Saturday, December 13, 2014

ईश्वर --एक गोष्ट

अकबर ने बीरबलला अचानक 3 प्रश्न विचारले
〰〰〰〰〰〰〰
प्रश्न होते
1)'ईश्वर कुठे राहतो?
2)ईश्वर कसा मिळतो
आणि
3) तो काय करतो?''

बीरबल हे अचानक प्रश्न ऐकून गड़बडून गेला व म्हणाला  ''जहाँपनाह! या प्रश्नांची उत्तरे उद्या देतो"

बीरबल घरी पोचला तेव्हा खुप उदास होता.ती उदासी बघुन जेव्हा मुलाने विचारले तेव्हा बिरबल म्हणाला

''बेटा आज अकबर बादशाहने मला एकावेळी तीन
प्रश्न विचारले आहेत
1)'ईश्वर कुठे राहतो?
2)ईश्वर कसा मिळतो
आणि
3) तो काय करतो?''
याची उत्तरे मला सुचत नाहीत व उद्या याची उत्तरे द्यायची आहेत.

बीरबलच्या मुलाने म्हटले ''पिताजी उद्या मला दरबारात घेवून जा व महाराजांना मी याची उत्तरे देईन

पुत्रहट्ट बघुन बिरबल दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात घेवून गेला

बीरबलला पाहून बादशाह अकबर ने म्हटले- ''बीरबल काल विचारलेल्या माझ्या प्रश्नांची उत्तरे दे

बीरबल म्हणाला
''जहाँपनाह आपल्या प्रश्नांची उत्तरे माझा मुलगा देईल

अकबर ने बीरबलच्या मुलाला पहीला प्रश्न विचारला  ''सांग"

'ईश्वर कुठे राहतो ?

बीरबलने विनंती केली महाराज एक पेला दूध साखर घालून आणावे आणल्यावर विचारले महाराज दूध कसे आहे?

अकबर ने दूध चाखले व म्हणाला गोड आहे

परन्तु बादशाह यात साखर दिसते का ?

बादशाह म्हणाले साखर नाही कारण ती दुधात विरघळून गेले आहे

बरोब्बर, जहाँपनाह!
ईश्वर सुद्धा जगात सर्व ठिकाणी आहे पण जशी साखर दुधात विरघळली आहे तसा ईश्वर सगळीकडे असून दिसत नाही

बादशाह आनंदीत होवून म्हणाला मग सांग ईश्वर कसा मिळतो ? मुलगा म्हणाला
''जहाँपनाह थोडे दही मागवाल का?

'' बादशाह ने दही मागवले मग बिरबल पुत्र म्हणाला

''जहाँपनाह! यात लोणी दिसते का?

बादशाह म्हणाला लोणी तर यात आहे पण मंथन केल्यावरच मिळेल

बिरबलपुत्र म्हणाला महाराज तसेच देव दर्शन साठी मंथन साधना तपत्चर्या करायलाच लागेल

बादशाह खुश झाला व म्हणाला आता अंतिम प्रश्न ईश्वर करतो काय?

बीरबलपुत्र म्हणाला - ''महाराज! यासाठी आपल्याला मला गुरु म्हणून स्विकारावे लागेल''

अकबर बोललाे- ''ठीक आहे, तुम्ही गुरू व मी तुमचा शिष्य।''

पुत्र म्हणाला - ''जहाँपनाह गुरू तर उच्चासनावर बसतात व शिष्य
खाली बसतो

'' अकबरने सिंहासन ख़ाली केले व स्वतः खाली बसला

बिरबलपुत्र स्वतः सिंहसनावर् बसला व म्हणाला हे आपल्या अंतिम प्रश्नाचे उत्तर आहे.

अकबर म्हणाला म्हणजे काय? मी समजलो नाही .

बालक म्हणाला- ''जहाँपनाह!
ईश्वर हेच तर करतो किंवा करण्याची क्षमता राखतो , क्षणात राजाला रंक व भिकरयाला राजा बनवू शकतो.

Sunday, December 7, 2014

कंन्टिन्यूटि ???

