Sunday, July 26, 2015

संवाद

समज गैरसमज यातील दरी सांधायला
भिन्न विचारातील मतभेद दूर व्हायला
पुनः परस्परामध्ये सहजता यायला
सांधायला हवा एकमेकातील संवाद

भांडणे वाद गैरसमज नेहमीच होतील
विचार भिन्न काही मुद्दे बरोबरही असतील
थोडा वेळ आपला ईगो बाजूला ठेवायला
सांधायला हवा एकमेकातील संवाद

नाती मैत्री सगळे पूल आहेत परस्परातील
माणूस एकटा राहू शकत नाही म्हणून जोडलेले
या पुलावरून मनसोक्त हवे असेल भटकायला
सांधायला हवा एकमेकातील संवाद

शेवटी जीभ एक दुधारी शस्त्र आहे
बोललेले ईजा करू शकते एखाद्याला
तीच जखम व वेदना सौम्य करायला
सांधायला हवा एकमेकातील संवाद

आयुष्य आहे क्षणभंगुर ,संपत जाते आहे
कापरासारखे प्रत्येक क्षणी उडून जाते आहे
त्यात चूक कबूल करून ताण हलका करायला
सांधायला हवा एकमेकातील संवाद

--निलेश जोशी

Saturday, July 4, 2015

एक जाहिरात परीक्षण


विमानात बसलेला एक प्रवासी रिक्वेस्ट कॉल बटन दाबून हवाई सुंदरीला बोलावत आहे पण ती व्यग्र आहे
त्यावेळी त्याचा सह प्रवासी एक स्प्रे देतो व म्हणतो शॉट लगा
स्प्रे केल्यावर काय आश्चर्य दोन हवाई सुंदरी त्याच्या गळ्यात पडतात

आता ही जाहिरात नीट बघा , त्याच रो मध्ये पैसेज च्या दुसऱ्या सिट मध्ये महिला बसली आहे पण ती येऊन गळ्यात पडत नाही म्हणजे हां स्प्रे फक्त जास्त हवाई प्रवास करणाऱ्यासाठी आहे

आणि या महिला संघटना या जाहिरतीत दाखवालेल्या गोष्टीवर बंदी का आणत नाहीत
आपल्या भारतीय महिला व आई भगिनी येवढ़याही चीप नाहीत ही स्प्रे वास आला व गळ्यात पडल्या

आपल्या ग्रुप वर कोणी आहे का महिला संघटना संदर्भात
माझे जाहीर आवाहन कृपया अशा जाहिरतीवर बंदी आणा

--निलेश जोशी

बालपण आठवणी

जरी ओठावरती शेरो शायरी गाणी
दगदगीतुनही चेहऱ्यावर हसू आणी
त्या हास्यात येई डोळ्यामध्ये पाणी
जेव्हा येती बालपणीच्या आठवणी

पहिल्या पावसातील चिखल पाणी
केली शिमगा होळी साजरी तत्क्षणी
ख़राब कपडे साळसूद चेहरा ठेवणी
वाचवे बाबांच्या मारातून त्याक्षणी

गाई गूरे चरावयाला नेता प्रभात क्षणी
वेळ निघुन जातसे अती जलद झणी
उशीर झाला यावया परतुनी रानातूनी
शाळेला मग आपोआप पड़े बुट्टीदांडी

शाळेला नाहीआता घरी अभ्यास करी
हो म्हणुनी पुन्हा खेळणे सुरु अंगणी
त्यावरुनी खायची सर्वांची बोलणी
रागे खाऊन भरवुन घेवू भाकरीलोणी


---निलेश जोशी