Sunday, August 28, 2016

कार्तवीर्य मंत्र

मंत्र सामर्थ्य व अनुभव

मननेन त्रायते इति मन्त्रः :- संदर्भ विकी

मंत्र --
कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !
(कोणतीही गोष्ट हरवली व ती सापडावी म्हणून या मंत्राचा जप करावा)

Monday, August 22, 2016

देव व दानव

एक चित्रकार होता , त्याला एकदा बालपणीच्या कृष्णाचे चित्र काढायची ऑफर येते , तो खूप खुश होतो व चित्र काढायला बसतो पण काही केल्या त्याच्या डोळ्यासमोर बाळकृष्ण मूर्ती येत नाही , हीच समस्या तो आपल्या मित्राला सांगतो तेव्हा मित्र त्याला सल्ला देतो कि शाळेतील एखादा गोंडस मुलगा सुट्टीदिवाशी घरी बोलावं व त्याला कृष्णासारखा सजवून त्याचे चित्र काढ ,लहान मुले हे निरागस व देवस्वरूप असल्याने छान चित्र येईल.
    हि कल्पना त्याला आवडते व तो ती अमलातही आणतो . चित्र छान जमून येते व तो त्या 10 वर्षाच्या मुलाला ड्रेस ,  खाऊ घेऊन देतो व त्याच्या वडिलांना धन्यवाद देतो. व त्या चित्राला त्याला पारीतोषिकही मिळते.
   20 वर्षानंतर त्या चित्रकाराला पुन्हा दानव रेखाचित्र करायची ऑर्डर मिळते, तेव्हाही तो पुन्हा संभ्रमित होतो पण पुन्हा मित्राच्या सल्ल्यानुसार दानव म्हणजे खूप गुन्हे करून शिक्षा भोगणारे कैदी , त्यांचे चित्र थेट दानवासारखे असेल म्हणून तुरुंगाधिकारी यांची परवानगी घेऊन खूप शिक्षा झालेला तरुण समोर बसवून चित्र काढायला लागतो . तो क्रूर दिसणारा , केस पिंजारलेला व लालेलाल डोळ्यांचा कैदी मात्र चित्रकाराच्या समोर बसतो व त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागते.
     त्याचे रडू बघून चित्रकार अचंबित होतो पण तरीही तो त्याच्या जवळ जाऊन त्याला रडण्याचे कारण विचारतो. तेव्हा तो कैदी म्हणतो तुम्ही तेच चित्रकार आहेत ज्यांनी 20 वर्षांपूर्वी लहान मुलाला बसवून कृष्णाचे चित्र काढले होते व मी तोच मुलगा आहे जो तेव्हा तुमच्या समोर बसला होता. माझ्या वाईट कामामुळे मी दानव बनलोय,म्हणजेच तुमच्या हातून जी चित्रे निर्माण झाली त्यातील कृष्णपण मीच व कंस पण मीच ,
तात्पर्य - आपले कामच आपली ओळख ठरवत असते.
  

Sunday, August 21, 2016

दारिद्र्यदहन शिवस्तोत्र

॥दारिद्र्य दहन शिवस्तोत्रं॥

विश्वेश्वराय नरकार्णव तारणाय कणामृताय शशिशेखरधारणाय।
कर्पूरकान्तिधवलाय जटाधराय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥१॥

गौरीप्रियाय रजनीशकलाधराय कालान्तकाय भुजगाधिपकङ्कणाय।
गंगाधराय गजराजविमर्दनाय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥२॥

भक्तिप्रियाय भवरोगभयापहाय उग्राय दुर्गभवसागरतारणाय।
ज्योतिर्मयाय गुणनामसुनृत्यकाय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥३॥

चर्मम्बराय शवभस्मविलेपनाय भालेक्षणाय मणिकुण्डलमण्डिताय।
मंझीरपादयुगलाय जटाधराय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥४॥

पञ्चाननाय फणिराजविभूषणाय हेमांशुकाय भुवनत्रयमण्डिताय।
आनन्दभूमिवरदाय तमोमयाय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥५॥

भानुप्रियाय भवसागरतारणाय कालान्तकाय कमलासनपूजिताय।
नेत्रत्रयाय शुभलक्षण लक्षिताय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥६॥

रामप्रियाय रघुनाथवरप्रदाय नागप्रियाय नरकार्णवतारणाय।
पुण्येषु पुण्यभरिताय सुरार्चिताय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥७॥

मुक्तेश्वराय फलदाय गणेश्वराय गीतप्रियाय वृषभेश्वरवाहनाय।
मातङ्गचर्मवसनाय महेश्वराय दारिद्र्य दुःखदहनाय नमः शिवाय॥८॥

वसिष्ठेन कृतं स्तोत्रं सर्वरोगनिवारणं। सर्वसंपत्करं शीघ्रं पुत्रपौत्रादिवर्धनम्।
त्रिसंध्यं यः पठेन्नित्यं स हि स्वर्गमवाप्नुयात्॥९॥

॥इति वसिष्ठ विरचितं दारिद्र्यदहनशिवस्तोत्रं सम्पूर्णम्॥.