आपण चित्रपटात कन्टीन्यूटी शोधतो तसच जर जाहिरातीत पण शोधायची ठरवली तर खुप त्रुटी मिळतील
उदा* एका प्रसिद्ध डिटर्जेंट कंपनीची जाहिरात,
आजोबा (रमेश देव) नातवाला सांगताहेत आम्ही लवकर परत येवू
नातू हिरमुसलेला तेवढ्यात त्याला ऐकू येते आजोबा बूट शोधत आहेत
नातू पळत पळत जाउन बूट शोधतो
बुटाना पॉलिश नसल्याचे लक्षात येताच स्वतः पॉलिश करतो अर्थातच पूर्ण पांढरा टी शर्ट व पैंट पॉलिशने काळी झालेली
आजोबा तारीफ करतात तर आजी कौतुकाने सुनेला म्हणते तुझ्या हातांचे काम वाढले
सुन अर्थात मुलाची आई म्हणते टीशर्ट वरील डाग काढणे सोप्पे आहे (अशी कौतुक करणारी आई फ़क्त जाहिरातीच दिसते खरी मिळणे दुरापास्तच)

नेक्स्ट 4 सेकन्द ग्राफिक्स च्या माध्यमातुन डिटर्जेंटचे कौतुक (दहा हातांची शक्ती वगैरे)

पुढील फ्रेम मध्ये आजोबा आजी आई मुलगा बाबा घराबाहेर
बाबा गाडीत बॅग चढवण्याचा प्रयत्न करताहेत
मुलगा म्हणतो बाबाना पण हवी दहा हातांची शक्ती
हे म्हणताना त्याचा टी शर्ट एकदम पांढरा सफेद पैंट पण स्वच्छ
म्हणजे आईने दहा हातांची शक्ती वापरली
शर्ट पैंट धुतली वाळवली
आजोबा आजी 5-6 थांबले व सर्व नीट झाल्यावर प्रवास चालु करणार

धन्य ती जाहिरात व धन्य ते कंट्यूयूटी पाळणारे दिग्दर्शक

(हा एक विनोद म्हणून घ्यावा ,त्या मुलाकडे तसेच 2  शर्ट पैंट होते अश्या कॉमेंट करू नयेत हाहाहाहा)

---निलेश जोशी

Tuesday, December 2, 2014

Innovative story

एका तळ्यात एक कासव राहात होते. त्याचे दोन हंस मित्र होते.
BASIC WORKING TEAM

ते हंस आणि कासव रोज गप्पागोष्टी करीत असत. एकदा दुष्काळ पडल्यामुळे तळे आटून गेले.
CRISES SITUATION

सगळे पशुपक्षी तो दुष्काळी भाग सोडून गेले. पण कासवाचे हाल होणार हे लक्षात आल्यानंतर हंस खूप दुःखी होतात.

BRAINSTORMING &
INNOVATION

शेवटी कासव हंसाना एक उपाय सुचवतो, ''मी एक काठी आणीन. ती मधोमध मी तोंडाने पकडीन. तुम्ही त्या काठीच्या दोन्ही टोकांना चोचीने घट्ट पकडा आणि जवळपास कुठे पाण्याने भरलेले तळे असेल तेथे जाऊन राहू.'' त्याबरोबर हंस सांगतात, ''ठीक आहे तुझी कल्पना! आम्ही करू सर्व! पण तुझ्या बडबड्या स्वभावाची भीती वाटते. काही झालं तरी तोंड उघडायचं नाही. तोंड उघडलंस तर खाली पडून मरशील.''

PFMEA DONE BY TEAM
Control plan & SOP finalized

ठरल्याप्रमाणे दोन्ही हंस कासवाला काठीच्या साहाय्याने उडत घेऊन जाऊ लागले.
Process executed

तेवढ्यात एका नगरातील लोकांचे या विचित्र पालखीकडे लक्ष गेले. ते आपापसात बडबडू लागले. गोंगाट वाढत गेला.
Change havoc

हा गोंगाट ऐकून कासवाने हंसाला ''हा आवाज कसला?'' हे विचारण्यासाठी तोंड उघडले आणि खाली पडून कासव मरण पावले.

SOS / SOP not followed causes Saviour defects may be extreme Results like death

Impact on end Customer

तात्पर्य : RESPECT STANDARDS AND FOLLOW IT TO ACHIEVE CUSTOMER SATISFACTION

Monday, October 27, 2014

सत्कर्म करत रहा

सुप्रभात......!!!!

