Monday, January 27, 2014

आरसा

प्रतिबिंब दाखवतो तो आरसा
खोटे बोलणे टाळतो आरसा
तरीही माणुस फसवतो सर्वाना
वय झाकतो रंगवून केसांना

रंगरंगोटी करून तरुण बनताना
खुश होतो बेमालूम फसवताना
नकली रूप लेवुन बनवू इतराना
सत्य फ़क्त माहीती आपल्या मनाला

मग हीच सवय लागते मनुष्याला
जर बेमालूम फसवू शकतो आरश्याला
का नाही फसवू शकत समोरच्याला
पुन्हा वेढ्यात गुरफटुन घेइ स्वत:ला

अंतर्मन सांगत असते त्या वेड्याला
तू बदलला आहेस फसवून मनाला
आतून खुप प्रेम व आहे जिव्हाळा
तरी दाखवी का कठोर रूप जगाला ??

आरसा काय व काय आपले मन
शेवटी दोन्ही घडवतात स्व दर्शन
आरसा घडवी बाह्य रूप दर्शन
मन घडवी आत्म रूप दर्शन

माणूस एकच मग का व्यक्तिमत्व दोन ?
देहबोली व मनाची बोली का दोन ?
जेव्हा एकच बोलतील आरसा व मन
असाच निर्मळ व प्रेमळ माणुस तू बनं

-----निलेश जोशी

Thursday, January 9, 2014

किर्ती


कीर्ति

एकदा मेल्यावरी मी परतुनी आलो घरी
तेच होते दार आणि तीच होती ओसरी ।

होती तिथे तसबीर माझी भिंतीवरी टांगली
खूप होती धूळ आणि कसर होती लागली ।

द्रवलो तिला पाहून, होती शेवटी माझीच ती
दिसली मला पण आज माझ्या प्रेताहुनी निस्तेज ती ।

बोलली की हीच का, माझ्यावरी माया तुझी
गेलास ना टाकून, होती प्रत्यक्ष जी छाया तुझी ।

बोलली हे ही तुला का सांगावया लागते
मेल्यावरी जगण्यास वेड्या, खूप कीर्ति लागते ।

होऊनी स्वार्थांध नुसता, कैसातरी जगलास तू
आहेस का, केला कुठे, जगण्याविना पुरुषार्थ तू? ।

समजली ना, आता तरी, आपुली स्वत:ची पायरी
समजले ना काय मिळते, नुसती करूनी शायरी? ।

ओशाळलो ऐकून, नेली तसबीर मी ती उचलुनी
सांगतो ह्याची तिथे, चर्चाही ना केली कुणी ।

- भाऊसाहेब पाटणकर