Tuesday, November 28, 2017

भगवंताची करणी

पारंपरिक अभंग

अधांतरी हे झुले नभांगण
शेष फणावरी धरणी
सारी भगवंताची करणी

लक्ष्मीसाठी घर दैवाचे
उंच बांधुनी देतो
गरिबांसाठी गरीब होऊनी
झोपडीतही रमतो
पतीतासंगे पतित होऊनी
चालतसे अनवाणी
सारी भगवंताची करणी

समुद्रा जरी अथांगपाणी
तहान शमवी श्रावण धार
अन्नब्रम्ह ते अखंड घेते
काळ्या मातीतून अवतार
जगण्यासाठी जरी मानवा
लाग प्रभूच्या चरणी
सारी भगवंताची करणी

Monday, November 13, 2017

हेरंब मिसळ

आम्हाला हेरंब उपहारगृह सुरू करून जवळजवळ ७ वर्ष झाली. आपण ही येथे अवश्य भेट द्यावी. आपले स्वागत आहे.....आमचा पत्ता १४५०, मातृमंदिर अपार्टमेंट, शुक्रवार पेठ, जनता बँक मुख्य शाखा बाजीराव रोड जवळ, शेवडे गल्ली, बँक ऑफ इंडिया शनिपार शाखेच्या समोर, पुणे ४११००२.

Saturday, November 4, 2017

विपश्यना मंगल गीत मराठीत

ना कोणाची हत्या आम्ही करू कधी
ना कोणाची चोरी आम्ही करू कधी
ना कोणाशी खोटे आम्ही बोलू कधी
ना कोणाला कटू आम्ही बोलू कधी
ना कोणाशी वाईट आम्ही बोलू कधी

आम्ही नेहमी सत्याचे पालन करू
आम्ही नेहमी पापापासून दूर राहू
आम्ही नेहमी शिलाचे पालन करू
आम्ही नेहमी मनाला ताब्यात ठेवू
आम्ही नेहमी हे चित्त निर्मळ ठेवू

वंदन माता पित्याना नित्य करू
वंदन गुरुजनांना नित्य करू
आम्ही नेहमीच सत्याचे पालन करू
आम्ही नेहमीच पापापासून दूर राहू

शिबिरार्थीला सप्रेम भेट
--मराठीकरण निलेश जोशी