शिवस्तोत्र से रोग, कष्ट-दरिद्रता का निवारण दारीद्र्यदहन शिबस्त्रोत का पाठ रोग, कष्ट-दरिद्रता का निवारण करता हैं।

दारिद्र्यदहन शिवस्तोत्र के पाठ से रोग, कष्ट-दरिद्रता का निवारण

यदि किसी व्यक्ति को जीवन में किसी भी प्रकार के दुःख, कष्ट, रोग आदि से परेशान हो परेशानीया पीछा नहीं छोड रही हों, उनके लिये दारिद्र्यदहन शिवस्तोत्र का पाठ रामबाण हैं।

विद्वानो के मतानुशार जिन लोगो को जीवन में अथक परिश्राम एवं पूर्ण मेहनेत के उपरांत सफलता प्राप्त नहीं हो रही हों उन्हें दारिद्र्यदहन शिवस्तोत्र का पाठ पूर्ण श्रद्धा एवं विश्वास से नियमित करना चाहिये।

क्योकी एसा शास्रोक्त वचन हैं, की जो व्यक्ति श्रद्धा भाव से त्रिकाल अर्थात सुबह, संध्या एवं रात्री के समय दारिद्र्य दहन शिवस्तोत्रं का पाठ करता उनके सभी दुख, कष्ट सर्व रोगादिका शीघ्र निवारण हो जाता हैं और भगवान भोलेभंडारी की कृपा से उसे, सुख, संपत्ति एवं उत्तम संतान लाभ प्राप्त होता हैं। इसमें लेश मात्र भी संदेह नहीं हैं।

Sunday, August 14, 2016

दिव्यानुभव 4

#दिव्यानुभव

हा अनुभव सुद्धा आत्ता 2 महिन्यापूर्वीचा , 6 जून 2016 सोमवार होता , सोमवारी माझा उपवास असतो म्हणजे दुपारी फळे किंवा खिचडी व रात्री जेवून उपास सोडायचा.
त्या दिवशी कामावर ऑफिसला गेलो 2 चाकी गाडी घेऊन , कंपनी बस असली तरी मी सोमवारी 2 चाकी नेऊन कंपनी पार्किंगला ठेवायचो व पूर्ण आठवडा कंपनी बसने जा ये करायची व शनिवारी शॉर्ट शनिवार असतो तेव्हा पुन्हा दोन चाकी घेऊन घरी यायचे.

कंपनी पार्किंग ला ठेवण्याचा उद्देश एकच जरी कधी थांबायची वेळ आली व कंपनी बस चुकली तरीही आपले वाहन हाताशी आहे व त्यामुळे MIDC तुन तोकड्या प्रवासी वाहतूकीचा त्रास होत नाही.
  तर त्यादिवशी सर्व काम संपले व जायला निघणार त्यात बॉसने विचारले 2 अर्जंट कामे आहेत व ते स्वतः थांबणार आहेत तेव्हा थांबून लवकर होईल काम , मग मी बॉस व माझा कालिग मित्र सर्वच थांबलो व साडेआठ पर्यंत काम संपवले .
      10 मिनिटात कंपनीतून निघालो , व मी माझ्या 2 चाकी गाडीने गेट बाहेर आलो , मागून माझा कालिग मित्र त्याच्या 2 चाकी गाडीने येत होता. गेटसमोरील रस्ता पकडला आणि मला समांतर येणाऱ्या ट्रकने मला कोणताही इंडिकेटर , हॉर्न ना देता अचानक डाव्या बाजूला ट्रक वळवला , त्याचा परिणाम  ट्रकची धडक मला बसली व मी गाडीवरून खाली पडलो , पण धडक एवढी जबरदस्त होती की मी ट्रकच्या खाली आलो व पुढील चाके निघून गेली होती व मी ट्रकच्या मधोमध रस्त्यावर होतो.
त्या क्षणाला खूप भीती वाटली व आता मी ट्रकखाली चिरडणार इतक्यात काय झाले माहिती नाही पण कोणीतरी माझ्या जवळ आहे व मला सूचना देत आहे असे जाणवले .
ते जे कोणी होते त्यांनी मला सुरवतीला पॉझिटिव्ह व्हायला सांगितले , यातूनही तू सहीसलामत वाचाशील , तुझ्या डोक्यावर हेल्मेट आहे त्यामुळे शक्य तितके डोके खाली ठेव म्हणजे ट्रक डोक्याला लागणार नाही , दोन्ही हात आतल्या बाजूला ठेव त्यामुळे टायरखाली हात जाणार नाहीत या व अशा अनेक सूचना मला येत होत्या आणि मी त्या फॉलो करत होतो.

साधारण 40-50 सेकंदानंतर मी ट्रकच्या मागील बाजूतून बाहेर पडलो व ट्रक साधारण 100 मीटर वर जाऊन थांबला. माझा जो कालिग मित्र मागून येत होता त्याने पूर्ण अपघात डोळ्याने पहिला व जेव्हा मी डोके वर केले तेव्हा त्याने सुटकेचा निश्वास ठेवला . त्यानेच मला अंबुलन्स बोलावून हॉस्पिटल मध्ये हलवले व उपचार सुरु केले .
आताच 16 तारखेपासून साधारण 2 महिन्यांनी मी कामावर जायलाही लागलो .
पूर्ण अपघात बघितलेला व ज्यांनी माझी चुराडा झालेली दोन चाकी गाडी बघितली त्या सर्वांच्या मते या जबरदस्त अपघातातून फक्त 1 हात फ्रॅक्चर व पायाला खोल जखम यावरच बचावणे हे खूप मोठे आश्चर्य आहे. माझ्या मते त्यावेळी जे कोणी मला सूचना देत होते ती दिव्य शक्ती होती व महाराज त्या निमित्ताने माझे संरक्षण करायला स्वतः हजर होते.

अनंतकोटी महाराजाधिराज योगीराज समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय

       

Tuesday, August 9, 2016

सेव्हन हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टीव्ह पीपल

पुस्तके वाचताना काही पुस्तके नुसतीच चाळायची असतात थोड्या वेळातच विसरून जायची असतात तर काही दीर्घ काळ डोक्यात घर करून बसतात .
इंग्रजी भाषेने अशा पुस्तकांच्या खजिन्याची किल्ली एकदा मला मिळवून दिली. कोणीतरी सांगितले आणि सहज म्हणून हाती लागले म्हणूनही मला एक रत्नाचा परिचय झाला.स्टीफन कोव्हे या लेखकाचा. स्वारी त्यांच्या मॅनेजमेन्ट थॉट्स मुळे परिचित आहे पण त्यातही सरताज म्हणता येईल अशा " सेव्हन हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टीव्ह पीपल " या पुस्तकाचा.
मॅनेजमेंट शिकताना मानव या घटकाचा विशेष अभ्यास करायचा असतो. पण आपली मॅनेजमेंट शिकायची सुरुवातच होते ती ऍडम्स स्मिथ च्या टाईम ऍन्ड मोशन वर अधारीत उत्पादन प्रमेयाशी. कारखान्यात काम करणार्‍या कामगाराचा मानव म्हणून विचार करण्याऐवजी एक मशीन म्हणून विचार करायचा. त्याला भावना अहेत नाहीत याच्याशी कर्तव्य नाही.
लीडरशीप बद्दल तर काही विचारु नका. लीडरशीप म्हणजे लोकांवर वर्चस्व गाजवायचे हेच आडूनआडून डोक्यात भरवलेले असते
सेव्हन हॅबीट्स्.. हे पुस्तक बराच वेगळा विचार करते . पुस्तक वाचताना लेखकाच्या विचारांशी होतो त्यापेक्षाही स्वतःचाच नव्याने परिचय होतो.
पुस्तकाची सुरुवात करतानाच एक जुने उदाहरण नव्याने पुढे येते. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी.........
प्रॉडक्षन आणि प्रॉडक्षन कपॅबीलिटी एह दोन शब्द वारंवार येतात. पी ऍन्ड पीसी
प्रथम त्याबद्दल पाहु. सोन्याचे अंडे हे प्रॉडक्षन मानले तरे ते अंडे देणारी कोंबडी ही प्रॉडक्षन कपॅबिलीटी असते.
उत्पादन आणि उत्पादन करणारे यंत्र. प्रश्न हा येतो की नक्की लक्ष कशावर द्यायचे. कोंबडीवर की सोन्याच्या अंड्यावर?
कोंबडीवर लक्ष दिले तिला उत्तम खाऊपिऊ घातले आणि तिने अंडे दिले नाही तर ते व्यर्थ आहे. आणि कोंबडीकडून सतत नुसत्याच अंड्याची अपेक्षा केली आणि तिला खाऊ पिउ घातले नाही विश्रांती दिली नाही तर कोंबडी मरून जाईल.
एखाद्या लेथ मशीनवर केले जाणारे काम हे उत्पादन मानले तर लेथ मशीन हे प्रॉडक्षन कॅपॅबिलीटी आहे. नुसते मशीन चालवत राहिलो तर ते केंव्हातरी मोडून जाईल. मशीनला अधूनमधून विश्रांती दिली पाहिजे त्याची निगा राखली पाहिजे तर त्याची क्षमता टिकून राहील.
आपल्या शरीराचेही तसेच आहे. नुसते काम केले तर आजारी पडू आपले शरीर( प्रॉडक्षन कॅपॅबिलीटी) हरवून बसु. आहाराबरोबरच व्यायाम्/ विश्रांती ( शारीरीक + बौद्धीक ) शरीराला मिळायला हवी.
अशी सुरुवात झाल्यानंतर लेख पुस्तकाचा आढावा घेतो. त्याला तो इनसाईड आउट म्हणतो.
एखादी गोष्ट आपल्याला जशी दिसते ती इतराना तशी दिसेलच असे नाही. एखादा प्रश्न आपल्याला जसा भासतो तो इतराना तसाच भासेल असे नाही. इतरांची मते वेगळी असू शकतात. ती आपल्या मतांइतकीच बरोबर असू शकतात्.यासाठी तो एक चित्र दाखवतो. एकाच चित्रात दडलेले दोन वेगळे चेहेरे पाहिल्यावर हे मत सहज पटते.
या नन्तर लेखक सर्वोत्तम प्रभावी व्यक्तींच्या सात सवयींकडे वळतो.या सात सवयी बद्दल त्याने जगातील अनेक व्यक्तींच्या अभ्यासानन्तर लिहिले आहे.
बरेच लोक एका ठराविक मार्गाने जात असतात. कधीकाळी त्याना त्यांची चूक कळते. ते आपला मार्ग बदलतात.
स्टीफन कोव्हे एक मस्त उदाहरण देतो.
एका अंधार्‍या रात्री एक जहाज समुद्रात सफर करत असते. अंधारात नीट दिसत नसते जहाजाच्या कप्तानाला दूरवर एक दिवा दिसतो. बहुतेक दुसरे जहाज असावे. कप्तान रेडीओवर संदेश पाठवतो. आपन एकाच मार्गावर आहोत. धदक होईल तुम्ही मार्ग बदला.
दुसर्‍या बाजूने उलट उत्तर येते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण तुम्हीच दिशा बदला. कप्तान चिडून पुन्हा संदेश पाठवतो. आम्ही लढाऊ जहाक आहोत. तुम्ही मुकाट्याने मार्ग बदला. उलट बाजूने उत्तर येते " आम्ही दीपस्तंभ ( दीपगृह)आहोत"
कप्तानाने मार्ग बदलला.
उत्तम सवयी या दीपस्तंभासारख्या असतात. त्या तुम्हाला अंधारात/धुक्यातही मार्ग दाखवतात. दीपस्तंभाशी टक्कर घेण्यात काहीच फायदा नसतो. दीपस्तंभाच्या खडकावर आदळून आपलेच तारु फुटते.
या सात सवयी......खरेतर त्या तशा एकमेकांपासून वेगळ्या करता येणार नाहीत.
पहिल्या तीन सवयी आहेत सेल्फ व्हिक्टरी म्हणजे स्वतः वर विजयमिळवण्यासाठी
दुसर्‍या तीन आहेत त्या सोशल व्हिक्टरी म्हणजे सामाज जिंकण्यासाठी
सातवी सवय वेगळीच आहे. ती या सहा सवयीनी मिळून बनलेली आहे.
पहिली सवय आहे. प्रोऍक्टीव्हीटी......मराठीत याला तेव्हढा योग्य शब्द मिळाला नाही. पण इनिशिएटीव्ह म्हणजे पुढाकार या पेक्षा थोडेसे पुढे जाऊन जी क्रिया येईल तशा प्रकारचा अर्थ अभिप्रेत आहे.
लेखक म्हणतो की एखादी गोष्ट स्वतः होऊन सुरु करणे ही एक सवय आहे.
बरेचदा आपण एखादी गोष्ट करतो ती कोणत्यातरी दुसर्‍या गोष्टीची प्रतिक्रिया म्हणून करत असतो. हे करण्यात ती गोष्ट करण्यात काय करावे यावर आपले कोणतेच नियंत्रण रहात नाही. जणू दुसरेच कोणितरी आपले नियंत्रण करत असते.
एखाद्या गोष्टीचे काय परिणाम होतील याचा अंदाज घेऊन आपण निर्णय घेतो. कधी कधी परिणामांचा विचार करून आपण निर्णय घेण्याचे टाळत असतो. पण निर्णय घेण्याचे टाळबे हा सुद्धा एक निर्णयच आहे हे आप्ल्या लक्ष्यात येत नाही.
कृती आणि परिणाम हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखादी पेन्सील उचलण्याच्या अगोदर ती कोणत्या बाजूच्या टोकाकडून उचलायची हे आपण ठरवू शकतो पण त्या टोकाकडून पेन्सील उचलताना दुसरे टोकही पेन्सीलच्या सोबतच येते. पेन्सीलीचे एक टोक हे जर कृती मानले तर दुसरे टोक म्हणजे त्या कृतीचे परिणाम असते
कृती करताना त्या कृतीचे परिणाम आपण टाळू शकत नाही. कृती न करणे ही सुद्धा एक प्रकारे कृतीच आहे. त्याचे परिणाम टाळू शकत नाही.
बहुतेकदा आपण केलेले कृती ही एखाद्या कृतीची प्रतिक्रिया असते. .पण मग प्रतिक्रीया कशी करायची त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे हा प्रश्न पडतो. स्टेफन कोव्हे यावर म्हणतो की प्रतिक्रीया कधीच स्वतंत्र नसते. ती क्रियेवर अवलंबून असते.क्रिया आणि प्रतिक्रिया यांच्या दरम्यान एक अवसर असतो. त्या वेळेचा वापर करून प्रतिसाद देता येतो. प्रतिक्रीया कशी द्यायची हे आपण ठरवू शकत नाही पण प्रतिसाद कसा द्यायचे हे मात्र आपण ठरवु शकतो.
एखाद्या गोष्टीचा परिणाम आपण आपल्यावर कसा होऊ द्यायचा हे आपण ठरवू शकतो.
शे दोनशे किमी वेगाने येणार्‍या चेंडूला घाबरून विकेट फेकायची ही प्रतिक्रीया झाली चेंडूच्या वेगाचा फायदा घेत त्याला सीमेपार भिरकावून द्यायचे हा झाला प्रतिसाद.
एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतीसाद देणे जमले तर परीणाम आपल्या ताब्यात राहु शकतील.
पुढाकार घ्या असे सांगताना कोणत्या गोष्टीत पुढाकार घ्यायचा हे कसे ठरवायचे हे सांगताना कोव्हे म्हणतो की ज्या गोष्टींवर तुमचे थेट नियंत्रण राहु शकते त्यावर लक्ष्य केंद्रीत करा.
उदा: दिवसभराच्या चोवीसतासात माझ्या सभोवताली अनेक गोष्टी घडत असतात. त्यापैकी माझा ज्यावर ताबा असेल त्याच गोष्टीवर लक्ष्य केंद्रीत करावे.
टीव्ही वर बातम्या पहाणे , अभ्यास करणे , वर्तमान पत्र वाचणे , राजकारणाची चर्चा करणे. यात अभ्यास करणे या गोष्टीवर माझा कंट्रोल /प्रभाव राहू शकतो कारण टीव्हीवर बातम्या काय येणार आहेत राजकारण कसे चालणार आहे यावर माझा थेट काहीच प्रभाव नसतो
दुसरी सवय : बिगीन विथ द एन्ड इन माईन्ड . शेवट काय करायचा हे डोक्यात ठेऊन सुरवात करा
या सवयी बाबत बोलतान कोव्हे म्हणतो की कोणतेही काम करण्यापूर्वी यातून काय साध्य करायचे आहे ते ठरवूनच मग सुरुवात करा.
जगात कोणतीही गोष्ट दोनदा तयार होत असते. सर्वप्रथम ती मनात आरखडा रूपात बनते मगच ती प्रत्यक्षात येते.
ताजमहाल बनण्यापूर्वी त्याचा आराखडा कोणाच्या तरी मनात उतरला असेल नन्तर तो कागदावर आला असेल मग तो प्रत्यक्षात बनला असेल.
पुढाकार घेऊन कृती करायची ती कशासाठी करायची हे नक्की करायचे. त्यातून काय मिळणार आहे ते ठरवून मग कृती करायची. हे करताना कोणती कृती करायची ते कसे ठरवायचे हे सांगताना कोव्हे म्हणतो की आपल्या रोजच्या व्यवहारात बरीच कामे असतात. त्यात काही तातडीची असतात काही महत्त्वाची असतात. काही तातडीची आणि महत्त्वाची सुद्धा असतात.कोव्हे या कामांची १)तातडीची व मह्त्वाची ,२) कमी तातडीची पण महत्त्वाची, ३)तातडीची पण फारसे महत्त्व नसलेली , ४)कमी तातडीची कमी महत्त्वाची वर्गवारी करतो.
पहिल्या वर्गात बहुतेकदा क्रायसीस प्रकारची कामे असतात. दुसर्‍या गटात मेन्टेनन्स ( फिजीकल / बौद्धीक) येतो.
तिसर्‍या प्रकारा बहुधा सामाजीक कार्यक्रम वगैरे असतात. तर चौथ्या प्रकारात गॉसिपींग चकाट्या या गोष्टी येतात
पैकी दुसर्‍या गटात मोडणार्‍या गोष्टींवर लक्ष्य दिले तर क्रायसीस कमी होतात. आणि काय करायचे ते ठरवता येते.
तिसरी सवय : फर्स्ट थिंग फर्स्ट ......पहिले काम अगोदर करा.
ऐकायला हे वाक्य जरा विचित्रच वाटते पण कोव्हे यात कोणत्या कृतीला अग्रक्रम द्यायचा आणि तो अग्रक्रम कसा ठरवायचा हे सांगतो.
आपण आपल्या जगण्यात कोणती तरी गोष्त केंद्रस्थानी ठेवून आपली धोरणे कृती ठरवत असतो.
हे केंद्रस्थान प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे असते. ते कुटुंब , सामाजीक संस्था , नोकरी , धर्म ,मुले पत्नी , मित्र अशा अनेक प्रकारचे असु शकते. कित्येकांच्या बाबतीत शत्रु हे केंद्रस्थान असते. त्यांची प्रत्येक कृती शत्रुला केंद्रस्थानी ठेऊनच घडत असते.शत्रु अमूक करतो म्हणून मी असे करतो. असे त्यांच्या बाबतीत होत असते.
( रावण आणि कर्ण ही या प्रकाराची उदहरणे) आपण अपल्या जगण्याचा केंद्रबिंदू ओळखला तर त्या संदर्भातले काम करायला आपल्याला आवडतच असते. साहाजीक त्यात यश मिळण्याचे प्रमाण अधीक असते.
इतर चार सवयींबद्दल पुन्हा कधितरी.
हे पुस्तक एका दमात वाचता येत नाही. एकेक पान डोक्यात मुरवत जावे लागते . पुस्तक वाचताना आपण स्वतःलाच वाचत असतो.
वाचक एक वेगळाच अनुभव घेत जातो. पानागणीक
तो संपन्न होत जातो.

