नमस्कार
कालचाच नाते विषय संदर्भात अजुन काही
2 दिवसांपूर्वी महाराष्ट्रात जी काही परिस्थिति होती त्याने खूपच बैचेनी वाढली.त्यात ज्यांना मारामारीची झळ सोसावी लागली त्यातला कोणीच नात्यांचा नव्हता पण माणूस म्हणून माणसाशी जे नाते आहे त्या माणुसकीच्या बंधाने तर आपण नक्कीच बांधलो गेलोय यात कुणाचेच दुमत नसेल. ज्यांनी स्वतःमधील माणुसकी जिवंत ठेवली आहे त्यांना नक्कीच या दोन दिवसात त्रास झाला . आपण रोज जगतानाही कोणाला साधे लागले,खरचटलं तरीही आपल्याला वाईट वाटते इकडे तर जीव जाईपर्यंत मारणे असो किंवा गाड्याची तोडफोड असो . यात नुकसान सामान्य व्यक्तीचेच झालेय व सार्वजनिक मालमत्तेचे जास्त नुकसान झाले ज्यात सामान्य माणसाने भरलेला कर बरबाद झाला. एक मुलाचा व्हिडीओ बऱ्याच लोकांनी बघितलेला असेल जो व्हायरल झालेला ज्यात जेमतेम 10 वर्षाचा मुलगा हातात दगड घेऊन जातोय व जेव्हा त्याला विचारले की दगड कशासाठी तर त्यांना मारायला ज्यांनी आपल्यावर हल्ला केला . खरंच एवढे ज्ञान त्याचे स्वतःचे असेल की त्याला भडकवलेले ,भरवलेले होते?
उन्माद आणि उत्साह , भडकणे व भडकवणे यातील सीमारेषा खूपच धूसर आहे पण ज्याला ही सीमारेषा समजली ती व्यक्ती समंजस झाली असे आपण म्हणू शकतो . जन्माला माणूस येतो ते तेच सर्व शरीर घेऊन जे इतरांकडेही आहे पण जेव्हा त्याला जातीचे लेबल लागते आणि सगळं घोळ होतो . जीवनावश्यक गोष्टींना जातीचे लेबल लावून विकतो का आपण? ओपेरेशन करणारा डॉक्टर ,मदतनीस नर्स,फायर ब्रिगेडचा माणूस ,रक्तदाता यांची जर जात बघत नसू तर हे लेबल निव्वळ लोकांना भडकवण्यासाठी छापलेला बिल्ला आहे , फक्त नामनिधान , त्यातून ठोस फायदा काहीच नाही.
याउलट देवाने दिलेल्या शरीराचा समाजाला कसा उपयोग होईल असे जगलो तर अनेक जन्म त्या व्यक्तीला लक्षात ठेवतातच . बाबा आमटे याचे सर्वात योग्य उदाहरण म्हणावे लागेल .
ईश्वराने निर्मिताना भेदभाव नाही केला
धरतीने पालन पोषण करताना भेद नाही केला
वृक्षाने प्राणवायूचा पुरवठा सर्वाना एकच केला
नदीने ने पाणी देताना कोण कुठला ना पाहिला
पंचमहाभूताठायी मनुष्य एक समान असता
मनुष्यानेच जातीपातीचा घोळ तयार केला
आरक्षण ,पक्षातूनी स्वतःच गट तयार केला
अमर्याद निसर्ग नाकारून छोटा पिंजरा मान्य केला
सगळ्यांचा आदर करा तुमचा आदर नक्कीच केला जाईल....!!!!!
--- निलेश जोशी (बाबा निलेशानंद)
