Monday, April 20, 2015

काही चुकले का ?? सत्यकथा

परवा रविवारची गोष्ट

पिंपरी येथे किराणा घाऊक दरात स्वस्त मिळतो म्हणून मी व माझी बायको कविता पिंपरीला आलो
गाड़ी पार्क केली मी माझे काही हार्डवेअर सामान घेवून किराणा दुकानासमोर आलो.
कविता म्हटली मी आलेच तेल गहु वैगरे जुजबी सामान घेवून मी बाहेर गाडीवर बसून वाट बघतोय,
ईतक्यात एक वृद्ध जोडपे आले
"दादा ,मदत दया काहीतरी"
अगदी काल परवाच फेसबुक वर अशा लोकांना भिक देवु नका वैगरे मौलिक सल्ले ऐकले होते
त्या विचारांच्या अमलाखाली मी असल्याने अर्थात दुर्लक्ष केला व मान फिरवली
"दादा , खाण्यापुरते हाएत पैसे , ह्यांना सकाळ पासून ताप हाये, डाक्टर कड़े जायाला पैसे हवेत "

मी क्षणभर त्या खंगलेल्या वृद्ध मांणसाकडे बघितले खरच ताप आलेला दिसत होता
"पांडुरंग कृपा करेल ,तुमच्या लेकाला कायपण कमी पडू नाय देणार "

द्विधा मनस्थिति अनुभवत होतो तरी मनाने निर्णय घेतला व त्याना 50 रुपये हातात दिले ,मला वाटले हे जोड़पे आता पैसे घेवून दुसऱ्या एखाद्या मांणसाकडे जातील पण इतर कोणाच्याकडे न जाता समोरच्या दवाखान्यात शिरताना दिसले .

क्षणभर वाटले 100 रु द्यायला हवे होते
क्षणभर वाटले आपण स्वतः डॉक्टर ला भेटून पैसे द्यायला हवे होते एक ना दोन ,
मग विचार केला दान दिले ना मग त्याचा सदुपयोग होवो की दुरूपयोग होवो नंतर का विचार करा ??

थोड्या वेळाने कविता किराणा सामान घेवून आली ,मी
विचारले काय ग किती रुपये वाचले असतील इकडे एवढ्या लांब आलो खरेदीला ??
"चिंचवडला तेल 85-90 मिळते इकडे 75 ला मिळते ,
5 लिटर घेतले म्हणजे साधारण 50 रुपये वाचले "
आता तिला काहीच माहिती नव्हती पण मी मनोमन त्या जगनियंत्याच्या एडजस्टमेंटला व जुळवाजुळवीला मनोमन नमस्कार केला.

काही मला पडलेले प्रश्न
1.मी त्या जोडप्याला पैसे दिले चूक की बरोबर
2.असे कोणी गरजू आले म्हणजे काही खरेही असतील काही ढोंग पांघरून येतील आपण भाळावे का?
आपले विचार सांगा व मार्गदर्शन करा.

No comments: