Tuesday, November 28, 2017

भगवंताची करणी

पारंपरिक अभंग

अधांतरी हे झुले नभांगण
शेष फणावरी धरणी
सारी भगवंताची करणी

लक्ष्मीसाठी घर दैवाचे
उंच बांधुनी देतो
गरिबांसाठी गरीब होऊनी
झोपडीतही रमतो
पतीतासंगे पतित होऊनी
चालतसे अनवाणी
सारी भगवंताची करणी

समुद्रा जरी अथांगपाणी
तहान शमवी श्रावण धार
अन्नब्रम्ह ते अखंड घेते
काळ्या मातीतून अवतार
जगण्यासाठी जरी मानवा
लाग प्रभूच्या चरणी
सारी भगवंताची करणी

No comments: