Friday, December 9, 2016

डिजिटल मार्केटिंग काही FAQ

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 60%जनता मोबाईल वापरते व त्यातील निम्मी स्मार्टफोन वापरते.आपण मोबाईल व इंटरनेट वापरतो म्हणजे आपल्याला गुगल माहितीच असते.काही प्रश्न उत्तरे FAQ

Q-गुगल सर्च म्हणजे काय?
A-आता मला एका गोष्टीची माहिती हवी आहे उदा.माझ्या एरियातील बिल्डर व साईट्स तर मी गुगल करेन builders pune चिंचवडआणि मला रिजल्ट्स मिळतील
99acres.com
magicbrics.com
makaan.com
आता असे करून जे सर्वात वरती 3-4 वेबसाईट्स येतील त्याच क्लिक करून आपण माहिती घेतो.

Q-मी तर बिल्डर शोधूनही याच प्रोफेशनल वेबसाईट वर येतात असे का होते? बिल्डर माहिती टाकूनही याच वेबसाईट का येतात?
A-कारण या वेबसाईटने ,आपले पेज वर दाखवायला गुगलला पैसे दिलेले असतात व पेड सर्व्हिस विकत घेतलेली असते जेणेकरून नेहमी त्यांचीच वेबसाईट वर दिसेल.

Q-पण मग गुगल या वेबसाईटला वर कसे आणते?
A-गुगल सर्च इंजिन सॉफ्टवेअर ज्या साईटचे विजीटर जास्त त्या वेबसाईटला वर दाखवते.आता या वेबसाईट प्रमोशन आणि विजिटर वाढवायला या वेबसाईटना व्हिजिट द्यावी लागते , म्हणजेच फिजिकली ती साईट जाऊन बघावी लागते आणि एका दिवसात त्याच वेबसाईटला हजारो वेळा क्लिक करणे हे अर्थातच गुगल ला शक्य नाही , म्हणून गुगल हे काम आऊटसोर्स करते.

Q-आउटसोर्स कंपनी काय करते?
A- आऊटसोर्स कंपनीला क्लीक वाढवून द्यायचे करार गुगल बरोबर करते म्हणजे अमुक रकमेच्या बदलात त्यांनी दिलेल्या लिंक्स वर तेवढे क्लिक करून त्या वेबसाईट लिंकची विजीटर संख्या वाढवणे, त्यासाठी एकतर त्यांचे स्वतःचा स्टाफ व इन्फ्रा जसे कंप्युटर्स व इंटरनेट असावे लागेल ,पण एवढ्या मोठ्या क्लिक करायचे म्हणजे इन्फ्रा कोटीच्या घरात लागेल , ते टाळण्यासाठी मग ही कंपनी स्वतःचे नेटवर्क वाढवते व असे मेम्बर जमवते ते क्लिक करतील व त्याचे त्यांना per click pay म्हणजेच पीपीसी मिळेल.

Q जर क्लिक करणे उद्देश असेल तर या कंपन्या मग जॉईन होणाऱ्या मेम्बर कडून पॅकेज विकून पैसे का घेते
व नंतर क्लिक का प्रोवाईड करते?
A-क्लिक करून व्हिजिटर वाढवणे हा गुगल बरोबर केलेला करार तुटू नये म्हणून असे पॅकेज विकले जाते
समजा एक व्यक्तीला रोज क्लिक दिल्या व तो त्याच्या वेळेनुसार करतो आहे तर कधी घाईच्या वेळी तो करणार नाही व कंपनीला सांगेल क्लिक केले नाही तुम्ही पैसे देऊ नका ,पण असे कंपनीला परवडत नाही कारण क्लिक होणे गरजेचे आहे , त्याऐवजी एखाद्याने पैसे भरून पॅकेज घेतले तर आपले पैसे वसूल व
होण्यासाठी तो क्लिक करेलच मग स्वत: करेल किंवा मित्राला सांगेल पण डेली टास्क पूर्ण करेलच.

Q  मग बूस्टर देऊन आपल्या id खाली 2 लोक का वाढवायचे?
A कंपनी प्लॅन नुसार आपण भरलेले पैसे पुन्हा आपल्यला मिळायला 5 महिने लागतात ,यालाच आर्थिक भाषेत ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतात, पण कंपनी उद्देश नेटवर्क वाढवणे आहे म्हणून 2 लोक खाली ऍड केल्यास त्या माणसाचे क्लिक डबल होतात व ब्रेक इव्हन पॉईंट 5 माहिन्यावरून 2 महिन्यावर येतो व भरलेले पैसे लगेच वसूल होतात

हा प्लॅन जाणून घ्यायला खालील व्हिडीओ अवश्य बघा
https://youtu.be/fLF0xe07rYg

Saturday, November 12, 2016

दिव्यानुभव 5

कोणाचा विश्वास असो वा नसो , प्रत्येक मानवाला एक अनामिक शक्ती सूचना देत असते व जाणीव करून देत असते , अर्थात ज्याने या सूचना अंमलात आणल्या त्याला त्याचा फायदा होतो , शेवटी देव म्हणजे तरी काय तर एक शक्ती जी प्रत्येकाच्या मनात,शरीरात आहे.
या ग्रुपवरचे अनेक अनुभव वाचून मलाही माझे अनुभव सर्वाना सांगावेसे वाटले व याआधीही हे मी सांगत आलेलो आहे.अर्थात हा समूह त्यासाठीच आज ज्याने देवावरील श्रद्धा वृद्धिंगत होईल,
मागच्या महिन्यातील रविवारची गोष्ट , सकाळपासून मन खूप खिन्न झालेले , माझा 5 महिन्यापूर्वी अपघात झालेला व त्यात झालेल्या इजांमुळे खूप त्रासलो होतो, तसेच सलग 5 वर्षे नित्य जीवनात खूप अडचणी येतच आहेत,त्यावर मार्ग सापडत नव्हता.
पूजा केल्यावर नेहमीसारखा डोळे मिटून देवाचे आवाहन केले व मार्ग दाखव म्हणून आळवणी केली. दुपारचे जेवण केले व पुस्तक वाचत पडलो होतो तेव्हा सवयीप्रमाणे डुलकी लागली. कदाचित तेव्हाही देवाने मार्गदर्शन करावे हे मनात चालू असेल म्हणून असावे पण कोणीतरी एक व्यक्ती माझ्याही बोलतेय असा भास झाला , झोपेतच मी त्या व्यक्तीचे बोलणे ऐकतोय तर मला मागील 5 वर्षातील ठळक घटना मग दोन्ही चांगल्या वाईट ऐकू येऊ लागल्या व नंतर एकदम गंभीर आवाजात "हे सर्व फेब्रु 2011 सालापासून झाले आहे व त्यात तू जो मोबाईल नंबर वापरतोस त्याचाही मोठा हात आहे , नीट बघ तुझ्या मोबाईल नंबर मधील 6 वेळा येणारा 8 आकडा हा शनी प्रतीत करतो आणि त्यामुळे तुला त्रास होतोय , जेवढ्या लवकर तू नंबर बदलशील ते फायद्याचे ठरेल व या सर्वात आपोआप मार्गदर्शन मिळेल , काळजी नसावी"
एवढे सर्व संभाषण मी डुलकी असताना ऐकत होतो पण ते सर्व उठल्यावर आठवायला लागले , मी माझ्या बायकोशी या संदर्भात बोलून यावर अंमल करायचा निर्णय घेतला व त्यासाठी काम चालूही केले लवकरच नवीन नंबर मिळवण्यासाठी खटपट चालू केला व आज तो नंबर चालूही झाला.
ही प्रोसेस चालू केल्यावर माझ्या नावावर 2 jio सिम पण मिळाली व  प्रलंबित कामांना गती मिळायला लागली .कंपनीत जो आत्मविश्वास कमी झाला होता तो परत आला.
या सर्वात मला आपल्या ऐडमीन प्रज्ञा साने यांचेही छान मार्गदर्शन झाले.त्यांनाही खूप खूप धन्यवाद

अर्थात आपल्या श्रद्धास्थानावर विश्वास ठेवा व मनापासून आळवणी करा , आपल्याला तोच त्यातून मार्ग दाखवतो हे खरेच आहे ,
श्री स्वामी समर्थ , गजानन महाराज की जय
--निलेश जोशी

Wednesday, November 2, 2016

फटाका

संपली दिवाळी , निघालोय एकटाच रस्त्यावरून
बघत रस्त्यावरील फटाक्यांचा कचरा व धुरळा
तुडवत असंख्य चिटोरे एकमेकांशी असंबंधीत

काय नाहीये त्या फटाक्यांच्या तुटलेल्या कागदात
अनेक यशस्वी अयशस्वी जगावेगळ्या कहाण्या
चांगले वाईट दोन्हीही कधीकाळी आलेले छापून

दररोज लाखो करोडो घटना घडताहेत पृथ्वीवर
त्यातील अदमासे 2-3 टक्के बातम्या हक्कदार
या कागदावर छापून यायचे भाग्य लेवून आलेल्या

अनेक व्यक्ती नावे भाषा लेख ओळी शब्द
चुराडा होऊन पुन्हा मिळाल्या आहेत जमिनीवरच
अनेक भाषा,बातम्या रद्दीमोल होऊन विखुरलेल्या

अनेकातून ऐकता साधत स्फोटक दारू बांधून
त्या सर्व बातम्यांची झालीय आता एकच सुरळी
दाहकता जपत आणि एकत्र गुंफून लड तय्यार

आनंद झाला सण आला एका ठिणगीने पेटवला
फटाका आणि निमिषार्धात असंख्य आवाज
जणू सर्व बातम्या एकत्र बोलायला लागल्यात

टाळ्या जल्लोष फटाक्यांचा आवाजाबरोबर विरून
पुन्हा झालेय रूपांतर त्यांचे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात
पुनर्वापर झाल्याच्या आनंदात तो कागद विरून गेलाय

असंख्य कागदांच्या आकारांची नक्षी पायाखाली
हवेत गारवा व पायाखाली तुडवले जात असतीलही
कदाचित आपली श्रद्धास्थाने व आपलीच कर्तृत्वस्थाने

उत्पत्ती मध्य लय साधत ती बातमी पुन्हा एकदा
मातीमोल होऊन पायाशी पडलीय व त्याशी निगडित
लोक सर्व विसरूनही दैनंदिन आयुष्यात मग्न झालेत

--निलेश जोशी

Tuesday, September 27, 2016

सूर्योदय

हृदयात भावनांचा कल्ला असेल तेव्हा
शांत नीरव क्षणांनी ते गजबजेल तेव्हा

झाल्या असती जखमा शरीरतनूस तेव्हा
मन ठेवले ताजे त्या परिस्थितीतही तेव्हा

प्राक्तन म्हणावे की परीक्षा देवाने घेतलेली
त्यातही व्हावे उत्तीर्ण हेच ठरवले तेव्हा

संपेल हे वलय अन होईन रिसेट मी पुन्हा
जगण्यास देईल बळ हाच आशावाद तेव्हा

बाजूला सारून टाकू हे पूर्वग्रहण जरासे
आयुष्यात सूर्योदय नक्की दिसेल तेव्हा

----निलेश जोशी

Sunday, August 28, 2016

कार्तवीर्य मंत्र

मंत्र सामर्थ्य व अनुभव

मननेन त्रायते इति मन्त्रः :- संदर्भ विकी

मंत्र --
कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !
(कोणतीही गोष्ट हरवली व ती सापडावी म्हणून या मंत्राचा जप करावा)

Monday, August 22, 2016

देव व दानव

एक चित्रकार होता , त्याला एकदा बालपणीच्या कृष्णाचे चित्र काढायची ऑफर येते , तो खूप खुश होतो व चित्र काढायला बसतो पण काही केल्या त्याच्या डोळ्यासमोर बाळकृष्ण मूर्ती येत नाही , हीच समस्या तो आपल्या मित्राला सांगतो तेव्हा मित्र त्याला सल्ला देतो कि शाळेतील एखादा गोंडस मुलगा सुट्टीदिवाशी घरी बोलावं व त्याला कृष्णासारखा सजवून त्याचे चित्र काढ ,लहान मुले हे निरागस व देवस्वरूप असल्याने छान चित्र येईल.
    हि कल्पना त्याला आवडते व तो ती अमलातही आणतो . चित्र छान जमून येते व तो त्या 10 वर्षाच्या मुलाला ड्रेस ,  खाऊ घेऊन देतो व त्याच्या वडिलांना धन्यवाद देतो. व त्या चित्राला त्याला पारीतोषिकही मिळते.
   20 वर्षानंतर त्या चित्रकाराला पुन्हा दानव रेखाचित्र करायची ऑर्डर मिळते, तेव्हाही तो पुन्हा संभ्रमित होतो पण पुन्हा मित्राच्या सल्ल्यानुसार दानव म्हणजे खूप गुन्हे करून शिक्षा भोगणारे कैदी , त्यांचे चित्र थेट दानवासारखे असेल म्हणून तुरुंगाधिकारी यांची परवानगी घेऊन खूप शिक्षा झालेला तरुण समोर बसवून चित्र काढायला लागतो . तो क्रूर दिसणारा , केस पिंजारलेला व लालेलाल डोळ्यांचा कैदी मात्र चित्रकाराच्या समोर बसतो व त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागते.
     त्याचे रडू बघून चित्रकार अचंबित होतो पण तरीही तो त्याच्या जवळ जाऊन त्याला रडण्याचे कारण विचारतो. तेव्हा तो कैदी म्हणतो तुम्ही तेच चित्रकार आहेत ज्यांनी 20 वर्षांपूर्वी लहान मुलाला बसवून कृष्णाचे चित्र काढले होते व मी तोच मुलगा आहे जो तेव्हा तुमच्या समोर बसला होता. माझ्या वाईट कामामुळे मी दानव बनलोय,म्हणजेच तुमच्या हातून जी चित्रे निर्माण झाली त्यातील कृष्णपण मीच व कंस पण मीच ,
तात्पर्य - आपले कामच आपली ओळख ठरवत असते.
  

Sunday, August 21, 2016

दारिद्र्यदहन शिवस्तोत्र

॥दारिद्र्य दहन शिवस्तोत्रं॥

विश्वेश्वराय नरकार्णव तारणाय कणामृताय शशिशेखरधारणाय।
कर्पूरकान्तिधवलाय जटाधराय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥१॥

गौरीप्रियाय रजनीशकलाधराय कालान्तकाय भुजगाधिपकङ्कणाय।
गंगाधराय गजराजविमर्दनाय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥२॥

भक्तिप्रियाय भवरोगभयापहाय उग्राय दुर्गभवसागरतारणाय।
ज्योतिर्मयाय गुणनामसुनृत्यकाय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥३॥

चर्मम्बराय शवभस्मविलेपनाय भालेक्षणाय मणिकुण्डलमण्डिताय।
मंझीरपादयुगलाय जटाधराय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥४॥

पञ्चाननाय फणिराजविभूषणाय हेमांशुकाय भुवनत्रयमण्डिताय।
आनन्दभूमिवरदाय तमोमयाय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥५॥

भानुप्रियाय भवसागरतारणाय कालान्तकाय कमलासनपूजिताय।
नेत्रत्रयाय शुभलक्षण लक्षिताय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥६॥

रामप्रियाय रघुनाथवरप्रदाय नागप्रियाय नरकार्णवतारणाय।
पुण्येषु पुण्यभरिताय सुरार्चिताय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥७॥

मुक्तेश्वराय फलदाय गणेश्वराय गीतप्रियाय वृषभेश्वरवाहनाय।
मातङ्गचर्मवसनाय महेश्वराय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥८॥

वसिष्ठेन कृतं स्तोत्रं सर्वरोगनिवारणं। सर्वसंपत्करं शीघ्रं पुत्रपौत्रादिवर्धनम्।
त्रिसंध्यं यः पठेन्नित्यं स हि स्वर्गमवाप्नुयात्॥९॥

॥इति वसिष्ठ विरचितं दारिद्र्यदहनशिवस्तोत्रं सम्पूर्णम्॥.

शिवस्तोत्र से रोग, कष्ट-दरिद्रता का निवारण दारीद्र्यदहन शिबस्त्रोत का पाठ रोग, कष्ट-दरिद्रता का निवारण करता हैं।

दारिद्र्यदहन शिवस्तोत्र के पाठ से रोग, कष्ट-दरिद्रता का निवारण

यदि किसी व्यक्ति को जीवन में किसी भी प्रकार के दुःख, कष्ट, रोग आदि से परेशान हो परेशानीया पीछा नहीं छोड रही हों, उनके लिये दारिद्र्यदहन शिवस्तोत्र का पाठ रामबाण हैं।

विद्वानो के मतानुशार जिन लोगो को जीवन में अथक परिश्राम एवं पूर्ण मेहनेत के उपरांत सफलता प्राप्त नहीं हो रही हों उन्हें दारिद्र्यदहन शिवस्तोत्र का पाठ पूर्ण श्रद्धा एवं विश्वास से नियमित करना चाहिये।

क्योकी एसा शास्रोक्त वचन हैं, की जो व्यक्ति श्रद्धा भाव से त्रिकाल अर्थात सुबह, संध्या एवं रात्री के समय दारिद्र्य दहन शिवस्तोत्रं का पाठ करता उनके सभी दुख, कष्ट सर्व रोगादिका शीघ्र निवारण हो जाता हैं और भगवान भोलेभंडारी की कृपा से उसे, सुख, संपत्ति एवं उत्तम संतान लाभ प्राप्त होता हैं। इसमें लेश मात्र भी संदेह नहीं हैं।

Sunday, August 14, 2016

दिव्यानुभव 4

#दिव्यानुभव

हा अनुभव सुद्धा आत्ता 2 महिन्यापूर्वीचा , 6 जून 2016 सोमवार होता , सोमवारी माझा उपवास असतो म्हणजे दुपारी फळे किंवा खिचडी व रात्री जेवून उपास सोडायचा.
त्या दिवशी कामावर ऑफिसला गेलो 2 चाकी गाडी घेऊन , कंपनी बस असली तरी मी सोमवारी 2 चाकी नेऊन कंपनी पार्किंगला ठेवायचो व पूर्ण आठवडा कंपनी बसने जा ये करायची व शनिवारी शॉर्ट शनिवार असतो तेव्हा पुन्हा दोन चाकी घेऊन घरी यायचे.

कंपनी पार्किंग ला ठेवण्याचा उद्देश एकच जरी कधी थांबायची वेळ आली व कंपनी बस चुकली तरीही आपले वाहन हाताशी आहे व त्यामुळे MIDC तुन तोकड्या प्रवासी वाहतूकीचा त्रास होत नाही.
  तर त्यादिवशी सर्व काम संपले व जायला निघणार त्यात बॉसने विचारले 2 अर्जंट कामे आहेत व ते स्वतः थांबणार आहेत तेव्हा थांबून लवकर होईल काम , मग मी बॉस व माझा कालिग मित्र सर्वच थांबलो व साडेआठ पर्यंत काम संपवले .
      10 मिनिटात कंपनीतून निघालो , व मी माझ्या 2 चाकी गाडीने गेट बाहेर आलो , मागून माझा कालिग मित्र त्याच्या 2 चाकी गाडीने येत होता. गेटसमोरील रस्ता पकडला आणि मला समांतर येणाऱ्या ट्रकने मला कोणताही इंडिकेटर , हॉर्न ना देता अचानक डाव्या बाजूला ट्रक वळवला , त्याचा परिणाम  ट्रकची धडक मला बसली व मी गाडीवरून खाली पडलो , पण धडक एवढी जबरदस्त होती की मी ट्रकच्या खाली आलो व पुढील चाके निघून गेली होती व मी ट्रकच्या मधोमध रस्त्यावर होतो.
त्या क्षणाला खूप भीती वाटली व आता मी ट्रकखाली चिरडणार इतक्यात काय झाले माहिती नाही पण कोणीतरी माझ्या जवळ आहे व मला सूचना देत आहे असे जाणवले .
ते जे कोणी होते त्यांनी मला सुरवतीला पॉझिटिव्ह व्हायला सांगितले , यातूनही तू सहीसलामत वाचाशील , तुझ्या डोक्यावर हेल्मेट आहे त्यामुळे शक्य तितके डोके खाली ठेव म्हणजे ट्रक डोक्याला लागणार नाही , दोन्ही हात आतल्या बाजूला ठेव त्यामुळे टायरखाली हात जाणार नाहीत या व अशा अनेक सूचना मला येत होत्या आणि मी त्या फॉलो करत होतो.

साधारण 40-50 सेकंदानंतर मी ट्रकच्या मागील बाजूतून बाहेर पडलो व ट्रक साधारण 100 मीटर वर जाऊन थांबला. माझा जो कालिग मित्र मागून येत होता त्याने पूर्ण अपघात डोळ्याने पहिला व जेव्हा मी डोके वर केले तेव्हा त्याने सुटकेचा निश्वास ठेवला . त्यानेच मला अंबुलन्स बोलावून हॉस्पिटल मध्ये हलवले व उपचार सुरु केले .
आताच 16 तारखेपासून साधारण 2 महिन्यांनी मी कामावर जायलाही लागलो .
पूर्ण अपघात बघितलेला व ज्यांनी माझी चुराडा झालेली दोन चाकी गाडी बघितली त्या सर्वांच्या मते या जबरदस्त अपघातातून फक्त 1 हात फ्रॅक्चर व पायाला खोल जखम यावरच बचावणे हे खूप मोठे आश्चर्य आहे. माझ्या मते त्यावेळी जे कोणी मला सूचना देत होते ती दिव्य शक्ती होती व महाराज त्या निमित्ताने माझे संरक्षण करायला स्वतः हजर होते.

अनंतकोटी महाराजाधिराज योगीराज समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय

       

Tuesday, August 9, 2016

सेव्हन हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टीव्ह पीपल

पुस्तके वाचताना काही पुस्तके नुसतीच चाळायची असतात थोड्या वेळातच विसरून जायची असतात तर काही दीर्घ काळ डोक्यात घर करून बसतात .
इंग्रजी भाषेने अशा पुस्तकांच्या खजिन्याची किल्ली एकदा मला मिळवून दिली. कोणीतरी सांगितले आणि सहज म्हणून हाती लागले म्हणूनही मला एक रत्नाचा परिचय झाला.स्टीफन कोव्हे या लेखकाचा. स्वारी त्यांच्या मॅनेजमेन्ट थॉट्स मुळे परिचित आहे पण त्यातही सरताज म्हणता येईल अशा " सेव्हन हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टीव्ह पीपल " या पुस्तकाचा.
मॅनेजमेंट शिकताना मानव या घटकाचा विशेष अभ्यास करायचा असतो. पण आपली मॅनेजमेंट शिकायची सुरुवातच होते ती ऍडम्स स्मिथ च्या टाईम ऍन्ड मोशन वर अधारीत उत्पादन प्रमेयाशी. कारखान्यात काम करणार्‍या कामगाराचा मानव म्हणून विचार करण्याऐवजी एक मशीन म्हणून विचार करायचा. त्याला भावना अहेत नाहीत याच्याशी कर्तव्य नाही.
लीडरशीप बद्दल तर काही विचारु नका. लीडरशीप म्हणजे लोकांवर वर्चस्व गाजवायचे हेच आडूनआडून डोक्यात भरवलेले असते
सेव्हन हॅबीट्स्.. हे पुस्तक बराच वेगळा विचार करते . पुस्तक वाचताना लेखकाच्या विचारांशी होतो त्यापेक्षाही स्वतःचाच नव्याने परिचय होतो.
पुस्तकाची सुरुवात करतानाच एक जुने उदाहरण नव्याने पुढे येते. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी.........
प्रॉडक्षन आणि प्रॉडक्षन कपॅबीलिटी एह दोन शब्द वारंवार येतात. पी ऍन्ड पीसी
प्रथम त्याबद्दल पाहु. सोन्याचे अंडे हे प्रॉडक्षन मानले तरे ते अंडे देणारी कोंबडी ही प्रॉडक्षन कपॅबिलीटी असते.
उत्पादन आणि उत्पादन करणारे यंत्र. प्रश्न हा येतो की नक्की लक्ष कशावर द्यायचे. कोंबडीवर की सोन्याच्या अंड्यावर?
कोंबडीवर लक्ष दिले तिला उत्तम खाऊपिऊ घातले आणि तिने अंडे दिले नाही तर ते व्यर्थ आहे. आणि कोंबडीकडून सतत नुसत्याच अंड्याची अपेक्षा केली आणि तिला खाऊ पिउ घातले नाही विश्रांती दिली नाही तर कोंबडी मरून जाईल.
एखाद्या लेथ मशीनवर केले जाणारे काम हे उत्पादन मानले तर लेथ मशीन हे प्रॉडक्षन कॅपॅबिलीटी आहे. नुसते मशीन चालवत राहिलो तर ते केंव्हातरी मोडून जाईल. मशीनला अधूनमधून विश्रांती दिली पाहिजे त्याची निगा राखली पाहिजे तर त्याची क्षमता टिकून राहील.
आपल्या शरीराचेही तसेच आहे. नुसते काम केले तर आजारी पडू आपले शरीर( प्रॉडक्षन कॅपॅबिलीटी) हरवून बसु. आहाराबरोबरच व्यायाम्/ विश्रांती ( शारीरीक + बौद्धीक ) शरीराला मिळायला हवी.
अशी सुरुवात झाल्यानंतर लेख पुस्तकाचा आढावा घेतो. त्याला तो इनसाईड आउट म्हणतो.
एखादी गोष्ट आपल्याला जशी दिसते ती इतराना तशी दिसेलच असे नाही. एखादा प्रश्न आपल्याला जसा भासतो तो इतराना तसाच भासेल असे नाही. इतरांची मते वेगळी असू शकतात. ती आपल्या मतांइतकीच बरोबर असू शकतात्.यासाठी तो एक चित्र दाखवतो. एकाच चित्रात दडलेले दोन वेगळे चेहेरे पाहिल्यावर हे मत सहज पटते.
या नन्तर लेखक सर्वोत्तम प्रभावी व्यक्तींच्या सात सवयींकडे वळतो.या सात सवयी बद्दल त्याने जगातील अनेक व्यक्तींच्या अभ्यासानन्तर लिहिले आहे.
बरेच लोक एका ठराविक मार्गाने जात असतात. कधीकाळी त्याना त्यांची चूक कळते. ते आपला मार्ग बदलतात.
स्टीफन कोव्हे एक मस्त उदाहरण देतो.
एका अंधार्‍या रात्री एक जहाज समुद्रात सफर करत असते. अंधारात नीट दिसत नसते जहाजाच्या कप्तानाला दूरवर एक दिवा दिसतो. बहुतेक दुसरे जहाज असावे. कप्तान रेडीओवर संदेश पाठवतो. आपन एकाच मार्गावर आहोत. धदक होईल तुम्ही मार्ग बदला.
दुसर्‍या बाजूने उलट उत्तर येते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण तुम्हीच दिशा बदला. कप्तान चिडून पुन्हा संदेश पाठवतो. आम्ही लढाऊ जहाक आहोत. तुम्ही मुकाट्याने मार्ग बदला. उलट बाजूने उत्तर येते " आम्ही दीपस्तंभ ( दीपगृह)आहोत"
कप्तानाने मार्ग बदलला.
उत्तम सवयी या दीपस्तंभासारख्या असतात. त्या तुम्हाला अंधारात/धुक्यातही मार्ग दाखवतात. दीपस्तंभाशी टक्कर घेण्यात काहीच फायदा नसतो. दीपस्तंभाच्या खडकावर आदळून आपलेच तारु फुटते.
या सात सवयी......खरेतर त्या तशा एकमेकांपासून वेगळ्या करता येणार नाहीत.
पहिल्या तीन सवयी आहेत सेल्फ व्हिक्टरी म्हणजे स्वतः वर विजयमिळवण्यासाठी
दुसर्‍या तीन आहेत त्या सोशल व्हिक्टरी म्हणजे सामाज जिंकण्यासाठी
सातवी सवय वेगळीच आहे. ती या सहा सवयीनी मिळून बनलेली आहे.
पहिली सवय आहे. प्रोऍक्टीव्हीटी......मराठीत याला तेव्हढा योग्य शब्द मिळाला नाही. पण इनिशिएटीव्ह म्हणजे पुढाकार या पेक्षा थोडेसे पुढे जाऊन जी क्रिया येईल तशा प्रकारचा अर्थ अभिप्रेत आहे.
लेखक म्हणतो की एखादी गोष्ट स्वतः होऊन सुरु करणे ही एक सवय आहे.
बरेचदा आपण एखादी गोष्ट करतो ती कोणत्यातरी दुसर्‍या गोष्टीची प्रतिक्रिया म्हणून करत असतो. हे करण्यात ती गोष्ट करण्यात काय करावे यावर आपले कोणतेच नियंत्रण रहात नाही. जणू दुसरेच कोणितरी आपले नियंत्रण करत असते.
एखाद्या गोष्टीचे काय परिणाम होतील याचा अंदाज घेऊन आपण निर्णय घेतो. कधी कधी परिणामांचा विचार करून आपण निर्णय घेण्याचे टाळत असतो. पण निर्णय घेण्याचे टाळबे हा सुद्धा एक निर्णयच आहे हे आप्ल्या लक्ष्यात येत नाही.
कृती आणि परिणाम हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखादी पेन्सील उचलण्याच्या अगोदर ती कोणत्या बाजूच्या टोकाकडून उचलायची हे आपण ठरवू शकतो पण त्या टोकाकडून पेन्सील उचलताना दुसरे टोकही पेन्सीलच्या सोबतच येते. पेन्सीलीचे एक टोक हे जर कृती मानले तर दुसरे टोक म्हणजे त्या कृतीचे परिणाम असते
कृती करताना त्या कृतीचे परिणाम आपण टाळू शकत नाही. कृती न करणे ही सुद्धा एक प्रकारे कृतीच आहे. त्याचे परिणाम टाळू शकत नाही.
बहुतेकदा आपण केलेले कृती ही एखाद्या कृतीची प्रतिक्रिया असते. .पण मग प्रतिक्रीया कशी करायची त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे हा प्रश्न पडतो. स्टेफन कोव्हे यावर म्हणतो की प्रतिक्रीया कधीच स्वतंत्र नसते. ती क्रियेवर अवलंबून असते.क्रिया आणि प्रतिक्रिया यांच्या दरम्यान एक अवसर असतो. त्या वेळेचा वापर करून प्रतिसाद देता येतो. प्रतिक्रीया कशी द्यायची हे आपण ठरवू शकत नाही पण प्रतिसाद कसा द्यायचे हे मात्र आपण ठरवु शकतो.
एखाद्या गोष्टीचा परिणाम आपण आपल्यावर कसा होऊ द्यायचा हे आपण ठरवू शकतो.
शे दोनशे किमी वेगाने येणार्‍या चेंडूला घाबरून विकेट फेकायची ही प्रतिक्रीया झाली चेंडूच्या वेगाचा फायदा घेत त्याला सीमेपार भिरकावून द्यायचे हा झाला प्रतिसाद.
एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतीसाद देणे जमले तर परीणाम आपल्या ताब्यात राहु शकतील.
पुढाकार घ्या असे सांगताना कोणत्या गोष्टीत पुढाकार घ्यायचा हे कसे ठरवायचे हे सांगताना कोव्हे म्हणतो की ज्या गोष्टींवर तुमचे थेट नियंत्रण राहु शकते त्यावर लक्ष्य केंद्रीत करा.
उदा: दिवसभराच्या चोवीसतासात माझ्या सभोवताली अनेक गोष्टी घडत असतात. त्यापैकी माझा ज्यावर ताबा असेल त्याच गोष्टीवर लक्ष्य केंद्रीत करावे.
टीव्ही वर बातम्या पहाणे , अभ्यास करणे , वर्तमान पत्र वाचणे , राजकारणाची चर्चा करणे. यात अभ्यास करणे या गोष्टीवर माझा कंट्रोल /प्रभाव राहू शकतो कारण टीव्हीवर बातम्या काय येणार आहेत राजकारण कसे चालणार आहे यावर माझा थेट काहीच प्रभाव नसतो
दुसरी सवय : बिगीन विथ द एन्ड इन माईन्ड . शेवट काय करायचा हे डोक्यात ठेऊन सुरवात करा
या सवयी बाबत बोलतान कोव्हे म्हणतो की कोणतेही काम करण्यापूर्वी यातून काय साध्य करायचे आहे ते ठरवूनच मग सुरुवात करा.
जगात कोणतीही गोष्ट दोनदा तयार होत असते. सर्वप्रथम ती मनात आरखडा रूपात बनते मगच ती प्रत्यक्षात येते.
ताजमहाल बनण्यापूर्वी त्याचा आराखडा कोणाच्या तरी मनात उतरला असेल नन्तर तो कागदावर आला असेल मग तो प्रत्यक्षात बनला असेल.
पुढाकार घेऊन कृती करायची ती कशासाठी करायची हे नक्की करायचे. त्यातून काय मिळणार आहे ते ठरवून मग कृती करायची. हे करताना कोणती कृती करायची ते कसे ठरवायचे हे सांगताना कोव्हे म्हणतो की आपल्या रोजच्या व्यवहारात बरीच कामे असतात. त्यात काही तातडीची असतात काही महत्त्वाची असतात. काही तातडीची आणि महत्त्वाची सुद्धा असतात.कोव्हे या कामांची १)तातडीची व मह्त्वाची ,२) कमी तातडीची पण महत्त्वाची, ३)तातडीची पण फारसे महत्त्व नसलेली , ४)कमी तातडीची कमी महत्त्वाची वर्गवारी करतो.
पहिल्या वर्गात बहुतेकदा क्रायसीस प्रकारची कामे असतात. दुसर्‍या गटात मेन्टेनन्स ( फिजीकल / बौद्धीक) येतो.
तिसर्‍या प्रकारा बहुधा सामाजीक कार्यक्रम वगैरे असतात. तर चौथ्या प्रकारात गॉसिपींग चकाट्या या गोष्टी येतात
पैकी दुसर्‍या गटात मोडणार्‍या गोष्टींवर लक्ष्य दिले तर क्रायसीस कमी होतात. आणि काय करायचे ते ठरवता येते.
तिसरी सवय : फर्स्ट थिंग फर्स्ट ......पहिले काम अगोदर करा.
ऐकायला हे वाक्य जरा विचित्रच वाटते पण कोव्हे यात कोणत्या कृतीला अग्रक्रम द्यायचा आणि तो अग्रक्रम कसा ठरवायचा हे सांगतो.
आपण आपल्या जगण्यात कोणती तरी गोष्त केंद्रस्थानी ठेवून आपली धोरणे कृती ठरवत असतो.
हे केंद्रस्थान प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे असते. ते कुटुंब , सामाजीक संस्था , नोकरी , धर्म ,मुले पत्नी , मित्र अशा अनेक प्रकारचे असु शकते. कित्येकांच्या बाबतीत शत्रु हे केंद्रस्थान असते. त्यांची प्रत्येक कृती शत्रुला केंद्रस्थानी ठेऊनच घडत असते.शत्रु अमूक करतो म्हणून मी असे करतो. असे त्यांच्या बाबतीत होत असते.
( रावण आणि कर्ण ही या प्रकाराची उदहरणे) आपण अपल्या जगण्याचा केंद्रबिंदू ओळखला तर त्या संदर्भातले काम करायला आपल्याला आवडतच असते. साहाजीक त्यात यश मिळण्याचे प्रमाण अधीक असते.
इतर चार सवयींबद्दल पुन्हा कधितरी.
हे पुस्तक एका दमात वाचता येत नाही. एकेक पान डोक्यात मुरवत जावे लागते . पुस्तक वाचताना आपण स्वतःलाच वाचत असतो.
वाचक एक वेगळाच अनुभव घेत जातो. पानागणीक
तो संपन्न होत जातो.