Saturday, September 30, 2017

स्वयं जाणीव

मी गझल लिहिण्याचा केलेला एक प्रयत्न

स्वयं जाणीव

अनित्य आहे सर्व काही जीवनी
हे जीवन तरी कुठे शाश्वत आहे

उत्पन्न व्यय आलेख हा आयुष्याचा
नवनिर्मिती होण्या प्रत्येकास संपणे आहे

आठवांचा गुच्छ असुदे कितीही सुंदर
कधीतरी त्यालाही जगती अंत आहे

बोलती स्तुती गाती जीवनी नित्य सारे
स्तुतीच्या ओघालाही काहीतरी मर्यादा आहे

जरूरत नसता बोल लावीती इतरांना जेजे
कृतघ्न अवघे काम झाल्या विसरत आहे

आजचे भाट होतील निष्क्रिय केव्हातरी
भविष्यातील भाट आजपासून शोधणे आहे

दुसऱ्यांवर विसंबंण्याला नित्य शोध घेणे आहे
विसंबणारा न मिळाला तर अवघा घात आहे

स्वयंसिद्ध होणे हीच गुरुकिल्ली आयुष्याची
इतरांची मदत मग नसली तरीही आनंद आहे

शिकुनी चुकातुनी नित्य पुढे जाणे आहे
नाहीतर डोळे बंद करणारी मांजरही आहे

बंद डोळे उघडले वेळेत तर सूर्योदय पाहू
पहाट सांज दोन्ही माहौल सारखाच आहे

सांजेला पहाट समजून फसवू जगाला इथे
न्यायाधीश अंतरीचा सर्वात श्रेष्ठ आहे

सारांश एवढाच स्वयंजाणीव आवश्यक आहे
डोळ्यावर पट्टीवाली गांधारी सर्वा ज्ञात आहे

--- निलेश जोशी

Tuesday, September 19, 2017

गुरू उपदेश

नामधारका तू विसरू नकोस....

"नामधारका "

रोज थोडे तरी नामस्मरण
केल्यावाचून राहू नकोस,
सद्गुरूनाथ पहातायेत तुला
गुरूदक्षिणा ( नामस्मरण) मात्र विसरु नकोस....

तुझ्या वाटेत आडवे खूप येतील...
पायात पाय घालून पाडतिल....
त्यांना घाबरून तुझं
उभे राहणं सोडू नकोस..
सद्गुरू पहातायेत तुला गुरूदक्षिणा ( नामस्मरण) मात्र विसरू नकोस

तुझं कौतुक प्रत्येकाला इथं
रुचेलच असं नाही...
कौतुकासाठी तुझं नाव
सुचेलच असं नाही...
तू मात्र इतरांचं कौतुक
करण्यास  कचरु नकोस... सद्गुरु पाहातायेत तुला
गुरूदक्षिणा  ( नामस्मरण) मात्र विसरू   नकोस

तुला सुद्धा मन आहे
हे माहीत आहे मला.....
पण ब्रह्मांडाचा स्वामी असताना काय रे कमी तुला....
इतरांना भरभरून देणं मात्र
कधी सोडू नकोस ...    सद्गुरू पाहातायेत तुला गुरूदक्षिणा ( नामस्मरण) मात्र विसरू नकोस

रडावंसं वाटत तेव्हा
रडून मोकळा हो...
कार्यासाठी लढावंसं वाटत तेव्हा,
लढून मोकळा हो....
रडण्यामध्ये मात्र तुझे
कार्य विसरू नकोस      सद्गुरू पाहातायेत तुला
गुरूदक्षिणा  ( नामस्मरण) मात्र     विसरू नकोस

तुझ्या कार्याचे कोणाला पुरावे
द्यायची गरज नाही...
कुणासाठी तुला कार्य
सोडायची गरज नाही....
सद्गुरू संकल्पासाठी पुढे
चालणं तू सोडू नकोस..
सद्गुरू पाहातायेत तुला
गुरूदक्षिणा ( नामस्मरण) मात्र विसरू नकोस

