Tuesday, December 1, 2015

हतबलतेवर उपाय

दैनंदिन आयुष्यात अनेकदा मनुष्य परिस्थितीशी लढता लढता हतबल होतो. प्रत्येक वेळी अपयश येत रहाते. प्रकट आणि गुप्त शत्रूंची संख्या वाढत जाऊन त्यांच्या कारवायांनी हताश झाल्यासारखे वाटते. स्त्रीयांना काही वेळा त्यांच्या व्यावसायिक, नोकरीक्षेत्रात विकृत व्यक्तींशी संपर्क येतो...थोडक्यात जेव्हा सबंध जग विरोधात गेल्यासारखे वाटते तेव्हा....
श्रीदूर्गासप्तशतीमधील खालील मंत्र तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणू शकतो. रोज सकाळी आंघोळी नंतर खालील मंत्राचा जप देवी/कुलस्वामिनीचे स्मरण करून एकाग्रचित्ताने (न मोजता) सलग १५ ते २० मिनीटे करावा. हाच क्रम रात्री झोपण्यापूर्वी हातपाय धुवून पुनश्च आचरावा. सबंध दिवसभरातही या मंत्राचा जप अधुनमधुन करत रहावा. या मंत्राचा संबंध शुध्द भक्तिभावाशी आहे त्यामुळे यास कोणतीही बंधने नाहीत. केवळ शुक्रवार आणि मंगळवारी शक्यतो देविमंदीरात जाऊन प्रार्थनापूर्वक दर्शन घेणे अपेक्षित आहे..मंत्राचा जप करताना सकारात्मकता, देविवर श्रध्दा असावी. संकटमुक्तीनंतरही रोज कृतज्ञता म्हणून निदान २१ वेळा तरी मंत्रजप करत रहावा.

मंत्र :- "रक्षांसि यत्रोग्रविषाश्च नागा
यत्रारयो दस्युबलानि यत्र |
दावानलो यत्र तथाब्धिमध्ये
तत्र स्थिता त्वं परिपासि विश्वम् ||"

उच्चारणास सोपी फोड :-

रक्षांसि यत्रोग्र-विषाश्च-नागा
यत्रारयो दस्यु-बलानि यत्र |
दावानलो यत्र तथाब्धि-मध्ये
तत्र स्थिता त्वं परिपासि विश्वम् ||

Sunday, November 22, 2015

anagha gadgil catering

रसना स्नँक्स अँन्ड केटररर्स  आनंद नगर सिंहगड रोड येथे समर्थ पार्क शॉप नं ७,९, १० येथे आहे रोज चालु असते राइस प्लेट ८० रु  रोज स. ११ ते ३ संध्या . ७ ते १० वेऴ असते रोज भाज्या कोशींबीरी वेगळ्या असतात भाकरीचे ३ प्रकार असतात

Saturday, November 21, 2015

शो मस्ट गो ऑन

"जिथून परत फिरने संभवत नसते,
तिथून पुढेच गेले पाहीजे".

आपल्या जीवनात अश्या बऱ्याच घटना घड़तात , ना त्या रीवाइंड करून दुरुस्त करू शकतो ना त्यावर जास्त विचार करून वेळ खर्ची करू शकतो तसा केला तर आपण जगाच्या मागे राहू किंबहुना हांतावर पोट असणाऱ्या आपण मध्यमवर्गीय लोकांना हे शक्यच नाही.

मुंबई बॉम्बस्पोट दंगली आता पॅरिसला झालेला दहशदवाद सगळे खरय पण शोक म्हणून काम थाम्बवायला वेळ नाहीये इथे कोणाला
याला मग जग म्हणोत मुंबई स्पिरिट वा फिनिक्सीअन संस्कृती
फीनिक्स पक्षी जसा राखेतून जन्म घेतो तसाच माणूस कितीही भयानक परिस्थितीतून उभारी घेतोच
काय व्हायचे ते होउ दे चलते रहो! बढ़ते रहो! हसते रहो !
काळ कुणासाठी थांबत नाही तू सुद्धा कुणासाठी थांबू नकोस हे आजच्या युगाचे जनरेशनचे चित्र आहे
हर हाल में लक्ष को पाना है त्यासाठी बिकट परिस्थितीतून पुढे पाऊल टाकायलाच हवे

whatever it is ,lets face it , welcome to the generation of Phynixions

१९९९ च्या विश्वचषकादरम्यान सचिनचे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले होते. ही बातमी ऐकताच सचिन मुंबईत परतला आणि त्यावेळी सचिनशिवाय खेळताना भारतीय संघाला झिम्बाव्वेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण संघाची गरज ओळखून सचिन इंग्लंडला रवाना झाला आणि त्यानंतरच्या सामन्यात शतक झळकावित शो मस्ट गो ऑन चा प्रत्यय साऱ्या जगताला दिला होता व वडीलांना एक अनोखी श्रद्धांजली वाहीली होती.

शो मस्ट गो ऑन मित्रांनो हेच सत्य आहे

- निलेश जोशी

Wednesday, October 21, 2015

दसरा संकल्प

दसरयाचे तात्पर्य सदैव सत्याची जीत
गड तुटेल असत्याचा करा सत्याशी प्रीत

सत्याच्या मार्गावर लाखो असतील काटे
न थांबता चालत राहू काटे होतील फुले

क्रोध, कपट, कटुता, कलह, चुगली अत्याचार
दगा, द्वेष, अन्याय, छळ, रावणाचा परिवार॥

राम चिरंतन चेतना, राम सनातन सत्य।
रावण वैर-विकार, रावण हे दुष्कृत्य॥

वर्तमानातील दशानन, म्हणजेच भ्रष्टाचार।
दसरयादिवशी करू सर्व आपण याचा संहार॥

--निलेश जोशी

Sunday, September 27, 2015

वर्दी

वर्दीतील तुकाराम हवालदार आज सकाळ पासून चिड़चिड़ करायला लागला , कारणही तसेच होते , गणेश उत्सवात लागणाऱ्या बंदोबस्तासाठी साठे साहेबानी त्याची रजा नामंजूर केली होती .
म्हणजे यंदा पण सपत्नीक गावी गणपतीला जायचा मनसूबा रद्द करायला लागणार , गावी गणपतीला जायचे स्वप्न पुनः एक वर्ष पुढेच जाणार.
तुकाराम मालवणकर एकदम शांत शिस्तप्रिय व मनमिळावू गृहस्थाला चिड़चिड़ा पाहिल्यावर सर्व चकित झाले .
त्रागा कमी व्हावा म्हणून चहा प्यायला अण्णा च्या टपरीवर तुकाराम आला व चहा पिता पिता बायकोचे शब्द कानात घुमू लागले , 4 वर्षापुर्वी मूल होत नव्हते म्हणून गावच्या गणपतीला नवस केला व नंतर प्रताप झाला पण नंतरच्या एकाही वर्षी तो केलेला नवस गणपतीला जाउन अजुन फेडता येत नाहीये व कदाचित त्यामुळेच प्रतापच्या प्रगतीत अडथळे येतात ते त्यामुळेच ,
म्हणून यंदा काहीही झाले तरी गावी जायचेच व नवस पूर्ती करायचीच ,
"च्यायला वर्दी घातली की लोकांसाठी जगा , आम्हाला हाये काय इच्छा व पोरंबाळ , यंदा पण सुट्टी कॅन्सल , आता घालतली बायल गाळी आणि गावाहुंन बाबा पण"
अण्णा ऐकून त्याला म्हटला "गणपती हाये तुक्या काळजी घ्यायला , या वर्षी नाय पुढल्या वर्षी जा "

