Thursday, January 29, 2015

महाराणा प्रताप

आज महाराणा प्रताप पुण्यतिथि
त्याना त्रिवार वंदन करून त्यांच्याबद्दल थोड़ी माहिती घेऊ

भारताच्या इतिहासात शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच महाराणा प्रताप यांचेही नाव अजरामर झाले आहे. राणा प्रताप हे राजस्थानमधील एक शूर आणि स्वाभिमानी राजे होते.

        जयपूरचा राणा मानसिंग याने अकबरापासून आपल्या राज्याला धोका पोहोचू नये; म्हणून आपली बहीण देऊन त्याच्याशी सोयरीक केली होती. एकदा तो राजपुतान्यातून दिल्लीस जात असता वाटेत जाणूनबुजून आपल्या वैभवाचे प्रदर्शन करण्याकरता कुंभलगडावर असलेल्या राणा प्रताप यांच्या भेटीस गेला. राणा प्रताप यांनी त्याचा यथायोग्य आदरसत्कार केला; पण त्याच्या पंक्तीत बसून जेवण्यास नकार दिला. मानसिंगाने याचे कारण विचारता राणा प्रताप म्हणाले, ``स्वत:च्या समशेरीच्या बळावर आपल्या राज्याचे रक्षण करण्याकरिता जे रजपूत आपल्या मुली-बहिणी मोगलांना देऊन त्यांच्यापासून राज्याचे रक्षण करतात, अशा स्वाभिमानशून्य रजपुतांच्या पंक्तीला मी बसत नाही.''

        राणाजींच्या या घणाघाती वक्तव्याने डिवचला गेलेला मानसिंग वाढलेल्या पानावरून तसाच उठला आणि तेथून जाता जाता म्हणाला, ``प्रतापसिंह! रणांगणात तुझी मी वाट नाही लावली, तर नावाचा मानसिंग नाही !''

स्वामिनिष्ठ चेतक

        मानसिंग प्रचंड सैन्य आणि भरीला अकबराचा मुलगा सलीम यालाही घेऊन राणा प्रताप यांच्या पारिपत्याच्या मोहिमेवर निघाला. राणाजींना ही वार्ता लागताच त्यांनी अरवली पर्वतावरील वाटेने जाणाऱ्या मानसिंगाच्या सैन्यावर छुपे आक्रमण करून त्याचे बरेच सैनिक गारद केले. राणा प्रताप यांच्या तलवारीच्या घावाने शहाजादा सलीम ठार होणार होता; पण वेळीच त्याने हालचाल केल्यामुळे तो वार त्याच्या हत्तीवर बसला. मानसिंग तर राणा प्रताप यांच्या तलवारीच्या धाकाने स्वत:च्या सैन्याच्या पिछाडीला राहिला. राणाजी आपल्या तळपत्या तलवारीने वेढा कापून निसटून जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात कुणा शत्रूसैनिकाने राणाजींचा घोडा चेतक याच्या एका पायावर तीर सोडून त्याचा पाय निकामी केला. तशाही स्थितीत तो स्वामिनिष्ठ घोडा चौखूर दौडत पाठीवरच्या धन्याला घेऊन त्या वेढ्याचा भेद करून दूर दूर जाऊ लागला. तेवढ्यात वाटेत एक ओढा लागला. चेतकने उडी घेऊन तो ओढा पार केला आणि ऊर फुटेपर्यंत धावल्यामुळे त्याने त्याच क्षणी प्राण सोडला.

        आपला पाठलाग कोण करत आहे, हे पहाण्यासाठी राणा प्रताप यांनी मागे नजर टाकली, तर अकबराला जाऊन मिळालेला आपला धाकटा भाऊ शक्तीसिंह हा त्याच्या समवेत आलेल्या चार-पाच मोगल सैनिकांना जिवे मारत होता. राणाजी ते दृश्य पाहून अचंबित झाले. तेवढ्यात त्या पाचही शिपायांचे प्राण घेऊन शक्तीसिंह राणाजींजवळ आला आणि त्यांना आलिंगन देऊन म्हणाला, ``दादा ! तुझ्यासारखे असीम शौर्य आणि कणखर मन यांच्या अभावी मी जरी मोगलांची सरदारकी करत असलो, तरी तूच माझा आदर्श आहेस. तुझ्यापुढेच काय; पण तुझ्या त्या निष्ठावंत घोड्यापुढेही मी तुच्छ आहे.''

        मेवाडचा इतिहास लिहिणारा कर्नल टॉण्ड याने राणा प्रताप यांचा गौरव करतांना म्हटले आहे, `प्रबळ महत्त्वाकांक्षा, शासन निपुणता आणि अपरिमित साधनसंपत्ती यांच्या जोरावर अकबराने दृढनिश्चयी, धैर्यशाली, उज्ज्वल कीर्तीमान आणि साहसी अशा प्रतापला नमवण्याचा प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला.'

--निलेश जोशी

Sunday, January 11, 2015

नुसतच कविता लिहिणं - या उपक्रमात माझी कविता

नुसतच कविता लिहिणं

१२७ - नुसतच कविता लिहिणं - या उपक्रमात माझी कविता

मनात स्वतःच्याही नकळत डोकावणं
आतून आलेल्या भावना वहीवर लिहिणं
त्या भावनांना शब्दरूपी कोंदण देणं
सोप्प नाहीये नुसतच कविता लिहिणं

कधीतरी मनाला पडलेला प्रश्न मांडणं
त्या प्रश्नालाही लागू होणारे उत्तर शोधणं
मानसिक द्वंद्वाला नेमक्या शब्दात पकडणं
सोप्प नाहीये नुसतच कविता लिहीणं

विचार मांडत असताना त्यांच्या अधीन न होणं
तोलुन मापून चपखल शब्द निवड करणं
समर्पक अर्थपूर्ण अश्या शब्दात वृत्त बांधणं
सोप्प नाहीये नुसतच कविता लिहिणं

---निलेश जोशी

अर्पण

पारिजातकाचा सुवास दरवळ
कुंद हवा ही हवेत हिरवळ
थंडी दाटुन येते अंगावर
काटा सरकन फूलते ती लव

थंडी म्हणुनी अंगात स्वेटर
हातात मोजे गळ्यात मफलर
मजेच्या खोट्या सिगारेटचे झुरके
कॅनव्हासच होते काच दवमय

अशावेळी अचानक थबकतो मी
दिसतो एक कुडकुडणारा वृद्ध
हात चोळत थंडी घालवतो तो
शेकोटी पेटवून वातावरण धुरमय

मिटून टाकला स्वेटरचा उबदारपणा
मनातील शहाणपण केले कृतीमय
हुडहुडी असूनही आता मी उबदार
त्याला स्वेटर मफलर केला अर्पण

==निलेश जोशी.

Saturday, January 10, 2015

To Listen be silent

To Listen be silent #निलउवाच

काल यूट्यूब वर एक विडिओ बघत होतो त्यात एक एक संदर्भ आला
कम्युनिकेशन - संवाद हा उत्तम तेव्हाच होतो जेव्हा आपण श्रवण करतो
आपल्याला असे वाटते की ऐकणे - hearing व listen -- श्रवण करणे हे समानार्थी शब्द आहेत
पण तसे नाहीये
hear शब्दाचा डिक्शनरी अर्थ आहे
To perceive sounds through the ear किंवा
To perceive (a sound, or something producing a sound) with the ear, to recognize (something) in an auditory way
अर्थात कानाच्या माध्यमातून आवाज ग्रहण करणे

listen शब्दाचा डिक्शनरी अर्थ आहे
To pay attention to a sound or speech.
To expect or wait for a sound, such as a signal.
To accept advice or obey instruction; to agree or assent.
अर्थात कानाच्या माध्यमातून लक्षपूर्वक ग्रहण करणे व त्याचा योग्य अर्थ लावणे

