Sunday, February 16, 2014

भाऊबंधकी

भाऊबंधकी

3 भाऊ होते A B आणी C
मजा घेत होते दिल्लीच्या जनतेची

C सत्तेवर होता तेव्हा B बघत होता
A पुढे यावा म्हणून C जनतेला रेटत होता

A प्रसिद्ध झाला तेव्हा C B हसत होते
छोटा बच्चा म्हणत त्याला मात्र टाळत होते

C आणि B चे मिलीजुलीचे राजकारण होते
हे A पक्षाला चांगलेच  माहित होते

शेवटी निवडणुकित A ने दणका दिला
C व B ला लोकांची ताकत दाखवून गेला

सरकार स्थापनेचा मोठा लोचा झाला होता
A B किंवा A C हाच पर्याय होता

A ने पुन्हा जनतेलाच साकडे घातले
जे होइल त्याचे खापर जनतेच्या माथी थोपले

भर थंडीत दिल्लीत जोशात A C चालू झाला
C सत्तेत असुनही B सोबत विरोधी मजा घेवु लागला

A ला नाही अनुभव पण करतो नुसतेच वायदे
C ला मनातून भीती A बदलतो की काय कायदे

60 वर्ष कमाईची सिस्टिम आम्ही बसवली
A ने काही दिवसात घडी सगळी विस्कटवली

आता A आपला रुबाब B C ला दाखवतो आहे
B C चा कर्ता धर्ता M मनातून घाबरला आहे

हीच ती संधी ठेऊ M च्या खाल्या मिठाला जाण
A चा सभागृहात करू B C मिळून घोर अपमान

A दुखावला आतून कोणासाठी हे सर्व करतो आहे
B C एकत्र आलेच आहेत तर मी राजीनामा देतो आहे

आता B C खुश,मुळ अडसर सत्तेतुन निघून गेला
राजीनामा म्हणजे "घाबरला"म्हणायला संधी ठेवून गेला

B खुश व C खुश सारे कसे मस्त आता पुन्हा थाट
A पण खुश मी "प्रयत्न केला" आता लोकसभेची वाट

असे A B C आपले उद्दिष्ट साध्य करून गेले आहेत
दिल्लीजनता हक्का बक्का ,कोण बरोबर ठरवते आहे

कोणीआले सत्तेवर तरी रोजचे कष्ट काही संपणार नाही
स्वत:चे पोट भरणारे पक्ष पोटाची खळगी भरणार नाही

जनता कायमच उपेक्षित हेच खर राजकारण आहे
त्यानी फक्त मतदान करायच एवढच काम करायच आहे

कोणालाही करा मतदान आम्ही सगळेच भाऊ आहोत
आमची वाटणी आम्ही करायला समर्थ आहोत

मतदान केले  ना जनता आता संपले तुमचे काम
लोकशाहीत जे होइल ते बघा हेच तुमच्या हाती काम

--- निलेश जोशी

भाऊबंधकी

भाऊबंधकी

3 भाऊ होते A B आणी C
मजा घेत होते दिल्लीच्या जनतेची

C सत्तेवर होता तेव्हा B बघत होता
A पुढे यावा म्हणून C जनतेला रेटत होता

A प्रसिद्ध झाला तेव्हा C B हसत होते
छोटा बच्चा म्हणत त्याला मात्र टाळत होते

C आणि B चे मिलीजुलीचे राजकारण होते
हे A पक्षाला मात्र चांगलेच  माहित होते

शेवटी निवडणुकित A ने दणका दिला
C  B ला लोकांची ताकत दाखवून गेला

सरकार स्थापनेचा मोठा लोचा झाला होता
A B किंवा A C हाच फ़क्त पर्याय होता

A ने पुन्हा जनतेलाच साकडे घातले
जे होइल त्याचे खापर जनतेच्या माथी थोपले

भर थंडीत दिल्लीत जोशात A C चालू झाला
C सत्तेत असुनही B सोबत विरोधी मजा घेवु लागला

A ला नाही अनुभव पण करतो नुसतेच वायदे
C ला मनातून भीती "A बदलतो की काय कायदे"

60 वर्ष कमाईची सिस्टिम आम्ही बसवली
A ने काही दिवसात घडी सगळी विस्कटवली

आता A आपला रुबाब B C ला दाखवतो आहे
B C चा कर्ता धर्ता M मनातून घाबरला आहे

हीच ती संधी ठेऊ Mच्या खाल्या मिठाला जाण
A चा सभागृहात करू B C मिळून घोर अपमान

A दुखावला आतून "कोणासाठी हे सर्व करतो आहे"
"BC एकत्र आलेच आहेत तर मी राजीनामा देतो आहे"

आता B C खुश,मुळ अडसर सत्तेतुन निघून गेला
राजीनामा म्हणजे "घाबरला"म्हणायला संधी ठेवून गेला

B खुश व C खुश सारे कसे मस्त,आता पुन्हा थाट
A पण खुश मी "प्रयत्न केला" धरु लोकसभेची वाट

असे A B C आपले उद्दिष्ट साध्य करून गेले आहेत
दिल्लीजनता हक्का बक्का ,कोण बरोबर ठरवते आहे

कोणीआले सत्तेवर तरी रोजचे कष्ट काही संपणार नाही
स्वत:चे पोट भरणारे पक्ष पोटाची खळगी भरणार नाही

जनता कायमच उपेक्षित हेच खर राजकारण आहे
त्यानी फक्त मतदान एवढच एक काम करायच आहे

कोणालाही करा मतदान आम्ही सगळेच भाऊ आहोत
आमची वाटणी आम्ही करायला पूर्णपणे समर्थ आहोत

मतदान केले  ना जनता ? आता संपले तुमचे काम
जे होइल ते बघा व करा पुढच्या मतदानापर्यंत आराम

--- निलेश जोशी