तुकाराम तेथून निघाला ,"हाये गणपती काळजी घ्यायला म्हणे , साला सगळीकडे ऎडजेस्टमेंट करा , उत्सवात लोक मजा करणार आणि आम्ही आहोत दिवस रात्र पहारा देवून याना संरक्षण द्यायला , एवढा करून हे आम्हाला मित्र समजत नाहीच  "
याच तणतणीत व त्राग्य्यातपोलिस स्टेशनकडे जाताना तुकारामला एका उभ्या सूमो गाडीत संशयास्पद अशी माणसे दिसली पण त्याने थोडावेळ तिकडे लक्ष दिलेच नाही , मनात म्हटला "ह्यांच्यासाठी यांच्या सुरक्षेसाठी मरा 14-15 तास रोज , पण एवढे करून आपल्याला सुख नाहीच "
10 पावले चालल्यावर मात्र तुकाराम मधील पोलिस जागा झाला , त्याने लगेच  गाड़ी नंबर लक्षात ठेवला व वॉकी वरुन साठे साहेबाना कळवले
साठे साहेबानाही गांभीर्य समजले  व त्यानी कुमक घेवून येतो हे कळवलेही
थोड्याच् वेळात सर्व प्रयत्नाअंती ती गाड़ी पकडण्यात पोलिसांना यश आले , त्या गाडीत मिळालेली टोळी ही लहान मुलाना किडनैप करणारी टोळी होती व वांटेण्ड होती, आजच तसे आदेश सर्व पोलिस स्टेशन ला देण्यात आले होते व तुकाराम मुळे 3 तासांच्या आत ती टोळी गजाआड़ होती,

साठे साहेबानी सर्व स्टाफला बोलावून कौतुक केले व तुकारामच्या हजर जबाबीपणाचे विशेष कौतुक केले आणि शाबासकी म्हणून गणेश चतुर्थी तील 5 दिवसांची सुट्टीही मंजूर करून टाकली ,

हायसा व आनंदी झालेला तुकाराम घरी जाताना पुनः अण्णाच्या टपरीवर गेला व त्याला पूर्ण समाधानी , आनंदी पाहून अण्णा त्याची ख़ुशी समजून गेला , आणि तुकारामला म्हणाला "काय हाये ना बाप्पावर विश्वास ?"
तुकाराम मनोमन बाप्पाला नमस्कार करून म्हटला "हायेस बाबा माझ्या पाठीशी , बाप्पा मी येणार यंदा दर्शनला , आता प्रतापच्या प्रगतीचेही मार्ग खुले कर, गणपती बाप्पा मोरया "

(लघु-वृत्तीदर्शन....कमीत कमी शब्दात प्रसंग आणि त्यातून मनुष्याच्या स्वभाव व वृत्तीचे दर्शन करण्याचा एक साहित्यप्रकार)

-- निलेश जोशी

Monday, September 14, 2015

षोडशोपचार गणेश पूजा

पार्थिवगणेशपूजा प्रारंभ:-
द्विराचम्य प्राणायामं कृत्वा। इष्टकुलस्वाम्यादि देवतानां फल-तांबूलानि प्रदानं कृत्वा।  ज्येष्ठां नमस्कृत्य।

ॐ श्रीमन्महागणपतये नम:॥
इष्ट,कुल,ग्राम,वास्तु,गुरू देवताभ्यो नम:॥
सुमुखश्चैकदंतश्च……॥

श्रीमद्भगवतो महापुरुषस्य....शालिवाहनशके मन्मथ नामसंवत्सरे, दक्षिणायने, वर्षा ऋतौ, भाद्रपद मासे, शुक्लपक्षे, चतुर्थ्यां तिथौ (रात्री १०:१९पर्यंत), बृहस्पति वासरे, स्वाती (उत्तररात्री १:३१पर्यंत) दिवस नक्षत्रे, तुला (अहोरात्र) स्थिते वर्तमाने चंद्रे, सिंह स्थिते श्रीसूर्ये (दु.१२:१८नंतर कन्या), सिंह स्थिते श्रीदेवगुरौ, वृश्चिक स्थिते श्रीशनैश्चरौ, शेषेशु ग्रहेषु यथायथं..... शुभपुण्यतिथौ....॥
मम आत्मन: श्रुतिस्मृति-पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं....अमुक ...गोत्रोत्पन्नाय अमुक...शर्माणं अहं अस्माकं सकलकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद-चतुष्पद-सहितानां क्षेम स्थैर्य आयु: आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धी अर्थं,समस्त मंगल अवाप्ति अर्थं,समस्त अभ्युदय अर्थं,अभीष्ट कामना सिद्धी अर्थंच प्रतिवार्षिक विहितं {पार्थिवसिद्धिविनायक} देवता प्रीत्यर्थं यथाज्ञानेन यथामिलित उपचार द्रव्यै: पुरुषसूक्त/पुरणोक्तमंत्रै: प्राणप्रतिष्ठापन पूर्वक ध्यानआवाहनादि षोडश उपचार पूजन अहं करिष्ये॥ आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं, शरीर शुद्ध्यर्थं षडंगन्यासं कलश, शंख, घंटा, दीप पूजनं च करिष्ये॥

