Friday, November 8, 2019

टाइम बँक

*टाइमबँकेच्या निमित्ताने. . . .*

वेळेचे महत्व सांगताना आपण बऱ्याचदा इंग्रजीतील Time is Money ही म्हण वापरतो. वेळ कधी सांगून येत नाही आणि वेळ कुणासाठी थांबत नाही असेही आपण म्हणतो. पण आपल्याकडे असलेला मोकळा वेळ आपल्याला खरोखरीच्या पैशात रूपांतरित करता आला किंवा भविष्यातील वापरासाठी साठवता आला तर?? ही कल्पना काहीशी अशक्य कोटीतली वाटत असली तरी काही प्रमाणात ती ‘टाईम बँके’च्या रूपाने प्रत्यक्षात उतरली आहे. हे टाईम बँक प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी आपण ही संकल्पना सर्वात प्रथम जिथे उगम पावली आणि वापरली गेली त्या स्वित्झर्लंड विषयी थोडी माहिती घेऊ या …

स्वित्झर्लंड हा तसा अत्यंत विरळ लोकवस्ती (४१,००० चौरस किमी मधे जेमतेम ८५ लाख लोक) असलेला देश. आज स्वित्झर्लंड मध्ये प्रत्येक सहा व्यक्तीपैकी एक व्यक्ती ६५ वर्षे किंवा अधिक वयाची (जेष्ठ नागरिक) आहे. अशा अनुत्पादक वयोवृद्धांची, (ज्यांची विशेष काळजी घ्यावी लागते) वाढती संख्या हे स्वित्झर्लंडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांपुढील मोठे आव्हान आहे.

स्वित्झर्लंडच्या फेडरल स्टॅटिस्टिक्स ऑफिसने २०१० साली केलेल्या सर्वेक्षणानुसार त्यांच्या नागरिकांचे सरासरी वयोमान ८३ वर्षे असून, एकूण लोकसंख्येच्या १६.९०% इतके लोक ६५ वर्षाहून अधिक वयाचे आहेत. याउलट लोकसंख्येतील २० वर्षाखालील मुलांचा टक्का दिवसेंदिवस घसरत चालला आहे. जेष्ठ नागरिकांपैकी ७०% हुन अधिक लोक स्मृतीभंश किंवा डिप्रेशनचे शिकार आहेत. खाणे, पिणे, नैसर्गिक विधी करणे, कपडे बदलणे अशी कामे देखील ही लोकं इतरांच्या मदतीशिवाय करू शकत नाहीत.

या पार्श्वभूमीवर, स्वित्झर्लंडच्या पूर्वोत्तर भागात जर्मनीच्या सीमेला लागून असेलेल्या साधारणतः ७५,००० लोकसंख्येच्या सेंट गॅलेन या शहरात २०१२ मध्ये जगातील पहिली टाईम बँक सुरु झाली. पूर्वीच्या काळी (आणि काही प्रमाणात आजही) खेडेगावातील लोक जसे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांची, मग ते त्यांचे कुटुंबीय असोत, शेजारी असोत, नातेवाईक असोत किंवा मित्र असोत, अडीअडचणीच्या वेळी काळजी घेत तशा प्रकारची एक औपचारिक व्यवस्था आणण्याचा प्रयत्न म्हणजे हे टाईम बँक. ही अनोखी बँक सुरु करण्यापूर्वी चार वर्षे म्हणजे २००८ पासून नागरिकांना सेवेच्या बदल्यात सेवा देणारी एक व्यवस्था सेंट गॅलेनची स्थानिक स्वराज्य संस्था स्वीस रेडक्रॉस च्या मदतीने चालवीत होती.

टाईम बँक या व्यवस्थेमध्ये, उत्तम आरोग्य आणि मोकळा वेळ असलेली एक व्यक्ती (ठेवीदार) त्याच्या सभोवतालच्या परिसरातील एखाद्या वयोवृद्धाला मदत करण्यासाठी आपला काही वेळ देते. त्या व्यक्तीने दिलेला हा वेळ नोंदवून ठेवण्याची एक व्यवस्था असते. टाईम बँकेच्या शब्दात त्याला ठेव किंवा डिपॉझिट म्हटले जाते. आणि हे डिपॉझिट जेव्हा त्या ठेवीदाराला गरज असेल तेव्हा त्या टाईम बँकेकडून सेवेच्या स्वरूपात परत केले जाते.

हे सर्व आज आठवण्याचं कारण म्हणजे ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या स्पिकिंग ट्री या स्तंभात आलेलं पुढील अनुभव कथन …

स्वित्झर्लंडमधे अभ्यास करीत असतांना मी एका भाड्याच्या घरात राहत होतो. त्या घराची मालकीण श्रीमती क्रित्सीना ही ६७ वर्षांची बाई शिक्षिका म्हणून ररिटायर्ड झाली. खरं म्हणजे तेथले पेन्शन इतकं मोठं असतं की तिला तिच्या उत्तरायुष्यात खायची, प्यायची काही ददात नव्हती. तरीसुध्दा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने एका ८७ वर्षांच्या महिलेची सेवा करण्याचे काम पत्करले काळजीवाहक म्हणून. मी तिला विचारले अधिक पैशाच्या मोहाने तू हे स्वीकारले आहेस कां? तर तिने दिलेले उत्तर मला संभ्रमीत करणारे होते. ती म्हणाली, नाही, मी पैशांसाठी नाही हे करीत. मी माझा हा कामाचा वेळ *टाइमबँक* मध्ये टाकते. आणि मी जेंव्हा म्हातारी होईन तेंव्हा मी ह्या टाईमबँकमधून मला सेवेचा वेळ काढून घेईन.

मला टाईमबँक असं काही असतं, हे ऐकूनच आश्चर्याचा धक्काच बसला. मी तिला विस्ताराने या संकल्पनेची माहिती विचारली. ती म्हणाली, स्वीसच्या शासनाने एक कल्याणकारी कार्यक्रम म्हणून याची सुरुवात केली. त्याचं असं आहे की जेंव्हा व्यक्ती सुद्रुढपणे तारुण्यात असते तेंव्हा ती आपल्यापेक्षा व्रुध्दाची सेवा करतात आणि ती जेंव्हा व्रुध्द होते तेंव्हा अशा सेवेची तिला आवश्यकता भासते. तेंव्हा अशा पूर्वी सेवा केलेल्या वेळेची परतफेड म्हणून तिला सेवा मिळते. अशी सेवेकरी व्यक्ती सुद्रुढ, संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाची असावी. ज्या व्रुध्दांनासेवेची अपेक्षा असते अशा अनेक संधी त्या तरुण व्यक्तीला मिळू शकतात. अशी त्यांची सेवेची वेळ त्यांच्या सेवा खात्यात जमा होते. त्याच्यि घराची मालकीण आठवड्यातून दोन वेळा दोन दोन तास व्रुध्दांना त्यांच्या काही गोष्टी खरेदीसाठी किंवा त्यांच्या घरकामासाठी किंवा त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी, वाचनासाठी अथवा बाहेर फिरण्यासाठी व्यतीत करीत होती. अशाप्रकारे एक वर्षापर्यंत सेवा दिल्यावर तिच्या सेवेची गणना करुन तिला *टाइमबँक कार्ड* दिलं जाईल. त्यात त्या सेवेची वेळ नमूद केलेली असेल. जेंव्हा सेवेकरी व्रुध्द होईल, तेंव्हा तिला तिच्यासाठी त्या टाइमबँक कार्डाव्दारे सेवा मिळू शकेल. तिच्या टाइमकार्डाची तपासणी होऊन *टाइमबँक* तिच्यासाठी सेवेकरी तिच्या घरी अथवा हाँस्पिटलमधे पाठवून देईल.

एके दिवशी मला माझ्या घरमालकीणीचा फोन आला. ती म्हणाली, काही गोष्टी काढण्यासाठी ती स्टुलावर उभी होती. तोल जाऊन ती पडली आणि तिच्या मांडीचे हाड मोडले आहे. मी आँफिसमधून रजा घेतली आणि तिला हाँस्पिटलमधे पोहोचवली. मी तिच्या सेवेसाठी रजा टाकत होतो. पण ती म्हणाली, तशी काही जरुरी नाही. मी माझ्या टाइमबँकेतून सेवेसाठी टाइम विड्राव्हल फाँर्म भरला आहे. आणि टाइमबँक आता माझी काळजी घेईल. आणि खरेच दोन तासात टाइमबँकेतून सेवेकरी हजर झाले. त्यानंतर महिनाभर त्या सेवा स्वयंसेविकेने माझ्या घर मालकिणीचे घर सांभाळले. तिच्यासाठी स्वयंपाक करुन जेवू घातले. तिच्याशी गप्पा मारुन आनंदी ठेवले. सेवेकरीच्या सहाय्याने घरमाकीण लवकरच पूर्ण बरी झाली. बरी झाल्यावर लगेच ती आपल्या सेवाभावी कार्याला लागली. तिचे म्हणणे असे की, ती जोपर्यंत कार्यक्षम आहे तोपर्यंत ती जास्तीत जास्त वेळ टाइमबँक मध्ये टाकू इच्छिते.”

यावरून कुणी निष्कर्ष काढील की, स्वित्झर्लंडमधे आणि एकूणच पाश्च्यात्य जगतात बंधुभाव, शेजारप्रीती ही कमी होत चाललीय त्यामुळे तिथे अशा बँकेची गरज असेल. परंतु हा दावा स्वित्झर्लंड सरकारला मान्य नाही. त्यांच्या मते आज सगळीकडे विभक्त कुटुंब पद्धती प्रचलित आहे. नोकरी धंद्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला मदत करण्यासाठी तुमचे कुटुंबीय, तुमचे नातेवाईक तुमच्या जवळ असतीलच असे नाही. अशा वेळी गरजां भागविण्यासाठी आपल्याला आपल्या कौटुंबिक परिघाबाहेर पडण्याची गरज आहे. आणि ती गरज टाईम बँक सारखी संस्था भागवू शकते .

स्वित्झर्लंड सरकारने केलेल्या पाहणीनुसार बाजारहाट, प्रशासकीय कामे, वैयक्तिक आणि घरादाराची स्वच्छता इत्यादी सारखी दैनंदिन कामे करण्यासाठी तेथील जेष्ठ नागरिकांना इतरांच्या मदतीची गरज लागते. या कामांचा भार सरकारच्या डोक्यावर न येता टाईम बँकेसारख्या अभिनव सामाजिक व्यावसायिक संस्थेमार्फत करण्याचा स्विस सरकारचा प्रयत्न आहे. या मुख्य उद्दिष्टाबरोबरच खालील उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून स्वित्झर्लंड सरकारने हा टाईम बँकेचा प्रयोग केला आहे …:

१) जेष्ठ नागरिकांना स्वतःच्या घरात स्वतंत्रपणे जास्तीत जास्त काळ सुखाने राहता येईल.

२) या योजनेमुळे जेष्ठ नागरिकांना आपल्या एकटेपणावर मात करता येईल आणि विविध प्रकारची लोकं एकत्र येतील.

३) उपलब्ध असलेल्या मानव संसाधन (Human Resource) साधनांचा वापर करणे इतकेच नव्हे तर विरळ होत चाललेले सामाजिक समरसतेचे बांध अधिक दृढ करता येतील.

या टाईम बँकेच्या योजनेत सामील होणे न होणे हे जरी नागरिकांसाठी ऐच्छिक असले तरीही सेंट गॅलेनच्या स्थानिक प्रशासनाने, या प्रकल्पाच्या वेबसाईटचा तसेच प्रशासकीय आणि प्रशिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी सुमारे १५०,००० स्विस फ्रॅंक इतक्या बीज भांडवलाचा एक ट्रस्ट स्थापन केला आहे. भविष्यात काही कारणाने जर हा प्रकल्प चालू ठेवणे अशक्य झाले तर ज्यांनी ह्या प्रकल्पात आपला वेळ गुंतवलेला आहे त्यांना पैशाच्या स्वरूपात मोबदला देता येईल अशीही तरतूद या ट्रस्ट ने केलेली आहे.

गरजवंताला मदतीउत्सुक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, एखाद्याने केलेल्या मदतीचा हिशेब ठेवणे, त्या मदतीचे योग्य चलनात रूपांतरण करणे आणि दात्याला जेव्हा गरज भासेल तेव्हा त्याच्या खात्यातील मदतीच्या शिलकीप्रमाणे त्याला मदत मिळवून देणे हे पूर्वीच्या काळी खूप कठीण असलेले काम आता तंत्रज्ञानांतील प्रगतीमुळे (विविध प्रकारचे सॉफ्टवेयर, मोबाईल अँप) खूपच सोपे झाले आहे.

सेवानिवृत्त झालेल्या परंतु शारीरिक आणि आर्थिकदृष्टया सुदृढ असलेल्या अनेक स्वीस नागरिकांना आपला मोकळा वेळ वाया घालविणे हा सामाजिक गुन्हा वाटतो आणि व्यस्त राहण्यासाठी, केवळ कुठलातरी छंद जोपासण्यापेक्षा इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करील अशा एखाद्या कामात स्वतःला जोडून घेणे त्यांना जास्त संयुक्तिक वाटते. अशी विचारसरणी असलेले लोक असणे आणि त्यांची संख्या वाढणे ही टाईम बँकेसारखा प्रकल्प राबविण्यासाठी महत्वाची गरज आहे.

आपण भारतीय लोक एका महान संस्कृतीचा भाग असल्याने, आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक संबंधात अजूनही ओलावा आहे. गरजवंताला मदत करणे, त्यांच्यासाठी वेळ देणे हा आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग आहे. निदान तसा आपला दावा आहे. त्यामुळे केलेल्या मदतीचा हिशेब ठेवणे आणि त्याबदल्यात आपल्याला गरज असताना हक्काने मदत घेणे हे आपल्याकडे सुसंस्कृतपणाचे लक्षण समजले जात नाही. म्हणूनच आपल्याला अशा भावनाशून्य कोरड्या संस्थेची गरज नाही असा बऱ्याच लोकांचा सूर दिसतो. परंतु कितीही निरपेक्ष भावनेने केलेले पुण्यकर्म असो त्याबदल्यात, आता लगेच नाही तर आपल्या गरजेच्या वेळी तरी आपल्याला काहीतरी मिळावे अशी सुप्त इच्छाही नसलेले किती जण भेटतील ? अगदी कसलीच अपेक्षा न करणारा इसम देखील आपल्या पुण्यकर्माबद्दल मृत्यपश्चात आपल्याला स्वर्गात जागा मिळावी अशी अपेक्षा करतोच करतो. आज आपण आपल्या भविष्याची आर्थिक तरतूद करून ठेवतोच की तशीच ही भविष्यात लागणाऱ्या सेवांची तरतूद समजायला हरकत नाही.

हे केवळ स्वित्झर्लंड मधेच होऊ शकते, भारतासारख्या देशात नाही असे आपल्या सारखेच मलाही वाटत होते पण मध्यंतरी वाचनात आले कि केरळमधल्या कोची शहरात १६ तरुण व्यावसायिकांनी एकत्र येऊन HourWorld या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने प्रायोगिक तत्वावर कोची टाईम बँकेची स्थापना केली आहे आणि सध्या ते त्या बँकेचा विस्तार करत आहेत. ह्या कोची टाईम बँकेची उद्दिष्टे स्वित्झरलँडच्या टाईम बँकेपेक्षा वेगळी असली तरी मूळ संकल्पना मात्र तीच आहे.

जग बदलत आहे आणि त्याबरोबर जगाच्या गरज बदलत आहेत. कुठल्याही परतफेडीची अपेक्षा ना करता गरजूंना मदत करणे हे कितीही उद्दात्त आणि आदर्श असले तरी अशा सेवाभावी लोकांचा टक्का गरजू लोकांच्या तुलनेत नेहमीच अत्यल्प राहिलेला आहे हे सत्य अमान्य करता येणार नाही. त्यामुळे भविष्यात आपल्याला गरज भासेल तेव्हा काही मिळण्याच्या अपेक्षेने आज कुणी सेवा देऊ करीत असेल तर ते स्वागतार्हच मानले पाहिजे. आपल्या सर्व कौटुंबिक, सामाजिक, राजकीय समस्यांसाठी नेहमी सरकारनेच काहीतरी करावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा जितके जमेल तितके योगदान आपणही द्यावे हेच योग्य आहे. आपणही पुढे व्रुध्द होणार आहोत आणि सध्या न्यूक्लीअर कुटुंबाच्या काळात आपल्या व्रुध्दत्वी काळजीवाहक म्हणून आपल्याला कोणी साथी उपलब्ध होऊ शकेल ह्या भावनेने आजच्या तरुणाईने व्रुध्दांशी सेवाभाव ठेवावा हा विचार केल्यास भारतीय व्रुध्दांचे भवितव्य उज्वल असेल.

आपण एखादा मेडिकल इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्सचा टर्म प्लॅन घेतो. दरमहा किंवा दरवर्षी ठराविक रक्कम त्यासाठी भरतो. परंतु, शक्यतो ह्या इन्शुरन्सचा फायदा घ्यायची (म्हणजेच आजारी पडून हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याची किंवा अकाली मरण्याची) वेळ आपल्यावर येऊ नये अशीच आपली इच्छा असते. अशाच ‘ नेकी कर और दर्या मे डाल’ या दृष्टीने टाईम बँक या संकल्पनेकडे पाहण्याची गरज आहे असे मला वाटते.

सॅबी परेरा

Thursday, October 31, 2019

“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या महामंत्राचे माहात्म्य

“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या महामंत्राचे माहात्म्य
(परमपूजनीय ब्रह्मर्षी दत्तमहाराज कवीश्वर यांच्या प्रवचनातून)

ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं | द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् |
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् | भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरूं तं नमामि ||

दिगंबराची धून चालू असताना तन्मय अवस्था प्राप्त होणे ही ईश्वराची मोठी कृपा आहे. ‘मदभक्ता: यत्र गायंती तंत्र तिष्ठामि नारद’ असे भगवंत नारदाला म्हणतात. तेंव्हा जिथे असं ईश्वराचे भजन, गायन चालू असते त्या ठिकाणी ईश्वराचा निवास असतो.

या महामंत्राचा अर्थ विशद करण्याकरिता सदगुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी एक आरती केली आहे. त्या आरतीचा विचार आज यथामती थोडासा करावयाचा आहे. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हे शब्द मूळ संस्कृत असल्याने मंत्ररूप आहेत. मराठी आणि संस्कृतमधे शब्दांचा उच्चार सारखाच होतो. ती मूळ आरती इथे देत आहे,

दिगंबरा! दिगंबरा! श्रीपाद वल्लभ दिगंबरा |
आरती हे तव चरणी राहो नति तति गुरुवरा ||धृ||
दिग्भिर-वेष्टित अंबरं एव प्रत्यग-ब्रम्हेति |
खं-ब्रह्मेती श्रुतिर अपि वदती दिगंबराच इति ||१||
दिग्वत च अंबरं एव व्यापक पूर्ण ब्रह्मेति |
सच्चितसुख धनम आयातीतं दिगंबरा वदति ||२||
श्रीपादवल्लभ नाम प्रापहि नक्रगजेंद्रम इव |
द्रौपद्यंबरीषचारे ग्रसित द्विजमेव ||३||
दिगंबरा गुरु वासुदेव दत्त सत्वं ब्रह्म |
काम क्रोध ग्रसितं माम लभ सदैव झटितिवह ||४||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

वेदांत शास्त्राप्रमाणे दृकतत्व आणि दृश्यतत्व असे दोनच पदार्थ जगात दाखवलेले आहेत. ज्ञात होणारे, प्रकाशित होणारे असे एक दृश्यतत्व आहे आणि दुसरे दृक-परमात्म तत्व आहे. बहिर्मुखी चित्तवृत्ती ज्या वेळेला असते (तशी ती सर्वदाच असते, तसा स्वभावच आहे चित्ताचा, इंद्रियांचा) त्या वेळेला (म्हणजे सर्वदा) दृश्यतत्व प्रकाशित होत असते आणि ती चित्तवृत्ती ज्या वेळेला अंतर्मुख होईल त्यावेळी प्रकाशमान होणारा तो, ‘प्रत्यगात्मा’ म्हंटले आहे, त्याला त्याची अनुभूती येते.

बाहेरचे पदार्थ जसे भासतात त्याच्या उलट आतले आहे. दुःखरूप आपल्याला बाहेर दिसते तो आतला आनंद-स्वरूप आहे. बाहेरच्या जगात विनाशी पदार्थ दिसतात तर आत हा अविनाशी आहे. बाहेर अशुद्ध पदार्थ सर्वत्र आहेत तर आत हा शुद्धच आहे. बाहेर परप्रकाशी सर्व पदार्थ आहेत तर हा स्वयंप्रकाशी आहे. बाहेरचे सर्व पदार्थ विकारी आहेत तर हा निर्विकार आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक बाह्य पदार्थास षडविकार आहेत तर हा परमात्मा ‘भावातीतम त्रिगुणरहितम’ म्हणजे भावपदार्थाच्या पलीकडे आहे, सत्व-रज-तम या त्रिगुणांच्या परे आहे, रहित आहे.

तर असा हा जो परमात्मा आहे त्याचे अनुसंधान करावयाचे आहे. इंद्रियांची बहिर्वृत्ती असल्यामुळे देहत्रयाशिवाय दुसरं काहीही आपल्याला प्रकाशित होत नाही. देहत्रयामध्ये शास्त्रकारांनी पंचकोषांची रचना केलेली आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे पांच कोष आहेत. स्थूल देह हा अन्नमय कोष म्हंटलेला आहे. आत्म्याची ओळख करून देताना स्थूल देहालाच आत्मा म्हणून त्यांनी सांगितलेले आहे. इथून सुरुवात करायला सांगितलेली आहे. हाच अन्नमय कोष म्हणजे आत्मा आहे. त्याच्यानंतर प्राणमय कोष आहे. प्राणवायू, कर्मेंद्रिये हा जो विभाग आहे हा प्राणमय कोष सांगितलेला आहे. त्याच्यानंतर मनोमय आणि विज्ञानमय असे दोन कोष आहेत. ‘ज्ञानेंद्रिये आणि मन’ म्हणजे मनोमय कोष, व ‘ज्ञानेंद्रिये आणि बुद्धी’ म्हणजे विज्ञानमय कोष, असे दोन विभाग म्हणजे हे दोन कोष आहेत. शेवटी आनंदमय कोष आहे. चित्ताचा संबंध इथे संपलेला आहे. त्या ठिकाणी केवळ अज्ञान म्हणून आहे. मूळ अज्ञान शक्ती ईश्वराची आहे. कर्मशक्ती ईश्वराची आहे आणि कार्यशक्तीही ईश्वराची आहे आणि शक्तींच्या द्वारा सृष्टीच्या नियमनाचे कार्य चाललेले आहे.

तर स्वयंप्रकाशी असा जो आत्मा आहे. ज्याला प्रत्यगात्मा म्हणतात, तो आपली प्रवृत्ती बाहेर आहे म्हणून तो आत आहे असे म्हणतात. नाहीतर तो आत आहे म्हणजे बाहेर नाही असे म्हंटले तर सिद्धांत भंग होईल. तो सर्वव्यापी आहे. देशाची-काळाची-कशाचीही त्याला मर्यादा नाही. असे ते परमतत्व आहे.

ज्ञानी भक्तांनी नामदेवांना या तत्वदृष्टीने कच्चे ठरविले. नामदेव पांडुरंगाच्या जवळ गेले आणि विचारले तर देवांनीही ज्ञानी भक्तांच्या म्हणण्याला संमती दिली. ‘हो कच्चे मडके आहेस तू’ असे देव सुद्धा म्हणाले.

तेव्हा नामदेव म्हणाले, “देवा, माझ्याशी तुम्ही बोलता, माझ्या घरी येता, माझ्या हातचे जेवता, माझी कामे सुद्धा करता, तरी मी कच्चा कसा?”

यावर देव म्हणाले, “नामदेवा, मी फक्त राऊळामध्येच आहे हे समजणे कच्चेपणाचे लक्षण आहे. पांडुरंग सर्व ठिकाणी आहे. सर्वस्वरूप आहे. हे ईश्वरदर्शन, पूर्ण दर्शन आहे.”

तर याप्रमाणे अंतरात्मा प्रत्यगात्मा, प्रत्यग ब्रह्मा, या पूर्ण स्वरूपाचे दर्शन होण्याकरता, ज्या मनाचं, बुद्धीचं साहाय्य घ्यायचं ती बुद्धी त्याच्यापर्यंत जाऊच शकत नाही. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या पांच कोषांपर्यंतही त्या बुद्धीची झेप पोहोचत नाही आणि तो तर आनंदमय कोषाच्याही पलीकडे असलेला. स्वयंसिद्ध आनंदमय कोष म्हणजे तरी काय? सुषुप्तीच्या वेळी जो आनंद मिळतो, त्याची कोणतीही इंद्रिये नाहीत. ज्याला केवळ अज्ञान म्हणतात, असा तो अज्ञान संमिश्रित जो आनंद मिळतो, तो आनंदमय कोष. परमात्म स्वरूप शुद्ध आनंद-रूप आहे म्हणजे बाहेरून मन ज्यावेळी परावृत्त होईल, त्या वेळेला कोषांचे अनुसंधान करता करता, आनंदमय कोषाच्याही पलीकडे एक स्वयंसिद्ध निर्विकार आत्मतत्व आहे, हे मनाला समजून येते. त्या साक्षी स्वरूपाचं अनुसंधान तितकंच उत्कटतेने होत राहील पाहिजे. साक्ष म्हणजे दिसणारे दृश्य, ते तटस्थपणे पाहणारा म्हणून साक्षी.

मात्रा स्पर्शास्तु कौंत्येय शोतोष्ण सुखदुःखदा: | आगमापायिनोस नित्यस्तांस्तितिक्षस्व भारत ||
भगवद्गीता २.१४

अर्थात, “हे कुंतीपुत्र अर्जुना, शीत-उष्ण आणि सुख-दुःख देणारे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पत्ती आणि नाश आहेत. म्हणून ते अनित्य आहेत, हे भारता अर्जुना, तू ते सहनच केले पाहिजेस.”

ही उच्च भूमिका अर्जुनाला सांगितली आहे. वेदांत श्रवण, मनन, निदिध्यासन करणे, समाधी आणि मग साक्षात्कार त्या बुद्धितत्त्वाला करून घेण्याइतकी बुद्धीची योग्यता झाली पाहिजे. यासाठी ती योग्यता येण्यापूर्वी ते अनुसंधान इथून सुरु करावयाचे आहे.

सर्व ही विश्व ‘आगमा-बाह्य आहे आणि अनित्य’ आहे. याकरिता तितिक्षेचा अभ्यास शास्त्रकारांनी सांगितला आहे. इष्ट-अनिष्ट कोणत्याही घटना घडल्या तरी समचित्त राहणे हा तितिक्षेचा अभ्यास आहे.

“सहनं सर्व दुःखानां अप्रतिकार पूर्वकं सा तितिक्षा” हे साधून मग स्वरुपानुसंधान करायला सांगितले आहे. याचे स्पष्टीकरण थोरल्या महाराजांनी ‘आत्मानात्म-विवेक’ मध्ये केले आहे. हे स्वरुपानुसंधान ज्या बुद्धीने किंवा मनाने करावयाचे आहे ते समचित्त-स्थिर पाहिजे.

निर्विकार जे स्वरूप आहे, तो ‘दिगंबर’ शब्दाचा अर्थ आहे. साक्षीस्वरूप सूर्याच्या उदय आणि अस्तानुसार आपण पूर्व, पश्चिम वगैरे दिशा समजतो. सूर्यनारायणाच्या मूर्त स्वरूपानुसार उदयाप्रमाणे पूर्व दिशा समजतो आणि जो मूर्त पदार्थ त्या सूर्यनारायणापासून दूर असेल त्याला पश्चिम दिशा समजतात. सूर्यनारायणापासून आमच्या पाठीमागे असलेल्या पदार्थापेक्षा आम्ही जवळ आहोत म्हणून सूर्यनारायणापेक्षा दूर असलेल्या पदार्थाला पश्चिम दिसा असे समजतात. व्यवहारामध्ये दृकतत्वांप्रमाणे विभाग केले जातात. तेव्हा येथे अंबर म्हणजे आकाशाप्रमाणे सर्वव्यापी परमात्म तत्व आहे. दृकतत्वांप्रमाणे मूर्त पदार्थ अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोषांनी वेष्टित असतात. किंवा स्थूल, सूक्ष्म, कारण या तीन देशांनी वेष्टित झाले आहे, आवृत्त झाले आहे. त्या आवरणांनां काढावयाचे आहे. त्यासाठी बुद्धीचे सहायय घ्यायचे आहे, शुद्ध प्रकाशमान आत्मतत्वाचं अनुसंधान करावयाचें आहे.

मी बसलो, मी उठलो, हे सगळे देहाचे धर्म आहेत. मी पहातो, मी ऐकतो, हे सर्व इंद्रियाचे धर्म आहेत. मी संकल्प करतो, माझ्या मनात राग आहे, माझ्यांत दोष आहेत, हे सर्व मनोधर्म आहेत. हे सगळे धर्म “मी” च्या ठिकाणी आपल्याला भासतात. आणि शेवटी त्या “अहम्” ची शुद्धी होता होता देहत्रयातील देहत्रयाने होणारे सर्वही व्यवहार आपण पाहू शकतो – हा साक्षीभाव. या व्यवहाराची उत्पत्ती आणि नाश हा सर्व मला दिसतो आहे. त्यामुळे मी असंग आहे. माझा याच्याशी काही संबंध नाहीये, हे जे अनुसंधान आहे, तो “दिगंबरा” या पहिल्या शब्दाचा अर्थ आहे. हे जे आत्मतत्त्व आहे ते सर्व वेष्टीत झालेलं आहे. त्याचे अनुसंधान करून, बुद्धीने हे वेष्टन दूर करून, विश्लेषण करून, तसा मी आहे अशी धारणा करावी लागते. आकाशतत्त्वाप्रमाणे “खग” हे आकाशाचे नांव आहे, ब्रह्माचेही नांव आहे. पण खग म्हणजे आकाशाप्रमाणे असंग आहे आणि आकाशाप्रमाणे देश-काळ मर्यादा रहीत आहे. आकाशाला श्रीदत्तात्रेयांनी गुरु केले आणि या आकाशापासून असंग हा बोध घेतलेला आहे. सर्वांतर्यामी असलेल्या प्रत्यग ब्रह्मापर्यंत आपली बुद्धी नेणे हे दिगंबर पदार्थाचे अनुसंधान करणे आहे.

प्रत्यग् ब्रह्मापर्यंत आपली बुद्धी नेणे फार कठीण आहे असे म्हणतात. तार्किकांना हे सांपडणार नाही असे आद्य आचार्य महाराजांनी स्पष्ट सांगितले आहे. तिथे तर्काला आंतमध्ये प्रवेश नाही. कारण साक्षी म्हणून जो आहे तो जगात कुठे अनुभवाला येत नाही. निर्विकारी आणि स्वयंप्रकाशी आत्मतत्वाचा अनुभव बुद्धीने ठरवून घ्यावयचा आहे. त्याकरता योगमार्ग किंवा भक्तीमार्ग सांगितला आहे. तर त्या स्वरुपानुसंधानापर्यंत बुद्धी आली म्हणजे मी साक्षी आहे, इथे सुखदुःख वगैरे काही नाही असा अनुभव येतो. ‘द्वंद्वातीतम’ पर्यंत बुद्धी येऊन पोचली असा याचा अर्थ आहे.

ज्या तत्वाला कशाचाही संबंध नाही. सुख दुःखादी होणारी द्वंद्व हा फक्त पाहातो आहे. त्या सर्वांचा मी फक्त साक्षी आहे. जसा मी साक्षी आहे तसा दुसरा एखादाही साक्षी आहे. व्यापक दृष्टीने हे आहे. सर्वसाक्षी, सर्वव्यापी एकच आहे. जसे जीव अनंत आहेत तसे साक्षीही अनंत होतील. साक्षीस्वरूप अद्यापी मर्यादित राहीलेलं आहे. आत्मस्वरूपाचे जे निरनिराळे विभाग आहेत, अंश आहेत, कल्पनेने दाखविलेले ते सगळे अंश अजून लक्षात आलेले नाहीत. केवळ निर्विचार, असंग एवढंच ठरलेलं आहे. याकरता अनंत जन्मांचा अभ्यास, सुकृत आहे, महात्म्यांची कृपा आहे. त्यामुळे बुद्धी येथपर्यंत येऊन पोचली आहे.

आणि साक्षीस्वरूप समजल्यानंतर ते अनेक आहे. साक्षी जो आहे, तो सर्वत्र व्यापक आहे. कालमर्यादा असेल पण देशमर्यादा त्याला नाहीये. “सर्वगतः” एवढेच समजून घ्यायचे आहे.

ते पूर्ण ब्रह्म आणि हे प्रत्यग् ब्रह्म.

साक्षी ब्रह्म पूर्ण आहे. सर्वव्यापी आहे. सर्वत्र एकच आहे. हे दुसऱ्यांदा आलेल्या “दिगंबरा” शब्दाच्या अर्थात त्यांनी सांगितले आहे. दिशा एक तत्त्व आहे, काल एक तत्त्व आहे, आकाश एक तत्त्व आहे, परंतु उपाधीमुळे त्यांच्यात भेद दिसतो. भांड्यातले, खोलीतले, ताटातले आकाश निराळे हा जो भेद दिसतो तो उपाधीमुळे दिसतो. जसं काल हे एक तत्त्व असताना कालाची उपाधी क्रियेवरुन त्यांनी मानलेली आहे. आणि त्या क्रियेवरुन कालाचा भेद शास्त्रकारांनी मानला आहे. साठ सेकंदाला एक मिनिट, साठ मिनिटे म्हणजे एक तास ही नांवे आपण जरी दिली असली (म्हणजे भेद केला असला) तरी वस्तुतः कालतत्त्व एकच आहे. त्याचप्रमाणे एक दृकतत्त्व मानून ते जसे सर्वव्यापी आहे त्याप्रमाणे पूर्ण ब्रह्म आहे.

साक्षीभाव जो आहे तो सुद्धा शेवटी नाहीसाच झाला पाहिजे. मी साक्षी आहे, आणि साक्ष मात्र निराळे आहे. पुन्हा हा भ्रम अद्यापि शिल्लक राहिला आहे, तो देखील जायला पाहिजे. तर साक्षीस्वरूप सर्वव्यापी आणि पूर्ण आहे, हे कळण्याकरिता पदात पुढे ‘सच्चितसुख धनम आयातीतं’ असे म्हंटले आहे. सचिदानंद स्वरूप जे आहे ते सत-स्वरूप म्हणजे अविनाशी आहे आणि चित-स्वरुप म्हणजे स्वयंप्रकाशी आहे. दुसऱ्याच्या प्रकाशाची आवश्यकता नाही. सूर्य चंद्रादिकांना देखील त्याच्यामुळे प्रकाश आला आहे.

यद आदित्य गतं तेजो जगद भासयते अखिलम् | यत चन्द्रम असि यत च अग्नौ तत तेजो विद्धि मामकम्||
– भगवद गीता १५- १२

असे भगवान म्हणत आहेत. असे सर्वप्रकाशी एक तत्व आहे आणि ते आनंदरूप आहे. तो आनंद सर्वसिद्ध आनंद आहे. आणि “मायतीतं” म्हणजे मायेने निर्मण झालेल्या बौटिक पदार्थांच्याही पलीकडचा तो आनंद आहे. आणि हे दोन्ही तत्वे एकच आहेत, हे दुसऱ्या “दिगंबरा” शब्दाने सांगितले आहे.

“श्रीपादवल्लभ” हे निर्गुण निराकार असे जे आत्मतत्व आहे ते परमतत्व साक्षीरूपाने आधी दाखवले गेले. पुनः सर्वसाक्षी, सर्वव्यापी अशा परिपूर्ण रूपाने त्याचे प्रकटीकरण केलेले आहे. अगोदर साक्षीचे अनुसंधान केले. अहंब्रह्म म्हणजे अहंसाक्षी असा मनाचा अभ्यास होण्याकरिता मनाचं फार साहाय्य पाहिजे, आणि हे मनाचे साहाय्य होण्याकरिता शास्त्रकारांनी बाकीची साधने सांगितली आहेत. त्यासाठी भक्तियोगाचा पुरस्कार थोरल्या महाराजांनी केला आहे. श्रीपादवल्लभ हे सगुण स्वरूप आहेत.

श्रीपादवल्लभ ज्या स्थानी राहिले त्या स्थानात राहणाऱ्यांची इष्टसिद्धी होते. श्रीपादवल्लभ निवासी, साधकाने यज्ञ, दान, तप, इत्यादी करून मिळणाऱ्या फळांपेक्षा कितीतरी अधिक पट फळ त्याला मिळते. त्याची प्रगती लवकर होते. श्रीपादांचे स्वरूप हे फक्त भौतिक शरीर नसून ज्ञानमय सगुण रूप त्यांनी धारण केले आहे. असा परमेश्वर स्वरूप अवतार ज्या ठिकाणी राहिले ते स्थान पवित्र होत असते. आळंदीला माउली सातशे वर्षे समाधिस्थ आहेत. अशा ठिकाणी जाणाऱ्यांची कार्यसिद्धी कशी होते? त्यांना बातमी कोण पोचवितो? सिद्धपुरुषांच्या या स्थानामध्ये असं काही वैशिष्ट्य निर्माण झालाय कि तिथे जाणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.

आत्मानुसंधान करणाऱ्या साधकांना निरनिराळ्या विघ्नांना तोंड द्यावे लागते. पहिले विघ्न म्हणजे झोप. स्वरुपानुसंधानास बसल्यावर झोप आली तर मनोलय होतो. मग कसे करायचे अनुसंधान? त्यासाठी आहार-विहाराचे कटाक्षाने पालन व्हावयास पाहिजे. हिताहार-मिताहार आदी पळाले पाहिजेत. म्हणजे हा लय-दोष उत्पन्न होत नाही.

त्यानंतरचा मोठा दोष म्हणजे अनेक प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात आणि त्यातच माणूस रममाण होतो. वृत्ती निर्माण होणं हा संसार आहे आणि वृत्ती नाहीशा होणं हा मनोनाश. वृत्ती निर्माण होऊन स्वरुपानुसंधानात विक्षेप निर्माण करतात. आपल्या अंतःकरणात षडविकारादि दोष किती प्रबळ आहेत याचा पत्ता आम्हाला लागत नाही. प्रत्यक्ष ते विकार प्रकट झाल्यानंतर देखील ते जाणवत नाही.

यानंतर रसास्वाद हा एक भयंकर मोठा दोष आहे. ज्यांना प्रगती साधावयाचे आहे ते रसास्वादाच्या मागे लागत नाहीत. आपली प्रसिद्धी आपणच आपल्या तोंडाने करायची. व्यवहारात जरी हे उपयोगी असले तरी परमार्थात हा दोष म्हणूनच मनाला आहे. मला असा-असा अनुभव आला आहे, मी इतके नाम घेतो, इतकी साधना करतो, जप, तप, दानादि करतो, माझी एवढी प्रगती झाली आहे असे सांगणे, आपल्याला जो काही थोडाफार चांगला अनुभव आला त्याची प्रसिद्धी करायची, हे परमार्थात अपेक्षित नाहीये. प्रगती या शब्दाचा अर्थ काय तर साधन व्यवस्थित चालले आहे. ती ईश्वराची कृपा आहे, आपले कर्तृत्व काय त्यात? अशा या रसास्वादात सर्व काळ निघून जातो, तो घातकच. यामुळे साधनेत प्रतिबंध निर्माण होतो. असे अनेक दोष आहेत.

आत्मस्वरूपाचे अनुसंधान म्हणजे मी साक्षीरूप आहे, मी पूर्णब्रह्म आहे याचा निदिध्यास. निदिध्यास म्हणजे साक्षात्कार नाही पण साक्षात्काराजवळची ज्ञानभूमिका. श्रवण ही सुद्धा ज्ञानभूमिका. मनन-चिकित्सा ही देखील ज्ञानभूमिकाच. त्यानंतर मनोलय झाल्यावर आत्मस्वरूपाचे अनुसंधान करणे ही तिसरी भूमिका आहे. त्यामुळे आपले अंतःकरण अखंड परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर होत गेलं तर मग ती समाधी अवस्था. आणि समाधीतून पुढे साक्षात्कार होतो.

या पायरीने जाताना वेगवेगळ्या अवस्थेत येणाऱ्या विघ्नांचे निरसन कसे होणार? आपल्याला वाटते मन-इंद्रिये-बुद्धी माझी आहे, पण तसे नसते. आपल्यासारखे साधारण जीव शरीराला वेदना झाल्यावर तिकडे दुर्लक्ष करू शकत नाही. साधी खाज आली, किंवा डास-मुंगी बसली, अगदी केसाच्या हालचालीने देखील मन विचलित होते, आपली तंद्री सुटते, आपण चिडतो. देहापासून मन, बुद्धी, इंद्रिये ही परावृत्त होत नाहीत. सर्पदंश झाल्यावर देखील थोरले महाराज समाधिस्त बसत, एकदा तर आठ तास बसले होते. हा साधनानंद, इंद्रियानंदापासून मोठा. शरीर वेदना असताना, दुर्लक्ष करून समाधिस्थ राहणे सोपे आहे का? पंडित राजेश्वर शास्त्री द्रविड एकदा ग्रंथालयात जाऊन बसले कि दोन-दोन दिवस बसत असत, अन्नपाणी, झोप कशाचीही साधी आठवण देखील येत नसे त्यांना, असा विद्यानंद होता, इंद्रियानंदापासून मोठा. इंद्रियानंद मोठा वाटलं तरी तो अल्प आणि अस्थिर आहे. विषयापासून, देहापासून मन परावृत्त करण्याची तयारी पाहिजे.

ईश्वर दयाळू आहे. भक्तांचे कल्याण करण्यासाठी निरनिराळे अवतार झाले आहेत. चार भक्तांची उदाहरणे यासाठी या आरतीमध्ये पुढे सांगितली आहेत. पहिले उदाहरण म्हणजे नक्र आणि गजेंद्रची कथा सर्वांना माहित आहे. नक्राने गजेंद्राचा पाय धरून आत चालवले आहे, गजेंद्राने खूप प्रतिकार केला पण शरीर सामर्थ्य संपले. गजेंद्राला कळून चुकले कि आता आपण पाण्याबाहेर येऊ शकत नाही. मग पूर्वजन्मात त्याच्याकडून जे अनुसंधान घडले त्याचे स्मरण करून तो भगवंताला शरण गेला नि त्याची स्तुती केली. गजेंद्राने परमेश्वराची केलेली स्तुती भागवतात गजेंद्रस्तुती म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात परमेश्वराच्या स्वरूपाचे वर्णन गजेंद्रने केले आहे.

आपल्यासारख्या सामान्य बुद्धीवाल्याला वाटेल कि हत्ती कधी स्तुती करतो का? पण चंद्रलोकात बुद्धी (मानव) जाऊ शकते हे अगोदर कुणी मान्य केले होते का? शक्ती ही आधी मान्य करावी लागते. आपल्यामध्ये असलेल्या शक्तीचा विकास कसा करून घ्यायचा ती साधना आम्हाला मान्य नाही किंवा सांगणाऱ्यांवर विश्वास नाही. वास्तविक हा आपल्या बुद्धीचा दोष आहे पण तो दोष न समजता त्या चिकित्सेचे आपल्याला कौतुक वाटते. दोष न समजता आपण ते अशक्य समजून बसतो, असंभवना हा फार मोठा दोष आहे.

ही असंभवना, हे अशक्य आहे ही समजूत, हा दोष बुद्धीतून गेल्याशिवाय परमार्थ साध्य होणे शक्य नाही. शक्यतेची भावना निर्माण झाली कि संशय कमी होतो. संशय दोन प्रकारचे असतात, असेल असे वाटणे हाही संशय आणि नसेल असे वाटणे हा देखील. बुद्धीवाद्याला यातले काहीच मान्य नसते त्यामुळे अर्धवट स्थिती होते, “संशयात्मा विनश्यति |”. असे घडणे शक्य आहे, हे संभवनात्मक ज्ञान आहे, निश्चितपणे नाही, शक्यतेचाही अर्धवटपणा, अशी स्थिती ही संशयाच्या वरची पायरी आहे.

याच्या नंतर निःसंशय बुद्धी, त्याच्या वर निर्णयात्मक बुद्धी, याच्याही वर निश्चयात्मक बुद्धी. असा हा बुद्धीचा विकास करावयाचा आहे. अशा विकसित बुद्धीचे संस्कार कायम राहू शकतात. मागच्या जन्मीचे, पश्वादिक योनीमध्ये असतानाही ते पूर्वजन्माची बुद्धीचे संस्कार कायम असू शकतात. मागच्या जन्मी केलेलं साधन, त्या साधनेचा आलेला अनुभव, त्या साधन संस्कारांचे महत्व इतके आहे कि या पशूच्या, गजेंद्रच्या जन्मात आलेला असताना सुद्धा त्या बुद्धीवर संस्कार कायम आहेत.

बुद्धीतत्व हे अविनाशी आहे, जीवनमुक्ती होईतोवर बुद्धितत्त्व बरोबर राहते. शास्त्रकार देखील बुद्धीनेच आत्मतत्व दिसू शकते म्हणून बुद्धितत्त्वाचा पुरस्कार करतात. गजेंद्राचे शुक्राचार्यांनी कौतुक केले आहे. गजेंद्राने सर्वव्यापी ईश्वरत्त्वाची प्रार्थना केली आहे. सर्व जग ज्याने निर्माण केले, सर्व जीवांच्या बुद्धीला प्रेरणा करणारा, ज्या शक्तीने सर्व विश्वाचे कार्य चालविले आहे त्याला मी शरण आलेलो आहे, अशी गजेंद्राने प्रार्थना केल्यावर शुक्राचार्य म्हणतात कि, देवादिकांना देखील आपल्या नावाचा कर्तृत्वाचा अभिमान आहे. पण पशु जन्माला येऊन देखील गजेंद्रची बुद्धी इतकी शुद्ध झालेली होती कि सर्व ठिकाणी एकच परमात्मतत्त्व आहे याची जाणीव त्याला होती. बुद्धी शुद्ध असली कि अशा रीतीने ती कोणत्याही जन्मी कामी येते.

अशा प्रकारे नाव आणि रूप धारण करून भगवंत येतात. असेच नाव प्राप्त झालेले भगवान श्रीपादवल्लभ. नक्र आणि गजेंद्रासारखेच दुसरे द्रौपदीचे उदाहरण आरतीमध्ये सांगितले आहे. धर्मराजांनी वनवासात गृहस्थ धर्माचे पालन करता यावे म्हणून सूर्यनारायणांना प्रसन्न करून इच्छित-भोजन-थाळी मिळवली. द्रौपदीचे जेवण झाले कि ते पात्र अन्न देणार नाही, म्हणजे द्रौपदीला शेवटी जेवण आले. कर्म करायचे ते सुद्धा किती कठीण असते बघा, सत्वपरीक्षाच ती. ध्येय पूर्ण करण्याकरिता मनाचा निर्धार किती पाहिजे? भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग हे तर कर्मानंतरचे आहेत, पण कर्ममार्गात देखील निश्चित दृष्टी (बुद्धी) पाहिजेच.

दुर्योधनाने दुर्वासांना प्रसन्न करून पांडवांचे सत्वभंग करण्याकरिता, द्रौपदीचे जेवण झाल्यावर, त्यांच्याकडे अतिथी म्हणून जेवायला पाठवले. म्हणजे दुर्योधनासारखी माणसे ही सत्संग करतात पण त्याचा असा दुरुपयोग करतात. वास्तविक दुर्वास ऋषींना प्रसन्न करून घेणे सोपे नाही. दुर्योधनाला मनाचा निग्रह करावा लागला. पण त्याने ते सर्व केले तेव्हा कुठे दुर्वास ऋषी प्रसन्न झाले. ही असुरी प्रवृत्तीची मंडळी असली तरी त्यांच्याजवळ मनोनिग्रह, इंद्रियसंयम, तितिक्षा, आदी साधने आहेत. दुर्वास ऋषींना प्रसन्न करवून त्यांच्याद्वारे म्हणजे पाहुण्यांच्या हाताने साप मारायचा असे झाले. पण दुर्वासांना देखील नाईलाज म्हणून जावे लागले. पांडव योग्य आहेत, धर्मनिष्ठ आहेत हे दुर्वासांना माहित नव्हते असे नाही. ऋषी आश्रमात आले, धर्मराज अतिथी धर्माचे पालन करीत होता पण आता द्रौपदीचे जेवण झाल्याने दुर्वासांना आणि ऋषी समुदायाला जेवण कसे देणार? न द्यावे तर दुर्वासांचा कोप होऊन ते शाप देणार.

पण द्रौपदी काही कामी नव्हती. सर्व भगवंताचीच इच्छा किंवा शक्ती आहे अशी तिची पक्की खात्री होती. ‘त्वमेव सर्वम मम देव देव’ ही भूमिका उत्पन्न होणे हे फार कठीण आहे पण ते द्रौपदीजवळ होते. साधनेवर विश्वास असल्यानंतर, मी साधना करतो असा स्वतःचा विश्वास वाटतो आणि वाढतो. पुढे त्याचे रूपांतर अभिमानात होते. पण द्रौपदीचे तसे नव्हते. साधनेतून देवांवर विश्वास दृढ झाला पाहिजे. द्रौपदीने तळमळीने श्रीकृष्णांना आवाहन केले. भगवान आले आणि पात्राला लागलेले भाजीचे पान भक्षण केले. ‘पत्रं पुष्पम फलं तोयं’ हे स्वतः आचरून दाखविले आणि द्रौपदीच्या प्रेमाला-भक्तीला महत्व दिले. मग त्या थाळी-पत्राने परत अन्न दिले. याप्रमाणे द्रौपदीच्या भक्ती भूमिकेने पांडव संकटातून मुक्त झाले आहेत. भक्तिभावासाठी भगवान वाटेल त्या वेळेला येऊन संकटातून मुक्त करतात. आरतीमध्ये चोथे उदाहरण म्हणून अंबरीश राजाला कसे भगवंताने दुर्वासांच्या शापातून मुक्त केले आहे ते घेतले आहे.

चौथे उदाहरण गुरुचरित्राच्या दहाव्या अध्यायातल्या सकाम भक्ताचे घेतले आहे. श्रीपाद वल्लभांचा नवस फेडून, सहस्त्र भोजन घालण्यासाठी, तो भक्त कुरुगड्डीला निघाला आहे. वाटेत चोरांनी गाठून फसवून त्याचा वध केला. भगवंतांची वात्सल्य शक्ती अशी आहे कि तिथे येऊन चोरांना मारून, ब्राह्मणाला जिवंत केले आहे आणि त्याचा तो संकल्प पूर्ण करवून घेतला आहे. मेल्यावर आयुष्य संपले असे सांगता नाही का येत देवांना?

निर्विकार ब्रह्मरूप समजणे, सर्वव्यापक ब्रह्मरूप समजणे, त्यांचे अनुसंधान करणे, सगुण श्रेष्ठ कि निर्गुण श्रेष्ठ असा भेदभाव संपणे महत्वाचे. भक्तकार्य करणारा भगवानच साक्षात ब्रह्मरूप आहे, निर्गुण निराकार तोच आहे, सगुण साकार तोच आहे, त्याची मला प्राप्ती व्हावी. काम क्रोधरूपी अनंत विक्षेप चित्तात उत्पन्न होतात, चित्त स्थिर करण्याचे सामर्थ्य माझ्याकडे नाही. साधन मिळाले तरी त्या साधनेवर माझा तितका संपूर्ण विश्वास माझा कुठे आहे? त्यामुळे साधनाचाही उपयोग मी करून घेऊ शकत नाही. याकरता तुमचे सहायय मला व्हावे, तुमची प्राप्ती मला व्हावी, ही प्रार्थना या आरतीत शेवटी केली आहे. अशा रीतींत सामान्यतः एकंदर तत्वानुसंधान, वेदांतसिद्धांत यात मांडले आहेत. या सिध्दांतापर्यंत आपली बुद्धी जाण्याकरिता भगवतभक्तीचे महत्व इथे सांगितले आहे.

आपण जर कृपा केलीत तरच मला आपले स्वरूप समजून येणार आहे. माझे कर्तृत्व काहीही नाही अशी अनन्यभावाने शेवटी प्रार्थना केली आहे. याचे नित्य अनुसंधान करीत राहून या आरतीचे पठण अर्थाकडे लक्ष देऊन झाले तर त्याचे फळ आपल्याला मिळणार आहे. हे एक वाङ्मय तपच आहे. अर्थानुसंधान नाही घडलं तरी जितके वाणीने होईल तेवढे करावे. त्या वाङ्मय तपाचेही महत्व काही कमी नाही. वाङ्मय तपाचे पर्यवसान मानस तपापर्यंत होत आहे हे थोरल्या महाराजांनी सांगितले आहे.

ब्रह्मस्वरूप भक्तांचं संरक्षण करण्याकरता आहे. संरक्षण याचा अर्थ भक्तांची बुद्धी शुद्ध करून आपल्या ठिकाणी स्थिर करणे. ‘श्रीपाद वल्लभ’ या संबोधनात ‘श्रीपाद’ आणि ‘वल्लभ’ असे दोन शब्द आहेत. “श्री पादेयस्य’, म्हणजे ज्याच्या चरणाजवळ ‘श्री’ आहे. लक्ष्मीयुक्त परमात्म, शक्तियुक्त परमात्म्याचे स्मरण श्रीपाद या शब्दाने केले आहे. सर्व ‘श्री’ लक्ष्मीदेवी ज्याच्याजवळ आहे आणि म्हणून तो सर्वांना वल्लभ, म्हणजे प्रिय आहे. सर्वांना संकटातून मुक्त करून कल्याण करणारा जो आहे, म्हणून तो वल्लभ म्हणजे प्रिय आहे. सर्व श्री-मायाशक्ती ज्याच्याजवळ आहे आणि सर्वही भक्तांना जो अत्यंत प्रिय आहे.

आरतीमध्ये आर्त भक्तांचे “न मे भक्त: प्रणश्यति” या वचनाप्रमाणे भगवंतांनी संरक्षण केले आहे. आणि शेवटी प्रार्थना केली आहे,

दिगंबरा गुरु वासुदेव दत्त सत्वं ब्रह्म | काम क्रोध ग्रसितं माम लभ सदैव झटितिवह ||४||

हे दिगंबरा, “श्रीपादवत लभ” असा एक अर्थ केला आहे. श्रीपाद ज्याप्रमाणे विष्णुरूपाने गजेंद्राला आणि अंबरीषाला, श्रीकृष्णरुपाने द्रौपदीला, श्रीपाद रूपाने द्विजाला स्वरूपात लभ म्हणजे प्राप्त झाले, त्याप्रमाणे मलाही आपली प्राप्ती व्हावी. कारण मी देखील काम-क्रोधादि ग्रसित आहे. इथे महामंत्रातील चौथ्या शब्दाचा म्हणजे तिसऱ्या ‘दिगंबरा’चा, शेवटच्या शब्दाचा अर्थ सांगताना आपण गुरुस्वरूप आहात, वासुदेवरूप आहात, दत्तरूप आहात असे म्हंटले आहे.

म्हणजे ही तिन्ही रूपे एकच आहेत. गुरु-वासुदेव आणि दत्त हे तिन्ही ब्रह्मस्वरूपच आहेत, सर्वही अनुसंधान एकरूपाने या ठिकाणी केले आहे.

‘वासुदेव’ याचा अर्थ देखील शास्त्रकारांनी केला आहे. ‘वस’ धातूचा अर्थ ‘आच्छादन’ असा आहे. सर्वही भुतांना काही दिसत नाही आणि स्वतः तो प्रकाशमान आहे. झाकून जरी टाकलेलं असलं तरी आत्मरूप प्रकाशमान आहे. अशा हे वासुदेवा, “दत्त: त्वम ब्रह्म”, आपण ‘गुरुर्ब्रह्मा वसुदेवा दत्तात्रेय’ आहात. ब्रह्मस्वरूप आहात. याप्रमाणे मूळ ब्रह्मरुपाने अनुसंधान करून प्रार्थना केली आहे.

“काम क्रोध ग्रसितं माम लभ” मला आपण प्राप्त व्हा कारण कामक्रोधांनी मी अगदी ग्रासलेले आहे. या सर्व विकारांनी पिटलेलो आहे. म्हणून आपण मला प्राप्त व्हा आणि त्याच प्रमाणे लवकर मला आपल्याकडे न्या, अशी शेवटी प्रार्थना केली आहे.

असा हा महामंत्र आहे. या महामंत्राचे सगुण-निर्गुण, व्यापक-अव्यापक अशा स्वरूपाचे ऐक्य कसे आहे, ते ऐक्य-ज्ञान आपल्याला व्हावे आणि आपण कृतार्थ व्हावे अशी प्रार्थना करून शेवट करतो.

|| अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ||
श्रीगुरुचरणरजामृतानंद सेवक

Friday, October 25, 2019

दिपावली शुभेच्छा

लक्ष्मीमातेचा राहो आशिष
फराळ पक्वान्न खाद्यविशेष
तुमच्या पूर्ण होवो सर्व सदिच्छा
हार्दिक शुभेच्छा दिपावलीच्या

पाच सणांचा हा सणगुच्छ
होवो धन,यश,आरोग्य दायक
लाभो सर्वां सदगुरुकृपाशीर्वादा
हार्दिक शुभेच्छा दिपावलीच्या 

मी माझेपणा जावो विलया
सदगुरुचरण स्मरण उपासना
नित्य राहो लक्ष नामस्मरणा
हार्दिक शुभेच्छा दिपावलीच्या

करूनी नित्य नामसाधना
अंतरीचा हा दीप उजळता
आत्मसात सदगुरुंना करूया
हार्दिक शुभेच्छा दिपावलीच्या

Wednesday, October 23, 2019

स्वयें श्रीराम प्रभु ऐकती

श्री राम, श्री राम, श्री राम
स्वये श्रीरामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती
कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतीने तेजाची आरती
राजस मुद्रा, वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनीचे
वाल्मीकींच्या भाव मनीचे
मानवी रुपे आकारती
ते प्रतिभेच्या आम्रवनातील
वसंत वैभव गाते कोकील
बालस्वरांनी करुनी किलबिल
गायनें ऋतुराजा भारिती
फुलापरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनी झुलती
कर्णभूषणें कुंडल डुलती
संगती वीणा झंकारिती
सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या, नऊ स्वरधुनी
यज्ञमंडपीं आल्या उतरुनी
संगमी श्रोतेजन नाहती
पुरुषार्थाची चारी चौकट
त्यात पाहता निजजीवनपट
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट
प्रभुचे लोचन पाणावती
सामवेदसे बाळ बोलती
सर्गामागुन सर्ग चालती
सचिव, मुनिजन, स्त्रिया डोलती
आसवे गाली ओघळती
सोडुनि आसन उठले राघव
उठुन कवळिती अपुले शैशव
पुत्रभेटीचा घडे महोत्सव
परि तो उभया नच माहिती

Monday, October 21, 2019

गुरू श्लोक अर्थसहित

slokas in sanskrit

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥

भावार्थ :
गुरु ब्रह्मा है, गुरु विष्णु है, गुरु हि शंकर है; गुरु हि साक्षात् परब्रह्म है; उन सद्गुरु को प्रणाम ।

धर्मज्ञो धर्मकर्ता च सदा धर्मपरायणः ।
तत्त्वेभ्यः सर्वशास्त्रार्थादेशको गुरुरुच्यते ॥

भावार्थ :
धर्म को जाननेवाले, धर्म मुताबिक आचरण करनेवाले, धर्मपरायण, और सब शास्त्रों में से तत्त्वों का आदेश करनेवाले गुरु कहे जाते हैं ।

निवर्तयत्यन्यजनं प्रमादतः स्वयं च निष्पापपथे प्रवर्तते ।
गुणाति तत्त्वं हितमिच्छुरंगिनाम् शिवार्थिनां यः स गुरु र्निगद्यते ॥

भावार्थ :
जो दूसरों को प्रमाद करने से रोकते हैं, स्वयं निष्पाप रास्ते से चलते हैं, हित और कल्याण की कामना रखनेवाले को तत्त्वबोध करते हैं, उन्हें गुरु कहते हैं ।

नीचं शय्यासनं चास्य सर्वदा गुरुसंनिधौ ।
गुरोस्तु चक्षुर्विषये न यथेष्टासनो भवेत् ॥

भावार्थ :
गुरु के पास हमेशा उनसे छोटे आसन पे बैठना चाहिए । गुरु आते हुए दिखे, तब अपनी मनमानी से नहीं बैठना चाहिए ।

guru mantra in hindi

किमत्र बहुनोक्तेन शास्त्रकोटि शतेन च ।
दुर्लभा चित्त विश्रान्तिः विना गुरुकृपां परम् ॥

भावार्थ :
बहुत कहने से क्या ? करोडों शास्त्रों से भी क्या ? चित्त की परम् शांति, गुरु के बिना मिलना दुर्लभ है ।

प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा ।
शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥

भावार्थ :
प्रेरणा देनेवाले, सूचन देनेवाले, (सच) बतानेवाले, (रास्ता) दिखानेवाले, शिक्षा देनेवाले, और बोध करानेवाले – ये सब गुरु समान है ।

गुकारस्त्वन्धकारस्तु रुकार स्तेज उच्यते ।
अन्धकार निरोधत्वात् गुरुरित्यभिधीयते ॥

भावार्थ :
‘गु’कार याने अंधकार, और ‘रु’कार याने तेज; जो अंधकार का (ज्ञान का प्रकाश देकर) निरोध करता है, वही गुरु कहा जाता है ।

शरीरं चैव वाचं च बुद्धिन्द्रिय मनांसि च ।
नियम्य प्राञ्जलिः तिष्ठेत् वीक्षमाणो गुरोर्मुखम् ॥

भावार्थ :
शरीर, वाणी, बुद्धि, इंद्रिय और मन को संयम में रखकर, हाथ जोडकर गुरु के सन्मुख देखना चाहिए ।

guru vandana in sanskrit

विद्वत्त्वं दक्षता शीलं सङ्कान्तिरनुशीलनम् ।
शिक्षकस्य गुणाः सप्त सचेतस्त्वं प्रसन्नता ॥

भावार्थ :
विद्वत्व, दक्षता, शील, संक्रांति, अनुशीलन, सचेतत्व, और प्रसन्नता – ये सात शिक्षक के गुण हैं ।

अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया ।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः ॥

भावार्थ :
जिसने ज्ञानांजनरुप शलाका से, अज्ञानरुप अंधकार से अंध हुए लोगों की आँखें खोली, उन गुरु को नमस्कार ।

गुरोर्यत्र परीवादो निंदा वापिप्रवर्तते ।
कर्णौ तत्र विधातव्यो गन्तव्यं वा ततोऽन्यतः ॥

भावार्थ :
जहाँ गुरु की निंदा होती है वहाँ उसका विरोध करना चाहिए । यदि यह शक्य न हो तो कान बंद करके बैठना चाहिए; और (यदि) वह भी शक्य न हो तो वहाँ से उठकर दूसरे स्थान पर चले जाना चाहिए ।

विनय फलं शुश्रूषा गुरुशुश्रूषाफलं श्रुत ज्ञानम् ।
ज्ञानस्य फलं विरतिः विरतिफलं चाश्रव निरोधः 

भावार्थ :

विनय का फल सेवा है, गुरुसेवा का फल ज्ञान है, ज्ञान का फल विरक्ति है, और विरक्ति का फल आश्रवनिरोध है ।

sanskrit slokas on guru

यः समः सर्वभूतेषु विरागी गतमत्सरः ।
जितेन्द्रियः शुचिर्दक्षः सदाचार समन्वितः ॥

भावार्थ :
गुरु सब प्राणियों के प्रति वीतराग और मत्सर से रहित होते हैं । वे जीतेन्द्रिय, पवित्र, दक्ष और सदाचारी होते हैं ।

एकमप्यक्षरं यस्तु गुरुः शिष्ये निवेदयेत् ।
पृथिव्यां नास्ति तद् द्रव्यं यद्दत्वा ह्यनृणी भवेत् ॥

भावार्थ :
गुरु शिष्य को जो एखाद अक्षर भी कहे, तो उसके बदले में पृथ्वी का ऐसा कोई धन नहीं, जो देकर गुरु के ऋण में से मुक्त हो सकें ।

बहवो गुरवो लोके शिष्य वित्तपहारकाः ।
क्वचितु तत्र दृश्यन्ते शिष्यचित्तापहारकाः ॥

भावार्थ :
जगत में अनेक गुरु शिष्य का वित्त हरण करनेवाले होते हैं; परंतु, शिष्य का चित्त हरण करनेवाले गुरु शायद हि दिखाई देते हैं ।

सर्वाभिलाषिणः सर्वभोजिनः सपरिग्रहाः ।
अब्रह्मचारिणो मिथ्योपदेशा गुरवो न तु ॥

भावार्थ :
अभिलाषा रखनेवाले, सब भोग करनेवाले, संग्रह करनेवाले, ब्रह्मचर्य का पालन न करनेवाले, और मिथ्या उपदेश करनेवाले, गुरु नहीं है ।

sanskrit slokas with meaning in hindi on guru

दुग्धेन धेनुः कुसुमेन वल्ली शीलेन भार्या कमलेन तोयम् ।
गुरुं विना भाति न चैव शिष्यः शमेन विद्या नगरी जनेन ॥

भावार्थ :
जैसे दूध बगैर गाय, फूल बगैर लता, शील बगैर भार्या, कमल बगैर जल, शम बगैर विद्या, और लोग बगैर नगर शोभा नहीं देते, वैसे हि गुरु बिना शिष्य शोभा नहीं देता ।

योगीन्द्रः श्रुतिपारगः समरसाम्भोधौ निमग्नः सदा
शान्ति क्षान्ति नितान्त दान्ति निपुणो धर्मैक निष्ठारतः ।
शिष्याणां शुभचित्त शुद्धिजनकः संसर्ग मात्रेण यः
सोऽन्यांस्तारयति स्वयं च तरति स्वार्थं विना सद्गुरुः ॥

भावार्थ :
योगीयों में श्रेष्ठ, श्रुतियों को समजा हुआ, (संसार/सृष्टि) सागर मं समरस हुआ, शांति-क्षमा-दमन ऐसे गुणोंवाला, धर्म में एकनिष्ठ, अपने संसर्ग से शिष्यों के चित्त को शुद्ध करनेवाले, ऐसे सद्गुरु, बिना स्वार्थ अन्य को तारते हैं, और स्वयं भी तर जाते हैं ।

पूर्णे तटाके तृषितः सदैव भूतेऽपि गेहे क्षुधितः स मूढः ।
कल्पद्रुमे सत्यपि वै दरिद्रः गुर्वादियोगेऽपि हि यः प्रमादी ॥

भावार्थ :
जो इन्सान गुरु मिलने के बावजुद प्रमादी रहे, वह मूर्ख पानी से भरे हुए सरोवर के पास होते हुए भी प्यासा, घर में अनाज होते हुए भी भूखा, और कल्पवृक्ष के पास रहते हुए भी दरिद्र है ।

दृष्टान्तो नैव दृष्टस्त्रिभुवनजठरे सद्गुरोर्ज्ञानदातुः
स्पर्शश्चेत्तत्र कलप्यः स नयति यदहो स्वहृतामश्मसारम् ।
न स्पर्शत्वं तथापि श्रितचरगुणयुगे सद्गुरुः स्वीयशिष्ये
स्वीयं साम्यं विधते भवति निरुपमस्तेवालौकिकोऽपि ॥

भावार्थ :
तीनों लोक, स्वर्ग, पृथ्वी, पाताल में ज्ञान देनेवाले गुरु के लिए कोई उपमा नहीं दिखाई देती । गुरु को पारसमणि के जैसा मानते है, तो वह ठीक नहीं है, कारण पारसमणि केवल लोहे को सोना बनाता है, पर स्वयं जैसा नहीं बनाता ! सद्गुरु तो अपने चरणों का आश्रय लेनेवाले शिष्य को अपने जैसा बना देता है; इस लिए गुरुदेव के लिए कोई उपमा नहि है, गुरु तो अलौकिक है ।


ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभुतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥

ब्रह्मा के आनंदरुप परम् सुखरुप, ज्ञानमूर्ति, द्वंद्व से परे, आकाश जैसे निर्लेप, और सूक्ष्म "तत्त्वमसि" इस ईशतत्त्व की अनुभूति हि जिसका लक्ष्य है; अद्वितीय, नित्य विमल, अचल, भावातीत, और त्रिगुणरहित - ऐसे सद्गुरु को मैं प्रणाम करता हूँ ।

Saturday, October 12, 2019

माठ

अनेक पक्षांनी गृहीत धरले सर्व नागरिकांना 
मते द्या यांना नवीन आमदार निवडून देण्या 

नागरिक म्हणुनी अधिकार मोठा मतदानाचा
पण दान देण्या एकही उमेदवार नसे कामाचा

नागरिकांचे भले करण्याच्या नये मारू बाता
फक्त पैसे ओरबड्याण्याच्या नेत्यांचा मनसुबा

अनेक वचननामे आश्वासनांचा पाऊस येथे
त्या पूर्ण होणारच नाही,विश्वास शंभर टक्के

अपूर्ण वचने हवीत पुढील निवडणुकीसाठी
खड्डे,पाणी,अन्न,प्रश्न पुन्हा निवडणुकीसाठी

मतदारांवर विनोद करत असतील सर्व नेते
अनेक फसव्या वचनांना फसतील हे मतदाते

आहे सवय त्यांना करती चिंता प्रतीदिनाची
निवडून आल्या आम्हाच मानतील त्यांचे मंत्री

जातील कोठे शेवटी ,पाच वर्षात पुन्हा गाठ
आमचा असेल तेव्हाही,मतदारराजा हा माठ

-निलेश जोशी

Wednesday, September 18, 2019

म्हणी उगम 1

गगनाला गवसणी: गवसणी म्हणजे आवरण. एखादी गोष्ट झाकून ठेवायचे वस्त्र. जसे कि वाद्ये (तबला इत्यादी) झाकून ठेवण्याची गवसणी. त्यावरूनच एखादी अशक्यप्राय गोष्ट साध्य करणे म्हणजे आकाशाला गवसणी घातल्याची उपमा दिली जाऊ लागली. त्यातूनच पुढे खूप मोठ्या अभूतपूर्व पराक्रमाला "गगनाला गवसणी घालणे" म्हटले जाऊ लागले.

ताकास तूर हे खरे तर तागास तूर लागू न देणे असे आहे. ताग आणि तुरीची रोपं सारखी दिसतात. असा कुठे तरी वाचल्याचे आठवतंय.

बऱ्याचदा आपण काही म्हणी अर्धवट वापरतो. पुर्ण वापरणे चारचौघात बरे वाटत नाही. त्यातलीच ही एक.
नावडतीचे मिठ आळणी. (पुर्ण म्हण: आवडतीचा शेंबुड गोड आणि नावडतीचे मीठ आळणी. )
ही म्हण मी कुठेतरी आंतरजालावरच वाचली होती. . खुप हसलो होतो. नक्की शब्द माहित नाहीत.
ज्याका आली हागाक, तो घाबरत नाही वाघाक. 

उगम माहिती नाही.


"सोनार, शिंपी, कुलकर्णी आप्पा, यांची संगत नको रे बाप्पा"
कारण हे वर उल्लेखलेले सगळे लोक म्हणे स्वतः काम करत नाहीत आणि दुसर्‍याला ही करू देत नाहीत. फक्त गप्पा हाणित बसतात.






Friday, August 23, 2019

व्यसन मुक्ती

आजकाल कोकणात गावागावात कॅन्सरने गेलेले लोक वाढत आहेत ,त्या व्यसनमुक्ती साठी आपण एकत्र येऊन काहीतरी केले पाहिजे. याच विषयावर विनोदी ढंगाची आज सुचलेली एक मालवणी कविता

3 दिवस झाले,
इट इलो बाबा,
टीव्हीर येता ,
लुंगीवालो खावबा,

निसते कटकटी मेल्यांचे,
घरार टाकतत धाडी
आयकर, इडीवाले,
मारतत गडग्यावरसून उडी

ह्या इडी ईडी आयकान,
कान ह्यो इटाम्बलो,
मेल्यानु तुमका काय ,
दुसरो शब्द नाय गावलो?

एक वरीस झाला ,
ट्रीटमेंट चालू करून
धाप लागता चलताना,
भातो येता भरून

डाकटर म्हणता,कुड्याची
ईडी दि सोडून
त्याका त्वांड लायलय,
तर घेईन तुका बघून

वाडयेतले पोर टॉर,
सगळ्यांका म्हायत आसा,
माझ्यापुढे इडयेचा,
नावपण नाय घेवचा

गावातले लोक हेतूर,
कर्तत माका मदत
चुकान इडयेचो इलोच इशय,
सोमतो बदलतत

टीव्ही वयला मायझयांका,
ह्या कोण सांगतलो
3 दिसापासून मेले ईडी ईडी,
ह्याच बोबंलतले

आता ईडी शब्द इलो तरी,
कायच वाटना नाय
गावातले गेलले कॅन्सरने,
चेहरो इसराक जाणा नाय

इतके पावसाळे बघून ,
सल्लो माझो तुमकाव
दोन पावटाची मजा,म्हणांन
ईडी ,तंबाखू नको खावं

ईडी ईडी टीव्हीर,
केवढाय त्यांका बोंबलू दे,
गावातल्या ह्या व्यसनांका,
येशीच्या भायर जावन दे

वायच मज्जा म्हणांन चालू झालला ,
व्यसन मरे झाला,
जास्त नाय रे म्हणता म्हणता, आंगवळणी पडला

तू मी सगळे जणा ह्येच्यापुढे,
आता याक मातर करूया ,
कोनय लागलोच नादाक तर, त्येच्यापासून दूर त्येका करूया

ईडी तंबाखू घे रे तुपण,
लोकांका वरडू दे  कितक्याव,
आमच्या गावात व्यसनांचो,
आता नाय होवचो शिरकाव

मालवणी आम्ही पक्के,
शब्द नाय बदलुचो
ह्येचापूढे कोणच,
ह्या व्यसनात नाय अडकूचो
-- निलेश जोशी

Saturday, August 3, 2019

सदगुरु अनुभूती #दिव्यानुभव

सद्गुरू श्रीकाकामहाराज की जय

सद्गुरू यांचे सूक्ष्मातून काम चालूच असते आणि बरेच दुवे आपोआप जुळवतात व आपण मात्र त्यात निमित्तमात्र असतो ,अर्थात आपला समावेश हिसुद्धा सद्गुरूंची योजनाच असते, याचाच आलेली अनुभूती
मी पूर्ण घटनाक्रम सांगून मग त्यातील सद्गुरू योजना कशी असते हे नंतर सांगतो ,तर झाले असे,
मे महिन्यात दरवर्षीप्रमाणे आम्ही कोकणात गावी जाऊन आलो आणि त्याचवेळी माझा चिंचवडमधील मित्र संदीप पाटील सपत्नीक घरी आला. आम्हीसुद्धा त्याला घरी आल्यावर चहापाणी झाले , गावचाआंबा कापून दिला व घरी जाताना आंबे त्यांना दिले. विशेष म्हणजे आम्ही 4 वर्षांनी भेटत होतो कारण तो मित्र चीनमध्ये कंपनीच्या कामासाठी होता व मागील 4 महिने चिंचवडमध्ये आला पण आजच त्याला मला भेटण्याची इच्छा झाली व मीही त्याला म्हणालो आताच गावाहून आलो म्हणून भेटलो नाहीतर भेट शक्यच नव्हती. थोडक्यात त्या मित्राची 4 वर्षानी झालेली भेट हा पहिला दुवा.

त्यांनतर 5 दिवस मी कामावर गेलो , शनिवारी मला सुट्टी होती म्हणून घरीच होतो आणि त्यावेळी सकाळी कविताने (बायको) मला उठवले व तिच्या मामीच्या भावाचा मृत्यु कोल्हापूरला झाला ही बातमी सांगितली.
तिच्या मामीचा भाऊ व वैनी कोल्हापूर दर्शनाला गेलेले व रात्रीच हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला व मामी कोल्हापूरला निघाली होती.
तिलाही 10 मिनिटपूर्वी तिच्या मामीने फोन करून सांगितले. चहा घेताना गप्पा मारताना त्या मृत व्यक्तीने किती मामाच्या मयताच्या वेळी त्रास दिला वैगरे जुन्या आठवणी बोलताना कविता अचानक म्हणाली की मामी तिकडे एकटी आहे तर कोणाची ओळख आहे का म्हणजे हॉस्पिटल व पोस्ट मार्टम प्रक्रियेत एखाद्याची मदत करता येईल का असे विचारले.
मी सुद्धा विचार केला आणि आठवले माझा मित्र संदीप पाटील यांची सासुरवाडी कोल्हापूर ,लगेच त्याला फोन केला व त्यानेही सांगितले ओळकीचे खुपजण आहेत तू डिटेल्स कळव.
मी लगेच कवितांच्या मामीशी बोललो व डिटेल्स घेऊन लगेच संदीपला कळवले.
संदीपने त्याच्या कोल्हापूरमधील मेव्हण्याला फोन करून CPR हॉस्पिटलला पाठवले. त्या मेव्हण्याने ओळख वापरून प्रक्रिया चालू केली व सर्वाना नाश्ता, चहा घ्यायला लावला ,20 मिनिटात सर्व प्रक्रिया पूर्ण करून डेथ सर्टिफिकेट मिळवून दिले व शव पुण्याला आणण्यासाठी व्हॅन करून दिली.मामी व मयत व्यक्तीची पत्नी पुण्यात आल्या व संध्याकाळी 4 वाजता सर्व संस्कार पूर्णही झाले.
आता यातले दुवे सांगतो ,
1. 4 वर्षांनी भेटलेला मित्र नेमका एक आठवडा आधीच भेटतो (4 महिने एकाच गावात राहूनही भेट नाही पण नेमकी त्याच दिवशी त्याला मला भेटायची इच्छा होते)
2.कविताला मृत्यूची बातमी सांगितल्यावर त्या व्यक्तीला मदत मिळायला हवी असे खूप आतून वाटणे
3.कविताने त्यांना मदत करायला कोणी कोल्हापूरला मित्र आहे का हे विचारणे
4.नेमका माझा मित्राची आठवण होणे व त्यांनतर त्यांच्याकडूनही लगेच सूत्रे हलवणे.
5.मित्राचा मेव्हणा कोल्हापूरला जाऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करतो काय आणि सरकारी हॉस्पिटलमधील 6-7 तासाची प्रक्रिया 20 मिनिटात पूर्ण करतो काय
6.मृत्यमुळे तणावात असलेल्या मामी व त्यांची वहिनी वेळेत शव घेऊन येतात काय आणि सर्व देहसंस्कार वेळेत होतात.

म्हणजेच त्या बाहेरगावी व्यक्तीला मदत मिळावी ही सद्गुरूंची योजना आणि त्यासाठी सद्गुरुनी निमित्तमात्र म्हणून केलेली आम्हा सर्वांची योजना .
सद्गुरुचे कार्य अश्या प्रकारे चालते हेही अनुभवता आले. सद्गुरुकार्य सदोदित चालूच राहते ,त्या कार्यात आपलाही योजना होण्यासाठी सतत जास्तीत जास्त नामस्मरण करत राहणे हेच आपल्या हातात.

जय साईराम

Monday, July 1, 2019

श्री सद्गुरू आणि आनंद

श्री सद्गुरवे नमः
ओम श्री साईकाकाय नमः
ओम श्री साईनाथाय नमः

आनंद म्हणजे काय ? बऱ्याचदा आपल्या मनासारख्या गोष्टी झाल्या की आपल्याला आनंद होतो ,पण कित्येकदा त्या आनंददायक गोष्टी नंतर दुःख देणाऱ्या असू शकतात.
काही अनपेक्षित गवसले की दुप्पट आनंद होतो कारण त्यावेळी ती गोष्ट त्याला अपेक्षित नसते. पण माणसाला असाही आनंद मिळतो जेव्हा तो खुश असतो पण नाचू शकत नाही ,व्यक्त करू शकत नाही फक्त आनंदाश्रू ओघळत राहतात डोळ्यातून तासनतास ,तो खरा त्या माणसाने अनुभवलेला आनंद.
श्री सद्गुरू यांनी आपल्याला कृपा छत्राखाली घेतल्याचा आनंद असाच आहे ,अपरिमित आणि अव्यक्त..
श्री सद्गुरू म्हणजेच प्रत्यक्ष भगवंत आणि ते जेव्हा आपल्याला अनुभूती देतात ,काळजी नको मी आहे असे आश्वासन देतात त्यावेळी प्रत्यक्ष देवाच्या आशीर्वादात आपण असतो. सद्गुरू म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर , नित्यपाठात याचा उल्लेख आहेच की आताच्या युुगात जर श्रीराम किंवा हनुुुमान अवतरले तर आपण तेे तेज बघूून गांगरून जाऊ ,म्हणूूूनच सद्गुरु आपल्याला आश्वस्त करायला आले आहेत. ओवी क्रमांक ९८ - "म्हणोनि कालमान पाहोनी ,ईश्वरही झाला सौम्य सुवदनी ,काका स्वरूप आवडोन ,मानववेषी अवतरला.

