Monday, March 31, 2014

Thought Provoking Questions

24 Thought Provoking Questions You Need To Answer To Know Yourself Better
 

What would people say about you at your funeral?

What do you believe stands between you and complete happiness?

When will you be good enough for you? Is there some breaking point where you will accept everything about yourself?

If you were at heaven’s gates, and God asked “you why should I let you in?”, what would you say?

Do you fear death? If so, do you have a good reason?
If you lost everything tomorrow, whose arms would you want to run into?

Does that person know how much they mean to you?

 If you had the chance to go back in time and change one thing, what would you change?

If you could make a 30 second speech to the entire world, what would you say?

If you had all the money in the world but still had to have some kind of job, what would you choose to do?

What would you change if you were told with 100% certainty that God does not exist? Or if you don’t believe in God, that he does exist?

What would you change if you knew you were NEVER going to die?

If this were the last day of your life, would you want to do what you were about to do today?

If your life was a movie, what would be the title?

If you could ask for one wish, what would it be?

How could you describe yourself in 5 words?

Are there chances you’ve passed up that you wish you’d have taken?

How old would you be if you didn’t know how old are you?
If not now, then when?

What would you do differently if you knew nobody would judge you?

Are you aware that someone has it worse than you?

If you had to choose between a book or a movie what would you choose?

If you could see your whole life till now on a movie would you enjoy it?

If you could ask 1 person just one question, and he would answer honestly, what would you ask him and who would you ask?

 What would you do different if you were reborn?

I know some of these thought provoking questions might seem uncomfortable, but it’s important to remember they give us valuable insight on ourselves and guide us to live in ways that bring the most fulfillment and joy

श्रीगुरुचरित्र अध्याय १४

अध्‍याय १४ वा

श्रीगणेशाय नम:। नामधारक शिष्‍य देखा। विनवी सिद्धासि कौतुका। प्रश्‍न करी अतिविशेखा। एक चित्ते परियेसा॥१॥ जयजया योगीश्‍वरा। सिद्धमूर्ति ज्ञानसागरा। पुढील कथाविस्‍तारा। ज्ञान होय आम्‍हा ऐसी॥२॥ उदरव्‍यथेच्‍या ब्राह्मणासी। प्रसन्‍न झाले श्रीगुरूकृपेसीं। पुढें कथा वर्तली कैसी। विस्‍तारावें आम्‍हाप्रती॥३॥ ऐकोनि शिष्‍यांचें वचन। संतोषें सिद्ध आपण। गुरूचरित्रकामधेनु। सांगता झाला विस्‍तारोनी॥४॥ ऐक शिष्‍या शिरोमणी । भिक्षा केली ज्‍याचे भुवनीं । तयावरी संतोषोनी । प्रसन्‍न झाले परियेसा ॥५॥ गुरूभक्‍तीचा प्रकार । पूर्ण जाणे द्विजवर । पूजा केली विचित्र । म्‍हणोनि आनंदे परियेसा ॥६॥ तया सांयदेव द्विजासी । श्रीगुरू बोलती संतोषीं । भक्‍त व्‍हावें वंशोवशीं । माझी प्रीति तुजवरी ॥७॥ ऐकोनि श्रीगुरूचें वचन । सायंदेव करी नमन । माथा चरणीं ठेवून । नमित झाला पुन: पुन: ॥८॥ जयजयाजी सद् गुरू । त्रिमूर्तीचा अवतारू । अविद्यामायें दिससी नरू । वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥ विश्‍वव्‍यापक तूंचि होसी । ब्रह्मा विष्‍णु व्‍योमकेसी । धरिलें स्‍वरूप तूं मानुषी । भक्‍तजन तारावया ॥१०॥ तव महिमा वर्णावयासी । शक्‍ती कैची आम्‍हांसी । मागतों एक तुम्‍हासीं । कृपा करणें गुरूमूर्ति ॥११॥ माझे वंशपरंपरी । भक्ति द्यावी निर्धारीं । इहसौख्‍य पुत्रपौत्रीं । अंतीं द्यावी सद् गती ॥१२॥ ऐशी विनंती करूनी। पुनरपि विनवी करूणावचनीं। सेवा करितों दारीं यवनीं। महाक्रूर असे तो ॥१३॥ प्रतिसंवत्‍सरी ब्राह्मणांसी घात करितो बहुवसीं। याचिकारणें आम्‍हासी। बोलवीतसे परियेसा॥१४॥ जातां तया जवळीं आपण। नि‍श्‍चयें घेईल आमूचा प्राण। भेटी झाली तुमची म्‍हणोन। मरण कैचें आम्‍हासीं॥१५॥ संतोषोनी श्रीगुरूमूर्तीं। अभय देती तयाप्रती। वि‍प्रमस्‍तकीं हस्‍त ठेवि‍ती। चिंता न करी म्‍हणोनि‍यां॥१६॥ भय सांडूनि‍ त्‍वां जावें। क्रूर यवनातें भेटावें। संतोषोनी प्रि‍यभावें। पुनरपि‍ पाठवील आम्‍हाप्रती॥१७॥ जोंवरी परतोनि‍ तूं येसी। असों आम्‍ही भरंवसी। तूं आलि‍या संतोषी। जाऊ मग येथोनि‍यां॥१८॥ परंपरीं वंशोवंशीं। अखि‍लाभीष्‍ट तूं पावसीं। वाढे त्‍यंतती तुझी बहूत॥१९॥ तुझे वंशपरंपरी। सुखे नांदतीं पुत्रपौत्री। अखंड लक्ष्‍मी तुझे घरीं। नि‍रोगी शतायु नांदाल॥२०॥ ऐसा वर लाधोन। नि‍घें सांयदेव ब्राह्मण। जेथे होता यवन। गेला त्‍वरि‍त त्‍याजवळीं॥२१॥ कालांतक यम जैसा। यवन दुष्‍ट परि‍येसा। ब्राह्मणातें पाहतां कैसा। ज्‍वालारूप होता झाला॥२२॥ वि‍न्‍मुख होऊनि‍ गृहांत। गेला यवन कांपत। वि‍प्र झाला भयचकि‍त। मनीं श्रीगुरू ध्‍यातसे॥२३॥ कोप आलि‍या ओळंबयासी। केवी स्‍पर्शे अग्‍नीसी। श्रीगुरूकृपा असे जयासी। काय करील यवन दुष्‍ट॥२४॥ गरूडाचि‍या पि‍लासी। सर्प कैसी डंशी। तैसी त्‍या ब्राह्मणासी। असे कृपा श्रीगुरूची॥२५॥ कां एखादे सिंहासी। ऐरावत केवि‍ ग्रासी। श्रीगुरूकृपा ज्‍यासी। कळि‍काळाचें भय नाहीं॥२६॥ ज्‍याचे हृदयीं गुरूस्‍मरण। भय कैचें तया दारूण। काळमृत्‍यु न बाधे जाण। अपमृत्‍यु काय करी॥२७॥ ज्‍यासी नाही मृत्‍यूचें भय। त्‍यासी यवन करील काय। श्रीगुरूकृपा ज्‍यासी होय। यमाचें भय नाहीं तया॥२८॥ ऐसियापरी तो यवन। गृहीं रिघाला भ्रमेंकरून। दृढ निद्रा लागतां जाण। शरीरस्‍मरण नाहीं त्‍यासी॥२९॥ हृदयज्‍वाळ होवोनि त्‍यासी। जागृत होवोनि परियेसीं। प्राणांतक व्‍यथेसीं। कष्‍टतसे तये वेळी॥३०॥ स्‍मरण नसे कांहीं। म्‍हणे शस्‍त्र मारितों घायीं। छेदन करितो अवेव पाहीं। विप्र एक आपणासी॥३१॥ स्‍मरण झालें तये वेळीं। धांवत गेला ब्राह्मणाजवळीं। लोळतसे चरणकमळीं। म्‍हणे स्‍वामी तूंचि माझा॥३२॥ तूंते पाचारिलें येथें कवणीं। जावें त्‍वरित परतोनी। वस्‍त्रें भूषणें देवोनी। निरोप देत तये वेळीं॥३३॥ संतोषोनी द्विजवर। आला ग्रामीं सत्‍वर। गंगातीरीं जाय लवकर। श्रीगुरूचे दर्शनासी॥३४॥ देखोनियां श्रीगुरूसी। नमन करी भावेसीं। स्‍तोत्र करी बहुवसीं सांगे वृत्तांत आद्यंत॥३५॥ संतोषोनी श्रीगुरूमूर्ती। तया द्विजा आश्‍वासिती। दक्षिण दिशे जाऊ म्‍हणती। स्‍नानतीर्थयात्रेसी॥३६॥ ऐकोनि श्रीगुरूचें वचन। विनवितसे कर जोडून। न विसंबे आतां तुमचे चरण। आपण येईन समागमें॥३७॥ तुमचे चरणाविणें देखा। रा‍हूं न शकें क्षण एका। संसारसागरतारका। तूंचि देवा कृपासिंधू॥३८॥ उद्धरावया सागरांसी। गंगा आली भूमीसीं। तैसें स्‍वामी आम्‍हांसी। दर्शनें उद्धरा आपुल्‍या॥३९॥ भक्‍तवत्‍सल तुझी ख्‍याती। आम्‍हा। सांडणें काय नीती। सवेंचि येऊं हें निश्चितीं। म्‍हणोनि चरणीं लागला॥४०॥ येणें परी श्रीगुरूंसी। विनवी विप्र भावेंसीं। संतोषोनी विनयेसीं। श्रीगुरू म्‍हणती तये वेळीं॥४१॥ कारण असे आम्‍हा जाणें। तीर्थें असती दक्षिणें। पुनरपि तुम्‍हां दर्शन देणें। संवत्‍सरीं पंचदशीं॥४२॥ आम्‍ही तुमचे ग्रामसमीप। वास करूं हे निश्चित। कलत्र पुत्र इष्‍ट भ्रात। तुम्‍हीं आम्‍हां भेटावें॥४३॥ न करा चिंता असा सुखें। सकळ अरिष्‍टें गेलीं दु:खें। हस्‍त ठेवोनि मस्‍तकें। भाक देती तये वेळीं॥४४॥ ऐसे परी सांगोनी। श्रीगुरू निघाले तेथोनी। जेथे असे आरोग्‍य भवानी। वैजनाथ महाक्षेत्र तें॥४५॥ समस्‍त शिष्‍यासमवेत। श्रीगुरू आले तीर्थें पहात। प्रख्‍यात असे वैजनाथ। तेथे राहिले गुप्‍तरूपें॥४६॥ नामधारक विनवी सिद्धासी। कारण गुप्‍त व्‍हायासी। होते शिष्‍य बहुवसी। त्‍यांसी कोठें ठेविलें॥४७॥ गंगाधराचा नंदन। सांगे गुरूचरित्रवर्णन। सिद्धमुनि विस्‍तारोन। सांगे नामधारकासी॥४८॥ पुढील कथेचा विस्‍तार। सांगतसे अपरंपार। मन करोनि एकाग्र। ऐका श्रोते सकळिक॥४९॥ वास सरस्‍वतीचे तीरीं। सांयदेव साचारी। तया गुरूतें निर्धारीं। वस्‍त्रें भूषणें दीधलीं॥५०॥ गुरूचरित्र अमृत। सांयदेव आख्‍यान येथ। यवनभयरक्षित। थोर भाग्‍य तयाचें॥५१॥ इति श्रीनृसिंहसरस्‍वत्‍युपाख्‍याने दुष्‍टयव शासन नाम चतुर्दशोऽध्‍याय:॥१४॥