॥प्राणप्रतिष्ठा॥
अस्य श्री प्राणप्रतिष्ठामंत्रस्य ब्रह्म-विष्णू-महेश्वरा ऋषय:। ऋग्यजु:सामाथर्वाणि च्छंदासि। पराप्राणशक्तिर्देवता आं बी
जम्। -हीं शक्ति:। क्रों कीलकम्। अस्यां मृन्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोग:॥

॥ॐ आं -हीं क्रों॥ अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अ:॥ क्रों -हीं आं हंस: सोहं॥
अस्यां मूर्तौ १ प्राण २ जीव ३ सर्वेंद्रियाणि वाङ् मन:त्वक् चक्षु श्रोत्र जिव्हा घ्राण पाणि पाद पायूपस्थानि इहैवागत्य सुखं चिरं तिष्ठंतु स्वाहा॥
ॐ असुनीते…ॐ चत्वारिवाक्…॥
गर्भाधानादि १५ संस्कार सिद्ध्यर्थं १५ प्रणवावृती: करिष्ये॥
रक्तांभोधिस्थ… तच्चक्षुर्देवहितं…॥ अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा:क्षरंतु च।
अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन॥

देवस्य आज्येन नेत्रोन्मीलनं कृत्वा।
प्राणशक्त्यै नम:। पंचोपचारै: संपूज्य॥

१ ध्यानं,आवाहनं-
एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं।
पाशांकुशधरं देवं ध्यायेत्सिद्धिविनायकं॥
ॐ सहस्रशीर्षा...
आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर।
अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक॥

२ आसन-
ॐ पुरुषएवेदं…
नानारक्तसमायुक्तं कार्तस्वरविभूषितम्।
आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्॥

३ पाद्यं-
ॐ एतावानस्य…
पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भो।
भक्त्या समर्पितं तुभ्यं लोकनाथ नमोस्तु ते॥

४ अर्घ्य-
ॐ त्रिपादूर्ध्व…
नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर।
नमस्ते जगदाधार अर्घ्यं न: प्रतिगृह्यताम॥

५ आचमन-
ॐ तस्माद्विराळ…
कर्पूरवासितं वारि मंदाकिन्या:समाहृतम्।
आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तित:॥

६ स्नान-
ॐ यत्पुरुषेण…
गंगादिसर्वतीर्थेभ्यो मया प्रार्थनया हृतम्।
तोयमेतत्सुखस्पर्शं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्॥

॥पंचामृतस्नान,पंचोपचारपूजा,अभिषेक॥

मांगलिक स्नान-
ॐ कनिक्रदत्…
तैलेलक्ष्मीर्जलेगंगा यतस्तिष्ठति वै प्रभो।
तन्मांगलिकस्नानार्थं जलतैले समर्पये॥

ॐ तदस्तुमित्रा… सुप्रतिष्ठितमस्तु॥

७ वस्त्र-
ॐ तंयज्ञंबर्हिषि…
सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जानिवारणे।
मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यताम्।

८ यज्ञोपवीत-
ॐ तस्माद्यज्ञात्सर्वहुत:…
देवदेव नमस्तेतु त्राहिमां भवसागरात्।
ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाण परमेश्वर॥

९ गंध-
ॐ तस्माद्यज्ञात्सर्वहुतऋच:…
श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरम्।
विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्॥

अक्षतास्तंडुला:शुभ्रा:कुंकूमेन विराजिता:।
मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर॥
हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी।
सर्वालंकारमुख्या हि देवि त्वं प्रतिगृह्यताम्॥
हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकम्।
वस्त्रालंकारणं सर्वं देवि त्वं प्रतिगृह्यताम्॥
उदितारुणसंकाश जपाकुसुमसंनिभम्।
सीमंतभूषणार्थाय सिंगूरं प्रतिगृह्यताम्॥

परिमलद्रव्य-
ॐ अहिरिवभोगै:…
ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे।
नानापरिमलद्रव्यं गृहाण परमेश्वर॥

१० फुले,हार,कंठी-
ॐ तस्मादश्वा…
माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो।
मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्॥
करवीरैर्जातिकुसुमैश्चंपकैर्बकुलै:शुभै:।
शतपत्रैश्चकल्हारैरर्चयेत् परमेश्वर॥

॥अथ अंग पूजा॥
गणेश्वराय नम:-पादौ पूजयामि॥
विघ्नराजाय नम:-जानुनी पू०॥
आखुवाहनाय नम:-ऊरू पू०॥
हेरंबाय नम:-कटिं पू०॥
लंबोदराय नम:-उदरं पू०॥
गौरीसुताय नम:-स्ननौ पू०॥
गणनायकाय नम:- हृदयं पू॥
स्थूलकर्णाय नम:-कंठं पू०॥
स्कंदाग्रजाय नम:-स्कंधौ पू०॥
पाशहस्ताय नम:-हस्तौ पू०॥
गजवक्त्राय नम:-वक्त्रं पू०॥
विघ्नहत्रे नम:-ललाटं पू०॥
सर्वेश्वराय नम:- शिर:पू०॥
गणाधिपाय नम:-सर्वांगं पूजयामि॥

अथ पत्र पूजा:-
सुमुखायनम:-मालतीपत्रं समर्पयामि॥(मधुमालती)
गणाधिपायनम:-भृंगराजपत्रं॥(माका)
उमापुत्रायनम:-बिल्वपत्रं॥(बेल)
गजाननायनम:-श्वेतदूर्वापत्रं॥(पांढ-यादूर्वा)
लंबोदरायनम:-बदरीपत्रं॥(बोर)
हरसूनवेनम:-धत्तूरपत्रं॥(धोत्रा)
गजकर्णकायनम:-तुलसीपत्रं॥(तुळस)
वक्रतुंडायनम:-शमीपत्रं॥(शमी)
गुहाग्रजायनम:-अपामार्गपत्रं॥(आघाडा)
एकदंतायनम:-बृहतीपत्रं॥(डोरली)
विकटायनम:-करवीरपत्रं॥(कण्हेरी)
कपिलायनम:-अर्कपत्रं॥(मांदार)
गजदंतायनम:-अर्जुनपत्रं॥(अर्जुनसादडा)
विघ्नराजायनम:-विष्णुक्रांतापत्रं॥(विष्णुक्रांत)
बटवेनम:-दाडिमपत्रं॥(डाळिंब)
सुराग्रजायनम:-देवदारुपत्रं॥(देवदार)
भालचंद्रायनम:-मरुपत्रं॥(पांढरा मरवा)
हेरंबायनम:-अश्वत्थपत्रं॥(पिंपळ)
चतुर्भुजायनम:-जातीपत्रं॥(जाई)
विनायकायनम:-केतकीपत्रं॥(केवडा)
सर्वेश्वरायनम:-अगस्तिपत्रं॥(अगस्ति)

११ धूप,अगरबत्ती-
ॐ यत्पुरुषंव्यदधु:…
वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधउत्तम:।
आघ्रेय:सर्वदेवानां धूपोयं प्रतिगृह्यताम्॥

१२ दीप,निरांजन-
ॐ ब्राह्मणोस्य…
आज्यंच वर्तिसंयुक्तं वह्निना योजितं मया।
दीपं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भो:॥

१३ नैवेद्य,प्रसाद
ॐ चंद्रमामनसो…
नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे ह्यचलां कुरू।ईप्सितं मे वरं देहि परत्रं च परां गतिम्॥
शर्कराखंडखद्यानी दधिक्षीरघृतानिच।
आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्॥
पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतं।
कर्पूरैलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्॥
हिरण्यगर्भ गर्भस्थं हेमबीजं विभावसो:।
अनंतपुण्यफलद मत:शातिं प्रयच्छ मे॥
इदं फलं मयादेव स्थापितं पुरतस्तव।
तेन मे सुफलावाप्तिर्भवेज्जन्मनि जन्मनि॥
फलेन फलितं सर्व त्रैलोक्यं सचराचरम्।
तस्मात्फलप्रदानेन सफलाश्च मनोरथा:॥

दूर्वायुग्म पूजा-
गणाध्यक्ष महादेव शिवपुत्राभयप्रद।
दूर्वापूजां गृहाणेश गणाधिप नमोऽस्तुते॥
ॐ गणाधिपायनम:-दूर्वायुग्मं समर्पयामि॥

पतिर्गणानां सर्वेषामम्बिकागर्भसम्भव।
दूर्वायुग्मं गृहाणेश उमापुत्र नमोऽस्तुते॥
ॐ उमापुत्रायनम:-दूर्वायुग्मं ०॥

भक्तानां स्मरणादेव सर्वाद्यक्षयकृद्विभु:।
दूर्वायुग्मं गृहाणेश अघनाश नमोऽस्तुते॥
ॐ अघनाशनायनम:-दूर्वायुग्मं ०॥

नृपाणां युद्धसमये भजतामभयप्रद।
दूर्वापूजां गृहाणेश विनायक नमोऽस्तते॥
ॐ विनायकायनम:-दूर्वायुग्मं ०॥

जनितो देवतार्थाय तारासुतवधो विभु:।
दूर्वापूजां गृहाणेश ईशपुत्र नमोऽस्तुते॥
ॐ ईशपुत्रायनम:-दूर्वायुग्मं०॥

स्कन्दावरज भूतेश लम्बोदर गजानन।
दूर्वायुग्मं गुहाणेश सर्वसिद्धिप्रदायक॥
ॐ सर्वसिद्धिप्रदायकायनम:-दूर्वायुग्मं ०॥

राक्षसानां विनाशाय दूतायुधधरोभव।
दूर्वापूजां गृहाणेश एकदन्त नमोनम:॥
ॐ एकदंतायनम:-दूर्वायुग्मं ०॥

उमामहेश्वरं दृष्ट्वा कृतोऽसौ गजवक्त्रक:।
दूर्वायुग्मं गृहाणेश इभवक्त्र नमो नम:॥
ॐ इभवक्त्रायनम:-दूर्वायुग्मं ०॥

मूषकोत्तममारुह्य जिता देवा सुराहवे।
दूर्वापूजां गृहाणेश नमो मूषकवाहन॥
ॐ आखुवाहनायनम:-दूर्वायुग्मं ०॥

अग्निर्भू:बाहुलेयश्च गुरुमुख्यो भवप्रभो।
दूर्वापूजां गृहाणेश कुमारगुरवे नम:॥
ॐ कुमारगुरवेनम:-दूर्वायुग्मं ०॥

गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्राघनाशन।
विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक॥
एकदंतेभवक्त्रेति तथा मूषकवाहन।
कुमारगुरवे तुभ्यं पूजनीय:प्रयत्नत:॥
एकैकेन तु नाम्ना तु दत्वैकं सर्वनामभि:।
तत:स्वर्णमयं पुष्पं विघ्नेशाय समर्पयेत्॥
दूर्वामेकां समर्पयामि॥

ॐ श्रियेजात:
चंद्रादित्यौच धरणी विद्युदग्निस्तथैवच।त्वमेव सर्व ज्योतींषि आर्तिक्यं प्रतिगृह्यताम्॥

१४ प्रदक्षिणा-
ॐ नाभ्याआसी…
यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च।
तानि तानि विनश्यंति प्रदक्षिण पदे पदे॥

