#अर्थिक_साक्षरता
युपीआय पेमेंटला अनेकजण जीपे किंवा फोनपे का म्हणतात?
यूपीआय पेमेंट की भारत सरकारने दिलेली सुविधा खरच अनोखी आहे , आज जगात अनेक देश ही सुविधा आपल्या देशात चालू करावी यासाठी भारत सरकारला विनंती करत आहेत.यामुळे करस्वरूपात जमां झालेली रक्कम सरकारला मिळतेच त्यासोबत व्यवहारात पारदर्शकता येते, आणि यासाठीच ही सुविधा अनेक देशांना हवी आहे.
भारतात मात्र पेमेंट करायचे असल्यास मला जीपे कर , फोनपे कर, पेटीएम कर असे सर्रास म्हटले जाते ,यात आपले अज्ञान आहेच पण जाहिरातीमुळे हे शब्द म्हणजेच UPI पेमेंट असा अनेकांचा गैरसमज होतो.जसे ग्लूसाठी फेविकॉल आणि टूथपेस्ट साठी कोलगेट , कोपियर मशिनला झेरॉक्स शब्द प्रचलित झाला तसाच हा प्रकार आहे.त्यामुळे यापुढे जिपे किंवा फोनपे न म्हणता UPI पेमेंट म्हणुया, आपला upi नंबर शेअर करूया. आता फोनपे व पेटिंएम् प्लॅटफॉर्म फी म्हणून पैसे घ्यायला लागली आहे, भविष्यात गुगल पे देखील हा अतिरिक्त भार ग्राहकाकडून वसूल करायला लागेल.
आता काही मूलभूत प्रश्न
1)UPI पेमेंटसुविधा भारत सरकारने उभारली तर भारत सरकारचे काही ॲप आहे का?
उत्तर हो आहे आणि Bhim ॲप हे भारत सरकारने बनवलेले UPI पेमेंट ॲप आहे, सर्वात सुरक्षित आहे आणि आता तर क्रेडिट कार्ड लिंक करून आपण त्याद्वारे पेमेंट करू शकतो.या ॲपमध्ये आपला बँकेत दिलेला मोबाईल नंबर वापरून लॉगिन केले की तुमचे upi अकाऊंट बनवले जाते.जनरली तुमचा मोबाईल नंबर@upi असा तुमचा UPI ID बनतो,जो तुम्ही एखाद्याला पेमेंट करण्याआधी शेअर करू शकता.त्याचा QR कोड पण येतो जो तुम्ही स्कॅन करायला सांगू शकता किंवा व्हॉट्सॲप , ईमेल ने पाठवू शकता.तुमचा UPI I'd तुम्हाला हवा असा बनवू शकता.जसे की तुमचे नाव@upi असा आयडी बनवू शकता.सध्या भारत सरकारकडून कोणतेही चार्जेस घेतले जात नाही.
2)जर UPI मुळे बँक to बँक पैसे खात्यात ट्रान्स्फर होत असतील तर प्रत्येक बँकेचे काही असे ॲप असते का?
उत्तर हो आहे,प्रत्येक बँकेचे ,अगदी साध्या को-ऑपरेटिव्ह बँकेनेही ऑनलाइन व डिजिटल पेमेंट सुविधा ग्राहकांना मिळावी म्हणून स्वतची UPI सिस्टीम चालू केली आहे.काही बँकेनी स्पॉन्सर बँकेची UPI वापरून हा पर्याय चालू केला आहे. भारतात UPI पेमेंट करणाऱ्या बँका ज्या स्वतःसोबत इतर अनेक बँकेना स्पॉन्सर करतात त्या मुख्यत्वे १० बँक आहेत ,ज्यात HDFC bank, UCO bank, BANK OF BARODA, ICICI BANK, United Bank of India,SBI, bank of Maharashtra, Dena Bank, PNB bank, IDBI,GKSB या सर्वांची नावे येतात.
3) एखाद्याला आपल्याला पैसे पाठवायचे असल्यास काय करावे?
आपल्या बँकेत जो मोबाईल नंबर दिला आहे ,तो चालू हवा, BHIM ॲप किंवा कोणतेही upi ॲप उघडून (ज्यात बँक UPI किंवा प्रायव्हेट upi जसे जीपे किंवा फोंनपे, पेटीएम)त्यात आपल्या या मोबाईल नंबर रजिस्टर करा व OTP टाकल्यावर रजिस्टर होईल, काही ठिकाणी तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख ,बँक अकाऊंट नंबर व त्याचा प्रकार जसे बचत खाते किंवा चालू खाते असे विचारले जाईल ,माहिती भरून रजिस्टर करा.त्यांनंतर लॉगिन करा.
4) एखाद्याला पेमेंट करायचे असल्यास काय करावे?
ज्याला पेमेंट करायचे त्याचा UPI ID विचारून तो आपल्या बँकेच्या ॲप किंवा upi पेमेंट ॲप मध्ये टाका , send money म्हटले की किती रुपये व ज्याला ट्रान्स्फर करायचे त्याचा UPI ID अणि नाव दिसेल , ते त्या व्यक्तीशी कन्फर्म करूनच पेमेंट करावे. व्यक्ती समोर असल्यास चांगलेच, पण लांब असल्यास त्याला फोन करून एकदा खात्री करावी.
सर्वात सेफ उपाय .@निलेशजोशी आधी फक्त एक रुपया पाठवावा, तो त्याला मिळाल्याची खात्री करून मगच मग उरलेली रक्कम त्याच नंबरवर पाठवावी,म्हणजे चुकीच्या नंबरवर पेमेंट झाले तरी एक रुपयाच तोटा होईल व आपले इतर पैसे वाचतील.
5) एखाद्याकडून पैसे या असल्यास काय करावे?
रिसिव्ह मनी हा ऑप्शन वापरून त्या UPI id ला money request पाठवावी,समोरच्या व्यक्तीने ok म्हटले की तेवढी रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.
6) आपल्याला UPI पेमेंटमधून पैसे हॅक करून घेतले जाऊ शकतात,त्यावर उपाय काय?
मी खालील प्रकारे हा धोका टाळण्यासाठी काळजी घेतो. आपले मुख्य अकाऊंट कोणत्याही UPI पेमेंटला लिंक करू नका.त्या बँकेचा मोबाईल नंबर शक्यतो वेगळा ठेवा.@निलेशजोशी
दुसऱ्या एखाद्या बँकेचा अकाऊंट जिथे.कमी पैसे असतील किंवा CURRENT अकाऊंट असलेल्या बँकेचा लिंक असलेला मोबाईल नंबर वापरून upi अकाऊंट बनवा.त्यात(जास्तीत जास्त हजार किंवा दोन हजार) पैसे असतील असेच बघा .जास्त पैसे आल्यास आपल्या मुख्य बँकेत (UPI पेमेंट वापरून तुम्ही बँक अकाऊंट मध्येहिं पैसे ट्रान्स्फर करू शकता) ट्रान्स्फर करा. अगदी हॅकर्स तुमच्या UPI अकाऊंट पर्यंत पोचले तरीही अमाऊंट अगदी कमी बघून मेहनत घेत नाहीत.अगदी हॅक झालेच तरीही कमीत कमी नुकसान होईल असे पाहा.
- @निलेशजोशी
No comments:
Post a Comment