Wednesday, July 30, 2014

साक्षात्कार

आत्महत्या करण्यासाठी एक माणूस कड्यावरून खाली उडी मारणार तेवढ्यात एक साधू त्याला अडवतो.
साधू म्हणतो, 'आयुष्याला इतका वैतागला आहेस तर एक काम कर. माझ्याबरोबर इथल्या राजाकडे चल. तो आपल्या दोघांना 'मालामाल' करेल.'
दोघेजण राजासमोर उभे राहतात. साधू राजाला सगळी हकीगत सांगतो.
राजा त्या माणसाला म्हणतो, ' तू तुझे डोळे काढून दे, मी तुला पन्नास हजार रुपये देईन. तुझे दोन हात तोडून दे, मी तुला पंचवीस हजार रुपये देईन. पाय, मूत्रपिंड, हृदय, आतडी, किडनी, जठर या सगळ्याचे मिळून एक लाख रुपये !
माणूस चिडून म्हणतो, 'माझ्या अमुल्य अवयवांची किंमत करताना तुम्हाला लाज नाही वाटत ? मी माझा एकही अवयव विकणार नाही.'
राजा हसून म्हणतो, 'इतक्या 'अमुल्य' गोष्टी जवळ आहेत हे माहित असून तुला तुझ्या आयुष्याचा कंटाळा आला?'
माणसाला त्याची चूक समजते आणि तो रडू लागतो.
साधू म्हणतो, 'तू कुठल्या कारणासाठी आत्महत्या करणार होतास ते मला माहित नाही. पण तुझ्याजवळ ज्या अमुल्य गोष्टी आहेत त्यांचा योग्य वापर करून एक नवं आयुष्य सुरु कर.'
ही कथा संपल्यावर पुस्तकात ओळी होत्या -

When wealth is lost, something is lost.
When health is lost, everything is lost.
When everything is lost….. Future still remains !

थेंब टपोरा पावसाचा

थेंब टपोरा पावसाचा
वाटे मना हवा हवासा
तप्त भूमीवरी थोडासा
शिडकावा मायेचा जसा

थेंब टपोरा पावसाचा
वाफेतुन जन्मा आला
जलचक्र भ्रमण करुनी
अनाहूत पर्यटक जैसा

थेंब टपोरा पावसाचा
जसा किरण अपेक्षांचा
अंत आता पाणीतुटवडा
जलौघ घेउन आला

थेंब टपोरा पावसाचा
ओल्या प्रणयी भावनांचा
अंतरे दुही मनामनातील
क्षणात मिटवांया आला

थेंब टपोरा पावसाचा
अल्लड बालमनाचा
पाणी मस्ती चिखलांचा
ओल्याचिंब अनुभवांचा

थेंब टपोरा पावसाचा
आनंद शेतकरयांचा
पुढल्या वर्षाच्या सोयीसाठी
तरतूद करण्या आला

थेंब टपोरा पावसाचा
अश्रु धरणीमातेचा
मानव दिलेल्या दुखा:चा
हुंदका त्या वेदनांचा

            --- निलेश जोशी




आरती भाग्यवानची

आमच्या govt polytechnic Malwan च्या 1999 बैच मधील परममित्र भाग्यवान चव्हाण यांच्या स्तुतीपर केलेली आरती

------+--------+---------+--------+------

आरती भाग्यवानची

आरती भाग्यावाना
जीपीएम च्या देवा
मलेवाडीच्या देवा
आरती भाग्यावाना।।ध्रु।।

अवतार जगती या
भक्ताना सावराया
मर्तिकाला हजर
असे दुःखात वाटा
आरती भाग्यवाना ।।१।।

गुढ आवाजात उपदेश
सर्वानी समजुन घ्यावा
नसेल ज्याना आचारण्या
त्यानी परिणाम भोगावा
आरती भाग्यवाना ।।२।।

श्वान पाठलाग होता
देव राहिला तटस्थ
नाही अडविले त्याला
करू दिले तया कर्म
आरती भाग्यावाना ।।३।।

भू वरी अवतरला
ग्राम होते मलेवाड
कर्मभूमी मुंबई
तिकडचा केला उद्धार
आरती भाग्यवाना।।४।।

भरकटले जर मन
म्हणा मनी भाग्यवान
देव आहे पाठीराखा
याचे राहू द्यावे भान
आरती भाग्यवाना ।।५।।

i20 वाहनी बसून
देव दाखवी ऐट
भक्तानाही तुम्ही द्यावी
i20 वाहनाची भेट
आरती भाग्यवाना ।।६ ।।

प्रत्येक अमावास्येला
मनी भजा भाग्यवान
JJ करी स्तुती देवाची
ठेवा देवा तुम्ही मान

आरती भाग्यवाना।।७।।

-----निलेश जोशी

भाग्यवान स्तुती स्तोत्र


आमच्या govt polytechnic Malwan च्या 1999 बैच मधील परममित्र भाग्यवान चव्हाण यांच्या स्तुतीपर केलेले स्तुती स्तोत्र

------+--------+---------+--------+------

श्री गणेशाय नम:

JJ उवाच 

नाही धनवान 
नाही पुण्यवान
साधा सोपा मित्र 
भाग्यवान ।।1।।

मित्रा सारीखा देव 
देवा सारीखा मित्र 
मित्रात पाहीला देव 
जीपीएम् माजी ।।2।।

प्रत्येकाच्या सुखद 
प्रसंगी नसेल 
पण मर्तिकाला
अवश्य हजर ।।3।।

सर्वजण जेव्हा 
मोहमाया जपती
त्याना आणी रीती
स्वत: दंड सोसुनिया ।।4।।

अर्ध पूर्ण नग्न 
चित्रे नको टाको
तरी टाकीता चित्रे
लिंग कापोनी दाखवी ।।5।।


 ऐसा हा देव 
आहे पाठीशी खंबीर
का होशी सैरभैर 
ठेवी मनी धीर ।।6।।

वाची हे पुण्य स्तोत्र
दिसामाजी तीन वेळ
बाबू बॉस पत्नी दोष 
घालवुनी देइ सद्गति।।7।।

इति श्री JJ विरचित भाग्यवान स्तोत्र संपूर्ण 

बोला भाग्यवान महाराज की जय

--निलेश जोशी

Tuesday, July 29, 2014

तुझ्या असण्यामुळे (माझे ) आयुष्य बदलले आहे.

ब्लू रिबन एक गहिरी कथा कदाचित काहींनी इंटरनेटवर वाचली असण्याची शक्यता आहे, पण कथा इतकी सुंदर आहे की दुसर्यांदा वाचली तरी काही हरकत नाही म्हणून दोहरायचा मोह आवरत नाही.

न्यूयॉर्क शहरातल्या एका शिक्षिकेने वर्षाच्या शेवटी तिच्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या शर्टावर निळ्या रिबनचा बो लावला. त्या रिबनवर लिहिले होते Who you are, makes a difference. तुझ्या असण्यामुळे (माझे ) आयुष्य बदलले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला संदेश वाचून खूप आनंद झाला. ''वा, माझ्यामुळे टीचरच्या आयुष्यात फरक पडला आहे.'' पण नुसते एवढेच करून ती शिक्षिका थांबली नाही. तिने प्रत्येक विद्यार्थ्याला अजून तीन रिबन दिल्या व सांगितले, ''तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना धन्यवाद द्या व त्यांच्या कपड्यावर ही निळी रिबन लावा.''

एका विद्यार्थ्याने शेजारच्या घरात राहणार्या एका तरुणाच्या शर्टावर ''थँक यू, तुझ्यामुळे माझे आयुष्य बदलले आहे म्हणून मी तुला ही निळी रिबन लावतो'' असे म्हणत रिबन लावली. तो शेजारी एका ऑफिसमध्ये ज्युनियर कर्मचारी होता. त्याने त्या विद्यार्थ्याला अभ्यासात मदत केल्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षेत अव्वल नंबर मिळाला होता. विद्यार्थ्याने उरलेल्या दोन रिबन त्याला दाखवत विचारले, ''आम्ही शाळेसाठी एक प्रोजेक्ट करतो आहोत. तुझ्या आयुष्यात ज्या माणसामुळे चांगला बदल झाला आहे त्यांना ही रिबन लावशील का?''

कर्मचारी लगेच तयार झाला. दुसर्या दिवशी त्याने आपल्या बॉसपाशी जाऊन ''थँक यू You made a difference in my life " असे म्हणत निळ्या रिबनचा बो लावला. बॉस अत्यंत हुशार होता, कंपनी त्याच्यामुळे चालली होती; पण तो खडूस म्हणूनही प्रसिद्ध होता. तरीही कर्मचार्याने बो लावल्यावर बॉसच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो म्हणाला, ''माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात बदल झालाय? तुझ्यासाठी मी इतका महत्त्वाचा आहे हे मला माहीतच नव्हते. थॅक्यू.''

