अन्न गरज शरीराची
त्याला अशक्य टाळणे
परी अन्नदाता वेगवेगळे
जीवनाच्या सर्व टप्प्यावरी
गर्भामध्ये आई थोर
भरवी अन्न रक्तातुनी
गर्भाच्या ज्या ज्या इच्छा
पुरवी दाखवुनी डोहाळे
जन्म झाल्यावरी
देई प्रत्यक्ष अमृत
जरी म्हणती जग
सारे त्याला दुग्धपान
होता एक वर्ष पूर्ण
सप्तसंस्कार अन्नप्राशन
मऊ भात खीर प्रथमे
परअन्न प्रथमघास तो
आई होई मग अन्नदाता
पुरवी सर्व मागण्या
गोड तिखट चवदार
हट्ट पुरे तीच करणार
घर सुटता अभ्यासा
मेस हॉटेल हेच जग
तेथे समजे प्रथम
अन्न हेच पूर्णब्रम्ह
जग भ्रमंती करता
बरे वाईट चविष्ट
अनेक ठिकाणे होती
ना अथवा आवडती
लग्न होता यथावकाश
पुनः गवसे अन्नपूर्णा
आई नंतर पत्नी ती
बने अन्नदाता पुनः
नविन मिळती अन्नदाता
शेजारी मित्र व मुले
नविन पाक कृति प्रयोग
चाले या गिनीपिगवरी
ऐसे हे अन्न चक्र
अव्याहत असे चालते
खरा अन्नदाता कृषक
नेहमीच दुर्लक्षित
सलाम करुनी कृषका
करू व्यक्त कृतज्ञता
जेवण संपवता म्हणुया
अन्नदाता सुखी भवः
--निलेश जोशी
No comments:
Post a Comment