Tuesday, March 1, 2016

मराठीने मला काय दिले?

उत्तम शब्द उत्तम संस्कार
उत्तम वाणी उत्तम विचार
सर्वोत्तम माझी भाषा मराठी
मराठीने मला हे सर्व दिले

काय घ्यावे काय टाळावे
काय चाहत काय जरुरत
चांगले वाईट यांची तुलना
मराठीने मला हे सर्व दिले

स्तोत्रे श्लोक व शुभंकरोती
ओव्या, लयबद्ध काव्यपंक्ती
वृत्ते काव्य अर्थपूर्ण गझला
मराठीने मला हे सर्व दिले

मनातील द्वंद्व मराठीमधूनी
वादविवादही त्याच भाषेमधुनी
स्तुतीपर शब्दांचा अगाध कोष
मराठीने मला हे सर्व दिले

बोलीभाषा जरी मालवणी
आईची भाषा असे कोकणी
कुशीत घेऊन पुरविले लाड
मराठीने मला स्वातंत्र  दिले

सुविचार म्हणी सर्वाचा खजाना
अभंग वृत्तपत्रे पुस्तकांचा साठा
भाषणे लेख मजकूर विचारा
मराठीने मला हे सर्व दिले

अनेक मित्र खेळ सवंगडी
लेख निबंध पद्यरचनेची गोडी
विदा पूल विवा वपु खांडेकर
मराठीने नेहमीच भरभरून दिले

-- निलेश जोशी

Monday, February 29, 2016

सरितेचें चरित


करिते का कधिं खंत
सरिता करिते का कधिं खंत ? ll ध्रु ० ll

रांगत लोळत दौडत घोळत
कडेकपारींतुनी खळाळत
                       आक्रमिते निज पंथ ll १ ll

फुलो चांदणें, असो ग्रीष्मदिन
असो तमिस्त्रा ढगाळ भीषण
                    समान शिशिर वसंत ! ll २ ll

कुणीं आणिली घागर मृण्मय
पखाल किंवा कलश हिरण्मय
                            पहावया न उसंत ll ३ ll

करोत मज्जन रूप-यौवना,
दुर्जन, सज्जन, जरठ, अंगना
                         असो रंक धनवंत ! ll ४ ll

करोत कोणी अस्थि-विसर्जन
ताबुत किंवा देव गजानन;
                        स्वागतशील उदंत ! ll ५ ll

मरुभूमींतुन दहनभूमींतुन
गात चालली एकच गायन
                       'करुं जग शोभावंत !' ll ६ ll

भेदभाव परि निर्मुनि; मानव
होई दानव; तरंगिणी लव
                           गणी न हंस तरंत ll ७ ll

असें संतसम जीवित आंखुन
आसमंत ही करीत पावन
वरितें सिंधु अनंत
            सरिता विश्रुत-चरित दिगंत. ll ८ ll

— यशवंत (१-३-१९३६)

आठवते ना


आठवते ना-
ओढयाकाठी अपुल्या घरची
गाय घेऊनी धावत होतो
चरावयाला सोडूनिया तिज
पारंब्यावर लोंबत होतो !
आठवते ना-
डोहामधले स्वैर डूंबणे
अंगावरचे ओले कपडे
अंगावरती तसेच सुकणे,
सुकता कपडे पुन्हा पोहणे

आठवते ना-
करवंदाचा चीक बिलगता
बोटे अपुली बसली चिकटून
अन कैऱ्यांच्या दिवसामध्ये
हातकातडीं गेली सोलून
आठवते ना-
हातामध्ये हात घालुनी
अर्धा डोंगर गेलो चढूनी
वर्गामधल्या गोष्टी बोलत
उन्हात फिरलो शेतांमधूनी

मला तरी नित आठवते गा
आठवते ते फुलते जीवन
आक्रसलेल्या चाळीमध्ये
उबगुनी जाता देह आणि मन

– वि. म. कुलकर्णी

Saturday, January 9, 2016

रात्र व आजचा खेळ उद्या पुन्हा एकत्र

ही हकीकत सत्य घटना आहे साधारण 4 महिन्यापूर्वीची व घाबरवून टाकणारी आहे.
रात्रीची वेळ व चिडीचूप शांतता होती.
आम्ही बेडरूम मध्ये झोपलो होतो व अचानक साप पुत्कारतो तसा आवाज यायला लागला,
पुत्कार जणू कोणी मोठयाने उश्वास सोडतोय
2 दिवसापूर्वीच आमच्याच बिल्डिंग मध्ये 3 ऱ्या मजल्यावर गच्चीत साप निघाला होता आम्ही तर पहिल्या मजल्यावर

बाप रे .....

मी धीर एकवटून बाहेर आलो कोठून आवाज येतो हे बघायला तर किचन च्या खिडकीच्या बाहेरून आवाज येतो असे वाटले.
मी बॅटरी घेऊन त्या दिशेने गेलो तर पुन्हा पुत्कार आवाज आला .
मी घाबरून मागे वळलो व कविताला जागे केले
किचन खिडकीत पण बिल्डिंग खाली जाऊन बघतो असे सांगून मी खाली आलो .
पण खालून बघितले खिडकीत चिटपाखरुही नव्हते
पुन्हा वर आलो  व कानोसा घेतल्यावर असे जाणवले कि आवाज किचन मध्येच येतोय .
तोपर्यंत 5 वाजले
आम्ही 1 तास जीव मुठीत धरून तर्क लावत बसलो
6 वाजल्यावर तळ मजल्यावरील काकांना सर्व प्रकार सांगितला व त्याच्या ओळखीच्या सर्पमित्राला  त्यांनी बोलावून घेतले.
ते आले व पुत्कार ऐकून तेही हादरले ,
त्यांच्या अनुभवानुसार असा आवाज फक्त सर्वात विषारी घोणस करतो .
त्यांनी पूर्ण स्वयंपाक घर शोधले पण कोणीच नाही
आवाज मात्र मध्येच यायचाच,
its horrible
त्यांनी शेवटी फ्रिज बंद केला व फ्रिज उघडून सरकवून बघितला कोणीच नाही पण आवाज बंद झाला .
त्यांचा निष्कर्ष फ्रिज गॅस लीक होतोय व त्याचा आवाज होता चांगल्या रिपेरमन बोलवून फ्रिज दाखवून घ्या .

संध्याकाळी फ्रिज माणसाला बोलावून सर्व फ्रिज चेक केला त्याने सांगितले गॅस लीक वगैरे काहीच नाही पण त्या 7 तासात काही वेळाने पुत्कार ऐकू येतच होते पण प्रमाण कमी झाले होते.
फ्रिज आवरून नीट ठेवला पुत्कार बंद झाले आम्ही सुटकेचा निश्वास सोडला .
आजचा खेळ उद्या पुन्हा
दुसरा दिवस पहाटे पुनः साडेतीन च्या आसपास पुत्कार चालू झालें,
पुनः त्या सर्पमित्राला बोलवले ,
पुन्हा शोधाशोध पुन्हा सर्व किचन ढुंढाळने
काहीच नाही .
आवाज कोणता? खूप उत्सुकता .
फ्रिज च्या तिथून आवाज पण फ्रिज मध्ये काहीच नाही
फ्रिजच्या वरील सर्व सामान जमिनीवर खाली ठेवले व पुत्कार रोख आता जास्त जोरात पण जमिनीवरून

"अरे चोरा या सामानात आहेस काय?"

सामान कमीच त्यात औषधे व पिगिबँक व मुलाची 4 खेळणी ,
पुनः पुत्कार ऐकू आला व एकदाचा साक्षात्कार झाला .
आवाज करणारा साप नव्हता तर मुलाची रिमोट कार होती .
रिमोट व कार दोन्हीची बटन्स ऑन होती व काही ठरविक वेळाने कारला डीफेक्टिव्ह रिमोटमधून आपोआप सिग्नल जायचा व कार तिथल्या तिथे सरकायची .
फ्रिज च्या प्लास्टिक टॉप वर कार सरकल्याचा आवाज पुत्कार आल्यासारखा यायचा .

खोदा पहाड निकला चुहा
पण 2 रात्रीचा एकदम थरकाप उडवणारा अनुभव

अनुभवातून आलेले शहाणपण
खिडक्या उघड्या ठेवू नयेत
सेल ची खेळणी खेळून झाल्यावर बटन ऑफ करून ठेवायची .
मुख्य म्हणजे घाबरून न जाता मुख्य कारण शोधून काढणे आवश्यक

-- निलेश जोशी

Monday, January 4, 2016

तारक मंत्र

!! स्वामी समर्थ तारक मंत्र” !!

नि:शंक हो | निर्भय हो मना रे | प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे || अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी | अशक्य ही शक्य करतील स्वामी ||1||

जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय | स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय || आज्ञे वीणा काळ ना नेई त्याला | परलोकी ही ना भीती तयाला || 2 ||

उगाची भीतोसी भय हे पळू दे | जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे || जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा | नको घाबरू तू असे बाळ त्याचा||3||

खरा होई जागा | श्रद्धेसहित | कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त || कितीदा दिला बोल त्यांनीच हात | नको डगमगू | स्वामी देतील साथ||4||

विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ | स्वामीच या पंचप्राणामृतात || हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती | न सोडी कदा स्वामी जया घेई हाती ||5||

Tuesday, December 1, 2015

हतबलतेवर उपाय

दैनंदिन आयुष्यात अनेकदा मनुष्य परिस्थितीशी लढता लढता हतबल होतो. प्रत्येक वेळी अपयश येत रहाते. प्रकट आणि गुप्त शत्रूंची संख्या वाढत जाऊन त्यांच्या कारवायांनी हताश झाल्यासारखे वाटते. स्त्रीयांना काही वेळा त्यांच्या व्यावसायिक, नोकरीक्षेत्रात विकृत व्यक्तींशी संपर्क येतो...थोडक्यात जेव्हा सबंध जग विरोधात गेल्यासारखे वाटते तेव्हा....
श्रीदूर्गासप्तशतीमधील खालील मंत्र तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणू शकतो. रोज सकाळी आंघोळी नंतर खालील मंत्राचा जप देवी/कुलस्वामिनीचे स्मरण करून एकाग्रचित्ताने (न मोजता) सलग १५ ते २० मिनीटे करावा. हाच क्रम रात्री झोपण्यापूर्वी हातपाय धुवून पुनश्च आचरावा. सबंध दिवसभरातही या मंत्राचा जप अधुनमधुन करत रहावा. या मंत्राचा संबंध शुध्द भक्तिभावाशी आहे त्यामुळे यास कोणतीही बंधने नाहीत. केवळ शुक्रवार आणि मंगळवारी शक्यतो देविमंदीरात जाऊन प्रार्थनापूर्वक दर्शन घेणे अपेक्षित आहे..मंत्राचा जप करताना सकारात्मकता, देविवर श्रध्दा असावी. संकटमुक्तीनंतरही रोज कृतज्ञता म्हणून निदान २१ वेळा तरी मंत्रजप करत रहावा.

मंत्र :- "रक्षांसि यत्रोग्रविषाश्च नागा
यत्रारयो दस्युबलानि यत्र |
दावानलो यत्र तथाब्धिमध्ये
तत्र स्थिता त्वं परिपासि विश्वम् ||"

उच्चारणास सोपी फोड :-

रक्षांसि यत्रोग्र-विषाश्च-नागा
यत्रारयो दस्यु-बलानि यत्र |
दावानलो यत्र तथाब्धि-मध्ये
तत्र स्थिता त्वं परिपासि विश्वम् ||

Sunday, November 22, 2015

anagha gadgil catering

रसना स्नँक्स अँन्ड केटररर्स  आनंद नगर सिंहगड रोड येथे समर्थ पार्क शॉप नं ७,९, १० येथे आहे रोज चालु असते राइस प्लेट ८० रु  रोज स. ११ ते ३ संध्या . ७ ते १० वेऴ असते रोज भाज्या कोशींबीरी वेगळ्या असतात भाकरीचे ३ प्रकार असतात