Showing posts with label आठवण स्मरण. Show all posts
Showing posts with label आठवण स्मरण. Show all posts

Tuesday, September 1, 2015

आठवण

आठवण म्हणजे काय
मनातील कडू गोड साठवण
हळुवार मनाच्या कप्प्यात
जपून ठेवलेले ते क्षणकण

काही गोड वा काही कडू
काही वाटे पुनः अनुभवासे
काही वाटे नको पुनः ते
काही जपून ठेवायचे बंधन

आठवण एक मानसिक प्रवास
मनाच्या हिंदोळ्यावर करण्याचा
आठवण एक स्मरण झूला
ना त्याला वेळ काळाचे बंधन

आठवण करी प्रफुल्लीत मन
कधी देई वेदनांचा अनुभव
कधी दाखवुनी समोरी आरसा
देई आपणा तात्विक शहाणपण

एखादा किस्साही होते आठवण
एखादे स्थळ ही होते आठवण
जूना फ़ोटो वा वस्तु हांतातील
मनात जपलेली क्षणांची साठवण

जपुनी जुन्या गोड आठवणी
जगुया पुनः जोमाने आता
कधीतरी दवडुनी जास्तीचा वेळ
जागवुया पुनः ते जगलेले क्षण

--निलेश जोशी