Thursday, April 30, 2015

गुणवत्तेत तडजोड का दिसते आजकाल??

अनुभवाने माणूस शहाणा होतो पण केव्हा जर पहिला अनुभव वाइट असेल तर
पण जर असे झाले की पहिला अनुभव उत्तम म्हणून दुसऱ्या वेळी त्याच अनुभवाची अपेक्षा केली तर पदरी निराशा
त्याचे काय झाले उद्या गावी निघतोय चार चाकी गाड़ी घेवून , मागच्या वर्षी नाशिकवरून गावी नाशिक रोडला एक शोरूम आहे ,गावी जाताना या मोठ्या यश टायर शो रूम मधून व्हील रिम स्ट्रेटनिंग,व्हील बलेंसिंग व अलायन्मेन्ट करुन घेतले व त्यामुळे पूर्ण कोंकण प्रवास छान झालेला व प्रवासात ऐवरेज पण चांगले मिळाले.

उद्या गावी जायचे म्हणून आज तेच ठरवले की चांगल्या शोरूम मधून व्हील रिम स्ट्रेटनिंग,व्हील बलेंसिंग व अलायन्मेन्ट करुन घेऊ म्हणजे काळजी नाही ,मागीलवेळी नाशिकला केलेले तिकडे तर जाऊ शकत नाही कारण आता चिंचवडला राहायला आलो पण तरीही पहिला चांगला अनुभव लक्षात घेवून डांगे चौक सदगुरू टायर्स MRF डीलर हे शोरूम छान निवडले व गाड़ी घेवून तिकडे गेलो ,
अर्थात पहिल्या चांगल्या अनुभवामुळे मी नित्चिंत होतो की काम चांगलेच होणार
पण या आलेल्या अनुभवाने मी हादरून गेलो,
आलेले अनुभव खालीलप्रमाणे
1.व्हील बैलांसिंग प्रिंट मिळणार नाही (ठीक आहे पण काम नीट करा ,मी तरी प्रिंट किती दिवस जपून ठेवणार होतो?)
2.एका व्हीलची रिम बेंड होती पण रिम स्ट्रेटनिंग मशीन नाही (ठीक आहे पण व्हील बैलेंसिंग नीट करा)
3. एका शिकाउ मुलाकडून एका टायर नट थ्रेड डैमेज (आता मी काळजीने लक्ष पूर्वक सर्व प्रोसेस बघायला लागलो,शेवटी हा नट बदलून दिलाच नाही)
4. टायर हवा चेक न करता व्हील अलायन्मेन्ट चालू केली (मी सांगितल्यावर टायर हवा चेक करून मग चारही टायरवर ऐमिंग लेंस /कॅमेरा लावला ,या लेंस मधूनच प्रत्येक टायरचा ऐंगल मशीनला समजतो)
5.कंप्यूटर वर मशीन कैस्टर कॅम्बर व टो सेटिंग करायला सांगत असताना फ़क्त टो सेटिंग करून कस्टमर इन्फो भरायला सुरुवात (आता मला या गोष्टीची चीड़ आली ,मालकाला बोलावून आणले तर तो पण म्हणे आम्ही फ़क्त टॉय सेटिंग करतो)

त्याना सर्वाना मी अलाइनमेंट प्रोसेस का करतात त्याचे फायदे ,टो सेटिंग ,कैस्टर सेटिंग , कॅम्बर सेटिंग त्याचे फायदे सांगुनही त्याचे एकच पालुपद आम्ही हे सर्व करुच शकत नाही, आमच्या माणसाने सांगितले नाही ही त्याची चूक झाली ,पाहिजे तर कामाचा एकही रूपया देवू नका.
मी सांगितले काम नीट केले तर मी दुप्पट पैसे द्यायला तयार आहे व तसे नसेल तर आता केलेल्या सेटिंग पैरामीटरचा फ़ोटो काढू दया मग मी पैसे देवून आहे तशी गाड़ी न्यायला तयार आहे ,या भांडणात त्यांनी गाड़ी मशीन वरुन काढून दुकानाबाहेर उभी केली व मग मीही एकही रूपया न देता गाड़ी घेवून घरी आलो
या पूर्ण प्रसंगात काही शिकायला मिळाले ,काही प्रश्न पडले
1. एकदा चांगला अनुभव मिळाला म्हणून प्रत्येक वेळी मिळेलच असे नाही
2.पैसे देवूनही गुणवत्ता मिळायाची अपेक्षा असेल तर त्यातील ज्ञान आत्मसात करणे आवश्यक
3. काम चालू असताना ग़ाफ़िल न राहता लक्ष ठेवणे आवश्यक
4.मोदी मेक इन इंडिया स्वप्न बघत आहेत पण अशी गुणवत्तेशी तडजोड किती दिवस यश पैसा मिळवून देईल?
5.आजकाल सर्वच ठिकाणी पैसा अचूक हवा पण द्यायची सर्विस ,काम यात अचुकतेची अपेक्षा ग्राहकाने करायची नाही अशी मानसिकता का वाढते आहे??
6.पैसे घेतले नाहीत म्हणजे चूक केलेली जस्टिफाय होते का??

काहीच समजत नाही  मी चूक की बरोबर तुम्हीच सांगा

--निलेश जोशी

Monday, April 20, 2015

काही चुकले का ?? सत्यकथा

परवा रविवारची गोष्ट

पिंपरी येथे किराणा घाऊक दरात स्वस्त मिळतो म्हणून मी व माझी बायको कविता पिंपरीला आलो
गाड़ी पार्क केली मी माझे काही हार्डवेअर सामान घेवून किराणा दुकानासमोर आलो.
कविता म्हटली मी आलेच तेल गहु वैगरे जुजबी सामान घेवून मी बाहेर गाडीवर बसून वाट बघतोय,
ईतक्यात एक वृद्ध जोडपे आले
"दादा ,मदत दया काहीतरी"
अगदी काल परवाच फेसबुक वर अशा लोकांना भिक देवु नका वैगरे मौलिक सल्ले ऐकले होते
त्या विचारांच्या अमलाखाली मी असल्याने अर्थात दुर्लक्ष केला व मान फिरवली
"दादा , खाण्यापुरते हाएत पैसे , ह्यांना सकाळ पासून ताप हाये, डाक्टर कड़े जायाला पैसे हवेत "

मी क्षणभर त्या खंगलेल्या वृद्ध मांणसाकडे बघितले खरच ताप आलेला दिसत होता
"पांडुरंग कृपा करेल ,तुमच्या लेकाला कायपण कमी पडू नाय देणार "

द्विधा मनस्थिति अनुभवत होतो तरी मनाने निर्णय घेतला व त्याना 50 रुपये हातात दिले ,मला वाटले हे जोड़पे आता पैसे घेवून दुसऱ्या एखाद्या मांणसाकडे जातील पण इतर कोणाच्याकडे न जाता समोरच्या दवाखान्यात शिरताना दिसले .

क्षणभर वाटले 100 रु द्यायला हवे होते
क्षणभर वाटले आपण स्वतः डॉक्टर ला भेटून पैसे द्यायला हवे होते एक ना दोन ,
मग विचार केला दान दिले ना मग त्याचा सदुपयोग होवो की दुरूपयोग होवो नंतर का विचार करा ??

थोड्या वेळाने कविता किराणा सामान घेवून आली ,मी
विचारले काय ग किती रुपये वाचले असतील इकडे एवढ्या लांब आलो खरेदीला ??
"चिंचवडला तेल 85-90 मिळते इकडे 75 ला मिळते ,
5 लिटर घेतले म्हणजे साधारण 50 रुपये वाचले "
आता तिला काहीच माहिती नव्हती पण मी मनोमन त्या जगनियंत्याच्या एडजस्टमेंटला व जुळवाजुळवीला मनोमन नमस्कार केला.

काही मला पडलेले प्रश्न
1.मी त्या जोडप्याला पैसे दिले चूक की बरोबर
2.असे कोणी गरजू आले म्हणजे काही खरेही असतील काही ढोंग पांघरून येतील आपण भाळावे का?
आपले विचार सांगा व मार्गदर्शन करा.

Sunday, April 19, 2015

समान धागा

मणी असती वेगवेगळे
वेगळे आचार वेगळे विचार
जोडूनि ठेवी एकत्र सर्वा
समान धागा पुस्तकांचा
समान धागा सहित्याचा