Thursday, August 17, 2017

सतीश मोरे on ब्रिगेड - ब्राम्हणद्वेषीनी वाचावीच अशी पोस्ट

सतिश मोरे यांचे आभार मानून
ब्रिगेडमध्ये असताना खेडेकर विषयी आमच्या मनात फार अभिमान होता, खेडेकर युगपुरुष आहेत, ब्राह्मणांचे अत्याचार संपवण्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे असे संस्कार आमच्यावर होत असत. त्यांनी त्यांच्या एका पुस्तकातून ब्राह्मणांच्या कत्तली कराव्यात असा संदेश आम्हाला दिला होता, त्यांनी ब्राह्मण स्त्रियांबद्दल अत्यंत गलिच्छ विचार मांडले, परंतु आम्हाला ते विचार त्यावेळी फार पसंत पडले होते. त्या पुस्तकातील तो संपूर्ण परिच्छेद मी मार्करने रंगवून ठेवला होता. दररोज मी तो परिच्छेद वाचत असे आणि ब्राह्मणांच्या कत्तली कशा कराव्यात याच्या कल्पना रंगवीत असे. पुढे हा कार्यक्रम बंद पडला कारण माझ्या वडिलांना ते पुस्तक सापडले आणि त्यांनी तो परिच्छेद वाचला, त्याबद्दल त्यांनी मला प्रचंड मारले आणि पुस्तक फाडून फेकून दिले. मला वाटू लागले कि माझे वडीलसुद्धा आता ब्राह्मणवादी झालेले आहेत.
परंतु काही काळातच माझ्या जीवनात एक अशी घटना घडली कि ज्यामुळे मी ब्रिगेडपासून दूर होण्यास सुरुवात झाली. मी नेटवर सहज सर्फिंग करत असताना मला एके ठिकाणी कृष्णाजी अनंत सभासद याने लिहिलेली सभासद बखर सापडली. साहजिकच, ब्राह्मण नाव बघून मला वाटले कि त्याने महाराजांची बदनामी करण्यासाठीच हि बखर लिहिलेली आहे. म्हणून मी ती बखर डाउनलोड केली, आणि त्यात काय बदनामी केली ते शोधू लागलो, म्हणजे ते मला इतर मित्रांना दाखवता आले असते, मग आम्ही ब्राह्मणांना तुफान शिव्या घातल्या असत्या.

पण जसजशी मी ती बखर वाचू लागलो तसतसा मला आश्चर्य वाटू लागले. एक ब्राह्मण शिवरायांची एवढी स्तुती करतो हेच मला नवीन होते. कितीतरी ब्राह्मणांनी छत्रपती शिवरायांना मदत केली होती हे मला आज पहिल्यांदाच समजत होते.

अफझलखान वध प्रकरण वाचताना तर मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्यात काझी हैदर या ब्रिगेडने सांगितलेल्या माणसाचे नाव कुठेच नव्हते. तिथे गोपिनाथपंत बोकील या ब्राह्मणाचे नाव होते. महाराजांचा वकीलसुद्धा ब्राह्मणच होता हे मला आज प्रथमच समजत होते आणि या वकिलाने चक्क कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या ब्राह्मणाचा प्रतिकार केला.

आम्ही ज्यांना शिवद्रोही ठरवत होतो तेच ब्राह्मण प्रसंगी महाराजांच्या रक्षणासाठी धावून आले होते. आणि ज्या काझी हैदरला आम्ही शिवभक्त समजत होतो त्यानेच खरी गद्दारी केली होती. महाराजांच्या मृत्युनंतर त्याने चक्क औरंग्याचा पक्ष स्वीकारला होता, आणि शंभूराजांना ज्या काझींनी मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली त्यात त्याचादेखील समावेश होता. (हे मला एका प्रसिद्ध लेखकाने लिहिलेल्या एका पुस्तकातून कळले, जो बहुजन होता)

परंतु माझे मन यावर विश्वास ठेवायला तयार होत नव्हते. ब्रिगेडने जे सांगितले आहे तेच खरे आहे असे मला वाटत होते. म्हणून मला ती बखर म्हणजे एक ब्राह्मणी कावा वाटू लागली. ब्राह्मण खोटे बोलत आहेत असे मला वाटले, म्हणून ब्राह्मण खरे कि ब्रिगेड या प्रकरणाचा एकदा सोक्षमोक्ष लावायचाच असा मी विचार केला. मग मी नेटवर अजून काही माहिती मिळते का ते बघू लागलो. त्यात मला एक साईट मिळाली. त्यात छत्रपती शिवरायांच्या संबंधी बरीच माहिती होती. सभासद बखर, मराठी दफ्तर रुमाल, शिवभारत, खरे जंत्री अथवा शिवकालीन संपूर्ण शकावली, शाह शिवाजी : भोर चिटणीस, सातारचे श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज यांचे वंशाचा व प्रतिनिधी आणि अष्टप्रधान यांचा इतिहास : विष्णु गोपाळ भिडे चिटणीस निजबत पंतसचीव, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज लिखित संस्कृत ग्रंथ "बुधभूषणम्" याप्रकारचे बरेचसे ऐतिहासिक साहित्य मला उपलब्ध झाले. तसेच अनेक लोकांचे ब्लॉग देखील मी वाचून काढले.
काय खरे नि काय खोटे याचा शोध लावण्यासाठी मी रात्रंदिवस अभ्यास केला. प्रत्येक पुरावा नजरेखालून घालू लागलो. आणि सरतेशेवटी माझी ध्यानात एक गोष्ट आलो, ब्रिगेडने आणि ब्रिगेडच्या कोणत्याही लेखकाने कोणत्याही बाबतीत कसलाही पुरावा आम्हाला दिलेला नव्हता. पण जेव्हा एखादा ब्राह्मण किंवा आमच्या भाषेत एखादा ब्राह्मणवादी ब्लॉग लिहित असे तेव्हा प्रत्येक गोष्ट तो पुराव्यानिशी सिद्ध करत असे. उदा. इतिहासकाळात डोकावताना हा ब्लॉग.

आमच्या कोकाटे साहेबांनी आम्हाला सांगितले कि औरंगजेबाने आपल्या महाराजांना 'राजा' हि पदवी सन्मानाने दिली, महाराज स्वर्गवासी झाल्यावर त्याने अल्लाकडे प्रार्थना केली वगैरे वगैरे. (यानंतर आम्ही औरंगाबाद या नावाला विरोध करणे सोडून दिले, कारण आम्हाला तो औरंगजेब एक पुण्यात्मा वाटू लागला होता). पण हे सुद्धा साफ झूठ निघाले. कोकाटे साहेबांनीसुद्धा आमचा विश्वासघात केला. (नंतर एका पेजवरून कळले कि कोकाटे साहेबांवर शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे).

बुधभूषण ग्रंथ वाचताना माझ्या लक्षात आले कि गोब्राह्मण प्रतिपालक हा ब्राह्मणांचा शब्द नसून तो खुद्द शंभूराजांनी वापरला आहे. (यामुळे पुढे मी या शब्दावरून ब्राह्मणांना शिव्या घालणे बंद केले. पण तरीही तो शब्द जाहीरपणे वापरायची हिम्मत झाली नाही.)

या सर्व प्रकारामुळे माझ्या मनात ब्रिगेडच्या विषयी थोडा संशय निर्माण झाला. पण याची अजून थोडी शहानिशा करायची म्हणून मी महात्मा जोतिबा फुलेंचे चरित्र वाचण्यास सुरुवात केली. आणि खरोखर आश्चर्य, ज्या जोतिबांना आम्ही 'भटोबाचा कर्दनकाळ' म्हणून ओळखत होतो त्याच जोतिबांनी पहिली शाळा ब्राह्मणाच्या वाड्यात सुरु केली होती हि नवीनच माहिती मला मिळाली. त्यांनी एकच मुलगा दत्तक घेतला तोही ब्राह्मण होता, मृत्युपत्रावर सुद्धा ब्राह्मणाचीच सही घेतली हे वाचून मती गुंग होण्याची वेळ आली होती.

ब्रिगेडने छत्रपती शिवराय-फुले यांचे नाव घेऊन मला आणि माझ्यासारख्या बाकीच्या पोरांना हातोहात फसवले होते हे बघून मला ब्रिगेडचा राग येण्यास सुरुवात झाली. ब्रिगेडने लिहिलेले एकूण एक पुस्तक मी परत वाचले आणि त्याची तुलना बखरीसोबत आणि अभ्यासू ब्लॉगर्स लोकांच्या लिखानासोबत करण्यास सुरुवात केली. मला अत्यंत वाईट वाटले, कारण ब्रिगेडने एकूण एक गोष्ट खोटी लिहिलेली होती. मग ती शंभूराजांच्या हत्येविषयी असो किंवा जोतिबांच्या ब्राह्मण द्वेषाविषयी असो. (शंभूराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे झाली यावर माझा विश्वास होता, पुढे फेसबुकवरील एका पेजने खरी माहिती दिली)

ब्रिगेड हि बहुजनांची कैवारी आहे हा माझा विश्वास होता. परंतु ब्रिगेडच्या काही घोषणा या सरळसरळ दलितविरोधी होत्या. उदा. - वाजवा टाळी, हटवा माळी. वाजवा तुतारी हटवा वंजारी ई. यामुळे ब्रिगेड हि शिवद्रोही असून, बहुजनविरोधीसुद्धा आहे हे सुद्धा कळून चुकले.