Saturday, September 2, 2017

पंचमुख हनुमान कवच

ॐ श्री पंचवदनायांजनेयाय नमः। ॐ अस्य श्री पंचमुखहनुमत्कवचमन्त्रस्य ब्रह्मा ऋषिः, गायत्रीछन्दः,पंचमुखविराट्हनुमान्‌ देवता,
ह्रीं बीजं, श्रीं शक्ति, क्रौं कीलकं, क्रूं कवचं, क्रैं अस्राय फट्

इति दिग्बन्धः ॥

श्री गरुड उवाच:

अथ ध्यानं प्रवक्ष्यामि श्रृणुसर्वांगसुन्दरि ।
यत्कृतं देवदेवेन ध्यानं हनुमतः प्रियम्‌ ॥1॥

पंचवक्त्रं महाभीमं त्रिपंचनयनैर्युतम्‌ ।
बाहुभिर्दशभिर्युक्तं सर्वकामार्थसिद्धिदम्‌ ॥2॥

पूर्वंतु वानरं वक्त्रं कोटिसूर्यसमप्रभम्‌ ।
दंष्ट्राकरालवदनं भृकुटीकुटिलेक्षणम्‌ ॥3॥

अस्यैव दक्षिणं वक्त्रं नारसिंहं महाद्भुतम्‌ ।
अत्युग्रतेजोवपुषं भीषणं भयनाशनम्‌ ॥4॥

पश्चिमं गारुडं वक्त्रं वक्रतुंडं महाबलम्‌॥
सर्वनागप्रशमनं विषभूतादिकृन्तनम्‌ ॥5॥

उत्तरं सौकरं वक्त्रं कृष्णं दीप्तं नभोपमम्‌ ।
पातालसिंहवेतालज्वररोगादिकृन्तनम्‌ ॥6॥

ऊर्ध्वं हयाननं घोरं दानवांतकरं परम ।
येन वक्त्रेण विप्रेंद्र तारकाख्यं महासुरम्‌ ॥7॥

जघान शरणं तत्स्यात्सर्वशत्रुहरं परम्‌ ।
ध्यात्वा पंचमुखं रुद्रं हनुमन्तं दयानिधिम्‌ ॥8॥

खड्गं त्रिशूलं खट्वांगं पाशमंकुशपर्वतम्‌ ।
मुष्टिं कौमोदकीं वृक्षं धारयन्तं कमण्डलुम्‌ ॥9॥

भिन्दिपालं ज्ञानमुद्रां दशभिर्मुनिपुंगवम्‌ ।
एतान्यायुधजालानि धारयन्तं भजाम्यहम्‌ ॥10॥

प्रेतासनोपविष्टं तं सर्वाभरणभूषितम्‌ ।
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम्‌ ॥11॥

सर्वाश्चर्यमयं देव हनुमद्विश्वतोमुखम्‌ ।

पंचास्यमच्युतम नेकविचित्रवर्णं
वक्त्रंशशांकशिखरं कपिराजवयम ।
पीतांबरादिमुकुटैरूपशोभितांग
पिंगाक्षमाद्यमनिशं मनसा स्मरामि ॥12॥

मर्कटेशं महोत्साहं सर्वशत्रुहरं परम्‌ ।
शत्रु संहर मां रक्ष श्रीमन्नापदमुद्धर ॥13॥

ॐ हरिमर्कट मर्कट मन्त्रमिदं
परिलिख्यति लिख्यति वामतले ।

यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं
यदि मुंच्यति मुंच्यति वामलता ॥14॥