एक लोकांचा समूह चालत पर्यटनाला निघाला , वाटेत त्याना एक अंधारी बोगदा लागला ,बोगद्यात काहीच दिसत नव्हते व लोकांच्या पायाला काही खडे टोचू लागले काही लोकानी ते इतराना टोचू नये ,ईजा होवू नये म्हणून उचलुन खिशात ठेवायला चालू केले ,काहीनी जास्त उचलले तर काहीनी कमी उचलले,काही लोकानी विचार केला कशाला उचला मला त्रास झालाच ना तसा इतराना होइल त्यामुळे काहीनी उचललेलच नाहीत

जेव्हा ते बोगद्याबाहेर आले व खिशातून टाकण्यासाठी खडे बाहेर काढले तर ते अस्सल हीरे होते
त्यावेळी कमी उचललेले लोक हळहळु लागले की जास्त उचलले असते तर हीरे जास्त मिळाले असते
न उचललेले लोक पश्चाताप करू लागले
आपले जीवन पण या अंधारया बोगद्यासारखे असते व  खड़े म्हणजे भलाई किंवा सत्कर्म आहे
सत्कर्म हिरयासारखे बहुमोल व किमती आहे
जे करत नाहीत किंवा कमी करतील त्याना जीवनाच्या अंती खुप पश्चाताप होतो

-----आंतरजालावरून साभार

Saturday, September 20, 2014

अनसूया स्तोत्र

ज्या महिलांना विकार आटोक्यात नसल्याने षडरिपुंचा त्रास होउन पाय घसरण्याचा संभव असतो किंवा पूर्वी पाप घडल्यामुळे अपराधीपणाची भावना असेल त्यांनी परमपवित्र श्री अनसूया स्तोत्र म्हणावे
हे स्तोत्र कधीही बसून म्हणु नये श्री दत्तात्रेयांच्या मातु:श्रींचे हे दिव्य स्तोत्र आहे
उभे राहून आदराने व प्रेमाने म्हणावे
चारित्र्य रक्षण होते

।। अनसूयेचे स्तोत्र ।।

पतिव्रता शिरोरत्नभूता,सुंदरविग्रहा ।
सुचरित्रा,दिव्यतेजा ,सर्वलोक नमस्कृता ।।१।।

विष्णुप्रपौत्री,कपौत्री, सती,कर्दम पुत्रिका ।।
देवहूति,समुत्पन्ना,सुमुखी,कपिल स्वसा ।।२।।
8
अत्रिपत्नी,महाभागा,
दयाक्षान्त्यादिभूषीता ।।
अनसूया,वेदगेया,
निजधर्मजिताखिला ।।३।।

श्रीदत्तात्रयजननी ,चंद्रमाता, मनस्विनी ।।
दूर्वासोजनयित्री,सा,
जगत्संकटवारिणी ।।४।।

चतुर्विशति नामानि मंगलानि
पराणिच ।।
पावनान्यनसूयाया दत्तमातु:
पठेन्नर: ।।५।।

त्रिकालमेककालं वा
श्रद्धाभक्तिसमन्वित:।।
तस्यधर्मे रूचिर्दत्ते
भुक्तिर्मुक्ति क्रमादभवेत् ।।६।।

।।इति श्री वा.स. विरचितं अनसूया स्तोत्रम संपूर्णम ।।

Monday, September 8, 2014

चार वेदांविषयी थोडक्यात विवेचन


श्री स्वामी समर्थ
एका परिवारात वेदांवर वाचल्याचे आठवते. चर्चा ही आर्युवेदावर होती. त्या वेळी आणि काही जणांनी वेदावर काही माहिती मिळेल का असे विचारलेही...
काही वाचलेले आणि ऐकलेले आणि अभ्यासलेले असे आपल्या चारही वेदावरचे मोजके विवेचन माझ्याकडे आहे.