कर्मचार्याने त्याला विचारले, ''ही कल्पना माझी नाही. हे एका शाळेतले प्रोजेक्ट आहे. आयुष्यात बदल करणार्या लोकांना धन्यवाद देऊन त्यांना हा निळ्या रिबनचा बो लावायचा. तुम्हाला आवडेल असे करायला?''
बॉस एकदम म्हणाला, ''हो नक्की आवडेल. आहे तुझ्याकडे अजून एखादा बो?'' कर्मचार्याने आपल्याकडचा उरलेला बो बॉसला दिला.
बॉस घरी गेला. त्याने आपल्या मुलाला बोलावले . मुलाच्या शर्टावर निळ्या रिबनचा बो लावत तो म्हणाला ''मी कामामुळे उशिरा घरी येतो, घरी आल्यावर माझी चिडचिड होते, मी तुझ्याशी प्रेमाने बोलतही नाही, मी आजवर तुला कधी हे सांगितले नाही, पण तू जसा आहेस तसाच रहा. तुझे असणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. Who you are, makes a difference in my life "

मुलगा ढसाढसा रडायला लागला. तो म्हणाला, ''डॅड , मला वाटायचे की तुला मी अजिबात आवडत नाही. मी तुला कधीच खूश करू शकणार नाही म्हणून आज रात्री मी आत्महत्या करणार होतो. ही बघ, मी तुला व आईला चिठ्ठी लिहून ठेवली होती. पण ही रिबन लावलीस आणि माझं आयुष्य बदलवलेस डॅड.'' बॉसने चिठ्ठी वाचली. त्याने आपल्या मुलाला घट्ट पोटाशी धरले. दोघेही एकमेकांच्या मिठीत आनंदाचे अश्रू ढाळत होते. त्या एका रिबनमुळे मुलाला बाबा व आयुष्य दोन्ही मिळाले होते आणि बापालाही मुलगा मिळाला होता.
आई मुलांविषयीचे प्रेम सहज व्यक्त करू शकते. मुलेही आईशी मोकळेपणाने बोलू शकतात. आईला ते जन्मजात कसब असते. कारण स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते . पण पुरुष हा क्षणाचा पिता असतो, पण म्हणून त्यांचे महत्त्व मुलाच्या आयुष्यात कमी नसते. उलट अनेक मुले वडिलांच्या नजरेतही आपण कोणीतरी असावे यासाठी आयुष्यभर झटतात, पण काही वडिलांना त्याबद्दल काहीच वाटत नसते. मुलांकडे पूर्णत: दुर्लक्ष करत हे पुरुष मौजमजेत वा कामात मग्न रहातात.

Who you are, makes a difference.
तुझ्या असण्यामुळे (माझे ) आयुष्य बदलले आहे.

work life balance

Work-Life Balance हा अनेकांसाठी कळीचा प्रश्न झालाय. ‘Work’ आपल्या ‘Life’ मधून वेगळं कधी झालं? जगणं वेगळं – काम वेगळं असं ठरवूनच टाकलं आपण. घरी वेगळे आणि ऑफिसमध्ये वेगळे असं दुहेरी आयुष्य जगण्यात किती उर्जा खर्च होत्येय याची गणती नाही. पैसा भरपूर मिळतोय. पण तो उपभोगण्यापेक्षा इतरांना ‘दाखवण्यात’ जास्त खर्च होतोय. हॉलीवूडचा अभिनेता विल स्मिथ एकदा म्हणाला होता – ‘Now a days, people buy the things they don’t want, with the money they don’t have, to impress the people they don’t like !’ या एका वाक्यात आपल्या आजच्या जगण्याचं सार आहे. पैसे किती हवे आहेत याची काही सीमारेषा नाही, म्हणूनच ही तृष्णा कधी संपणारी नाही. किंबहुना, ही तृष्णा तृप्त करायचा ध्यास नाही, त्यामुळे गरजांची सीमारेषा ठरवणे कठीण जातंय. बाईक चालवताना ‘व्हॅगन आर’ची भूल पडते, ‘व्हॅगन आर’ आल्यावर XUV खुणावते, XUV मध्ये बसतोय न बसतोय तोच BMW ची स्वप्नं पडू लागतात, BMW येते आणि……..हे चालूच राहतं. प्रगती होणं वाईट नाही, पण भीती आणि मोहाच्या दुहेरी विळख्यात सापडून फरफटत ‘प्रगती’ होणार असेल तर थोडं थांबून विचार करणे गरजेचे आहे. थांबायचं? कोणाला सांगताय? इतका वेळ आहे कुणाकडे? समोर दिसेल ते आधी स्वतःसाठी ओरबाडून घ्यायचं हे desperation अगदी अलीकडे का दिसू लागलंय?
ग्रीन सिग्नल…मी आधी पोहोचणार. बस आली…मी आधी घुसणार. देवाचे दर्शन…रांग तोडून मी आधी जाणार. मार्केटमध्ये नवा मोबाईल..मी आधी विकत घेणार. अमुक एक घटना घडली…मी आधी जगाला सांगणार….जगण्यातला एकूणच ‘ठेहराव’ कुठे हरवलाय ? एक एक घोट घेत आयुष्य जगायचं सोडून एका दमात आयुष्य पिऊन मंडळी मोकळी होतायत आणि ‘मी पहिला’ म्हणत बेभान होतायत. इतकं असंतुलित आयुष्य जगताना ‘Work Life’ Balance कसा काय साधणार आपण?

नविन काळे

मजा की काम??

एका बंगल्यात एक कुरूप म्हातारा राहत असतो. आजूबाजूची लहान मुले रोज संध्याकाळी जमून त्याला चिडवत असतात. म्हातारा हुशार असतो. तो सर्व मुलांना बोलावतो. रोज चिडवण्याचे दहा रुपये मिळतील असे वचन देतो. मुलांना मजा वाटते. चिडवण्याचे पैसे ! मग पुढील महिन्यात मुलांना बोलावून दहा रुपयांचे ५ रुपये करण्यात येतात. हळूहळू पाच रुपयांचा एक रुपया होतो. मुलं कंटाळून म्हणतात, ‘एक रुपयासाठी रोज येऊन कोण चिडवणार !’ आधी चिडवायला मजा येत होती. त्याला ‘पैशाचे मोल’ चिकटवल्यावर रोजची मजा आता ‘काम’ वाटू लागली ! कुठलेही काम करताना त्यातली ‘मजा’ टिकवायची असेल तर त्या ‘कामाचे फळ’ कामापासून जितकं लांब ठेवू तितकं चांगलं !

आत्मविश्वास

प्रसिद्ध तबला वादक थिरकवाँ साहेबांची एक गोष्ट ऐकली होती. एक कार्यक्रम संपवून ते काही मोजक्या उपस्थितांमध्ये गप्पा मारत बसले होते. सर्व उपस्थित लोक खूप शिकलेले, धनाढ्य, अतिशय प्रतिष्ठित वगैरे. आयोजक बिदागी घेऊन आले. थिरकवाँ साहेबांच्या हातावर त्यांची बिदागी ठेवण्यात आली. ‘अमुक अमुक बिदागी मिळाली’ असं लिहिलेल्या ठिकाणी सही करण्यासाठी त्यांच्या समोर कागद सरकवण्यात आला. अतिशय शांतपणे त्यांनी त्या कागदावर आपला ‘अंगठा’ लावला. हे पाहून उपस्थितांमध्ये कुजबुज सुरु झाली. ही गोष्ट थिरकवाँ साहेबांच्या लक्षात आली. उपस्थित लोकाकडे एक कटाक्ष टाकून ते म्हणाले, ‘आपल्यामध्ये डॉक्टर किती आहेत?’ काहींनी हात वर केले. ‘आपल्यामध्ये वकील किती आहेत?’ काहींनी हात वर केले. मग आपल्या खास अंदाजात मिस्कीलपणे त्यांनी विचारलं, ‘अब ये बताइये, आप मे से ‘थिरकवाँ’ कितने है ?’ सगळ्यांनी माना खाली घातल्या. आपल्याला अवगत असलेल्या कलेबद्दल सार्थ आत्मविश्वास असणे, याला म्हणतात !

शिक्षण ??कोणते ??

भरपूर शिकलेल्या एका माणसाची गाडी एकदा रस्त्यात बंद पडते. काही केल्या ती सुरु होत नसते. तिथून एक अडाणी माणूस जात असतो. तो मदतीसाठी पुढे येतो. ज्ञानी महोदय त्या येड्या गबाळ्या रुपाकडे बघतात. त्याची खिल्ली उडवतात. तो माणूस म्हणतो, मला एक संधी द्या. चला, हेही करून बघूया, म्हणत महोदय गाडीपासून बाजूला होतात. त्या अडाणी माणसाच्या हातात गाडीचे ‘मॅन्युअल’ कोंबतात. त्याची मजा बघत बाजूला सावलीत बसून राहतात. अडाणी माणूस ‘मॅन्युअल’ उलटं सुलटं करून पाहतो. ते बाजूला ठेवून तो थेट गाडीच्या इंजिनमध्ये डोकं खुपसतो. थोड्या वेळाने गाडी सुरु होते. ज्ञानी महोदय अवाक होतात. त्याला विचारतात, ‘तुला ‘मॅन्युअल’ वाचता येत नसून तू गाडी दुरुस्त कशी केलीस?’
इंजिनमधील तेलाने काळे झालेले हात पुसत तो ‘अडाणी’ माणूस म्हणतो, ‘साहेब, या गरिबाला वाचता येत न्हाई. म्हणून मी थोडा ‘ईचार’ करू शकलो !’

बेअरफुट कॉलेज, तिलोनिया ,जयपुर

जयपूरपासून १०० किमी अंतरावर तिलोनिया नावाचं एक छोटंसं गाव आहे. बंकर रॉय नावाच्या एका अवलियाने तिथे ‘बेअरफुट कॉलेज’ नावाच्या एका जादुई वास्तूची स्थापना केली आहे. त्याविषयीच तुम्हाला थोडक्यात सांगायचंय.

दिल्लीत शिक्षण पूर्ण करून बंकर रॉय यांनी भारत भ्रमण करायचे ठरवले. ते राजस्थान मधल्या या गावात आले. ‘आपण खूप शिकलोय तेव्हा इथल्या अशिक्षित लोकांना आपण शिकवू’ असं त्यांच्या अहंकाराला वाटलं. जसजसा त्यांचा या लोकांशी संबंध वाढला, तसतसं बंकर यांच्या लक्षात येऊ लागलं की वरकरणी अडाणी दिसणाऱ्या मंडळींकडे अनेक ज्ञान-कौशल्ये आहेत. तेव्हा याच लोकांकडूनच आपण काहीतरी शिकलं पाहिजे. यातूनच जन्म झाला – बेअरफुट कॉलेजचा. १९७५-८० च्या काळात निर्मिती झालेली ही वास्तू पाहण्यास आता जगभरातून लोक येतात. या प्रयोगास अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. संपूर्ण वास्तू शून्य विजेवर आणि शंभर टक्के सौर उर्जेवर चालते. या वास्तूमधील जेवणासकट सर्व सेवा सुविधा कमालीच्या साध्या. वायफळ खर्च नाही. माणसं अतिशय लाघवी व नम्र. अतिशय साधे सुती कपडे घातलेली ही माणसे बोलू लागली की नुसतं ऐकत बसावसं वाटतं. मध्यंतरी एका नेत्याच्या मुलाखतीनंतर ‘women empowerment’ हा शब्द विनोदाचा विषय झाल्याचे अनेकांना आठवत असेल. ‘women empowerment’म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर ‘बेअरफुट कॉलेज’ ला भेट द्यावी लागेल.दर वर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्रामीण भागातील अशा सुमारे शंभर स्त्रियांना ‘सौरउर्जा उपकरणे’ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे शिक्षण देणाऱ्या सर्व महिला या त्याच गावातील ‘सहावी सातवी’ च्या पुढे न शिकलेल्या महिला आहेत. राजस्थानी पारंपारिक वेशातील त्या महिला शिक्षिका आफ्रिकन देशातील महिलांना शिकवताना पाहून आपण अक्षरशः अवाक होतो.
येस, नो, ओके या शब्दांच्या व्यतिरिक्त एकही ‘कॉमन’ शब्द माहित नसताना, केवळ खुणांच्या माध्यमातून आणि काही विशिष्ट संकेतांच्या माध्यमातून सुमारे सहा महिने हे शिक्षण चालू असतं. सोलर कुकर, सोलर हीटर, सोलर दिवे वगैरे उपकरणे महिलाच बनवतात आणि बाजारात यशस्वीपणे विकून दाखवतात. याच गावातील काही ‘कमी शिकलेल्या’ (?) महिला दंतवैद्यकशास्त्र शिकून ‘रूट कॅनल’ वगैरे करतात हे पाहून आपल्याला चक्कर यायची बाकी असते. या कॉलेजचं स्वतःचं एफएम रेडियो स्टेशन आहे. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असे रोज कार्यक्रम असतात. ज्या लोकांकडे बघून ती धड बोलतील की नाही अशी शंका यावी अशी माणसे ते रेडियो स्टेशन अतिशय शिताफीने चालवतात. एक एक धक्के पचवत बेअरफुट कॉलेजची सैर चालली होती. शेवटचा षटकार अजून बाकी आहे, याची कल्पना नव्हती. एका संगणकासमोर काही उपकरणे घेऊन एक स्त्री बसली होती. वय अंदाजे पन्नास. डोक्यावर घुंघट. त्यातून डोकवणारे सगळे केस पिकलेले. मी विचारलं, ‘आप क्या कर रही हो?’ अतिशय आत्मविश्वासाने समोरून उत्तर आलं – ‘मै रेडियो एडिटिंग कर रही हुं’…मी विचारलं, ‘आपके सामने जो मशीन्स है, उसके बारे मे आपको सब मालूम है?’ त्या स्त्रीने जे उत्तर दिलं, ते केवळ बेअरफुट कॉलेजच्या तत्वज्ञानाचं एका वाक्यात सार नव्हतं, तर आपल्या सर्वांच्या ‘शैक्षणिक अहंकाराला’ मारलेली चपराक होती. ती स्त्री म्हणाली, ‘ये बटन पे क्या लिखा है वो मै पढ नही सकती | पर ये बटन दबाने के बाद क्या होता है, वो मुझे मालूम है !’

आपण थोडंफार शिकलो, आता आपली पुढची पिढी शिकतेय. त्या स्त्रीने जे सांगितलं, नेमकं तेच आपल्या शिक्षणातून हरवून गेलंय. मार्क, टक्के, मेरीटलिस्ट, अॅडमिशन वगैरे बाजारू कल्लोळात ‘खरं शिक्षण’ बाजूलाच पडलंय. मार्क, टक्के वगैरे गोष्टींना कमी लेखायचा उद्देश नाही. पण त्यातच फार अडकून गेलोय आपण. इंग्रजी आलं पाहिजे ते शेक्सपिअर वाचायला नव्हे, तर नोकरीच्या इंटरव्ह्यूमध्ये उत्तरं द्यायला. विज्ञान आलं पाहिजे ते या विश्वातलं कुतूहल शमवायला नव्हे, तर माझं ‘अॅग्रीगेट’ वाढवायला. संस्कृत आलं पाहिजे ते माझ्या परंपरेच्या पाउलखुणा शोधायला नव्हे, तर ते स्कोरिंग आहे म्हणून. शिकायचं असतं ते जगण्यातलं ‘शहाणपण’ (wisdom) मिळवायला. हे सगळं विसरून आपण इतके हीन आणि दीन कधी झालो? शिकण्याला आत्मविश्वासाचे व रोकड्या व्यवहाराचे पंख फुटले की काय चमत्कार घडू शकतो हे सांगणारं बेअरफुट कॉलेजचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे.

‘बेअरफुट कॉलेज’ला जाण्यापूर्वी त्याविषयी अधिक जाणून घ्यायला मी ‘राजस्थान पर्यटन’ कचेरीत गेलो होतो. तिथल्या अधिकाऱ्यांकडे या जागेविषयी चौकशी केली. त्यांना कुणालाच ‘बेअरफुट कॉलेज’ माहित नव्हतं. त्यांनी माझ्यासमोर जयपूर येथील आपल्या स्वतःच्या मुख्यालयाला फोन लावला. त्यांनाही कुणाला स्वतःच्याच राज्यातील ‘तिलोनिया’ किंवा बेअरफुट कॉलेजविषयी काहीही माहिती नव्हती. या देशात काही भलं काम करायचं असेल तर कुठून सुरुवात करावी लागणार आहे, याची ही एक झलक होती. ‘बेअरफुट कॉलेज’च्या गेटमधून बाहेर पडलो तेव्हाच मनाशी पक्क ठरवलं – यापुढे या वास्तूचा प्रसार आणि प्रचार जमेल तसा आणि जमेल तिथे, आपण स्वतः करायचा. गेलं वर्षभर मी ते करतोय.

साभार नविन काळे

वदनी कवळ घेता

परवा कुठेतरी गेलो होतो. तिथला एक फलक नजरेत भरला.

वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे | सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे
कृषीवल-कृषीकर्मी राबती दिनरात | श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात
करुनी स्मरण त्यांचे अन्न सेवा खुशाल | उदर भरण आहे चित्त होण्या विशाल

या ओळींचा निर्माता कोण हे मला माहित नाही. पण या माणसाला ‘खाण्याचं अध्यात्म’ कळलंय.
…अखेर मला ‘जातिवंत खवैय्या’ सापडलाय !