Saturday, May 17, 2014

इल्लु इल्लु -- संदीप खरे

ऐकलय का हे संदीप सलिल चे गाणे ??
हे चित्र बघून आठवले एकदम

इल्लु इल्लु पिल्लू ग
अजुन भलते टिल्लू ग

इल्लु इल्लु पिल्लू ग
अजुन भलते टिल्लू ग
नाक छोट तोरा मोठा
गाल रुसुन फुल्लू ग ।।धृ.।।

इल्लु इल्लु पिल्लू ग
अजुन भलते टिल्लू ग

गाल गुबगुब गोरे ग
डोळे लुकलुक तारे ग
हिलवा फ्लोक लिबिन लाल
कानी नील डुल्लु ग ।।1।।

इल्लु इल्लु पिल्लू ग
अजुन भलते टिल्लू ग
नाक छोट तोरा मोठा
गाल रुसुन फुल्लू ग

चिमणे चिमणे थिर थिर पाय
घरात रहायला राजी नाय
डोळा चुकवून पलतय हल्लू
पटकन होतय गुल्लू ग ।।2।।

इल्लु इल्लु पिल्लू ग
अजुन भलते टिल्लू ग
नाक छोट तोरा मोठा
गाल रुसुन फुल्लू ग

बडबड करणे धंदा ग
पक्का बोबल कांदा ग
हसता कोणी डोळ्यात पाणी
चोकलेट देता खुल्लू ग ।।3।।

इल्लु इल्लु पिल्लू ग
अजुन भलते टिल्लू ग
नाक छोट तोरा मोठा
गाल रुसुन फुल्लू ग

दमदम सारे दमती ग
तरी गमतीने रमती ग
कधी बाबांचा खांदा आणी
कधी आईचा पल्लू ग ।।4।।

इल्लु इल्लु पिल्लू ग
अजुन भलते टिल्लू ग
नाक छोट तोरा मोठा
गाल रुसुन फुल्लू ग

Wednesday, May 14, 2014

बदल

घर ऑफिस व ऑफिस घर प्रवास
काही म्हणजे काहीच परिवर्तन नाही
तोच रस्ता तीच माणसे तीच कामे
मनाला काहीच म्हणून बदल नाही

त्रुतू येतात हवेत बदल घडवतात
पण रूटीन बदल काहीच नाही
तोच तोच पणाचा कंटाळा आला
कंटाळ्याच्या तिव्रतेतही बदल नाही

जिंकणे हरणे चढ़ाओढ़ चालली नुसती
त्या मानसिकतेत बदल काहीच नाही
मैच निवडणुका कुठेही तुम्ही बघा
या सारया चर्चेत बदल काहीच नाही

दिवस रात्र पहाट दुपार संध्याकाळ
येतात जातात त्यात बदल काहीच नाही
तारीख वार वर्ष बदलतात फक्त
ते जाउनही बदल काहीच नाही

वय वाढले केस पिकले तरीही
माणसाच्या ज्ञानात वृद्धि काहीच नाही
मौनीबाबा जाऊन नमो आले जरी तरी
आपल्या जगण्यात बदल काहीच नाही

अपेक्षा ठेवून अच्छे दिन यायची वाट
उद्याच्या काळजीत बदल काहीच नाही
उम्मीद पे दुनिया कायम असते फक्त
वाकय तेच त्यात बदल काहीच नाही

                                --- निलेश जोशी