परवा कुठेतरी गेलो होतो. तिथला एक फलक नजरेत भरला.
वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे | सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे
कृषीवल-कृषीकर्मी राबती दिनरात | श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात
करुनी स्मरण त्यांचे अन्न सेवा खुशाल | उदर भरण आहे चित्त होण्या विशाल
या ओळींचा निर्माता कोण हे मला माहित नाही. पण या माणसाला ‘खाण्याचं अध्यात्म’ कळलंय.
…अखेर मला ‘जातिवंत खवैय्या’ सापडलाय !
2 comments:
मला वाटते की ही रचना साने गुरूजींची किंवा संत तुकडोजी महाराजांची आहे. दापोलीतील श्री दिलीप कुलकर्णींनी याचा खूप प्रसार केला आहे.
ही रचना माझे वडील कै. रामचंद्र इनामदार यांची आहे. सानेगुरुजी कथामालेच्या संस्कार शिबिरांमध्ये सर्वधर्मिय मुले असत. त्यांना म्हणण्यासाठी १९७१ साली खालापूर इथे कथामाला शिबीर होते, तेंव्हा हा श्लोक त्यांनी रचला. सानेगुरुजी कथामालेमार्फत या श्लोकाचा प्रसार महाराष्ट्रभर शाळाशाळांतून व विद्यार्थी वासतिगृहातून झाला.
Post a Comment