Wednesday, October 21, 2015

दसरा संकल्प

दसरयाचे तात्पर्य सदैव सत्याची जीत
गड तुटेल असत्याचा करा सत्याशी प्रीत

सत्याच्या मार्गावर लाखो असतील काटे
न थांबता चालत राहू काटे होतील फुले

क्रोध, कपट, कटुता, कलह, चुगली अत्याचार
दगा, द्वेष, अन्याय, छळ, रावणाचा परिवार॥

राम चिरंतन चेतना, राम सनातन सत्य।
रावण वैर-विकार, रावण हे दुष्कृत्य॥

वर्तमानातील दशानन, म्हणजेच भ्रष्टाचार।
दसरयादिवशी करू सर्व आपण याचा संहार॥

--निलेश जोशी