ॐ हरिमर्कटाय स्वाहा ।
ॐ नमो भगवते पंचवदनाय पूर्वकपिमुखाय सकलशत्रुसंहारकाय स्वाहा ।
ॐ नमो भगवते पंचवदनाय दक्षिणमुखाय करालवदनाय नारसिंहाय सकलभूतप्रमथनाय स्वाहा ।
ॐ नमो भगवते पंचवदनाय पश्चिममुखाय गुरुडाननाय सकलविषहराय स्वाहा ।
ॐ नमो भगवते पंचवदनाय उत्तरमुखाय आदिवराहाय सकलसम्पत्कराय स्वाहा ।
ऊँ नमो भगवते पंचवदनाय ऊर्ध्वमुखाय हयग्रीवाय सकलजनशंकराय स्वाहा ।

ॐ अस्य श्री पंचमुखहनुमन्मंत्रस्य
श्रीरामचन्द्र ऋषिः अनुष्टुप्‌छन्दः,
पंचमुखवीरहनुमान्‌ देवता,
हनुमान इति बीजम्‌,
वायुपुत्र इति शक्तिः,
अंजनीसुत इति कीलकम्‌, श्रीरामदूतहनुमत्प्रसादसिद्धयर्थे जपे विनियोगः ।

ॐ अंजनीसुताय अंगुष्ठाभ्यां नमः ।
ॐ रुद्रमूर्तये तर्जनीभ्यां नमः ।
ॐ वायुपुत्राय मध्माभ्यां नमः ।
ॐ अग्निगर्भाय अनामिकाभ्यां नमः ।
ॐ रामदूताय कनिष्ठिकाभ्यां नमः ।
ॐ पंचमुखहनुमते करतलकरपृष्ठाभ्यां नमः ।

इति करन्यासः ।

ॐ अंजनीसुताय हृदयाय नमः ।
ॐ रुद्रमूर्तये शिरसे स्वाहा ।
ॐ वायुपुत्राय शिखायै वंषट् ।
ॐ अग्निगर्भाय कवचाय हुं ।
ॐ रामदूताय नेत्रत्रयाय वौषट् ।
ॐ पंचमुखहनुमते अस्राय फट् ।
पंचमुखहनुमते स्वाहा ।
इति दिग्बन्धः ।

अथ ध्यानम्‌:

वन्दे वानरनारसिहखगराट्क्रोडाश्ववक्रान्वितं दिव्यालंकरणं त्रिपश्चनयनं दैदीप्यमानं रुचा । हस्ताब्जैरसिखेटपुस्तकसुधाकुम्भांकुशादि हलं
खटांगं फणिभूरुहं दशभुजं सर्वारिवीरापहम्‌ ॥1॥

अथ मंत्रः
ॐ श्रीरामदूतायांजनेयाय वायुपुत्राय महाबलपराक्र्रमाय सीतादुःखनिवारणाय लंकादहनकारणाय महाबलप्रचण्डाय फाल्गुनसखाय कोलाहलसकल ब्रह्माण्डविश्वरूपाय सप्तसमुद्रनिर्लंघनाय पिंगलनयनायामितविक्रमाय सूर्यबिम्बफलसेवनाय दुष्टनिवारणाय दृष्टिनिरालंकृताय संजीविनीसंजीवित अंगदलक्ष्मणमहाकपिसैन्यप्राणदाय दशकण्ठविध्वंसनाय रामेष्टाय महाफाल्गुनसखाय सीतासहित रामवरप्रदाय षट्प्रयोग अगम पंचमुखवीरहनुमन्मंत्रजपे विनियोगः ।

ॐ हरिमर्कटमर्कटाय बंबंबंबंबं वौषट् स्वाहा ।
ॐ हरिमर्कटमर्कटाय फंफंफंफंफं फट् स्वाहा ।
ॐ हरिमर्कटमर्कटाय खेंखेंखेंखेंखें मारणाय स्वाहा ।
ॐ हरिमर्कटमर्कटाय लुंलुंलुंलुंलुं आकर्षितसकलसम्पत्कराय स्वाहा ।
ॐ हरिमर्कटमर्कटाय धंधंधंधंधं शत्रुस्तम्भनाय स्वाहा ।
ॐ टंटंटंटंटं कूर्ममूर्तये पंचमुखवीरहनुमते परयन्त्रपरतंत्रोच्चाटनाय स्वाहा ।
ऊँ कंखंगंघंडं चंछंजंझंञं टंठंडंढंणं तंथंदंधंनं पंफंबंभंमं यंरंलंवं शंषंसंहं ळं क्ष स्वाहा। 