१५ नमस्कार-
ॐ सप्तास्यासन्…
नमस्ते विघ्नसंहर्त्रे नमस्ते ईप्सितप्रद।
नमस्ते देवदेवेश नमस्ते गणनायक॥

१६ प्रार्थना-
ॐ यज्ञेनयज्ञम…
विनायकगणेशान सर्वदेवनमस्कृत।
पार्वतीप्रिय विघ्नेश मम विघ्नान्निवारय॥
आवाहनं न जानामि……
यस्यस्मृत्या……

अनेन मया यथाज्ञानेन कृतषोडशोपचार पूजनेन तेन श्रीसिद्धिविनायक:प्रीयताम्॥

॥जय गणेश॥जय गणेश॥जय गणेश॥

Sunday, September 13, 2015

गर्दीतील एकटेपण भाग 1

गर्दीतील एकटेपण
विषय वाचला आणि लगेच गाणे आठवले
"रंगुनी रंगात साऱ्या , रंग माझा वेगळा "

माणुस सामाजिक प्राणी आहे , इतर लोकांची,मित्रांची आपल्याला गरज भासते , शेयरिंग करायला मौज मस्ती करायला व दंगा करायला
पण जेव्हा अशी वेळ येते की आपले मन हेच आपल्याबरोबर आहे असे वाटायला लागते , त्यावेळी आजुबाजुला लाखो माणसे असूनही त्या वेळी स्वतशीच् संवाद करायला , भांडायला , शेयर करायला हवे असते आणि यालाच तर म्हणायचे गर्दीतील एकटेपण .
आणि हे एकटेपण जेवढे जास्त काळ अनुभवू अजुनच भयाण व भीषण वाटायला लागते

माझी ही आठवण 3 वर्षपूर्वीची , मी तेव्हा नाशिकला होतो, एप्रिल मध्ये आमचे ऑडिट असते त्याची जोरदार तयारी चालू होती ,रोज थांबून काम चालूच व अशावेळी माझ्या भावाचा फोन आला ,
ताबडतोब गावी ये , आपल्या काकुला हॉस्पिटल मध्ये नेली होती व बीपी कमी होवून वारली.
एकदम त्राण निघुन गेले कारण एकत्र कुटुंबात वाढल्याने जेवढी आईची माया तेवढीच् काकूचीही , लगेच सरांना फोन केला व सांगितले मला अर्जेंट गावी जावे लागतेय, त्यांची परवानगी घेवून मी घरी आलो, घाईत बायकोला फोन केला (ती तिच्या माहेरी चिंचवडला होती)की मी चिंचवडला येतो मग तिथून पुढे गावी कोकणात जाऊ.
रात्री 10 वाजता मी 4व्हीलर चालू केली व पुण्याच्या दिशेने निघालो , डोक्यात सर्व आठवणी लहानपासूनच्या, काकूने केलेले लाड, कौतुक ,रागावणे व सर्वच
मी इकडे गाड़ी चालवतोय , गाणी चालू होती झोप नको यायला म्हणून व डोक्यात असंख्य आठवणींचा कल्लोळ
रात्री 2 वाजता मी चिंचवडला पोचलो , वाटेत भावाचे बायकोचे फोन येतच होते कुठपर्यंत पोचलो म्हणून व काळजी वाटत होती म्हणूनही
पहाटे 2 वाजता चिंचवडला पोचलो , चहा घेतला व बायकोने सांगितले मी बॅग भरेपर्यंत झोप 10 मिनिटे
खरच मी झोपलो ते उठलो सकाळी 6 वाजता
(भावाच्या सांगण्याप्रमाणे बायको व सासुआई दोघानी मला झोप मिळावी म्हणून उठवले नव्हते)
6 वाजता फ्रेश होवून चहा घेवून आम्ही सर्वजण गावी जायला निघालो , वाटेत भावाने फोन करून सांगितले की गावी सर्व आले आहेत व पुढील विधीना सुरुवात केली तर चालेल का ? कारण मला पोचायलाही दुपार झाली असती
मी हो म्हटले व पूर्ण 7 तासांच्या प्रवासात सर्व एकत्र असूनही एकटेपण अनुभवले व संध्याकाळी घरी पोचलो
काका चुलतभाऊ  बाबा आई सर्वाना भेटलो व बोलल्यावर पुनः या एकटे पणातून बाहेर यायला मदत झाली
(याच घटनेच्या 2 दिवसांनी पुनः तसेच एकटेपण अनुभवले ते पुढील भागात)

-निलेश जोशी

Wednesday, September 9, 2015

"इंदुकोटी स्तोत्र".