Listening power -- श्रवणशक्ति वाढ़वण्यासाठी परिश्रम मेहनत घ्यावी लागते
पोषक वातावरण निर्माण करावे लागते

Listen व silent हे दोन्ही शब्द परस्परपूरक आहेत
silent म्हणजे मन बुद्धी एक करून शांत मौन रहाणे
LIS-TEN व SIL-ENT दोन्ही शब्द काळजीपुर्वक बघीतले तर
LIS उलट लिहिले तर SIL
TEN उलट लिहिले तर ENT होते
म्हणजेच LISTEN करण्यासाठी SILENT व्हा हे आपल्याला शब्दच सांगतात

किती सुंदर ना ??
मला सर्वांशी शेअर करावेसे वाटले म्हणून हा पोस्ट खटाटोप

--निलेश जोशी

Wednesday, January 7, 2015

वेश व पोशाखाचे महत्त्व

काल रत्नागिरीला राष्ट्र कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे बुवा यांचे बाजीराव पेशवे या विषयावर कीर्तन झाले
त्याचा काही रिकॉर्डिंग मला घरबसल्या व्हात्सप्प वर मिळाले व प्रगत तंत्रद्यानाला मनापासून दाद दिली आणि रेकॉर्डिंग पाठवणारया माझ्या भाच्याला पण मनोमन धन्यवाद् दिले.

कीर्तन पूर्ण ऐकले ,बरेच माहित नसलेले मुद्दे व माहिती मिळाली, त्यात बुवानी एक छान माहिती सांगितली
आजकाल पोशाख कोणताही घातला जातो , बलात्कार होतात त्याला पोशाख जबाबदार नाही हे पटवून दिले जाते ,आजकाल महाविद्यालये फैशनच्या विळख्यात गुरफुटूून काहीही वेश परिधान केला जातो.

त्यावर विवेचन करताना बुवानी खुप महत्वाचा मुद्दा मांडला , ते म्हणतात सर्वबाजुनी आपण आपल्याला समृद्ध करण्यासाठी ज्ञान,विद्या,प्रगत तंत्र याचा अवलंब करत आहोत तर त्याबरोबरच वेश पोशाखदेखील साजेसा असावा
प्रत्येक व्यवसायात ड्रेस कोड ठरलेला आहे जसे पोलिस ,जज, ऑपरेशन थेटर मधील डॉक्टर
त्या वेशानुरूप त्या माणसाची मानसिक स्थिती ठरते,त्यामुळेवेश परिधान केल्यावर आरशासमोर उभे राहून फक्त स्वतःचे निरिक्षण करावे की "माझा आजचा पोशाख माझ्या मनाची प्रगती सांगते आहे का?"
अर्थात जसे एखाद्या मुलाला गुंडाचे चित्र काढायला सांगितले तर तो टीशर्ट, पैंट ,गळ्यात रुमाल, चैन ,तोंडात पान वा सिगरेट असे काढेल कारण गुंड म्हटले की असा वेश असतो हे मनाने अधोरेखित केलेले असते

बुवानी अतिशय गहन अर्थ पण साधा सोपा करून सांगितला
मला इमेल एड्रेस मेसेज केल्यास या क्लिप 2 सवडीनुसार पाठवेंन
आफ़ळे बुवाना मनापासून नमस्कार
आपला अभिप्राय अपेक्षित

-- निलेश जोशी

Friday, January 2, 2015

धर्मराजाचे दुर्गास्तवन


श्री गणेशाय नमः|
नगरी प्रवेशले पंडुनंदन| तो देखिले दुर्गास्थान|धर्मराजा करी स्तवन|जगदंबेचे तेधवा||१||
जय जय दुर्गे भुवनेश्वरी|यशोदागर्भसंभवकुमारी|इंदिरारमणसहोदरी|नारायणी चंडीके अंबीके||२||
जय जय जगदंबे भवानी|मूळप्रकृती प्रणवरुपिणी|ब्रह्मानंदपददायिनी|चिद्विलासिनी जगदंबे||३||
जय जय धराधरकुमारी|सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरी|हेरंबजननी अंतरी|प्रवेशी तू अमुचिया||४||
भक्तहृदयारविंद्रभ्रमरी| तुझिया कृपावलोकने निर्धारी|अतिमूढ तो निगमार्थ करी|काव्यरचना अद्भुत||५||
तुझिया आपंगते करून|जन्मांधासी येती नयन|पांगुळ धावे पवनाहून|करी गमन त्वरेने||६||
जन्माधाराभ्य जो मुका|होय वाचस्पतीसम बोलका|तू स्वानंदसरोवरमराळिका|होसी भाविका सुप्रसन्न||७||
ब्रम्हानंदे आदी जननी|तव कृपेची नौका करुनी|दुस्तर भवसिंधू लंघोनी|निवृत्ती तटा नेईजे||८||
जय जय आदी कुमारीके|जय जय मूळपीठनायिके|सकल सौभाग्यदायिके|जगदंबिके मूळप्रकृती||९||
जय जय भर्गप्रियभवानी|भवनाशके भक्तवरदायिनी|समुद्रकारके हिमनगनंदिनी|त्रिपुरसुंदरी महामाये||१०||
जय आनंदकासारमराळिके|पद्मनयन दुरितकानन पावके|त्रिविध ताप भवमोचके|सर्व व्यापके मृडानी||११||
शिवमानस कनक लतिके|जय चातुर्य चंपक कलिके|शुंभनिशुंभ दैत्यांतके|निजजनपालके अपर्णे||१२||
तव मुखकमल शोभा देखोनी|इंदुबिंब गेले गळोनी|ब्रम्हादिके बाळे तान्ही|स्वानंदसदनी नीजवीसी||१३||
जीव शीव दोन्ही बालके|अंबे तुवा नीर्मीली कौतुके|जीव तुझे स्वरुप नोळखे|म्हणोनी पडला आवर्ती||१४||
शीव तुझे स्मरणी सावचित्त|म्हणोनी अंबे तो नित्यमुक्त|स्वनंदपद हातासी येत|कृपे तुझ्या जननीये||१५||
मेळवुनी पंचभूतांचा मेळ|तुवा रचिला ब्रह्माडगोळ|इच्छा परतता तत्काळ|क्षणात निर्मूळ करीसी तू||१६||
अनंतबालसूर्य श्रेणी|तव प्रभेमाजी गेल्या विरोनी|सकल सौभाग्य शुभकल्याणी|रमा रमणे वरप्रदे||१७||
शंबरारी रिपुवल्लभे|त्रैलोक्यनगरारंभस्तंभे|आदिमाये आदिप्रभे|सकळारंभे मूळप्रकृती||१८||
जय जय करुणामृतसरीते|निजभक्तपालके गुणभरीते|अनंत ब्रह्मांडपालके कृपावंते|आदिमाये अपर्णे||१९||
सच्चिदानंद प्रणवरुपिणी|चराचरजीव सकलव्यापिणी|सर्गस्थित्यंतकारिणी|भवमोचनी महामाये||२०||
ऐकोनी धर्मराजाचे स्तवन|दुर्गादेवी झाली प्रसन्न|म्हणे तव शत्रू संहारून|रीज्यी स्थापीन धर्मा तू ते||२१||
तुम्ही वास करावा येथे|प्रकटो नेदी जनाते|शत्रू क्षय पावती तुमचे हाते|सुख अद्भुत तुम्हा होय||२२||
तुवा जे केले स्तोत्रपठण|हे जो करील पठण श्रवण||त्यासी सर्वदा रक्षीन|अंतर्बाह्य निजांगे||२३||

श्री महालक्ष्मी अष्टकम

श्री महालक्ष्मी अष्टकम

नमस्तेस्तु महामाये श्री पीठे सुर पूजिते !

शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते !!

नमस्तेतु गरुदारुढै कोलासुर भयंकरी !

सर्वपाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते !!

सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी !

सर्वदुख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते !!

सिद्धि बुद्धि प्रदे देवी भक्ति मुक्ति प्रदायनी !

मंत्र मुर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते !!

आध्यंतरहीते देवी आद्य शक्ति महेश्वरी !

योगजे योग सम्भुते महालक्ष्मी नमोस्तुते !!

स्थूल सुक्ष्मे महारोद्रे महाशक्ति महोदरे !

महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते !!

पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी !

परमेशी जगत माता महालक्ष्मी नमोस्तुते !!

श्वेताम्भर धरे देवी नानालन्कार भुषिते !

जगत स्थिते जगंमाते महालक्ष्मी नमोस्तुते!!

महालक्ष्मी अष्टक स्तोत्रं य: पठेत भक्तिमान्नर:!

सर्वसिद्धि मवाप्नोती राज्यम् प्राप्नोति सर्वदा !!

एक कालम पठेनित्यम महापापविनाशनम !

द्विकालम य: पठेनित्यम धनधान्यम समन्वित: !!

त्रिकालम य: पठेनित्यम महाशत्रुविनाषम !

महालक्ष्मी भवेनित्यम प्रसंनाम वरदाम शुभाम !!

Perseverance

Perseverance

An eight-year-old child heard her parents talking about her little brother. All she knew was that he was very sick and they had no money left. They were moving to a smaller house because they could not afford to stay in the present house after paying the doctor's bills. Only a very costly surgery could save him now and there was no one to loan them the money.

When she heard her daddy say to her tearful mother with whispered desperation, 'Only a miracle can save him now', the little girl went to her bedroom and pulled her piggy bank from its hiding place in the closet. She poured all the change out on the floor and counted it carefully.

Clutching the precious piggy bank tightly, she slipped out the back door and made her way six blocks to the local drugstore. She took a quarter from her bank and placed it on the glass counter.

"And what do you want?" asked the pharmacist. 

"It's for my little brother," the girl answered back. "He's really very sick and I want to buy a miracle."

"I beg your pardon?" said the pharmacist.

"His name is Andrew and he has something bad growing inside his head and my daddy says only a miracle can save him. So how much does a miracle cost?"

"We don't sell miracles here, child. I'm sorry," the pharmacist said, smiling sadly at the little girl.

"Listen, I have the money to pay for it. If it isn't enough, I can try and get some more. Just tell me how much it costs."

In the shop was a well-dressed customer. He stooped down and asked the little girl, "What kind of a miracle does you brother need?"

"I don't know," she replied with her eyes welling up. "He's really sick and mommy says he needs an operation. But my daddy can't pay for it, so I have brought my savings".

"How much do you have?" asked the man.

"One dollar and eleven cents; but I can try and get some more", she answered barely audibly.

"Well, what a coincidence," smiled the man, "A dollar and eleven cents - the exact price of a miracle for little brothers."

He took her money in one hand and held her hand with the other. He said, "Take me to where you live. I want to see your brother and meet your parents. Let's see if I have the kind of miracle you need." 

That well-dressed man was Dr Carlton Armstrong, a surgeon, specialising in neuro-surgery. The operation was completed without charge and it wasn't long before Andrew was home again and doing well.

"That surgery," her mom whispered, "was a real miracle. I wonder how much it would have cost."

The little girl smiled. She knew exactly how much the miracle cost ... one dollar and eleven cents ... plus the faith of a little child.

Perseverance can make miracles happen!

And Very nice lines

A river cuts the rock not because of its power,but because of its consistency.
Never lose your hope & keep walking towards your vision..