Sunday, November 22, 2015

anagha gadgil catering

रसना स्नँक्स अँन्ड केटररर्स  आनंद नगर सिंहगड रोड येथे समर्थ पार्क शॉप नं ७,९, १० येथे आहे रोज चालु असते राइस प्लेट ८० रु  रोज स. ११ ते ३ संध्या . ७ ते १० वेऴ असते रोज भाज्या कोशींबीरी वेगळ्या असतात भाकरीचे ३ प्रकार असतात

Saturday, November 21, 2015

शो मस्ट गो ऑन

"जिथून परत फिरने संभवत नसते,
तिथून पुढेच गेले पाहीजे".

आपल्या जीवनात अश्या बऱ्याच घटना घड़तात , ना त्या रीवाइंड करून दुरुस्त करू शकतो ना त्यावर जास्त विचार करून वेळ खर्ची करू शकतो तसा केला तर आपण जगाच्या मागे राहू किंबहुना हांतावर पोट असणाऱ्या आपण मध्यमवर्गीय लोकांना हे शक्यच नाही.

मुंबई बॉम्बस्पोट दंगली आता पॅरिसला झालेला दहशदवाद सगळे खरय पण शोक म्हणून काम थाम्बवायला वेळ नाहीये इथे कोणाला
याला मग जग म्हणोत मुंबई स्पिरिट वा फिनिक्सीअन संस्कृती
फीनिक्स पक्षी जसा राखेतून जन्म घेतो तसाच माणूस कितीही भयानक परिस्थितीतून उभारी घेतोच
काय व्हायचे ते होउ दे चलते रहो! बढ़ते रहो! हसते रहो !
काळ कुणासाठी थांबत नाही तू सुद्धा कुणासाठी थांबू नकोस हे आजच्या युगाचे जनरेशनचे चित्र आहे
हर हाल में लक्ष को पाना है त्यासाठी बिकट परिस्थितीतून पुढे पाऊल टाकायलाच हवे

whatever it is ,lets face it , welcome to the generation of Phynixions

१९९९ च्या विश्वचषकादरम्यान सचिनचे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले होते. ही बातमी ऐकताच सचिन मुंबईत परतला आणि त्यावेळी सचिनशिवाय खेळताना भारतीय संघाला झिम्बाव्वेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण संघाची गरज ओळखून सचिन इंग्लंडला रवाना झाला आणि त्यानंतरच्या सामन्यात शतक झळकावित शो मस्ट गो ऑन चा प्रत्यय साऱ्या जगताला दिला होता व वडीलांना एक अनोखी श्रद्धांजली वाहीली होती.

शो मस्ट गो ऑन मित्रांनो हेच सत्य आहे

- निलेश जोशी