Tuesday, October 22, 2013

ढोंगी बाबा

काहीच जमले नाही आयुष्यी म्हणून बनले साधू
आज बनले महंत महाराज पण आधी होते म्हादु

आधी नव्हता मान होते इतरांच्या हातातले प्यादे
साधू बनून हवा पैसा मान ,वागणे मात्र नम्र व साधे

कलीयुगी लोक झाले त्रस्त त्यांना समस्या हजार
पैसा जातो नाहक वाया त्यात भरिला आजार

अशावेळी साधू बुवा देती ताइत धुप धागा दोरा
मंत्र जप पूजा अवडम्बर देइ त्रस्त मनाला सहारा

एक दूजा प्रचारात बाबांचा होई अलोट भक्तपरिवार
थेम्बे थेम्बे तळे साचे म्हणत लागे फ़क्त पैशांचाच उपहार

पैसा वाढला नाव प्रसिद्धी नेते बड्या हस्तिंचा वावर
मठ गाड्या बडेजाव वाढला झाली संपत्ति करोड़ोवर

पण ज्या बाबाला पुजती त्यांचे अंतर्गत वेगळे व्यवहार
वासना अनावर होता भक्तांसंग चाले शरीर व्यवहार

बाबा म्हणजे देवाचे रूप त्याला कसा विरोध करणार
केलाच विरोध तर ती व्यक्ति पुन्हा कधीच नाही दिसणार

या धाकाला नाही जुमानणार तो फ़क्त त्रासच भोगणार
रयतेचा राजाच येवून बाबाला भर सभेत मुजरा करणार

कथा प्रवचन सुन्दर विवेचन कोणाला कसा संशय येणार
दृष्टी आड़ श्रुष्टी हा गैरव्यवहार अनिर्बंध चालूच राहणार

थांबवायाचे कसे हे सर्व याचे उत्तर एकालाच मिळणार
जो आपल्या ह्रूदयातिल परमेश्वरालाच देव मानणार

बुवा बाबा साधू ढोंगी यांना ढुंकूनही नाही पाहणार
कर्म हाच देव त्यातूनच आपले ध्येय प्राप्त करणार

.....निलेश जोशी