Sunday, March 30, 2014

घाई नव्हे भीती

आज घाई आहे प्रत्येकालाच

घाई पुढे जाण्याची
नव्हे भीती दूसरा पुढे जाइल याची

घाई आनंद अनुभवण्याची
नव्हे भीती आनंदी क्षण निसटुन जाण्याची

घाई समोरच्याला मुद्दे सांगण्याची
नव्हे भीती समोरचा तोच मुद्दा मांडेल याची

घाई सुचलेले विचार मांडण्याची
नव्हे भीती दूसरा अव्वल ठरेल याची

घाई आलेल्या सुखाला लाथाडण्याची
नव्हे भीती पुन्हा दु:ख येइल याची

घाई भरधाव प्रगती करण्याची
नव्हे भीती आयुष्य सरून जाण्याची

ही भीती घालवून घाई कमी करता येइल का??

जाउ दे दूसरा पुढे मी त्याच्या चुकातुन शिकेल
आलेला प्रत्येक क्षण मी आनंदाचा करेन
श्रवण शक्ती वाढवुन मी योग्य विचार मांडेन
व जीवन जगण्यापेक्षा मी ते मनापासून जगेन

                                    --निलेश जोशी

Sunday, March 9, 2014

अहिल्या व मतदार

अहिल्या शिळा म्हणे रामाला करी माझा उद्धार
पायधुळ लावावी एकदा उघडी मोक्षाचे दार

आला पतीरुपातील कपटी इंद्र केला अचानक वार
पतीसाम्यामूळे नाही ओळखे भारावले त्याने मज पार

कळता पती गौतमहृषीना , ते कोपले मनातून अपार
पडशील होवूनी शिळा भूवरी शाप निघाला सत्वरा

विनवणी ऐकुनी महर्षिनी उ:शाप दिला, उतरवला भार
अनेक तपानी रामावतारी विष्णु देव करी तुझा उद्धार

रामलक्ष्मण जाताना मिथिला विश्वामित्र सांगे कथासार
रामाने लाविता पाय शीळेला झाला अहिल्येचा उद्धार

नकळत घडता चुक तरीही प्रायच्चित्त भोगले अपार
शिक्षा भोगावी लागली पतिव्रतेलाही कैक वर्षे हजार

या लोकशाहीत पक्ष इंद्रअहिल्या राम असे मतदार
भोगेल जनताही शाप यातना निवडता चुकीचा उमेदवार

इतिहासातुन शिकवण घ्यावी नाही ते पोथीपुराणसार
योग्य निर्णय घेवुन मतदानाने निवडावा योग्य उमेदवार

निवडून आणू फ़क्त जे करतील आमच्या हिताचा विचार
धावून येतील करण्या मदत,आला भूकंप वा पडली गार

नको खुर्चीचे राजकारण नको जातिपातिचा विचार
पाच वर्षे निचिंत घालवू निवडून देवू योग्य उमेदवार

                                               .....निलेश जोशी