Tuesday, August 27, 2013

कृतघ्न

धनधान्य देणारी दिवाळीत पूजनीय लक्ष्मीमाता
सरस्वती देइ बुद्धि , मती अशी विद्येची देवता
कठीण संसारात रामाला साथ देणारी सीतामाता
स्वातंत्र्याचा लढा पुकारणारी झाशीची वीरमाता

विश्वात एकमेव जेथे देशाला म्हणतात भारतमाता
शिवाजीला बनवले लढवय्या ती जिजाऊमाता
सर्व स्त्रीशक्तीचा गौरव, प्रत्येक बाळाची माता
प्रेमाने मुलाला पान्हा पाजुन देते प्रेम व ममता

आई बनुन आपल्याला शिकवणारी शिक्षिका
मुलगी बनुन आपली काळजी घेणारी बालिका
बायको बनुन संसार संभाळणारी सहचारीका
कधी बहिण बनुन दिशा दाखवणारी मार्गदर्शिका

स्त्री एकच पण प्रत्येक रुपात आहे विविधता
जसा आपला देश आहे विविधतेत एकता
त्या नारीशक्तीवरच आली आहे हतबलता
जेव्हा पुरुष तिच्यावर दाखवू पाहतो प्रबलता

बलात्कार करणारा स्वत: जितेपणी नरकात गेला
अनेक आयाबहीणिना काळजीत टाकुन गेला
अनेक मुलीना असुरक्षितेची जाणीव करून गेला पण प्रत्येक पुरुषाची मान खाली झुकवुन गेला

एवढा एकच विचार प्रत्येक पुरुषाने जर केला
स्त्री शिवाय तो येवू नसता या जगात जन्माला
क्षणिक मोहापायी त्याने जवळ केले क्रुरतेला
जन्मदात्री आईला त्याने मात्र कृतघ्नपणा दाखविला

---निलेश जोशी

Tuesday, August 20, 2013

Fluke

Yesterday on  20/08/2013 strange fluke happened

Jayant salgaonkar expired in 5.15am who belives in superstition

Narendra dabholkar got dead shot at 7.30 am who is anti superstition

but both done tremendous job in their field of work

Moral of the story

Belive god or not
death is truth

but perform every work with perfection then society definately remembers you

Monday, August 19, 2013

ST माझी

खरेतर स्वत:ची चारचाकी गाड़ी घेतल्यावर खुप वर्षांनी STने प्रवास केला आणि प्रवासातच STचे योगदान सर्वसामान्य लोकांमध्ये किती आहे हे जाणवले ह्या अविरत योगदानाला सलाम "TRIBUTE TO ST"

लाल रंगाची,खाकी गणवेशाने चालवलेली
राज्य परिवहन मंडळाची ST माझी

पत्र्यांचा अविरत ताशा वाजवणारी
खिडक्यांच्या काचा बंद न होणारी
बसायच्या बाकड्यांना स्पंज नसणारी
राज्य परिवहन मंडळाची ST माझी

एक दोन तासांनी एक फेरी तुडुम्ब भरणारी
गावाकडील लोकाना बाजारात पोचवणारी
रस्ता तिथे ST हे ब्रीद वाक्य असणारी
राज्य परिवहन मंडळाची ST माझी

पूर्वी लाल डबा म्हणून प्रचलित असणारी
आता एशियाड हिरकणी नावाने कात टाकणारी
वातानुकूलित शिवनेरी प्रवास सुखकर करणारी
राज्य परिवहन मंडळाची ST माझी

गावागावात रात्री मुक्काम वाहनसेवा देणारी
अपंग आमदार पत्रकार यांना सवलती देणारी
विद्याग्रहणात विद्यार्थ्याना सतत मदत करणारी
राज्य परिवहन मंडळाची ST माझी

हमाल केन्टीन फेरीवाले याना रोजगार देणारी
हजारो प्रवाशांना इच्छित स्थळी सुखरूप नेणारी
तरी संप बंद यामध्ये हमखास नुकसान होणारी
राज्य परिवहन मंडळाची ST माझी

आणि आता खाजगी वाहनांमूळे त्रस्त होणारी
विविध घोटाळ्यांनी कर्जबाजारी झालेली
दरवाढ होवुनही गोरगरिबांना हवीशीच वाटणारी
राज्य परिवहन मंडळाची ST माझी

----
निलेश जोशी

Wednesday, August 14, 2013

देशभक्ती हे पाप असे जर.....

कुणाच्याही वैयक्तिक भावना दुखावण्याचा हेतू नाहीय पण नथुराम गोडसेंनी गांधीहत्या का केली याची काही कारणे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली आहेत.
हे काव्य त्यांनी आपल्या भावना सर्वाना समजव्यात म्हणून लिहिले होते.

देशभक्ती हे पाप असे जर l तर मी पापी घोर भयंकर l
मात्र पुण्य ते असेल, माझा नम्र तरी अधिकार तयावार
वेदीवर या राही मी स्थिर ll धृ ll

द्रौपदीस छळले दुष्टांनी l कुरुतीर्थी लढले भीमार्जुन
न्हाली रुधिराने वसुंधरा l अन्यायाचे हो परिमार्जन
सीतेसाठी श्रीरामांनी l लंकेवर केले रणकंदन
मात्र आज या नव्या भारती l अबला हतबल सबलावाचून
अबलांचा तो करुणार्तस्वर l सह्याद्रीच्या ये कानावर
वेदीवर या राही मी स्थिर ll १ ll

न्यायासाठी आप्तांशीही लढणे l मागे फिरणे नाही
होता संभ्रम धनुर्धराला l स्फूर्तिप्रद हरी गीता गाई `
ठाई ठाई खला मारिले त्याने, जग कल्याणापायी
केले का हो पाप तयाने ? आपण म्हणतो नाही ! नाही !
समजा असले ! कृष्णार्पण ते ! कर्ता तो अन निमित्त मी तर
वेदीवर या राहो मी स्थिर ll २ ll

भू विभाजने कष्टी झाले त्या व्रणीतांचे करण्या सांत्वन
फास घेतला गळ्याभोवती l परी नाही विचलित माझे मन
दुष्टांना देणे सहायता l ठरते अत्याचारा इंधन
काया जरी हि वडिलोपार्जित l रक्षा कायेची माझे धन
धन ते टाका सिंधूमध्ये अखंडत्व देशा आल्यावर
वेदीवर या राही मी स्थिर ll ३ l।

नथुराम गोडसे

Sunday, August 11, 2013

मुड

पावसाला पण मुड लागत असेल का पडायला?
वारयाला पण मुड लागत असेल का वाहायला?
माणुस लागला आहे मुडच्या आहारी जायला
मुडला पण मुड यावा लागत असेल का यायला?

रोजचे काम करायला मुड नाही
देवाची प्रार्थना करायला मुड नाही
मुलाबरोबर खेळायला मुड नाही
बायकोला गजरा घेवुन द्यायला मुड नाही
सकाळी ब्रश करायला मुड नाही
नाश्ता हाच का? मला आवडत नाही
बाहेरून किराणा आणायला मुड नाही
पाउस पडतोय आता मुड नाही
पाउस पडत नाहीये म्हणुनही मुड नाही
टीवी बघायला मुड नाही
पुस्तक वाचायला मुड नाही
नैसर्गिक विधि करतो आहे वेळेवर
पण बाकी जीवनावश्यक कामाला मुड नाही

मुडनुसार काम करायला भाग पाडा शरीराला
सगळे शरीर लगेच लागेल बंड पुकारायला
माणुसच लागला आहे मुडच्या आहारी जायला
त्याच्या मनाने हवे त्याला आताच रोखायला

---
निलेश जोशी

Friday, August 9, 2013

ये इंडिया है बॉस

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार
क्या उखाड लेगा?

सातआठ धर्म एकत्र तरी धर्मनिरपेक्ष म्हणून  थाप मारणार
अल्पसंख्येच्या नावाखाली एखाद्यालाच झुकते माप देणार
एखाद्याच्या यात्रेला वारेमाप सवलती आणि पैसा पुरवणार
गरीब वारकरयाला वर्षोंवर्ष व दिनरात उपेक्षितच ठेवणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार

सैनिक भरती कमी का होते यासाठी बैठक बोलवणार
त्या बैठकीचे बिलात हजारो-लाखोंचा भ्रष्टाचार होणार
सैनिकभरतीमध्ये नेत्यांचा मुलगा नसावा हे कटाक्षाने पाळणार
वर सैनिक,पोलिस असतातच मरण्यासाठीच, निर्लज्ज मंत्री बोलणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार

बॉम्बस्फोट दंगलीत मेलेल्याना पैसे जाहीर करून गाजर दाखवणार
मदतीतील नातेवाईकांना पाच पाच वर्षे  काहीच नाही मिळणार
दंगलग्रस्तांना दाखाविलेले नोकरीचे आमिष मुख्यमंत्री विसरणार
मदतीच्या बर्फाचा गोळा हातात येइपर्यंत पळीभर पाणी होणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला मुलाना उन्हात वेठिला धरणार
नेत्यांना प्यायला बाटल्या,मुलांना घोटभर पाणी नाही मिळणार
उपदेशात तुम्हीच भावी भारत अशी मोठठी वाकये ऐकवणार
मुलेही आपले भविष्य उपेक्षित आहे हे तेथेच समजुन घेणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार

इतर देशात कर किती जास्त तुम्हालाच कमी हे ऐकवणार
आपल्या सोयीसाठी लोकसंख्येतला फरक नाहीच सांगणार
सुरु केलेल्या किती सोयीसुविधा चालु हे कोणीच नाही बघणार
त्या चालुच दाखवून त्याचा पैसा चालूलोक आपल्या तिजोरीत ठेवणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार

नागरीकांचा वेळ शुल्लक,त्यांना रस्त्यावर अडवून ठेवणार
मंत्री देवापेक्षा व्यस्त त्यांना दुतर्फा रस्ता मोकळा करून देणार
"रूग्णवाहिकेतच मृत" बापाचा मुलगा डेथ सर्टिफिकेटसाठी पैसे चारणार
मंत्री मात्र हेलिकॉप्टर येइपर्यन्त विश्रामगृहात झोप काढणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार

माजी आमदार पेन्शन बिल सभागृहात लगेच मंजूर होणार
सभागृहात जनतेच्या फायद्याचे कायदे मंजूर होवुच नाही देणार
कर्तव्यदक्ष अधिकारयांना बडतर्फ केल्याचा कागद दिला जाणार
"सामान्य जन"भारत निर्माणची जाहीरात कौतुकाने बघणार

ये इंडिया है बॉस इकडे असच आणि असच होणार
क्या उखाड लेगा?

--- निलेश जोशी

Tuesday, August 6, 2013

आगमन

काहूर माजले मनात,उत्छवासाचे फ़क्त उसासे
संभ्रम पडतो मनाला,निर्णय खुप दुरवर भासे
विचारांच्या गदारोळात भरकटते मन काहीसे
सर्वच निर्णय वाटतात बरोबर का होते असे?

वागणे माझे असते का योग्य, की चुकीचे?
चुकीचे असेल तर मग ते कसे सुधारायाचे
अवघड सोप्या दोन्ही वाटांमध्ये मन गुंतायचे
कोणता मार्ग योग्य हे ठरवणे अवघड वाटायचे

अशा वेळी फ़क्त तुझी साथ अजमावयाची
तु माझ्या सोबत असण्याची शक्ती घ्यायची
आशीर्वादाने दिव्यत्वाची अनुभूति घ्यायची
देवा तुझ्या सान्निध्यात सर्व दुःख विसरायची

गरज आहे वर्षभर झालेला क्षीण घालवायची
श्रावणानंतर भाद्रपद महिन्याची चाहुल घ्यायची
हीच ती वेळ पुन्हा जोमाने उठून उभे रहायची
श्री गणेशा तुझ्या आगमनाची तयारी करायची

---निलेश जोशी

Sunday, August 4, 2013

बालमन

लहान मुलांच मन किती नितळ आणि निर्मळ असतं
गवताच्या पात्यावरील दवबिंदू प्रमाणे पारदर्शी असतं
बघीतलेल्या गोष्टीवर असच का? म्हणून प्रतिप्रश्न करत असतं
कोळीष्टकावरील थेम्बातही इन्द्रधनुचे सप्तरंग शोधत असतं

लहान मुलांच मन किती नितळ आणि निर्मळ असतं
समोरचा माणूस काय बोलतो ह्याकडेच लक्ष देत असतं
जमल तर त्याच्यासारखच नक्कल करायला बघतं
नाहीच जमल तर खुशाल दुसरया खेळाकडे वळतं

लहान मुलांच मन किती नितळ आणि निर्मळ असतं
आपल्याच जगात स्वच्छ्न्दपणे बागडायला आवडत
त्यांच्या जगात आपण प्रवेश करणं एवढ सोपं नसतं
कारण त्या जगात स्वार्थी मतलबी व्हायचचं नसतं

लहान मुलांच मन किती नितळ आणि निर्मळ असत
भाबड्या जगातील एकदम सच्चे ,अजिबात कपटी नसतं
समोरच्यावर निस्सीम विश्वास व श्रद्धा ठेवणारं असतं
म्हणूनच लहान मूल देवाघरच कोमल टवटवीत फूल असतं

--- निलेश जोशी