हिरवे ( Yes, GREEN ) अथवा मटार भेळ
तयारी ला लागणार वेळ : 15 minutes
बनवण्याचा वेळ : 10-12 minutes.
अंदाजे ३ जाणां साठी
सकाळी किंवा संध्याकाळ साठी
बनवण्यास लागणारे जिन्नस:
२५०-३०० gms* सोललेला ताजा हिरवागार मटार
२ माध्यम आकाराचे कांदे
२ बारीक चिरलेली मिरच्या
१ टेबल स्पून मोहऱ्या ,
१ टेबल स्पून जिरे
१/२ टेबल स्पून हिंग
१ टेबल स्पून हळद पावडर
३-४ टेबल स्पून तेल .
१/२ बाउल खवलेला ओला नारळ
चिरलेली कोथिंबीर
१ रसाळ लिंबू
सैंधव चवी नुसार
नायलॉन शेव (हवी असल्यास )
कृती :
कांदा बारीक चिरावा
मिक्सर मध्ये मटार आणि मिरच्या अर्ध बोबड्या* वाटून घ्या (*एकदम बारीक नको)
कढई अथवा पॅन मध्ये तेल तापवा
चांगले तापल्यावर मोहरी, जिरे घालून - चांगले तडतडल्या वर हिंग , हळद घाला
लगेच मिक्सर मधला मटार आणि मिरच्या घाला
एकदा सर्व एकत्र करा/ ढवळून घ्या , व झाकण ठेऊन वाफ काढा
साधारण ५ मिनीटांनी चेक करा
जरूर असल्यास आणखी २-३ मिनिटे झाकण ठेवा
आता सैंधव चवी नुसार घालून चांगले एकत्र करा .
कोणाला जर थोडे ब्राउन हवे असेल तर जास्ती वेळ न परतता तसे होऊंद्या
प्लेट मध्ये घेऊन , वरून चिरलेला कांदा , खोवलेला नारळ , चिरलेली कोथिंबीर , हवी असल्यास शेव आणि वरून लिंबू पिळून सर्व्ह करा .
हा पदार्थ बाहेर कुठे मिळत नाही - माझ्या आत्याची खास रेसिपी आहे ( लहान पणीच्या आठवणी )- मी एका कूकिंग स्पर्धेत करून खिलवली होती - नक्कीच नवीन काही तरी सदरात आहे आणि सध्या हिवाळयात मटार चा हंगाम आहेच
--पोस्ट बाय श्रीनिवास जोशी
No comments:
Post a Comment