Sunday, August 30, 2015

जीवन प्रवास

आज टीवी वर गाणे ऐकले आणि प्रवास विषयावर लिहायला चालना मिळाली.

"रोते हुए आते है सब
हसता हुवा जो जायेगा
वोह मुकद्दर का सिकंदर
जानेमन कहलायेगा "

एडमिन ने आजचा विषय दिला प्रवास आणि वरील ओळीत जीवन प्रवास समर्पकरित्या मांडलाय कवी अजांन यांनी.जगात आल्यावर सर्वजण रडतच येतो पण जाताना हसत जावे व मधील संपूर्ण जीवनप्रवास कसा करावा हे आपल्या हातात असते.
मंगेश पाडगावकरांचे पण अशाच अर्थाचे गाणे आहे
"रडतच आलो येताना पण
हासत जावे जाताना"

हा जीवन प्रवास चालू करतोच आपण आपल्या आईबरोबर , आईशी जोडलेली नाळ म्हणजे दुवा आपल्याला या जगात आणणारा. मग हळू हळू जगाचे नियम चालीरीति आपण शिकत जातो.
पहिला गुरु आई व आपले कुटुंबिय व जसजसे आपण मोठे होत जातो या जीवन प्रवासात आपल्याला सह प्रवासी भेटत जातात, काही अनुभव शिकवून जातात धड़े देवून जातात तर काही आपल्याला आपल्या चुकाही दाखवतात.
बऱ्याच वेळेला आपल्याला वाटते प्रवासातील वाहने साधने सहप्रवासी हे योग्य निवडलेत आपण , पण कालांतराने ते अयोग्य होते हेही कळुन चूकते ,
जीवन प्रवास हा असाच असतो
चुकातून शिकवणारा व चुकत चुकत बरोबर होत जाणारा
हे सर्व अनुभव देणारे आपले कुटुंबीय , मित्र ,जीवलग ,सखे सोबती व आपले विरोधकही
या जीवन प्रवासात विविध अनुभव देवून समृद्ध करणाऱ्या सर्वाना हा लेख मनापासून अर्पण.

---निलेश जोशी

Saturday, August 29, 2015

श्रीदत्तात्रेयस्तोत्रम्


॥ श्रीदत्तात्रेयस्तोत्रम् ( नारदपुराण ) ॥

जटाधरं पाण्डुराङ्गं शूलहस्तं कृपानिधिम् ।
सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ॥ १॥

अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमन्त्रस्य भगवान् नारदऋषिः ।
अनुष्टुप् छन्दः । श्रीदत्तपरमात्मा देवता ।
श्रीदत्तप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥

जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहार हेतवे ।
भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १॥

जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च ।
दिगम्बरदयामूर्ते दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ २॥

कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च ।
वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ३॥

र्हस्वदीर्घकृशस्थूल-नामगोत्र-विवर्जित ।
पञ्चभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ४॥

यज्ञभोक्ते च यज्ञाय यज्ञरूपधराय च ।
यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ५॥

आदौ ब्रह्मा मध्य विष्णुरन्ते देवः सदाशिवः ।
मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ६॥

भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे ।
जितेन्द्रियजितज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ७॥

दिगम्बराय दिव्याय दिव्यरूपध्राय च ।
सदोदितपरब्रह्म दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ८॥

जम्बुद्वीपमहाक्षेत्रमातापुरनिवासिने ।
जयमानसतां देव दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ९॥

भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे ।
नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १०॥

ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभूतले ।
प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ११॥

अवधूतसदानन्दपरब्रह्मस्वरूपिणे ।
विदेहदेहरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १२॥

सत्यंरूपसदाचारसत्यधर्मपरायण ।
सत्याश्रयपरोक्षाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १३॥

शूलहस्तगदापाणे वनमालासुकन्धर ।
यज्ञसूत्रधरब्रह्मन् दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १४॥

क्षराक्षरस्वरूपाय परात्परतराय च ।
दत्तमुक्तिपरस्तोत्र दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १५॥

दत्त विद्याढ्यलक्ष्मीश दत्त स्वात्मस्वरूपिणे ।
गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १६॥

शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकम् ।
सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १७॥

इदं स्तोत्रं महद्दिव्यं दत्तप्रत्यक्षकारकम् ।
दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम् ॥ १८॥

॥ इति श्रीनारदपुराणे नारदविरचितं
                       दत्तात्रेयस्तोत्रं सुसम्पूर्णम् ॥

श्री दत्त माला मंत्र

श्री दत्तमाला मंत्र
========

दत्तयागाच्या वेळेस या मंत्राचा ठराविक वेळा उच्चार केलेला पाहिला आहे.
-----

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय, स्मरणमात्रसंतुष्टाय,
महाभयनिवारणाय, महाज्ञानप्रदाय, चिदानंदत्मने,
बालोन्मत्तपिशच्ववेशाय, महायोगिने अवधूताय,
अनसूयाSSनंदवर्धनाय, अत्रिपुत्राय,
ॐ भवबंधविमोचनाय,
'आं' असाध्यसाधनाय, 'र्‍हीं' सर्वविभूतिदाय,
'क्रौं' असाध्याकर्षणाय, 'ऐं' वाक्प्रदाय,
'क्लिं' जगत्त्रयवशीकरणाय,
'सौ:' सर्वमनःक्षोभणाय, 'श्रीं' महासंपत्प्रदाय,
'ग्लौं' भूमण्डलाधिपत्यप्रदाय, 'द्रां' चिरंजीविने,
वषट वशीकुरु वशीकुरु, वौषडाकर्षयाकर्षय,
'हुं' विद्वेषय विद्वेषय, 'फट' उच्चाटय उच्चाटय,
ठः ठः स्तंभय स्तंभय, खें खें मारय मारय,
नमः संपन्नय संपन्नय, स्वाहा पोषय पोषय,
परमंत्रपरयंत्रपरतंत्राणि छिंधि, छिंधि,
ग्रहान निवारय निवारय,
व्याधीन विनाशय विनाशय,
दु:खं हर हर, दारिद्र्यं विद्रावय विद्रावय,
देहं पोषय पोषय, चित्तं तोषय तोषय,
सर्वमंत्रस्वरुपाय, सर्वयंत्रस्वरुपाय,
सर्वतंत्रस्वरुपाय, सर्वपल्लवस्वरुपाय,
ॐ नमो महासिद्धाय स्वाहा ||

Monday, August 24, 2015

माझी शाळा

शाळेच्या आठवणी
काय कश्या सांगू
त्याहुनही कठीण
कित्ती सांगू ?

गावातली शाळा
1ली ते 7 वी वर्ग
अभ्यास व खेळ
प्रमाण व्यस्त

दहाची जर शाळा
नऊ लाच यावे
सावरी खाली जमवू
भोवरे फुले

बागेतील फुले
त्यांचा हार करावा
सावरीच्या फुलांची
आबादुबी

मैत्री जरी असली
भांडणे सदोदित
पेन्सिलचा तुकडा
माझा तुझा

उजाड़ता शनिवार
करू वर्ग स्वच्छ
जमिनी शेणाने
सारवुया

कित्ती आठवणी
पुनः ना जगणे
तरी आठवे ती
माझी शाळा

---- निलेश जोशी

miracle drink

After reading in depth about the benefits of this drink and also after somewhat being fascinated by it, you too may be tempted to avail to it. Go fetch for a piece of paper and a pen as here’s how you can prepare this Miracle drink –
Ingredients:
1 Apple
1 Carrot
1 Beetroot

`
Method:
Mix this concoction well in a juicer. These have to be used enough so as to obtain an 8 ounce drink. To add taste to this drink, lemon can be used.

For best results, one should consume this juice immediately after it’s taken out from the juicer. Thus, we see that this drink is quite simple enough and easy to make.

The article also goes on further to state that this drink is known to not have any side effects. It gets easily absorbed into the body and therefore this adds to its nutritious level. Within 2 weeks the results can be noticed. The immune system will begin to show some kind of improvement.

Are you wondering now when exactly should you consume this drink? Don’t worry! We have an answer to all your questions. This drink ought to be drunk twice a day for better results in the morning on an empty stomach and sometime in the afternoon before 5 pm however. Breakfast should be eaten only an hour after the juice has been consumed.

Now as we reach the climax of this article, I would firstly like to thank my friend. His concern towards my health and his willingness to help me out are something for which i can’t express my gratitude in words alone. I’ve never doubted the role of fruits and vegetables in helping us lead healthier life. However, it came as a big surprise to me that they can help to cure cancer as well!

It may not be known to all that the indigenous people of the Amazon Rain Forest are said to be living healthy lives, free from diseases and ailments mainly due to the ACAI berry that they consume. There may be a slight exaggeration if we say that these people live almost forever. However, there is no denying of the fact that they lead better lifestyles that the average of us. It is important to note that by ‘better’, I only mean ‘healthier’.

http://adhyatmablog.com/can-miracle-drink-cure-cancer-experts-analysis-view/

Thursday, August 20, 2015

मृत्युंजय मंत्र

मृत्युंजयाय रुद्राय निलकंठाय शंभवे ।।
अमृतेशाय शर्वाय महादेवायते नमः।।

दत्तस्तव स्तोत्र

श्री गणेशाय नमः

भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः ||
दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामि तं || १ ||

यन्नामस्मरणाद्-दैन्यं पापं तापश्च नश्यति ||
भीतिग्रहार्तिदु:स्वप्नं दत्तात्रेयं नमामि तम् || २ ||

दद्रुस्फोटककुष्ठादि महामारी विषूचिका ||
नश्यन्ति अन्येSपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामि तम् || ३ ||

संगजा देशकालोत्था अपि सांक्रमिका गदा: ||
शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामि तम् || ४ ||

सर्पवृश्चिकदष्टानां विषार्तानां शरीरिणाम् ||
यन्नाम शान्तिदं शीघ्रं दत्तात्रेयं नमामि तम्|| ५ ||

त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनम् ||
यन्नाम क्रूरभीतिघ्नं दत्तात्रेयं नमामि तम् || ६ ||

वैर्यादिकृतमन्त्रादिप्रयोगा यस्य कीर्तनात ||
नश्यन्ति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामि तम् || ७ ||

यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादि लभ्यते ||
य ईश: सर्वतस्त्रांता दत्तात्रेयं नमामि तम् || ८ ||

जयलाभयशःकामदातुर्दत्तस्य यः स्तवम् ||
भोगमोक्षप्रदस्येमं पठेद्-दत्तप्रियो भवेत्|| ९ ||

इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं दत्तस्तवस्तोत्रं संपूर्णम् ||

Wednesday, August 19, 2015

भीमरूपी महारुद्रा

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।। १।।

महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें ।
सौख्यकारी दुखःहारी, धूर्त वैष्णव गायका ।।२।।

दिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवता हंता, भव्य सिंदूरलेपना ।। ३।।

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका ।। ४।।

ध्वजांगे उचली बाहू, आवेशें लोटिला पुढें ।
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।।५।।

ब्रम्हांडे माईली नेणों, आवळें दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा,भ्रुकुटी त्राटील्या बळे ।।६।।

पुच्छ तें मुरडिलेंमाथां, किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्ण कटी कांसोटी,घंटा किंकिणी नागरा ।।७।।

ठकारे पर्वताऐसा,नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें,महाविद्युल्लतेपरी ।। ८।।

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।९।।

आणिला मागुती नेला,आला गेला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें, गतीसी तूळणा नसे ।।१०।।

अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें ।। ११।।

ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ करु शके ।
तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ।।१२।।

आरक्त देखिलें डोळां, ग्रासिले सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।। १३।।

धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां।।१४।।

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही ।
नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ।। १५।।

हे धरा पंधराश्लोकी,लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ।। १६।।

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडणू ।
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।। १७।।

।। इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं
मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।। ।।
श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ।।

Saturday, August 15, 2015

स्वातंत्र्यदिन

15 ऑगस्ट सूर्योदय झाला
69 वा स्वातंत्र्यदिन उजाडला
पण माझ्या बोलण्यात वागण्यात
नेमका काय बदल झाला ?

स्वातंत्र्य होतेच की आधीपासून
बोलण्याचे,विचार मांडण्याचे
समाजात चुकीचे घडते दिसुनही
त्याकडे कानाडोळा करण्याचे

स्वातंत्र्य आहेच की सर्वाना
खोटे वागुन व्यवहार करण्याचे
सर्व मिळून खाऊ वृत्तीला
एकसाथ जोपासण्याचे

स्वातंत्र्य आहेच की आपल्याला
चांगले घडत असूनही
वाईट घडलेले जास्त बघण्याचे
नकारार्थी मानसिकता जोपसण्याचे

स्वातंत्र्य आहे लोकप्रतिनिधिना
स्वार्थी राजकारण करण्याचे
लोकहिताचे निर्णय न घेता
282 करोड़ वाया घालवण्याचे

स्वातंत्र्य आहे शेतकऱ्यांना
आत्महत्या आत्मक्लेश करायचे
किंवा मग सरकार भरोसे न राहता
स्वतःच शेती संवर्धन करण्याचे

स्वातंत्र्य आहेच की जनतेला
नवीन पिढीची दिशा ठरवण्याचे
संस्कार करून येणाऱ्या पिढीला
स्वंयपुर्ण बलवान बनवण्याचे

स्वातंत्र्य तर आहेच सर्वांकडे
आज अचूक वेळ आलीये
कसा अर्थ काढायचा व कसे
वागायचे हे ठाम ठरवण्याची

-- निलेश जोशी