Wednesday, April 23, 2014

घरच्या घरी आइस क्रीम बनवा

घरच्या घरी आइस क्रीम बनवा

लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 
साहित्यः
दुध - १ वाटी/कप
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप
साखर - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 
वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागत
बर्फाचे खडे लागलेच तर पुन्हा मिक्ससर मधून फिरवून फ्रीजर मध्ये सेट व्हायला ठेवा

सौजन्य -- कविता जोशी

Sunday, April 20, 2014

निवडणुक

निवडणुक झेंडे  त्यांचा प्रचार
प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र उमेदवार

भाऊ दादा ताई माई अक्का
अमुक निशाणी त्यावर शिक्का

आम्ही पैश्याची केलेली साठवण
सर्वांची आता नेमकी आठवण

गरीब जनता ,सामान्य बेरोजगार
जाती ,आरक्षण ,दुर्लक्षित कामगार

आता या सर्वांची आली याद
त्यांना पोटतिड़कीने घालू साद

सर्वांचे प्रश्न समस्या अडचणी
निवारण्याची आश्वासने दिली सर्वानी

नविन जाहीरनामा सज्ज कार्यकर्ता
नविन आचारसंहिता बंधन सर्वाकरता

गरिबाला प्रचारात कामाची आशा
प्रचाराला चालते नोटांचीच भाषा

5 वर्ष आम्ही सर्व एकदम गप्प
कामाचा निधी लाटून काम ठप्प

प्रत्येक दारोदारी जाउन नमस्कार
यंदा मीच करणार चमत्कार

अरे तूच ना तो नेता आवारा
आठ पट संपत्ति दाखवणारा

गेल्या खेपेला निवडूनही
काहीच नाही करणारा

तूच शिवीगाळ करणारा
आम्हाला झिडकारणारा

पुन्हा मला निवडून दया
पाच वर्षांची सत्ता दया

यावर्षी पुन्हा तुम्हाला फसवू
मागील पानावरून पुन्हा चालू

तेच झेंडे तेच कार्यकर्ते
पक्ष बदलले नेते नाकर्तेच

तरी जनता मतदान करतेच
माहित असुनही दरवेळी फसतेच

रस्ते खराब तरी तुम्ही टोल भरा
पाणी विज नाही जनता तुम्ही मरा

जनता विखुरलेली हे नेत्याना ठाऊक
काय करतिल सगळे हे गिर्हाइक घाउक

मतदान पार पडले टक्का वाढला
धन्यवाद् जनता आता तू कोण कुठला

पुन्हा सामान्य दर दिवशी पिचतोच आहे
स्वत:ला जपत कुटुबांला जपतो आहे

आमदार खासदार आता काही वर्ष फिरकत नाही
लोकशाही असली तरी रोजची परवड थांबत नाही

वर्षे सरली महीने गेले पुन्हा निवडणुका आल्या
पुन्हा पहिल्यापासून वाचा त्यात बदल नसेलच झाला

                                          ----निलेश जोशी

Thursday, April 3, 2014

चारोळी

रस्ता आणि मन सुनसान आहे
काहुर उठलय मनात आहे
का असे जाणवते आहे
उलथापालथ मनात होते आहे