Wednesday, May 31, 2017

अन्याय आहे हा

बेल्सचे ओझे घेऊन खांद्यावर
कायम उभे आम्ही रहायचे
बॉलचा मारा आम्ही झेलायचा
आणि अंतिम निर्णय मात्र
त्या झोपलेल्या बेल्स पडल्या
तरच होणार , अन्याय आहे हा

प्रत्येक फलंदाज कोण आहे
हे बघून व्यूहरचना करून
कमजोरी बघून बॉलिंग करायची
त्यात फिल्डिंग बघा,
कॅप्टनचे मूड सांभाळा,
कहर म्हणजे मोजकीच अस्त्रे
पाजळून बॉलिंग करा
तरी गोलंदाजी कमजोरच
हे नेहमीच ऐकून घ्या
अन्याय आहे हा

डिफेन्स आम्ही करायचा
प्रत्येक येणाऱ्या चेंडूचा
मन लावून सामना करायचा
रन्स किती हवेत हे आठवून
प्रत्येक कमजोर चेंडू हेरायचा,
इकडे तिकडे फिल्डिंग बघत
ग्राऊंडचा पुरेपूर अंदाज घेत
रिस्क घेऊन बॉलला टोलवायचे
तरी आम्हाला आऊट देणारा
अंपायरच खरा,अन्याय आहे हा

पॉवरप्ले मध्ये सर्कलच्या आत
इकडे पळ तिकडे जा
बॉल येतोय मार उडी
झेल आला पकडायलाच हवा
थुंकलेल्या ग्राऊंडवरून
सरपटत येणारा बॉल
अंगाला लेपून चिखल,थुंकी
हातात घ्या आणि करा थ्रो
आणि एवढेहीे करून सुद्धा
पोचलाच नाही पिचकडे तर
फिल्डिंग कोच नवीन प्रकार
माथी आहेच,अन्याय आहे हा

करोडो लाखोच्या बोली
प्रत्येक मॅचला हिरोझम
जाहिराती फ्रॅंचायजी यांना
तरी स्वतः कामधंदा सोडून
सहस्त्र खर्चून तिकीट काढून
सुट्टी नाणी बलिदान करून
आलोय स्टेडियम वर
दर्शनाला अनेक हिरोंच्या
एवढे करूनही शेवटी
स्टेडिअमवरील स्क्रीनवरच
त्यांना पाहून धन्यता मानून
300 रु चे पाणी वेफर खाऊन
थकून जातोय घरी परतून
मित्रांनो अन्याय आहे हा
शेवटी खरा अन्याय इथेचआहे

-- निलेश जोशी

Friday, May 19, 2017

मुंज सोहळा

झाला मुंज सोहळा आणि स्मृतींचे बांड तयार
गोड,थोडे कटू अनुभव यांची जंत्रीच जणू मनात

सर्वांचीच सुंदर मदत, मोठ्यांचे भरभरून आशीर्वाद
खंबीरपणे नवीन आव्हाने झेलण्या तरुणाईची साथ

सोहळा तीन दिसांचा पण तयारी पूर्ण चार महिन्यांची
जणू अंकुर उमलण्याआधीची केली मशागत भूमीची

शक्यता अशक्यता पडताळून कार्यसिद्धी सज्ज व्हावे
कामांची विभागणी करता नवयुवकांनी लीड घ्यावे

भाऊ बहीणी पुतणे भाचे सगे सोयरे येती मदतीला
प्रत्येकाचा मोलाचा सहभाग नेले कार्य सिद्धीला

धन्यवाद म्हणुनी, सर्वाना मी नाही उतराई होणार
काव्यपंक्ती करुनी अर्पण स्मृत्यात्तर ऋणी राहणार

जुनेच वेध लागती, नवीन कार्याची वाट चालता
स्मृती कितीक लागल्यात खास सापडायला

अजून यायचा आहे छायाचित्र संग्रह क्षणांचा
त्यातून उलगडतील पैलू ,जो दरवळ गत क्षणांचा

अंती करुनी स्वामींना व मोरयाला ह्रदयापासून नमस्कार
बटुसवे उभयता करतो तुम्हाला मनापासून प्रणाम

-- निलेश जोशी