श्रीदत्तावतार सद्गुरु नृसिंह सरस्वती महाराजांवर आधारित श्री गुरुचरित्र ४० व्या अध्यायातील एक अत्यंत प्रभावी, प्रासादिक आणि भक्तिभावाने परिपूर्ण असणारे स्तोत्र म्हणजे "इंदुकोटी स्तोत्र". आकस्मिक संकटनाश होण्यासाठी, श्रीगुरुकृपेसाठी या सुंदर आणि लयबद्ध स्तोत्राचे मनःपूर्वक, श्रध्दापूर्वक वाचन करावे. या स्तोत्राची कितीही आवर्तने करावीत आणि अनुभव घ्यावा...

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

॥ इंदुकोटितेज-करुणासिंधु-भक्तवत्सलम् ।
नंदनात्रिसूनुदत्त, इंदिराक्ष-श्रीगुरुम् ।

गंधमाल्यअक्षतादिवृंददेववंदितम् ।
वंदयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम् ॥१

मोहपाशअंधकारछायदूरभास्करम् ।
आयताक्ष, पाहिश्रियावल्लभेशनायकम् ।

सेव्यभक्तवृंदवरद, भूयो भूयो नमाम्यहम् ।
वंदयामिनारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२

चित्तजादिवर्गषट्‍कमत्तवारणांकुशम् ।
तत्त्वसारशोभितात्मदत्त- श्रियावल्लभम् ।

उत्तमावतार-भूतकर्तृ-भक्तवत्सलम् ।
वंदयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम् ॥३

व्योमवायुतेज-आपभूमिकर्तृमीश्वरम् ।कामक्रोधमोहरहितसोमसूर्यलोचनम् ।

कामितार्थदातृभक्तकामधेनु-श्रीगुरुम् ।
वंदयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम् ॥४

पुंडरीक-आयताक्ष, कुंडलेंदुतेजसम् ।
चंडुदुरितखंडनार्थ -दंडधारि-श्रीगुरुम् ।

मंडलीकमौलि-मार्तंडभासिताननं ।
वंदयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम् ॥५

वेदशास्त्रस्तुत्यपाद, आदिमूर्तिश्रीगुरुम् ।
नादबिंदुकलातीत-कल्पपादसेव्ययम् ।

सेव्यभक्तवृंदवरद, भूयो भूयो नमाम्यहम् ।
वंदयामिनारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥६

अष्टयोगतत्त्वनिष्ठ, तुष्टज्ञानवारिधिम ।कृष्णावेणितीरवासपंचनदीसंगमम् ।

कष्टदैन्यदूरिभक्ततुष्टकाम्यदायकम् ।
वंदयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम् ॥७

नारसिंहसरस्वती-नामअष्टमौक्तिकम् ।हारकृत्यशारदेनगंगाधर आत्मजम् ।

धारणीकदेवदीक्षगुरुमूर्तितोषितम् ।परमात्मानंदश्रियापुत्रपौत्रदायकम् ॥८

नारसिंहसरस्वतीय-अष्टकं च यः पठेत् ।घोरसंसारसिंधुतारणाख्यसाधनम् ।

सारज्ञानदीर्घआयुरारोग्यादिसंपदम् ।चारुवर्गकाम्यलाभ,वारंवारं यज्जपेत ॥९

इति श्री गुरुप्रार्थनाष्टकं संपूर्णं

‪#‎nrusinhasaraswati‬ ‪#‎duttaguru‬ ‪#‎indukoti‬