Wednesday, June 19, 2013

गप्पा

आमच्या डिप्लोमा मित्रांचा whatsapp वर ग्रुप बनवला
त्यावेळी डोक्यात होते की पूर्ण ग्रुप नाही पण जेवढे आता आहेत तेवढे गप्पा मारू आणी शेरिंग करू
ग्रुप तयार झाला त्यावेळी सर्वाना गेट टुगेदर करायचे वेध लागले होते त्यामुळ गप्पाना ओघ आला होता
मेसेज चा महापुर म्हटला तरी चालेल कारण 2-3तासानंतर जरी whatsapp चालू केले तरी 100-150 मेसेज आधी वाचुन संपवायचे आणि मग त्यावर कमेन्ट करायच्या
एकदम धमाल खुप मजा पण यायला लागली

गेट टुगेदर झाले त्यानंतर मात्र मेसेजला गळती लागली

वाटले की उत्साह संपला वाटते ग्रुप मध्ये गप्पा मारण्याचा पण त्यानंतर पण गप्पा चालूच राहिल्या कधी एकमेकाना शिव्या घालणे ,एकमेकांची ऊणी दूणी काढायची ही कामे रोजचीच

पण या गप्पामधुन एक वेगळीच उर्जा मिळते रोजच्या रोज
जुन्या काळी जे सण समारंभ याच साठी असायाचे की त्या निमित्ताने सर्व मित्र परिवार एकत्र येइल, शेरिंग होइल ,गप्पा होतील ,विषयांचे आदान प्रदान होइल
गप्पा आणि गप्प एकदम एकसारखे शब्द पण एकदम भिन्न गोष्टी
गप्पा मारताना गप्प बसणे मुश्किल आणि गप्प बसणार्याशी एखादा गप्पा मारण्याचा विचार पण नाही करणार
गप्पा शब्दाची व्युत्पत्ति पण कशी झाली असेल तर काही लोक एकत्र येवून खुप बोलत असतील ,बडबडत असतील तेव्हा ज्याला असह्य झालाय हा गोंगाट असा माणुस ओरडला असेल अरे गपा
म्हणजे गप्प बसा
अर्थात हा माझा अंदाज आहे तेव्हा सप्रमाण पुरावा माझ्याकडे काहीही नाही
जुन्या काळी चावडीवर सर्व लोक जमून गप्पा मारायचे त्यालाच मग गावगप्पा म्हणायला लागले

काळ बदलला आणि कम्पूटर आणि इंटरनेट मुळे माणसाच्या गप्पाना नविन माध्यम मिळाले
मला आठवतय की साधारण 1998 पासुन इंटरनेट सायबर केफे मधून सर्वासामान्यांच्या आवाक्यात आले अर्थात तेव्हाही 15रु प्रति तास इंटरनेट असुनही ईमेल व याहू मेसेंजर वरुन तासंतास गप्पा मारनारे ग्रुप तयार झाले
अनोळखी माणसाशी गप्पा मारण्याचा याहू मेसेंजर सारखा मिडिया लोकप्रिय व्हायला लागला होता
सोबत होटमेल Icq रेडिफबोल सारखे नविन मेसेंजरही होतेच
नंतरच्या 4-5 वर्षात प्रत्येकाच्या हातात मोबाइल आला आणि sms हा गप्पा मारण्याचा नविन फंडा मिळाला जो 2008 पर्यन्त कौलेज तरुण वर्गाचा आवडता साधानान्पैकी एक झाला
2011 2012 उजाडले आणि एंड्राइड युग चालु झाले
माणुस आधुनिक झाला हातात स्मार्टफोन आणि लैपटॉप आला तसा गप्पा मारण्याचा मिडिया पण मोठा झाला
फेसबुक ,ट्विटर ,gtalk,whataapp ही आताची साधने म्हणजे गप्पा मारण्याची नवी ठिकाने ,अड्डे ,चावडी होउ लागली
फेसबुक तर जुन्या मित्राना शोधून पुन्हा त्यांच्याशी नाळ जोड़ण्याचा आणि गप्पा मारण्यासाठी like comment करणारे मित्रही वाढले
A जर b चा मित्र आणि b असेल c चा मित्र तर आपोआप a हा c चा मित्र व्हायला लागला

नविन आलेले wechat किंवा hangout सारखे अप्प्स तर voice chat व video chat सारख्या सुविधा फुकट मध्ये द्यायला लागलेत
viber ,skype सारखे अप्प्स मुळे कितीही लांब व्यक्तिशी कमी खर्चात गप्पा मारण्याची सुविधा मिळाली

साधने वाढली पण त्यामुळे खरच गप्पा वाढल्या??
नात्यांमधली दरी भरायला ह्या गप्पा उपयोगी ठरायला लागल्या का?
पूर्वी घराघरात दिसणारा संवाद या नविन माध्यमांमूळे वाढला की बिघडला???

उत्तरे व्यक्तिसापेक्ष वेगळी असतीलही
पण जेवढी माध्यमे वाढली तेवढया पटित गप्पा आणि संवाद कमी झाला हेही तेवढेच सत्य आहे

जगाला कवेत घेत जगाशी गप्पा वाढल्या असतीलही पण एकत्र जेवताना घराच्यान्शी मारलेल्या गप्पा शुन्य झाल्यात आणि हीच खंत आहे आपल्या वडीलधारर्यांची
कामावरून घरी आल्यावर चहा घेता घेता आईशी, बायकोशी गप्पा मारणे कमी झालय
आपल्या मुलाशी बोबड्या भाषेत गप्पा मारण्यापेक्षाही महत्वाचे ठरते ट्विट्स आणि फेसबुक अपडेट्स

दूरचा मित्र काय करतोय हे अपडेट्स मिळतात पण शेजारी आजारी असून होस्पिटलमध्ये एडमिट आहे हे समजायला आठवडा जातो

जग जवळ आले म्हणतात पण मने मात्र खुप दूर जायला लागली आहेत
हीच धोक्याची घंटा वाजायला लागली आहे असे वाटायला लागले आहे
माध्यम वाढूनही गप्पांचे रूपांतर गप्प मध्ये होते काय??
जर असे असेल तर प्रत्येकाने गप्पा आपल्या घरातल्या माणसापासून सुरु करायला हवे

मग काय मित्रानो पटले ना????

-- निलेश जोशी

Sunday, June 16, 2013

पाउस

पाउस

येणार येणार चर्चा चालु असतानाच मुसळधार आला पाउस
आसमंतातुनं असलेली उन्हाची काहिली विझवून आला पाउस

घाम आलाच होता अंगावर थंडावा द्यायला आला पाउस
माझे अंग शांत करण्या अवघे जलचक्र फिरून आला पाउस

पडणारे थेम्ब पावसाचे म्हणजे त्याचा घाम तर नव्हता ना??
माझ्या डोळ्यांच्या खालचा थेम्ब माझा अश्रु तर नव्हता ना??

कुणास ठाउक कोणासाठी आला पण पाण्याचे वरदान घेवुन आला पाउस
कोरड्या धरणात लघुशंका होवू नये म्हणून धरणे तुडूम्ब भरायला आला पाउस

चला आता आम्ही आत्म्क्लेश करायला नको म्हणून खुश
सामान्य जनता वण वण करायला नको म्हणून खुश
गाई गुरे चवचवित चारा खायला नको म्हणून खुश
बिचारा सर्वांच्या अगणित अपेक्षा पूर्ण कराया आला पाउस

निलेश जोशी

जागतिक वडिल दिवस

आज जागतिक वडिल दिवस
त्या अनुषंगाने विचार करतानाच लक्षात आले की
आज मी पण एका मुलाचा बाप आहे की,
कालचक्र किती वेगाने फिरते ना??

मागच्या वर्षापर्यंत एक मनाला दिलासा होता की बाबा आहेत आपल्याबरोबर काहीही झाले तरीही आधार द्य्यायाला जे आज माझ्याबरोबर नाहित
पण तीच वडिल पणाची जबाबदारी देवून गेल

या विचारातच आठवले की उद्यापासून माझ्या मुलाची शाळा चालु झाली की लगेच त्याची तयारी चालु केली
पुस्तकाना कवर्स घालून बैग तैयार करून ठेवणे
माझ्या बाबानी असे कधीच केले नाही माझ्यासाठी अर्थात त्याना करावेही लागले नसते कारण एकत्र कुटुंब असल्यामुळे माझी बहिणी भाऊ या कामात मदत करणार हे ग्रुहिताच होते

पण माझ्या मुलाला कोण करणार मदत अशी ??
आई बाबा हेच त्याचे विश्व

आणि हीच जबाबदारी खुप मोठी आहे असे वाटायला लागलेय कारण नर्सरी साठी जो पिल्याला अभ्यासक्रम दिला आहे जो मी 2-3 इयत्तेत जाइपर्यन्त पुरला होता
खरच जग खुप गतिमान झालय
माझाच वेग कमी पडतोय की काय??

ध्येय असेल तर अडचणी ही असणारच
या अडचणी वर मात करण्यासाठी बाबा मला शक्ति दया
या वडिल दिवासानिमित्त तुमच्या पिल्ल्लाला दयाल ना एवढा आशीर्वाद???

मालवणी भाषा ---सुरेख म्हणी


मालवणी ही मराठी भाषेची उपभाषा आहे. ही कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बोलीभाषा आहे. मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषेत बरेच नाट्यप्रयोग केले आहेत. ऐकण्यास मधूर अशी ही भाषा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य आहे.
मालवणी माणूस फणसासारखा म्हणजे वरून काटेरी पण आतून खूप गोड आणि रसाळ असतो, हे मालवणी माणसाचे वर्णन खालील कवितेत मांडले आहे.
मालवणी माणसा प्रेमाची भूकेली, शाबासकीचो दोर घेवन माडार चढतली, चढता चढता मधेच खाली पडतली, तोंडार आपाटली तरी ही ही करतली स्वतः भुकी रवतली, पावन्याक जेवक घालतली, कोकम मिश्यांका लावतली,तूप खालय म्हनांन सांगतली, हजार रुपयाची वस्तू धा रुपयाक मागतली, मिळाली नाय ती खराब म्हणान सांगतली, गणपतीत जोरात आरती-भजना गातली, शिगम्याक जोशात सोंगा नाचवतली, दशावतारी नाटक बघीत थयच पसारतली, जात्रेचा खाजा चार दीस खातली, मालवणी माणसा ही अशीच रवतली, फसली गेली तरी नाय म्हनतली, हसणार्‍याक रडयतली,रडणार्‍याक हसवतली, गुणगान करता करता मधीच गाळीय घालतली.

मालवणीतील म्हणी [संपादन]

मालवणी भाषेत काही सुरेख म्हणी आहेत. खाली काही म्हणी उदाहरणादाखल दिलेल्या आहेत.
  • येवाजलला साधात तर दळीदार कित्याक बाधात
  • लिना लिना नी भिकार चिन्हा
  • वसाड गावात एरंड बळी
  • वेताळाक नाय बायल, भामकायक नाय घोव
  • सरकारी काम, तीन म्हयने थांब
  • सरड्याची धाव वयपुरती
  • सात पाच रंभा नी पाण्याचा नाय थेंबा
  • हयरातय नाय नी माशातय नाय
  • हळ्कुंडाच्या पदरात शेळ्कुंड
  • हात पाय र्‍हवले, काय करु बायले
  • हो गे सुने घरासारखी
  • देणा नाय घेणा आणि कंदिल लावन येणा
  • करुन गेलो गाव आणि .... चा नाव
  • काप गेला भोका रवली
  • कावळो बसाक फांदी मोडाक
  • मोठ्या लोकंची वरात आणि हगाक सुद्धा परात
  • हगणार्‍याक नाय तरी बघणार्‍याक होई लाज
  • कापाड न्हेला बायन आणि चींधी नेली गायन
  • गावकारची सुन काय पादत नाय?
  • कपाळार मुकुट आणि खालसुन नागडो
  • कोंबो झाकलॉ म्हणान उजवाडाचा रव्हत नाय
  • दोडकार्‍याचा कपाळात तिनच गुंडे
  • केला तुका - झाला माका
  • कोको मिटाक जाता मगे पावस येता
  • करुक गेलं गणपती आणि झाला केडला
  • कशात काय आणि फटक्यात पाय
  • आपला ठेवा झाकान आणि बघा दुसऱ्याचा वाकान
  • दिस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती
  • आवस रडता रोवाक आणि चेडू रडता घोवाक
  • करून करून भागलो आणि देव पूजेक बसलो
  • जेच्या मनात पाप तेका पोरा होती आपोआप
  • जेच्या खिशात आणो तो म्हणता मीच शाणो
  • जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाय
  • फूडचा ढोर चाल्ताला तसा पाटला
  • भेरा म्हणता तेरा आणि माजाच तूनतुना खरा
  • आपली मोरी आणि मुताक चोरी?
  • हाडाची काडा आणि बोच्याचा तूनतुना
  • गायरेतले किडे काय गायरेतच रवनत नाय
  • आवस सोसता आणि बापूस पोसता
  • आंधळा दळता आणि कुत्रा खाता
  • अंधारात केला पण उजेडात इला
  • कायच नाय कळाक - बोको गेलो म्हाळाक
  • एक कानार पगडी आणि घराक बायल उघडी
  • येळार येळ - शीगम्याक खेळ
  • घरासारखो गुण, सासू तशी सून
  • चल चल फुडे तीन तीन वडे
  • चव नाय रव धनगरा पोटभर जेव
  • चुलीतला लाकूड चुलीतच जळाक होया
  • शेजारणीचा रस्सा आणि पोळयेचा काढून बसा
  • उडालो तर कावळो बुडलो तर बेडूक
  • मडकेत कडी पाटी जीव ओढी
  • घरणी बरोबर वाकडा ता खायत चुलीतली लकडा
  • पडलो तरी नाक वर
  • एक मासो आणि खंडी भर रस्सो
  • खिशात नाय दमडी आणि खावची हा कोंबडी
  • धाक नाय दारारो, फुकटचो नगारो
  • तरण्याक लागली कळ आणि म्हाताऱ्याक इला बळ
  • वसावसा खान आणि मसणात जाणा
  • दुकान नाय उघडला, तो इलो उधारेक
  • नावाजललो गुरव देवळात हगलो
  • राती राजा आणि सकाळी कपाळार बोजा
  • डाळ भात लोणचा कोण नाय कोणचा
  • देव गेल्लो हगाक आणि ह्यो गेल्लो अक्कल मागाक
  • तुमचा तुमका आणि खटपट आमका?
  • गाढवा गुळ हगती तर घोरपी भीक कित्या मागती?
  • सुने आधी खावचा, लेकी आधी लेवचा
  • वरये दितय तुका गावकार म्हण माका
  • शेजारी पाजारी मड्याक आणि पावणे सोयरे वड्याक
  • बघून बघून आंगण्याची वाडी
  • अरदो मिरग सारण गेलो आणि म्हारणीच्या झिलान उतव बांदलो
  • कोणाची जळताहा दाडी आणि तेच्यार कोण पेतयता इडी
  • बारशाक वारशी नसाय आणी अवळात बसलो देसाय
  • पानवेलीच्या धर्मान शेगलाक पाणी
  • बघता वडो मागता भजी
  • आवशीक खाव व्हरान
  • बापूस लक्ष देयना आवस जेवक घालीना
  • बोच्यात नाय दम आनी माका म्हणा यम
  • आकाडता बापडा, सात माझी कापडा
  • आयत्यार कोयत्ये
  • आळशी उटाक आनी शिमरा शिंकाक
  • इतभर तौसा नी हातभर बी
  • कुल्यापाटी आरी नी चांभार पोरांक मारी
  • कोणाच्यो म्हशी नी कोणाक उठा बशी
  • खळ्यात मुतलला आनी जावयाक घातलला सारख्याच
  • खांद्यार बसयलो तर कानात मुतता
  • खुळा भांडता वझरा वांगडा
  • खेकट्याक मेकटा
  • गजालीन खाल्लो घोव
  • गाबत्याक गोरवा आनी भटाक तारवा सांगलीहत कोणी?
  • गावता फुकट भाकरी तर कित्याक करु चाकरी
  • गावला तेचा फावला
  • गावात लगीन नी कुत्र्याक बोवाळ
  • चुकला माकला ढॉर धामपुरच्या तळ्यात
  • तुका नको माका नको घाल कुत्र्याक
  • दिसला मडा, इला रडा
  • देणगेसारख्या घोरीप
  • नदी आधी व्हाणो, कढलल्यो बर्‍यो
  • नाय देवच्या भाषेक बोंडगीचे वाशे
  • नालकार रडता म्हणान त्यालकार रडता
  • पादर्‍याक निमीत पावट्याचा
  • पानयात हगलला काय दडान र्‍हवाचा नाय
  • पावळेचा पाणी पावळेक जाताला
  • पिकला पान घळतलाच
  • पोरांच्या मळणेक बी नाय भात
  • भोपळन बाय पसारली नी पाटचे गुण इसारली
  • मिठाक लावा नी माका खावा
  • मेल्ल्या म्हशीक पाच शेर दूध
  • मोव थय खोव
  • येरे दिसा नी भररे पोटा
  • आगासली ती मागासली पाठसून इलेली गुरवार रवली
  • आसलो पाडो तरी म्हणायचो रेडो जो तो म्हणता माझोच मोठो लवडो
  • बोच्याची झाली वाटी तरी माका म्हणा नटी