आज सद्गुरुनी जो निबंध लिहायला सांगितलंय त्याला नित्यपाठतील ओव्या आधार घेऊनच आपण श्री सद्गुरू आणि आनंद हा विषय समजून घेऊया.

नित्यपाठ ओवी क्रमांक १४ "फेडफेडीची ही भाषा , करणे माझी मनाची मूर्खता,तुमच्या उपकारी राहता ,आनंद मजसी वाटतो" 

श्रीसदगुरू या मोहमयी व स्वार्थी जीवनात तुमच्या कृपेने हे जीवनच पालटले आणि आता मनांत विचार येतात की सद्गुरुंचे खूप उपकार आहेत आपल्यावर आणि ते कसे फेडू ,दुसऱ्याच क्षणी तुमच्याच कृपेने मनात विचार येतो की फेडफेडीची ही भाषा म्हणजे निव्वळ व्यवहार आहे आणि हा व्यवहार सदगुरूंना अपेक्षित नाही, त्यापेक्षा त्यांच्या उपकारात जन्मभर राहणे मला मनापासून आवडेल.आणि हे उपकारात आहोत याची जाणीव व्हायला सद्गुरुनी दिलेली चाकोरी सर्व साधकांनी व भक्तांनी मनापासून पाळायला हवी ,आचारायला हवी.ऑटोमोबाईल मेंटेनन्स भाषेमध्ये 3 term वापरल्या जातात , CBM म्हणजे कंडिशन बेस्ड मेंटेनन्स TBM म्हणजे टाइम बेस्ड मेंटेनन्स व IR म्हणजे इंस्पेक्शन व रिपेअर ,ह्याच व्याख्या आपल्याला या भक्तिमार्गात आचारता येतील. आपली पूर्वकर्मे जळून जावीत म्हणून सद्गुरूंनी दिलेली उपासना म्हणजे कंडिशन बेस्ड मेंटेनन्स ,सद्गुरूंनी आखून दिलेली चाकोरी जेणेकरून आपण भक्तिमार्गात राहू ,सदोदित सद्गुरूंचे स्मरण होईल म्हणजेच टाइम बेस्ड मेंटेनन्स व नैमित्तिक साधना सद्गुरू करवून घेतात जसे जप ,हे निबंध लेखन व मंदिरातील सत्संग - भजन हे आपल्यातील जाणीव नेणीव घासून पुसून लख्ख करतात म्हणजेच या गोष्टी इंस्पेक्शन व रिपेअर याचेच काम करतात.

नित्यपाठ ओवी क्रमांक ४१ "पुढे श्रीसाईंचीही कृपा झाली ,तू माझा बंधू ऐसी ओळख दिली ,शिरडीच आनंदनगरी आली ,साईमहिमा वाढविण्या" श्री सद्गुरु राहतात ते ठिकाण शिवकृपा ,आनंदनगर दोन्हीकडे बारकाईने बघितले तर सिंहगड रोड वरील आनंद देणारे नगर असेही आपण म्हणून शकतो.या वास्तूत स्वतः शिवस्वरूप सद्गुरू वास्तव्य करतात.

नित्यपाठ ओवी क्रमांक ६५ , "आपण आनंदी राहावे ,इतरांनाही आनंदी करावे ,कष्टाची भाकर खाऊन राहावे ,एका हरिसी धरुनी"या ओवीतही सद्गुरूंनी बोध दिलेला आणि तोही जसा कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली व जगण्यातील मर्म सांगितले तेच सर्वात सोपे करून सद्गुरू आपल्या सत्संगातून सर्वाना बोध करतात ,की षड्रिपूच्या पार जाण्यासाठी सर्व काही सद्गुरू घडवून आणतात हे सत्य जाणले तर मग आनंदी राहणे सोपे होते व आपोआप आपणसुद्धा सद्गुरूना अपेक्षित तसे वागायला लागतो , त्यासाठीच सद्गुरूंनी सांगितलेली त्रिसूत्री आपण आपल्या मनावर बिंबवायला हवी.

नित्यपाठ ओवी क्रमांक ९२ आहे " तुम्हा उद्धरण्यात मला आनंद ,तुमच्या कल्याणाचाच मला छंद ,तुमचे तोडोनी सर्व बंध ,माझ्यात तुम्हा मेळविन मी " या ओवीतून सद्गुरू साधकांना स्पष्ट सांगतात की अरे मुलांनो ,सद्गुरू यांना आनंद कधी मिळतो तर जेव्हा त्यांचे साधक सर्व बंध तोडून स्वतःमधील सदगुरु तत्वाला जाणायला शिकतील तेव्हा आपोआप श्री सद्गुरूंना अपेक्षित त्यांच्या स्वतःमध्ये साधकांना मेळवायची इच्छा म्हणजे प्रत्येक साधक भगवंत स्वरूप व सद्गुरू स्वरूप होण्याची इच्छा पूर्ण होईल आणि हाच असेल श्री सद्गुरू काकामहाराज यांना मिळालेला सर्वोच्च आनंद.

नित्यपाठ ओव्या व श्री सद्गुरू काकामहाराज यांनी जे विचार माझ्या मनात परावर्तित केले ,त्यांच्याच इच्छेने हा निबंध लिहिला गेला ,जे काही न्यून असेल त्याचा दोष निव्वळ माझ्या विचारातील मळभ असेल ,बाकी सद्गुरू यांनी बोध केलेल्या विचारात व विचार लिहिण्यात काही चूक झाली असल्यास सर्वांनी क्षमा करावी व श्री सद्गुरूंनी मार्गदर्शन करावे ही विनंती.

जय साईराम ,शिवस्वरूप सद्गुरू श्री काकामहाराज की जय ,उमास्वरूप सौ काकुमाऊली की जय,संतश्रेष्ठ श्री गडबोले महाराज की जय.

-निलेश जोशी









Tuesday, May 21, 2019

प्रिय प्रत्युष यांस

10 वर्षांपूर्वी याच दिवशी भेटला
डॉ जवळ येऊन म्हणाल्या मला
अभिनंदन मुलगा झालाय कविताला
त्यावेळी निलुचा बाबा झाला

इवलेसे हात, छोटुसे पाय
आईच्या कुशीत पहुडलेला
एकदम झोपमग्न असलेला
मी घेतलं उचलून तुला आणि
नर्स म्हणाल्या काळजी घ्या

दिवसा कमी झोपायचं
रात्र जागवण्यात पटाईत
आई बाबा सर्वाना त्रास,
देण्याची तुझी खासियत
दंगा जेवताना ,झोपतानाही
करामतीत तुझ्या दंग आम्ही

कार्टून बघत जेवायचं नेहमी
जेवताना आईला उठवायचं नेहमी
दिवाळीत उटणं लावायचं मलाही
कित्ती प्रताप करायचा दिसामाजी
त्यात स्वमग्नता अनुभवलीस तू
अनेक ट्रीटमेंटला सामोरा गेलास तू

आज सद्गुरुकृपेने या सर्वातूनही
सुखरूपपणे बाहेर आला आहेस
इतके दिवस न बोलणारा मात्र तू
सर्वच कसर भरून काढतो आहेस
माझ्या हाताचीही काळजी घेतोस
आईला बर नसतानाही संभाळतोस

पुढे मात्र आता खूप सांभाळायचं आहे
स्वतःला सर्व क्षेत्रात घडवायचं आहे
अभ्यासबरोबरीने माणूस व्हायचं आहे
समाजमन जपत स्वसिद्ध व्हायचं आहे
हट्ट बालपण अनुभवत मजा करायची आहे
आई बाबांना अभिमान असे वागायचे आहे


Saturday, April 20, 2019

सौभाग्यकांक्षीणी मुलीला शुभेच्छा

नवीन मुलीला लग्नाआधी द्यायच्या शुभेच्छा

शांत वाहणारी नदी तू
सागरा मिळण्या चालली,
अल्लड सखी ,मुलगी कुणाची
नवी नाती जोडाया चालली

नवे घर, नवे स्वप्न आता
तुला कवेत घ्यायचे आहे
अवखळपणा विसरुनी सारा
जबाबदारी घ्यायची आहे

नवे क्षितिज पेलताना
कधी ठेच लागेलही
घे भरारी पुन्हा एकदा
जुन्या आठवणी आठवुनी

आसमंत नवे खुणावत आहे
तुला सर्वांच्या शुभेच्छा आहे
बळ द्यायला पाठीशी तुझ्या
आईबाबांचा आशिर्वाद आहे
-- निलेश जोशी

Tuesday, February 19, 2019

बदल - गझल

सीमेवरील सैनिकांनी आता बळी होऊ नये
शस्त्र हातात असूनही अगतिक होऊ नये

माणसांतील राक्षसांनी मांडला उच्छाद हा
देवाने आता शंभर अपराधांची वाट बघू नये

माणसे जगतात जर का दहशतीखाली इथे
त्या तगमगीला चुकूनही कमी लेखू नये

अतिपाण्यात वाहून जातात अनेक संसार इथे
दुष्काळी संसारानी पाण्याअभावी दम तोडू नये

चप्पल चोरली तर पाप गेले ही समजूत आहे
चुकीचे वागणाऱ्या चोराला पुण्यदाता ठरवू नये

मीपणा जोपासत अहं विकसित करतात काही
त्यांनी स्मशानराखेतून शिकायची संधी सोडू नये

बोट करून तोच चुकीचा नित्य म्हणत आलोय
स्वयं बदल घडवून आणण्या मुळी लाजू नये

तर्जनी दाखवून तो चुकतो म्हणणे सोपे असेलही
तर्जनी सोडून तीन बोटे माझ्याकडे हे विसरू नये

-- निलेश जोशी

Saturday, February 9, 2019

अध्यात्म

कशाला चिंता सर्व क्लेशतापाची
त्या जाळण्याची ताकत जपात आहे

जाणून घेऊ माझे चुकले कोठे
त्यासाठीच आत डोकावणे आहे

हे सहा शत्रू परास्त करण्यास
हे मानवा ही शक्ती तुझ्यात आहे

आजचे काम उद्यावरी टाळतो
याचाच शेवट हारण्यात आहे

दर दिवशी दोन पावले चालू
अंती फलित ध्येय पूर्तीत आहे

का अट्टाहास सर्व मलाच हवे
खरे समाधान लोकां देण्यात आहे

"सत्य"सांग साखरेत घोळवून
लोकांना सवय कॅप्सूलची आहे

"मी" एवढा निर्ढावलो आता
मीच बरोबर,खोट इतरात आहे

ओळखपत्रे फोटोसहित माझ्या
फोटोत "मी" फक्त बाह्यरूप आहे

नाहीसे करण्या अवघी ही चिंता
फक्त सामर्थ्य "पांडुरंगात" आहे
              
               ----निलेश जोशी

Wednesday, January 2, 2019

लग्नाचा प्रवास - तुझ्यासोबत

बारा वर्षांपूर्वी आलीस
जीवनात माझ्या
जीवनाला खरा अर्थ
दिलास तू माझ्या

अनेक कडू गोड
हृद्य प्रसंगाची मजा
तुझ्यासंगे अनुभवली
कित्येकदा भोगलीही सजा

अनेकदा वाजलाही
भांडणाचा बँडबाजा
अनेकदा अनुभवलीही
तुझी अबोल्याची सजा

होता चार वर्षांचा बॅड पॅच
तेव्हाही तुझी मजबूत साथ
सर्व संकटावर मात करण्याचा
आत्मविश्वास दृढ केला तू माझा

सहजीवनात तूच माझी राणी
जन्मभर मीच ग तुझा राजा
लग्नाच्या वाढदिवसाच्या
तुला हार्दिक शुभेच्छा