आज ऋग्वेद जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. थोडक्यात, ह्याबद्दलच्या माझ्या काही टिप्पणी खाली देत आहे.
================================
ऋग्वेदविषयी थोडेसे विवेचन

१) चारही वेदांमध्ये सर्वात अग्र असा हा वेद ह्याला आद्यवेद असेही म्हटले जाते. ज्या मंत्रांनी भगवंताची स्तुती केली जाते त्यास ऋग असे म्हणतात. उअश्या अनेक ऋग असलेलला वेद म्हणून त्यास ऋग्वेद हे नाव पडले.

२) पैल ऋषीनी (व्यास मुनींचे शिष्य) ह्या वेदाचे दोन भाग केले. एकास सुक्त असे म्हणतात आणि दुसऱ्यास मंडल असे ओळखले जाते. सुक्तात स्तुतीपर बरेच मंत्र आहेत. त्यास सुक्ते असेही म्हणतात. प्रत्येक सुक्तात साधारणपणे १० ते १३ मंत्र असतात. ऋग्वेदातील सूक्तांचे ऋषीसुक्त, देवतासुक्त, अर्थ सुक्त आणि छंदसुक्त असे प्रकार आहेत.

३) ऋग्वेदाचे वेगवेगळे अध्याय हे मंडल, अनुवाक, अष्टक, अध्याय, वर्ग ह्या नावाने सम्भोधले जातात.

४) संपूर्ण ऋग्वेदात १० मंडले, ८५ अनुवाक, १०१७ अष्टके, ६४ अध्याय आणि २०८ वर्ग आहेत. सर्व मिळून ऋग्वेदात १०,५८० मंत्र आहेत.

५) वेदांमध्ये प्रकरणाना छंद असे म्हणतात. ऋग्वेदात एकूण १५ छंद आहेत. त्यातील प्रमुख, गायत्री, उष्णिक, अनुस्तूप, पंक्ती, बृहती आणि जगती हे आहेत.

६) ऋग्वेद अग्नीसूक्ताने सुरु होतो आणि सज्ञानसूक्ताने संपतो.

"अग्नीमिळे पुरोहितम, यज्ञस्य देवमृत्वीजम, होतारं यज्ञधातारम" हा ऋग्वेदातील आद्य मंत्र आहे.

७) पुराणात काही ऋषीनी ऋग्वेदावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यांना ह्या वेदाचे द्रष्टे असेही म्हणतात. मंडल, गुत्समद, विश्वामित्र, वामदेव, अत्री, भारद्वाज आणि वसिष्ठ हे ते ऋषी होत.

८) ऋग्वेदाच्या एकूण २१ शाखा किंवा खंड आहेत. त्यातील मुख्य मानले जाणारे, शाकल, बाश्फल, आश्वलायन, शांखयानी आणि मांडूकेवी हे आहेत.

९) ज्या विद्येचे मूळ एखाद्या वेदात असते, म्हणजे जी विद्या त्या वेदाचा base असतो, त्यास वेदांच्या भाषेत उपवेद म्हणतात. ऋग्वेदाचा उपवेद "आयुर्वेद" हा आहे.

१०) आपण सर्वांनी महावाक्य हे नाव ऐकले किंवा वाचले असेल. महावाक्य म्हणजे, ज्याचा अभ्यास केला जातो आणि ते पुर्णप्रकारे अंगिकारले जाते त्यास महावाक्य म्हणतात. उदाहरणार्थ "अहम ब्रह्मास्मि" हे महावाक्य आहे.

ऋग्वेदात ऐतरेय नावाचे एक उपनिषद आहे. त्यात एक महावाक्य आहे ते असे " प्रज्ञानं ब्रह्म" ह्या वाक्याचा अभ्यास खूप रंजक आहे.

=================================

यजुर्वेदचा अभ्यास आणि त्याबद्दल थोडी माहिती

१) यजुर्वेदास "अध्वर्यूवेद" असेही नाव आहे. ज्या मंत्रांच्या अक्षरांचा अंत अनिश्चित असतो त्यास संस्कृत मध्ये "यजु" असे म्हणतात. त्यावरूनही ह्यास यजुर्वेद हे नाव पडले असावे असे ज्ञानीजणांचे मत आहे. धातुपाठाच्या प्रमादाप्रमाणे "यज" म्हणजे पूजा करणे असा त्याचा अर्थ आहे. ह्यावरून हे नाव पडले असावे असावी तर्क आढळतो.