यातील सर्वात रंजक मुद्दा हा कि, छत्रपति शिवरायांना राज्याभिषेकाला कोणत्या ब्राह्मणांनी विरोध केला हा प्रश्न मी आजपर्यंत शेकडो ब्रिगेडी लोकांना विचारलेला आहे. परंतु आत्तापर्यंत एकही ब्रिगेडीने मला याचे उत्तर दिलेले नाही.

मराठा आरक्षण हा ब्रिगेडचा अजेंडा होता, ब्रिगेडमधील वकील मंडळी सांगत कि मराठा हा गरीब समाज आहे, मागासलेला आहे त्यामुळे त्याला आरक्षण मिळाले पाहिजे. पण एकदा माझ्या वाचनात मराठा तरुणानेच लिहिलेला एक लेख आला. आणि आरक्षण आपल्यापासून कोसो दूर आहे ते कळले. ब्रिगेडमधल्या वकील मंडळींना हे माहिती असणे स्वभाविक होते, परंतु तरीसुद्धा त्यांनी आम्हाला फसवण्याचे धोरण स्वीकारले यावरून एक कळू शकते कि ब्रिगेडचा ब्राह्मणद्वेष हा असा रोग आहे जो कोणालाही होऊ शकतो.

ब्रिगेडशी फारकत घेतलेल्या प्रत्येकाला ब्रिगेड शिव्या घालते हे मला कळू लागले होते. याचा अनुभव नरके सर, सोनवणी सर यांच्या संदर्भात आला होता. त्यांचे ब्लॉगसुद्धा मी वाचत होतो. त्यात मला शिवद्रोह वगैरे काहीही आढळले नाही. उलट ब्रिगेडशी फारकत घेतलेले हे लोक, समाज प्रबोधन या माझ्या आवडीच्या विषयाचे अत्यंत सुंदर काम तेही पुराव्यानिशी सिद्ध करून करत होते.

आणि याची परिणती मी ब्रिगेडमधून बाहेर पडण्यात झाली. खोटा इतिहास पसरवणाऱ्या ब्रिगेडमधून मी बाहेर पडलो. यावेळी आपल्या काही मित्रांना घेऊन बाहेर पडावे असे माझ्या मनात आले. त्यानुसार मी माझ्या जवळच्या सर्व मित्रांशी चर्चा करायला सुरुवात केली. परंतु एकानेही माझ्यासोबत सहमती दाखवली नाही. ब्राह्मण हे खरे शत्रू आहेत, देशात जी परिस्थिती आहे ती त्यांच्यामुळेच आलेली आहे यावरून त्यांचा विश्वास उडणे अशक्य झाले. आणि मी ब्रिगेडमधून बाहेर पडत आहे असे जेव्हा त्यांना कळले तेव्हा तर माझ्यावर शिव्यांचा पाऊसच सुरु झाला. कालपर्यंत जे लोक मला भाऊ म्हणत होते तेच आज मला आया-बहिणीवरून शिव्या घालत होते.
कालपर्यंत जे लोक मला भाऊ म्हणत होते तेच आज मला आया-बहिणीवरून शिव्या घालत होते. यात आमच्या विभागातली नेतेमंडळी सुद्धा होती. याला कारण एकच, मी सत्याची कास धरत होतो.

परंतु शेवटी यातून कशीबशी सुटका करून मी शेवटी ब्रिगेडमधून बाहेर पडलो. आणि सर्वत प्रथम माझ्या शिक्षणावर (सत्य शिक्षण) लक्ष केंद्रित केले आणि ते बर्याप्रकारे पूर्ण करून (चार ATKT सोडवून) शेवटी कामधंद्याला लागलो. परंतु ब्रिगेडसोबत आलेल्या संबंधावरून मी जो धडा घेतला होता तो धडा मी कधीच विसरणार नाही. तो धडा म्हणजे आपल्या धडावर आपलेच डोके असावे, उगाचच ब्रिगेडचे डोके वापरून काही फायदा नाही. कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय अजिबात पुढे जायचे नाही.
@ सतीश मोरे ,सांगली

Tuesday, August 8, 2017

अक्कलकोट दर्शन

🌹 *स्वामींच्या वास्तव्याने परमपावन* *झालेली*
*अक्कलकोटातील महत्वाची स्थळे* 🌹

*१. वटवृक्ष संस्थान* :

येथे स्वामी समर्थ महाराजांनी देह
सोडताना सगळ्यांना उपदेश केला की 'वडाच्या
पारंबीला धरून रहा.'