Sunday, August 7, 2016

दिव्यानुभव 3

#दिव्यानुभव

गजानन विजय 18 व्या अध्यायात खामगाव वासी डॉक्टर राजाराम कवर यांची कथा आहे , काहीसा तसाच अनुभव मला स्वतःला आलेला आहे.
हि माझी लग्न व्हायच्या आधीचा अनुभव ,साधारण 2003 ला पुण्यात मी जॉब करत होतो व स्वतःचा फ्लॅट घेतल्यावर तेथे एकटाच राहायचो.
         पायाला अवघड जागी मला फोड आला होता व त्यामुळे चालताना खूप त्रास व्हायचा. फोड लहान होता तोपर्यंत मी कंपनीत जायचोे व डॉक्टरनी दिलेले मलम लावायचो , होईल कमी असे वाटले होते पण हळूहळू फोड खूपच मोठा झाला व त्यात पु झाल्याने खूप वेदना व्हायच्या , तरी पण रोजच्या नामस्मरणात दिवस ढकलत होतो.
एके दिवशी सकाळी उठलो पण चालायलाही जमेना . त्या दिवशी नेमकी पौर्णिमा होती , सकाळी उठून कंपनीत कळवले कि आज येऊ शकत नसल्याने सुट्टी घेत आहे .गादीवर पडून विचार केला कसा हा फोड कमी होणार व डॉक्टर कडे जायचे म्हटले तरी कसे जाणार ?
      साधारण सकाळचे 7 वाजले , घरात असलेले सफरचंद खाल्ले , पाणी प्यालो व अचानक देव्हाऱ्याकडे लक्ष गेल्यावर पौर्णिमा असल्यान गजानन विजय ग्रंथाचेे पारायण करण्याचे मनात आले.अनायासे सुट्टी घेतलीच होती व मन दुसरीकडे गेल्यावर वेदनांचा विसर पडेल हा मूळ उद्देश ,
लागलीच सर्व आवरून आंघोळ करून देवघरात आलो व पूजा करून संकल्प करून पारायण चालू केले , अर्थात एकाच दिवसात पारायण संपवायचे होते , पौर्णिमा होती व भूकही लागली नव्हती ,
हाहा म्हणता संध्याकाळी 6 वाजता 21 अध्याय संपवले .
साधारण 4.40 ला 18 व अध्याय सुरु झाला आणि म्हणताना खूप चूका होऊ लागल्या ,
असे झाले की मी ती ओवी पुन्हा एकदा पूर्ण  वाचतो , 18 व्या अध्यायातील खामगाव वासी राजाराम कवर याना फोड झाला व अंगारा लावल्यावर त्याचा फोड फुटला या वर्णन असलेल्या सर्व ओव्या मला 2-3 वेळा वाचाव्या लागल्या .
सर्व अध्याय संपवले व आरती केली , साखर व सफरचंद नैवेद्य म्हणून दाखवले व पारायण समाप्ती केली.
शांतपणे बसलो असता पारायण वाचताना मी जेवढ्या अगरबत्ती लावल्या होत्या त्याचा अंगारा एका डबीत भरून ठेवला व  क्षणात आठवले 18 व्या अध्यायातील चूक झाल्यामुळे पुन्हा पुन्हा वाचलेल्या ओव्या , गजानन प्रसाद अंगाऱ्याने जर राजाराम कवर बरे होऊ शकतात तर पारायण करताना जमलेला अंगारा हाही गजानन प्रसादच आहे .
मी क्षणभर शहारलो व तो अंगारा हातावर घेऊन त्यात थोडे पाणी मिसळून माझ्या झालेल्या फोडावर चोळला  व थोडा अंगारा पाण्यात मिसळून तीर्थ म्हणून प्यालो,
थोड्या वेळाने बाहेर जाऊन चहा , नाष्टा केला व थोडी फळे घेऊन घरी आलो .
21 मोदकाऐवजी 21 फळांचा नैवेद्य दाखवला व बेडवर पडलो आराम करायला , शांत झोप लागली साधारण 9 वाजता जाग आली तेव्हा लक्षात आले फोड फुटून साफ झाला आहे व वेदनाही कमी झाल्यात .
महाराजांना नमस्कार करून त्यांना दाखविलेल्या नेवेद्यातील काही फळे प्रसाद म्हणून खाल्ली व पुन्हा नामस्मरण करत झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी खूप आराम पडला होता व कामावर सुद्धा जाऊ शकलो व पुढील 3-4 दिवसात तो फोड निमुन सर्व त्रास नाहीसा झाला.

जय गजानन , गण गण गणात बोते

Friday, August 5, 2016

दिव्यानुभव 1

#दिव्यानुभव

अगदी कालपरवा आलेला अनुभव
2 महिन्यापासून अपघात झालेने हात सर्जरी व पाय खोल जखम curing rest चालु आहे , त्यात 2 महिन्यात कितीवेळा मनात विचार आला,
असा  किती त्रास सहन करायचा तरीपण या परिक्षेत उतरायचेच असे ठरवले.
श्रावण चालू झाला 3 ऑगस्ट2016 पासून
त्याआधी 2 दिवस म्हणजे 30 जुलै पासून मनात विचार आले घरीच आहोत तर गजानन विजय पारायण करू , सोमवार माझा उपास असतो त्यामुळे सोमवार सुरुवात करून गुरुवारी संपवू व काहीतरी नैवेद्य करू , पण सध्या ड्रेसिंग चालू असल्याने रोज हॉस्पिटलला जायला लागते व पाऊस,ट्राफिक यामुळे अडचणी येतच होत्या व यायला उशीर झाल्याने 1 दिवस पुढे ढकलला गेला , म्हणजेच संकेत होता का?  कि श्रावणात कर पारायण ,
माहित नाही पण 2 ऑगस्टला ठरवले की उद्यापासून सकाळी उठून पारायण करायचेच ,
स्वामी आपल्याला बुद्धीही देतात व परीक्षाही बघतात, तशीच परीक्षा अनुभवली ,
रात्री सकाळी तयारी केली , बाथरूम मध्ये खुर्ची (बँडेजमुळे पिशवी बांधून पाय वर ठेवून अंघोळ करावी लागते)कपडे ठेवण्यापासून सौच्या मदतीने तयारी झाली , अलार्म लावला व सकाळी दूधवाला 4.45 ला येतो त्यानंतर अंघोळ करून मी पारायण करायला बसणार पण का कोण जाणे ? पहाटे 4.40 ला दूध घेतले व बाथरूम मध्ये गिझर चालू करायला गेलो तर लाईट गेले व पाणीही गेले ,
नाईलाजाने वाट बघणे आले , मी पुन्हा बेडरूम मध्ये येऊन लाईट यायची वाट बघतोय तर 6.30 ला लाईट आली , त्यानंतर पाणी येऊन गिझर लावून अंघोळ करून पारायण करायला बसायलाच 7.15 वाजले ,
घरातील देवांची पूजा केली व पारायण संकल्प करून अध्याय वाचायला सुरुवात केली , साधारण 10.30ला
6 अध्याय वाचून झाले व का कोण जाणे ग्लानी व झोप यायला लागली , अंगात तापही होता , सौ म्हणाल्या हीच तर परीक्षा आहे पण ताप व ग्लानी येताना पारायण नको , गोळ्या चालू आहेत त्यामुळे पण त्रास होत असेल थोडा आराम कर,
मी स्वामींना नमस्कार केला ,पोथी बाजूला ठेवली व बेडवर जाऊन पडलो .
क्षणार्धात गाढ झोप लागली जसे आपण रात्री झोपतो तेवढी गाढ झोप ,
दरम्यान चिरंजीव शाळेत गेले , सौं चा स्वयंपाक तयार झाला पण मला जाग नाही ,
साधारण दुपारी 1.30ला मला जाग आली पण त्यावेळी काहीतरी स्वप्नात बघितले म्हणून मी उठलो .
