Wednesday, September 11, 2013

संपूर्ण गणपती आरती

रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती

प्रचलित आरती आपण म्हणतो ती फ़क्त ३ कड़वी म्हटली जातात पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे असे म्हणतात ती खालिलप्रमाणे आहे.

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥

माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले  ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले  ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले  ॥ जय० ॥३॥

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥

छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा  घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना
॥  जय ० ॥ ७ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती

साभार --- उमेश जोशी गुरूजी

Wednesday, September 4, 2013

नियोजन

शेतकरी राबतोय शेतात त्याला नाही अनुदान
कर्जमाफ करण्यामागे घोटाळा करण्याचा प्लान
न चुकता कर भरणारया सामान्याला खड्डे प्रदान
अंध जनता सरकार बनवे करून पंचवर्ष मतदान

होता म्हणे भारत देश प्रगत व सोन्याची खाण
राजा महाराजा निभावायाचे प्रजाहिताचे वाण
आधुनिक राज्यकर्त्याना नाही जनहिताची जाण
महान लोकशाही असलेला माझा देश महान

मोकाट सुटले गुन्हेगार त्यानां पोलिसकृपेचे दान
निर्दोष मात्र न्यायासाठी कोर्टात झिजवी वहाण
कायदा वाकतो,त्याला वाकविणारा असे धनवान
कोणत्याही कामासाठी नोटेवरच्या गांधीना मान

घराणेशाही चालू सर्वत्र लोकशाहीची नसे जाण
सर्व पिढ्या ओरबडाण्यात मग्न,लक्ष्य एकबाण
विभाज्य मतांवर सदैव नजर त्याला नाही वाण
त्यासाठी मदरश्यांना विनाआधार अनुदान प्रदान

आपला तो कार्टा दुसरयाच्याला बाब्या संबोधन
कार्ट्याला मोबाइल टेब्लेट आमिषाचे संशोधन
बाब्याला खुश करणं देवून अनुदान,सवलती,धन
निवडणुकीआधीच वार्ड फिक्स करून उत्खन्नन

निवडून दिलेल्या प्रतिनिधिनी जनतेला फसवीणं
प्रत्येक निवडणुकीत नेत्यांच नियोजन अनुभवणं
अंधेर नगरी चौपट राजा ही म्हण खरी करणं
स्वतंत्र भारतात डोळे असूनही आंधळ होणं

---निलेश जोशी