*२. समाधी मठ* :

महाराजांची समाधी.

*३.महाराजांच्या चर्मपादुका* :

समाधी मठच्या शेजारीच
शिष्य चोळप्पा यांच्या घरात आजही महाराजांच्या
चर्मपादुका आहेत.सुमारे १ फुट लांबीचे पाउल आहे.

*४. गुरुमंदिर* :

श्री बाळप्पा महारजांची समाधी.
व्यवस्थापकांना सविस्तर माहिती विचारावी.

*५. हाक्याचा मारुती* :

स्वामींनी सत् शिष्य बाळाप्पा
यांना नामजप करण्यास सांगितले ते हे मंदिर.तळघरत
आजही जाता येते.

*६. जंगमांचे शिव मंदिर* :

स्वामींनी शिवलींगावर शेणी रचून
अग्नी पेटविला. जंगम चिडले व स्वामींना मारण्यास आले.
३ दिवस अग्नी पेटत होता. ३ दिवसा नंतर शिवलींगाला
काहीही हानी न होता , ते अधिच तेजस्वी झाले.

*७.जोशी मठ* :

'स्वामी दर्शनाशिवाय भोजन करणार
नाही' हा नियम तुटू नये म्हणून आजारी भक्ताला लाकडी
पाटावर स्वामींनी स्वत:ची पदचिन्हे उमटवून दिली. तो
पाट आजही आहे.

*८.मुरलीधर मंदिर* :

मुंबईहून स्वामी दर्शनास आलेले
'स्वामीसुत' ह्या मंदिरात स्वामींची वाट पहात बसले
होते. स्वामींच्या दर्शनास गओलेल्या एका श्रीमंत
भक्तास स्वामी म्हणाले ''माझ्या समोर दिवे
पेटवण्याऐवजी माझा सुत काळोखात बसला आहे तेथे
रोषणई कर.'' गिरगावातील कांदेवाडी येथील मठ स्थापन
करणारे तेच हे स्वामीसुत !

*९.शेखनूर दर्गा* :

स्वामी कित्येकदा ह्या दर्ग्यावर येत.
मन्नत मागण्याकरता आलेल्या कित्येकंना स्वामी सांगत
की दर्ग्यावर चदर चढवा. तिथल्या फकीरंना भोजन द्या.

*१०.मालोजीराजांचा किल्ला* :

महादरवाजावर असलेल्या
गणपतीच्या मुर्तीस सहज हात लाऊन स्वामी जात असत्.
आपला हात उडी मारुन देखील पोचत नाही. येथे एक
लहानसे संग्रहालयही आहे.

*११.शिवपुरी* :

सुर्योदय आणि सुर्यास्त ह्या वेळी
अग्निहोत्र कसे करावे? अग्निहोत्र म्हणहजे काय ? इ.
महत्वाची माहिती यएथे सांगतात. सविस्तर माहिती
आणि अग्निहोत्रात सहभाग घेण्याकरता शिवपुरी येथे
सुर्यास्ताच्या साधारण १ तास आधी पोचावे.

मनोज जहागीरदार यांचे
*मिसळ* *कट्टा* होटगी रोड , हॉटेल चे भव्य जागेत थाटात स्थलांतर ..

नविन पत्ता

*मिसळ* *कट्टा*
जयहिंद नगर (जुने नट्स हॉटेल)
स्वाद पावभाजी समोर
चैतन्य भाजी मंडई जवळ
विजापुर रोड .. आय टी आय गेट समोरच्या रस्त्यावर ...
सोलापुर
9422603603;9423589366

Thursday, August 3, 2017

दत्तात्रय गुरू तुम्हीच ना

जगद्वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना ?
अनन्यभावे शरणांगत मी,भवभय वारण तुम्हीच ना ? ll
कार्तवीर्य यदु परशुरामही, प्रबोधिले गुरु तुम्हीच ना ?
स्वामी जनार्दन एकनाथ तरि, कृतार्थ केले तुम्हीच ना ?
नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना ?
मच्छिंन्द्रादि जति प्रवृत्त केले, जन उद्धारा तुम्हीच ना ?
दासोपंता घरी रंगले, परमानंदे तुम्हीच ना ?
नाथ सनदिचे चोपदार तरि, श्रीगुरू दत्ता तुम्हीच ना ?
युगायुगी निजभक्त रक्षणा, अवतरता गुरु तुम्हीच ना ?
बालोन्मत्त पिशाच वृत्ती, धारण करता तुम्हीच ना ? ll
स्नान काशिपुरी चंदन पंढरी, संध्या सागरी तुम्हीच ना ?
करुनी भिक्षा करविरी भोजन, पंचाळेश्वरि तुम्हीच ना ?
तुळजापुरी करशुद्धि तांबुल, निद्रा माहुरी तुम्हीच ना ?
करुनी समाधी मग्न निरंतर, गिरनारी गुरु तुम्हीच ना ?
विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले, पीठापुरी गुरु तुम्हीच ना ?
श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती, करंजनगरी तुम्हीच ना ?
जन्मताच ओंकार जपुनी, मौन धरियेले तुम्हीच ना ?
मौजी बंधनी वेद वदोनी, जननी सुखविली तुम्हीच ना ? ll
चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा, आश्रम घेउनी तुम्हीच ना ?
कृष्ण सरस्वति सद्गुरू वंदुनी, तीर्था गमले तुम्हीच ना ?
माधवारण्य कृतार्थ केला, आश्रम देऊनी तुम्हीच ना ?
पोटशुळाची व्यथा हरोनी, विप्र सुखविला तुम्हीच ना ?
वेल उपटुनी विप्रा दिधला, हेमकुम्भ गुरु तुम्हीच ना ?
तस्कर वधूनि विप्र रक्षिला, भक्तवत्सल तुम्हीच ना ?
विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला, निष्ठा देखुनी तुम्हीच ना ?
हीनजिह्व वेदपाठी केला, सजीव करुनी तुम्हीच ना ? ll
वाडी नरसिंह औदुंबरही, वास्तव्य करुनी तुम्हीच ना ?
भीमा अमरजा संगमी आले, गाणगापुरी गुरु तुम्हीच ना ?
ब्रह्ममुहूर्ती संगमस्थानी, अनुष्ठानि रत तुम्हीच ना ?
भिक्षा ग्रामी करुनी राहतां, मध्याह्नी गुरु तुम्हीच ना ?
ब्रह्मराक्षसा मोक्ष देऊनी, उद्धरीरि मठी तुम्हीच ना ?
वांझ महिषी दुभविले, फुलविले शुष्क काष्ठ तुम्हीच ना ?
नंदीनामा कुष्ठी केला, दिव्यदेहि गुरु तुम्हीच ना ?
त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनी, कुमसी ग्रामी तुम्हीच ना ? ll
अगणित दिधले धान्य कापुनी, शूद्रा शेत गुरु तुम्हीच ना ?
रत्नाईचे कुष्ठ दवडिले, तीर्थे वर्णित तुम्हीच ना ?
आठही ग्रामी भिक्षा केली, दिपवाळी दिनी तुम्हीच ना ?
भास्कर हस्ते चारसहस्रा, भोजन दिधले तुम्हीच ना ?
निमीषमात्रे तंतुक नेला, श्रीशैल्यासी तुम्हीच ना ?
सायंदेवां काशीयात्रा, दाखविली गुरु तुम्हीच ना ?
चांडाला मुखि वेद वदविले, गर्व हरायाा तुम्हीच ना ?
साठ वर्षे वांझेसी दिधले,कन्यापुत्रही तुम्हीच ना ? ll
कृतार्थ केला मानसपूजनी, नरकेसरि गुरु तुम्हीच ना ?
माहूरचा सतिपती उठवोनी, धर्म कथियला तुम्हीच ना ?
रजकाचा यवनराज बनवुनी, उद्धरिला गुरु तुम्हीच ना ?
अनन्यभावे भजता सेवक, तरतिल वदले तुम्हीच ना ?
कर्दळीवनिचा बहाणा करुनी, गाणगापुरी स्थित तुम्हीच ना ?
निर्गुण पादुका दृष्य ठेऊनि, गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना ?
विठाबाईचा दास मूढ परि, अंगीकारिला तुम्हीच ना ?
आत्मचिंतनी रमवा निशिदिनी, दीनानाथ गुरु तुम्हीच ना