२) ह्यातील बरेचसे मंत्र हे गद्य स्वरूपात आहेत.

३) यजुर्वेदाची व्याप्ती सांगताना "यजुरेक शतात्मकम " असे म्हटले जाते. म्हणजेच यजुर्वेदाच्या १०० शाखा आहेत. त्यापैकी ५ शाखा अत्यंत महत्वाच्या. १. कठ २, मैत्रायणी ३. आपस्थंभ ४. हिरण्यकेशी ५. वाजसनेयी.

४) यजुर्वेदाचे कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद असे दोन मुख्य भाग आहेत. याज्ञवल्क्य ऋषी हे शुक्ल यजुर्वेदाचे अधिपती आहेत. त्याना हा वेद सूर्याकडून मिळाला अशी मान्यता आहे. तर कृष्ण यजुर्वेदाचे अधिपती वैशंपायन ऋषी आहेत.

५) यजुर्वेदात वेगवेगळ्या संहिता (प्रकरणे) आहेत. थोडक्यात खालील प्रमाणे

वाजसनेयी संहिता: संपूर्ण अध्याय ४० ह्यात वैदिक धर्माचे कर्मकांड आहे.

काण्व संहिता : संपूर्ण अध्याय ४०. ह्याचे पाठीराखे बरेच आहेत. ते काण्व शाखीय ब्राह्मण म्हणून ओळखले जातात.

काठक संहिता: ह्यात ५ खंड आणि ३०९१ मंत्र आहेत

कपिष्ठल संहिता : ह्यात ८ अध्याय आहेत

मैत्रायणी संहिता: ह्यात ३१४४ मंत्र आहेत. ह्याच संहितेत, वाजपेय, अश्वमेध, राजसूय आणि सौत्रमणी ह्या यज्ञाचे विधी आहेत.

आपस्थब संहिता: ह्यात याजमान आणि पैरोडाश ह्या यज्ञाचे विधी आहेत. दक्षिण भारतातील काण्व द्रविड आणी उत्तर भारतातील गौड काण्व आणि महाराष्ट्रातील काण्व ब्राह्मण हे ह्याचे पाठीराखे आहेत. ऋग्वेदी ब्राह्मणापेक्षा यजुर्वेदी ब्राह्मणाची संख्या खूप जास्त असल्याचे हे कारण आहे.

६) आपल्या बहुतेक सर्व पूजा, हवन, यज्ञ, याग ह्याच्या विधीने यजुर्वेद सजलेला आहे.

७) "धनुर्वेद" हा यजुर्वेदाचा उपवेद आहे.

८) वाजसेनेयी शाखेच्या ब्राह्मणोप्निशदात बृहदारन्यक हे प्रकरण आहे त्यातच " अहं ब्रह्मास्मि" हे महावाक्य आहे.

=================================

आता थोडेसे सामवेदाविषयी....

१) कोणत्याही यज्ञातील तिसऱ्या विधीस उद्गाता असे म्हणतात आणि त्याचा मंत्रसंग्रह सामवेदात आढळतो. उद्गात म्हणजे योग्य स्वरात भगवंताचे मंत्र म्हणून त्यास आळवणे. म्हणून मंत्र गायनाला साम गायन असेही म्हणतात.

२) सामगायनाचे ५ प्रकार आहेत. प्रस्ताव, उद्गीत, प्रतिहार, उपद्रव आणि निधान. हे गायची एक विशिष्ठ पद्धत आहे. ते गानार्याना प्रस्तोता, उद्गाता, प्रतीहार्ता अशी नावे आहेत.

३) सामवेदाच्या सुद्धा १००० शाखा आहेत. पण त्यातील ३ अत्यंत महत्वाच्या त्या म्हणजे कौथुम, राणायनिय आणि जैमनीय. ह्यापैकी कौथुमी शाखा ही गुजरात मध्ये, राणायनिय ही शाखा महाराष्ट्रात तर जैमनीय ही शाखा कर्नाटकात मानली जाते. सामवेदात एकंदरीत १५४९ मंत्र आहेत. पण ७५ मंत्र सोडले तर बाकीचे सर्व मंत्र ऋग्वेदाचेच आहेत. ह्यामुळेच सामवेदाला ऋग्वेदाहून वेगळे समजत नाहीत.

४) आपल्या मंत्रांच्या समूहास आर्चिक असे नाव आहे. सामवेदात पुर्वार्चिक आणि उत्तरार्चीक असे दोन भाग आहेत आणी ह्यात अग्निविषयक मंत्र आहेत.

५) सामवेद हा गायनाचा पाठीराखा आहे. ह्यातील पुर्वार्चीकेत ग्रामगेय आणि अरण्यगेय असे दोन गायनाच्या प्रकारांचे विश्लेषणही आहे. सामवेद गानार्याना सामगायक असेही संबोधतात.

६) सामवेद हा गायनाची पुष्टी करतो. तलावकार ह्या उपशाखेत स्वर, ताल, लय, वाद्य ह्याचे अति सूक्ष्म असे वर्णन आहे. त्यावरून भारतीय संगीत प्राचीन काळी सुद्धा किती प्रगत होते ह्याची प्रचीती येते.

७) सामवेद हा ऋग्वेदातून आल्याने ह्याबाबत बरेच मतभेद आहेत.

८) गंधर्वविद्या हा सामवेदाचा उपवेद आहे.

९) सामवेदातील छांदोग नावाच्या शाखेत छांदोग्य नावाचे उपनिषद आहे. त्यातच "तत्वमसी" हे महावाक्य आहे.

=================================

आता शेवटचा वेद ज्यास अथर्ववेद म्हणून ओळखले जाते, त्याबद्दल थोडे बोलू या

१) ह्या वेदाच्या निर्मिती मागे एक आख्यायिका आहे. सर्वप्रथम ह्या वेदाचे नाव अथर्वान्गीरस असे आहे. ब्रह्मदेव सृष्टीउत्पत्ती साठी तप करताना त्यांच्या तप सामर्थ्यातून दोन ऋषी निर्माण झाले. एक म्हणजे भृगु ह्यांचेच दुसरे नाव अथर्वण आणि दुसरे म्हणजे अंगिरा ऋषी. ह्या दोघांनी हा ग्रंथ लिहिला (ब्रह्मदेवाचे ऐकून). म्हणून ह्याचे नाव अथर्वान्गीरस असे पडले.

२) आता हा वेद लिहित असताना, ह्या दोन महान ऋषीनी आपले काही मंत्र ह्या वेदात घातले. भृगुऋषी रोगनाशक मंत्रांचे द्रष्टे आहेत तर अंगिरा ऋषी शत्रूनाशक मंत्रांचे. त्यामुळे अथर्व वेद हा अश्या मंत्रांनी परिपूर्ण आहे.

३) संपूर्ण वेदात ५ प्रकारचे अत्यंत प्रभावशाली असे मंत्र आहेत आणि ते खालीलप्रमाणे
अ) रोग, हिंस्त्र पशु, पिशाच्च ह्यांची बाधा टाळणारे
ब) बुद्धी भ्रंश, क्षय, सर्पबाधा, कुष्ठ इत्यादी व्याधी निवारक मंत्र
क) मंत्र प्रयोग करणाऱ्या शत्रुंचा नाश करणारे मंत्र
ड) कुटुंबात शांती प्रस्थापित करणारे मंत्र
इ) दीर्घायुष्य, संतती लाभ करून देणारे मंत्र

४) धर्मशास्त्र, विवाह, राज्याभिषेक, मृत्यू इत्यादी बद्दलचे अनेक मंत्र ह्यात आहेत.

५) अथर्व वेदाच्या वीस कांडामध्ये ७३९ सुक्ते आहेत आणि ५८४९ मंत्र. ह्यातील १२०० मंत्र हे ऋग्वेदातील आहेत. ह्यात चार उपनिषदे आहेत, क्रमवार त्यांची नावे अशी... प्रश्न, मुंड, मांडुक्य, नृसिंह आणी तापिनी.

६) पहिल्या १३ कांडात जारण, मारण उच्चाटन ह्याबद्दल मंत्र आहेत. १४ व्या कांडात विवाह, १८ व्या कांडात श्राद्ध आणि २० व्या कांडात सोमयाग ह्या विधीबद्दल मंत्र आहेत.

७) अथर्व वेदाच्या ९ शाखा आहेत पण अति महत्वाच्या दोन त्या म्हणजे पैपलाद आणि शौनक. ह्या शाखांवर पाश्चात्य लोकांनी खूप संशोधन केले आहे आणि करत आहेत.

८)
) स्थापत्यशास्त्र हा अथर्ववेदाचा उपवेद आहे.

९) अथर्व वेदाच्या मांडुक्य उपनिषदात "अयआत्मा ब्रह्म" हे महावाक्य आहे.

ह्याबरोबरच चारही वेदांचे अत्यंत संक्षिप्त विवेचन पूर्ण झाले. खूप सदस्यांनी वेदान्वरची माहिती विचारली होती. माझ्या अल्पमतीस जमेल तशी थोडक्यात लिहून स्वामीचरणी सादर केली. स्वमिकृपेनेमुळेच आज चारही वेदाची माहिती पोस्ट करू शकलो.

                               ------साभार राहुल पिकळे

Tuesday, August 19, 2014

मी कोण??

एकदा एक मुलगी तिच्या वडिलांकडे आपल्या आयुष्याबाबत तक्रार करत होती, की एक प्रॉब्लेम संपला, की दुसरा सुरू होतो.

तिला आता या सगळ्याचा कंटाळा आला आहे.

व्यवसायाने शेफ असलेले तिचे वडील तिला काही न बोलता स्वयंपाकघरात
घेऊन येतात आणि काही न बोलता तीन पातेल्यांत पाणी उकळत ठेवतात. पाणी जरासे उकळल्यावर ते त्यातल्या एका भांड्यात बटाटा, एकात अंडे आणि एकात कॉफी घालतात.

दुसरीकडे त्या मुलीच्या तक्रारी सुरूच असतात. साधारण वीस मिनिटांनंतर वडील गॅस बंद करतात आणि बटाट्याला एका भांड्यात, अंड्याला दुसऱ्या भांड्यात आणि कॉफीला एका कपामध्ये ओततात.

मुलीकडे वळून विचारतात,
'बाळा, तुला समोर काय दिसते आहे?'

ती मुलगीदेखील वडील हे काय विचारत आहेत, म्हणून जरासे चिडून उत्तर देते,
'बटाटा, अंडे आणि कॉफी.'

ते मुलीला ती प्रत्येक वस्तू जवळून पाहायला सांगतात.

ती बटाट्याला हात लावते, तर तो मऊ झालेला असतो.
अंड फोडून पाहिल्यावर ते उकडून कडक झालेले असते.
ते तिला कॉफी प्यायला सांगतात. ती चवदार कॉफी पिऊन तिच्या चेहऱ्यावर समाधान येते.

वडील तिला समजावतात.
यातील बटाटा, अंडे आणि कॉफी या तिघांनाही गरम पाण्यातून खडतर प्रवास करावा लागला; पण त्याच्याशी प्रत्येकाने प्रत्येक वेळी सामना केला.

कडक आणि ताठ बटाटा गरम पाण्याला सामोरे गेल्यावर नरम
पडला.

आतून लिबलिबित, मऊ असलेले अंडे गरम पाण्यात पडताच बदलत गेले आणि बाहेर आले उकडलेले कडक अंडे;

पण या सगळ्यात कॉफीची कमाल आहे. ती गरम पाण्यात टाकल्याबरोबर तिने पाण्यालाच बदलले आणि त्यातून काहीतरी नवे पेय तयार झाले.

ते मुलीकडे वळून म्हणतात, 'आता विचार तू करायचा आहेस.

या तिन्हीपैकी तू कोण आहेस?'

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात संकटे, अवघड प्रसंग येतच असतात.
त्यांना सामोरे जाताना एकच महत्त्वाची बाब म्हणजे आपल्यावर त्यांचा कसा परिणाम होतो आणि
त्या परिस्थितीला आपण कसे तोंड देतो.

हे केवळ त्या मुलीच्याच बाबतीत नाही, तर आपल्या सर्वांनाही लागू पडते. आपण स्वतःला फक्त प्रश्न
विचारायचा,

'या तिन्हीपैकी मी कोण?'

Monday, August 18, 2014

बंडगार्डन नाव कसे पडले?

पुण्यातील बंडगार्डन एरिया सर्वाना माहितच आहे

आम्ही सर्व मित्र पुण्यात फिरताना नेहमी भंकस करायचो
एकदा बंडगार्डन स्टॉपवर उतरलो आणी मित्राने विचारले
"काय रे नीलू ,या भागाचे नाव बंडगार्डन का आहे ??"
क्षणभर मलाच प्रश्न पडला
पण मग भंकस म्हणून मीही सांगितले
"काय यार तुषार ,एवढे माहित नाही ??
अरे जेव्हा इंग्रज होते तेव्हा पुण्यात स्वातंत्र मिळवण्यासाठी चळवळी,उठाव चालु रहायचे
असेच एकदा पुण्याचा इंग्रज गव्हर्नर बायकोसहित या भागात आला तेव्हा एका बागेत उठाव,घोषणाबाजी चालु होती
तेव्हा त्या गवर्नरबाईनी आपल्या नवरयाला विचारले ,हे हनी, व्हाट ए मोब? धिस इज बंड इन द गार्डन

तेव्हापासून या भागाला बंडगार्डंन म्हणु लागले "

हे स्पष्टीकरण ऐकून आम्ही दोघेही बराच वेळ मनसोक्त हसत राहिलो

:):):):)

मजा जाऊ दया पण बंडगार्डन नावाची खरी स्टोरी अशी आहे की
या मुळा मुठा नदीचे पाणी अडवण्यासाठी छोटा बंधारा किंवा भिंत म्हणु हवे तर बांधलेली आहे
त्याला इंग्रजीत BUND म्हणतात
त्याजवळील बाग -Garden म्हणून तो परिसर बंडगार्डन

आहे की नाही मजेशीर नावाची गंमत ??

Saturday, August 16, 2014

तुझे भास पावसाचे

लिहा ओळीवर कविता - भाग ११७ या उपक्रमासाठी माझा प्रयत्न

ओळ - तुझे भास पावसाचे

स्वप्नमय दिस श्रावणाचे
पानांवरील दवबिंदुंचे
मनात अजुनही ताजे
तुझे भास पावसाचे

भास की अनुभव आपले
एकाच छत्रीतुन जाणे
दोघांचेही खांदे भिजलेले
सुखावह येणे पावसाचे

तकलादू छत्री म्हणुनी
बसथाबां आडोसा घेणे
भोवताली माणसे असुनही
आपले एकटेच असणे

पावसा थांबू नको तू
आवडले अवचित येणे
ओठी तिच्या हसू आले
देवून गेले नजराणॆ

पाउस ओसरला अन
आपण चालत निघालो
अजुनी दिसती नेत्री तिच्या
अल्लड भाव पावसाचे

पावसाला कुणी सांगितले
त्याच वेळी कोसळणे
हे तर जगनियंत्याचे
भासे रूप सुत्रधाराचे

----------निलेश जोशी

घोरकष्टोधरणस्तोत्रम

!! घोरकष्टोधरणस्तोत्रम !!

 
श्रीपाद श्रीवल्लभ त्वम् सदैव ।
श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ।।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। १।।

त्वम् नो माता त्वम् पिताऽऽप्तोऽधिपस्त्वम् ।
त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् ।।
त्वम् सर्वस्वम् नोऽप्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। २।।

पापम् तापम् व्याधिमाधिम् च दैन्यम् ।
भीतिम् क्लेशम् त्वम् हराऽऽशु त्वदन्यम् ।।
त्रातारम् नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ३।।

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता ।
त्वत्तो देव त्वम् शरण्योऽकहर्ता ।।
कुर्वात्रेयानुग्रहम् पूर्णराते ।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ४।।

धर्मे प्रीतिम् सन्मतिम् देवभक्तिम् ।
सत्संगाप्तिम् देहि भुक्तिम् च मुक्तिम् ।
भावासक्तिम् चाखिलानन्दमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ५।।

श्लोकपंचकमेततद्यो लोकमङ्गलवर्धनम् ।
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥ ६॥

!! इति परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्वामीमहाराज विरचितं घोरकष्टोधरणस्तोत्रम सम्पूर्णम् !!