Saturday, February 28, 2015

अवकाळी पाउस

28 फेब्रुवारी 2015,
दिवसभर खुप उकाडा जाणवत होता
अरुण जेटली यानी बजेट जाहिर केले वर्ल्डकप मध्ये
भारत vs UAE मैच आपण जिंकलो
तर AUS VS NZ अतितटीची मैच NZ जिंकुन गेला
अचानक 3 नंतर पाउस चालू झाला
सर्व थरात मिश्र भावना व्यक्त होवू लागल्या
कशा त्या पाहुया या कवितेत...

वेळी अवेळी पाउस आला
मुलांना आनंद देऊन गेला
परीक्षा शाळा ताण तणाव
क्षणभर सर्व विसरवुन गेला

कामावर स्टाफ, अचानक पाउस आला
वीकेंड मज्जा पार्टी माहौल बनवला
ऑफीस संपल्यावर जमाव जमला
पिनेवालों को पिनेका बहाना देऊन गेला

अवेळी गृहिणीना चिडचिड देऊन गेला
त्यांची वीकेंड खरेदी भिजवून गेला
नवरयाचा पार्टीमुळे न येण्याचा फोन
त्यांच्या मनाची तगमग वाढवून गेला

ज्येष्ठ मंडळी घरातच, कंटाळवुन गेला
सायंफेरी, मित्र ,दर्शन सर्व हुकवुन गेला
पेपर मध्ये स्वाइन फ्लू लक्षणे वाचलेली
घरातल्याच्या तब्येतीची काळजी देऊन गेला

सकाळीच शेती माल बघून आलेल्या
मनोमन अंदाज बांधणारया शेतकरयाच्या
हाता तोंडाशी आलेल्या घास घेवुन गेला
मनाला अपार काळजी विवंचना देवून गेला

वेळी अवेळी नुकसानी पाउस आला
देवाजीच्या मनात काय हे सांगुन गेला
मिश्र भावना सर्वांच्या मनात पेरुनी
सर्व स्तरात आनंद दुःख काळजी देवून गेला

--- निलेश जोशी

No comments: