Sunday, May 24, 2015

शर्यत

जगाची ही ससा कासव शर्यत
जो कोण पुढे जाईल तो हुशार
पालकांच्या अपेक्षांचे ओझे डोईवर
टक्के श्रेणी यांतच बालपण विझणार

हे वय नविन शिकण्याचे जगण्याचे
तेथे अभ्यास म्हणजेच ठरतोय रट्टा
ही शर्यत ठरतेय मुलांसाठी धोका
निरागस वयात देई तणावाचा ठोका

जेव्हा झाली वयाची 3 वर्षे पूर्ण
नर्सरीत मुलाला पालक देती प्रवेश
घरी दंगा त्रास धूड़गुस घालण्यापेक्षा
4 तास घ्यावा मुलाने अभ्यासाचा आवेश

खरे बालपण आपले अनुभवुन झाले
बालकांनी मात्र आता मच्युअर व्हायचे
कला क्रीड़ा यात काय ठेवलय बाळा
थिअरीओझे वाहून तू फ़क्त विचारी व्हायचे

-- निलेश जोशी