ॐ पूर्वकपिमुखाय पंचमुखहनुमते टंटंटंटंटं सकलशत्रुसंहरणाय स्वाहा ।
ॐ दक्षिणमुखाय पंचमुखहनुमते करालवदनाय नरसिहाय ।
ॐ ह्रां ह्रीं ह्रुं ह्रैं ह्रौं ह्रः सकलभूतप्रेतदमनाय स्वाहा ।

ऊँ पश्चिममुखाय गरुडाननाय पंचमुखहनुमते मंमंमंमंमं सकलविषहराय स्वाहा ।
ॐ उत्तरमुखाय आदिवराहाय लंलंलंलंलं नृसिंहाय नीलकण्ठमूर्तये पंचमुखहनुमतये स्वाहा ।
ॐ उर्ध्वमुखाय हयग्रीवाय रुंरुंरुंरुंरुं रुद्रमूर्तये सकलप्रयोजननिर्वाहकाय स्वाहा ।
ऊँ अंजनीसुताय वायुपुत्राय महाबलाय सीताशोकनिवारणाय श्रीरामचंद्रकृपापादुकाय
महावीर्यप्रमथनाय ब्रह्माण्डनाथाय कामदाय पंचमुखवीरहनुमते स्वाहा ।
भूतप्रेतपिशाच ब्रह्मराक्षस शाकिनीडाकिनी अंन्तरिक्षग्रह परयंत्रपरतंत्रोच्चटनाय स्वाहा ।
सकलप्रयोजननिर्वाहकाय पंचमुखवीरहनुमते श्रीरामचन्द्रवरप्रसादाय जंजंजंजंजं स्वाहा ।

इदं कवचं पठित्वा तु महाकवच पठेन्नरः ।
एकवारं जपेत्स्तोत्रं सर्वशत्रुनिवारणम्‌ ॥15॥

द्विवारं तु पठेन्नित्यं पुत्रपौत्रप्रवर्धनम्‌ ।
त्रिवारं च पठेन्नित्यं सर्वसम्पतकरं शुभम्‌ ॥16॥

चतुर्वारं पठेन्नित्यं सर्वरोगनिवारणम्‌ ।
पंचवारं पठेन्नित्यं सर्वलोकवशंकरम्‌ ॥17॥

षड्वारं च पठेन्नित्यं सर्वदेववशंकरम्‌ ।
सप्तवारं पठेन्नित्यं सर्वसौभाग्यदायकम्‌ ॥18॥

अष्टवारं पठेन्नित्यं मिष्टकामार्थसिद्धिदम्‌ ।
नववारं पठेन्नित्यं राजभोगमवाप्युनात्‌ ॥19॥

दशवारं पठेन्नित्यं त्रैलोक्यज्ञानदर्शनम्‌ ।
रुद्रावृत्तिं पठेन्नित्यं सर्वसिद्धिर्भवेद्ध्रुवम्‌ ॥20॥

निर्वंलो रोगयुक्तछ महाव्याख्यादीपीडित:
कवचस्मतरणेनैव महाबलमवाप्नुयात्‌ ॥21॥

॥ सुदर्शनसंहितायां श्रीरामचन्द्रसीताप्रोक्तं श्री पंचमुखहनुमत्कवचं संपूर्ण ॥

बा. भ. बोरकर - दिसली नसतीस तर

बा. भ. बोरकर - दिसली नसतीस तर

रतनअबोलीची वेणी माळलेली
आणि निळ्याजांभळ्या वस्रालंकारात
संध्येसारखी बहरलेली तू
तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात
आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस
तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर
हा भुलावणा सप्तरंगी सोहळा
असा सर्वांगानी फुलारलाच नसता
आपल्याच नादात तू
पाठ फिरवून परत जाताना
तुझी पैंजणपावले जीवघेण्या लयीत
तशी पडत राहिली नसती
तर माझ्या आनंदविभोर शद्बातून
कातरवेलची कातरता
आज अशी झिणझिणत राहिलीच नसती
अबोलकेपणाच्या गूढ गाढाईने
जाईजुईच्या सांद्र-मंद्र सुगंधाचा लळा
सहज चुकार स्पर्शाने तू मला लावला नसतास
तर उमलत्या फुलपाखरांची
आणि मुक्या भाबड्या जनावरांची
आर्जवी हळुवार भाषा
इतक्या स्पष्टपणाने मला कळलीच नसती
तू कशामुळे माझी जिवलग झालीस
ते खरेच मला आता आठवत नाही;
पण मला तोडताना
समुद्रकाठच्या सुरुच्या बनात
मिट्ट काळोखातून चंद्रकोर उगवेपर्यंत
तू मुसमुसत राहिलीस
हे मात्र मी अजून विसरु शकलेलो नाही
त्या वेळची तुझी ती आसवे
अजून माझ्या कंठाशी तुडुंबलेली आहेत
तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस
तर माझ्या शृंगाराचा अशोक
आज करुणेच्या आरक्त फुलांनी
असा डवरलाच नसता
तू तेव्हा आकाशाएवढी विशाल
आणि अवसेच्या गर्भासारखी दारुण
निराशा मला देऊन गेली नसतीस
तर स्वतःच्याच जीवन शोकांतिकेचा
मनमुराद रस चाखून
निःसंग अवधूतासारखा
मी या मध्यरात्रीच्या चांदण्यात
असा हिंडत राहिलोच नसतो
तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीसः
माझी सशरीर नियती होतीस
तसे नसते तर आज जो काय मी झालो आहे
तो झालोच नसतो
बा.भ.बोरकर १४/८/७६ बोरी

पाळणा - हा बाळ टिळक

हा बाळ टिळक माझा नवा नवसाचा (२)

सतेज-तेली टाळू भरली
कुरळ जावळाचा, नवा नवसाचा ||१|

शुद्ध खादीचे अंगरखे ते
ताईत धर्माचा, नवा नवसाचा ||२||

उतरावासा नच वाटे हा
बाळ कडेवरचा, नवा नवसाचा ||३||

अति हौसेने दूध पाजले
चांदीचा चमचा,नव्या नवसाचा||४||

रेडिओ कविता

कवी माहीत नाही पण माझ्या आईला मंगला जोशी हिला तोंडपाठ होते ,तिने हे गाणे म्हटले व मी लिहून काढले ,

सुंदर वाक्य रचना व शब्द रचना

रेडिओची कविता

कोण ग आई बोलतो कोण हा आई

इथे टेबलावरती मोठी
जनुदादूची गमते पेटी
कोण लपला हिचिया पोटी
नवलच नाही ?

मध्येच करतो भाषण हसुनी
कधी गातसे सुंदर गाणी
कोण करी हे कोठे बसुनी
नवलच नाही ?

केव्हा हसतो केव्हा रडतो
आढेवेढे कितीतरी घेतो
कधी गोड गाणी ऐकवतो
नवलच नाही?