झोपेत मी स्वप्न बघितले की गजानन संस्थान वेबसाईट मी बघतो आहे , गजानन महाराज पूर्ण लाईव्ह दर्शन घेतले मी त्या साईट वर व नंतर एक आवाज ऐकू आला की साईटवर अभिषेक पावती पैसे ऑनलाइन भर,
तसेच आता उठल्यावर नैवेद्य दाखवून मगच जेवायचे .
मी बायकोला बेडवरून आवाज दिला व तिला म्हटले अग नैवेद्य दाखवून मग जेवूया.
पण तिने म्हटले की स्वयंपाक झालेला आहे पण मुलगा शाळेत जाताना खाऊन गेला , डबा घेऊन गेला तसेच मीही भाजी पोळी खाऊन घेतली भूक लागली म्हणून , त्यामुळे तो नैवेद्य दाखवणे बरोबर नाही , तिथेही परीक्षा ,
मग दूध साखर नैवेद्य दाखवला व जेवून हॉस्पिटलला ड्रेसिंग बँडेज करायला गेलो,
ट्राफिक पाऊस यामुळे यायलाच 6 वाजले अर्थात पारायण करणे दुसऱ्या दिवसापासूनच करायला लागणार . संध्याकाळी आठवणीने ऑनलाइन अभिषेक पावती पैसे भरले शेगाव संस्थान वेबसाईट वर व निश्चिंत झालो.

दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 ऑगस्टला सकाळी छान उठलो , पूजा करून पारायण चालू केले , छान पाऊस , हवेत गारवा 7 ते 9 असे 2 अध्याय वाचून झाले व खूप थंडी वाजायला लागली , ताप भरला व कालच्यासारखीच ग्लानी येऊ लागली. उठून तोंडावर पाणी मारले व गोळी घेतली , अध्याय क्रमांक 14 पर्यंत सर्व अध्याय मोठ्याने वाचून पूर्ण केले पण नंतर राहवेना म्हणून थांबवून नमस्कार केला व बेडवर झोपायला गेलो.(या आधी मी हे पारायण 2 दिवसात संपवणार व गुरुवारी गोड नैवेद्य कर असे सौ.ला सांगितले होते पण महाराजांना 3 दिवसात पारायण करून घ्यायचे असेल , तसेच डॉ दिलेल्या हाय अँटिबायोटिक्स मी आधीही घेत आहे पण अशी ग्लानी झोप प्रकार झाला नाही ) म्हणजे पुन्हा परीक्षाच ,त्यानंतर पुन्हा हॉस्पिटल बँडेज करून लवकर येऊनही मी महाराजांची इच्छा म्हणून अध्याय वाचले नाहीत.
काल 5 ऑगस्ट मात्र खूप छान सर्व अध्याय वाचून पूर्ण झाले व मनासारखा स्वामींना नैवेद्य दाखवून आरती पारायण सांगता मनासारखी झाली.
सांगण्याचा उद्देश कर्ताकरविता महाराज आहेत व ते सेवा करून घेतात , त्यात आपल्या हातात काहीच नाही , आपण निमित्तमात्र व असे असतानाही आपली खडतर परीक्षाही चालूच असते. त्या सर्वांना तोंड देत परीक्षेत उतरलो तरी महाराजांचा आशीर्वाद मिळाला असे मला वाटते.
लेख खूपच मोठा झाला म्हणून थांबतो , धन्यवाद

अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज भक्तप्रतिपालक समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय