Tuesday, December 1, 2015

हतबलतेवर उपाय

दैनंदिन आयुष्यात अनेकदा मनुष्य परिस्थितीशी लढता लढता हतबल होतो. प्रत्येक वेळी अपयश येत रहाते. प्रकट आणि गुप्त शत्रूंची संख्या वाढत जाऊन त्यांच्या कारवायांनी हताश झाल्यासारखे वाटते. स्त्रीयांना काही वेळा त्यांच्या व्यावसायिक, नोकरीक्षेत्रात विकृत व्यक्तींशी संपर्क येतो...थोडक्यात जेव्हा सबंध जग विरोधात गेल्यासारखे वाटते तेव्हा....
श्रीदूर्गासप्तशतीमधील खालील मंत्र तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणू शकतो. रोज सकाळी आंघोळी नंतर खालील मंत्राचा जप देवी/कुलस्वामिनीचे स्मरण करून एकाग्रचित्ताने (न मोजता) सलग १५ ते २० मिनीटे करावा. हाच क्रम रात्री झोपण्यापूर्वी हातपाय धुवून पुनश्च आचरावा. सबंध दिवसभरातही या मंत्राचा जप अधुनमधुन करत रहावा. या मंत्राचा संबंध शुध्द भक्तिभावाशी आहे त्यामुळे यास कोणतीही बंधने नाहीत. केवळ शुक्रवार आणि मंगळवारी शक्यतो देविमंदीरात जाऊन प्रार्थनापूर्वक दर्शन घेणे अपेक्षित आहे..मंत्राचा जप करताना सकारात्मकता, देविवर श्रध्दा असावी. संकटमुक्तीनंतरही रोज कृतज्ञता म्हणून निदान २१ वेळा तरी मंत्रजप करत रहावा.

मंत्र :- "रक्षांसि यत्रोग्रविषाश्च नागा
यत्रारयो दस्युबलानि यत्र |
दावानलो यत्र तथाब्धिमध्ये
तत्र स्थिता त्वं परिपासि विश्वम् ||"

उच्चारणास सोपी फोड :-

रक्षांसि यत्रोग्र-विषाश्च-नागा
यत्रारयो दस्यु-बलानि यत्र |
दावानलो यत्र तथाब्धि-मध्ये
तत्र स्थिता त्वं परिपासि विश्वम् ||