मोगऱ्याचा हार कविता

मोगर्‍याचा हार
मुलगा-     हा हार शुभ्र किति आई
किति कोमल सुंदर पाहीं॥ क्षणभरी॥
किती वास मधुर या येई।
मम चित्त ओढुनी घेई ॥ बघ तरी॥
कशिं फुलें डंवरलीं असतीं।
किती अलंकार त्यापुढती॥ बहुपरी॥
भुवरी। जन्म घे तरी। वास जनशिरीं।
कसा हा मिळवी ।
जनमनें क शानें वळवी ॥ वद तरी ॥1॥

आई-     मधुवासें प्रिय हा सकलां ।
स्वगुणांनी तूं हो बाळा ॥ त्यापरी॥
हा धवलत्वें सुंदरसा।
चारित्र्यें शोभे तैसा॥ तूं तरी ॥
हा दिपवी जसा नगभारा।
तेज तूं लोपविं धीरां॥ त्यापरी
यापरी । वागशिल जरी। सकल जन तरी
तुजसि मम तनया।
शिरि धरतील हारासम या॥ कधिं तरी ॥

Friday, September 1, 2017

सुर्यावरची कविता

पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर

झाडांनी किती मुकुट घातले डोईस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी

हिरवेहिरवे गार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालिचे

सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर त-हेत-हेचे इंद्रधनुष्यांचे

अशी अचल फुलपाखरे, फुले साळीस जणू झुलती
साळीवर झोपली जणूं का पाळण्यांत झुलती.

झुळकन सुळकन ईकडून तिकडे किती दुसरी उडती!
हिरे माणकें पांचू फुटुनी पंखचि गरगरती!

पहा पांखरे चरोनी होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा?

कवी – भा. रा. तांबे

माडाचे भावगीत

आई माझ्याकडे चिंचवडला आली आहे
आज बोलता बोलता एक कवितेचे 2 ओळी म्हणून विचारते ही कविता कोणावर आहे?

क्षणभर नाही समजले मग पूर्ण कविता शोधली

बा भ बोरकर यांची ही कविता
चक्क माडावरची म्हणजे नारळाच्या झाडावरची

खूपच छान आहे
माड कल्पवृक्ष का आहे याचे यथार्थ वर्णन

    ॥ माडाचें भावगीत ॥

ताठ उंच मी उभा नभास नित्य बाहुनी
राहिलो तुझ्याचसाठिं बाहु हे उभारुनी

स्वर्ग सांडिला मुदें तुझ्याच मुक्तिकारणें
देव वाहिला तुला, तुलाच वाहिलें जिणें

तापतां उन्हीं तुला दिली प्रशान्त सांवली
भागवावया तहान गोड गार शाहळीं

मेघ वारिले किती सुरम्य बांधुनी मठी
खावया दिलीं तुला फळें रसाळ गोमटीं

स्नान उष्ण घातलें तनूस तेल लावुनी
घास लाविले मुखा मुठेल तया मुठेल त्यात वाहुनी

रात दाटतां घरीं सुवर्णदीप लाविले
कुंतलीं प्रभातकालिं दैन्य सर्व झाडिलें

लग्नकारणीं, सणासुदीस, दुःखसंकटीं
साह्य मीं दिलें तुला सदैव बांधुनी कटी

स्वर्ग दाविण्या तुला स्वतःच जाहलों शिडी
चांदण्यांचिया तुला दिल्या भरून कावडी

गीत ऐकुनी तुझें तरारलों, थरारलों
नी चितारुनी भविष्य मी सहर्ष डोललो

तू परी कृपेमुळेंच होसि नित्य आंधळा
अन्‌ सुखामुळेंच जासि दुर्गतीचिया तळा

शंभु ठाकतां समोर गांगतीर्थ सांडुनी
कंठिंच्या हलाहलास जासि शीघ्र मोहुनी

कोटितीर्थ, मानवा ! असून माझाया शिरीं
तूं विषार्थ लाविली गळ्यास माझिया सुरी

स्वर्ग लाभतां करीं तयास नेसि रौरवा
धन्य धन्य बुद्धि रे तुझी विचित्र मानवा !

दुर्गतींत परी तुला करीन साथ मी
भावबद्ध मी तुला, तुझाच मित्र नेहमीं

भाविलें तुझ्यासवेँ रमेन दिव्य गौरवीं
स्वप्न तें विरून आज मी विषण्ण रौरवीं !